सा य ना ई ड - (भाग २) Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सा य ना ई ड - (भाग २)

सायनाईड
प्रकरण दोन
दुपार च्या कामासाठी पाणिनी पटवर्धन ऑफिस मधून बाहेर पडायच्याच तयारीत होता. त्याच वेळी त्याची सेक्रेटरी सौम्या सोहनी म्हणाली, “ बाहेर च्या ऑफिस मध्ये डॉ. कार्तिक बसले आहेत, ते आपल्या ऑफिस मधे सारखे अस्वस्थ पणे येरझऱ्या घालत होते. मी त्यांना सांगितलं की ५ वाजायला आलेत आणि....”
“काय हवंय त्यांना ? “ पाणिनी पटवर्धन ने मधेच विचारलं.
“ ते म्हणताहेत की काही झालं तरी तुम्हाला भेटायच आहेच त्यांना , त्यांच्याकडे एक मोठ उपकरण आहे, ते टेप रेकॉर्डर सारखे दिसतंय “
‘ मी भेटतो त्यांना , “ पाणिनी पटवर्धन म्हणाला. “काहीतरी अती महत्वाचे असल्या शिवाय डॉ. कार्तिक असे तडकाफडकी येणार नाहीत “
“तडकाफडकी?” सौम्या सोहनी ने भुवया उंचावत विचारले.
पाणिनी पटवर्धन ने मान हलवली. “अन्यथा त्यांनी फोन केला असता.जेव्हा ते खूप अधीर असतात तेव्हा फोन करायच्या भानगडीत पडत नाहीत. काही तरी खूप तातडीचे काम असणार , त्यांना आत पाठव सौम्या “
सौम्या सोहनी बाहेर जायला निघणार तोच पाणिनी पटवर्धन ने तिला परत मागे यायची खूण केली “ मी स्वतः बाहेर जाऊन त्यांना आत घेऊन येतो , सौम्या , व्यावसाईक शिष्ठाचार म्हणून त्यांना मान दिल्यासारखे होईल.ते आवश्यक आहे.”
पाणिनी पटवर्धन ने त्याची फिरती खुर्ची मागे ढकलली , ताठ उभा राहिला आणि बाहेरच्या ऑफिस ला गेला.
“नमस्ते कार्तिक” डॉ कार्तिक ना तो म्हणाला.” एवढ्या तातडीने इथे येण्याजोग काय घडल बरं ? “
डॉ कार्तिक खुर्चीतून उठले पाणिनी पटवर्धनशी हस्तांदोलन केले आणि खजील पणे म्हणाले, “ पाणिनी पटवर्धन मला एका बाबतीत तुझा तज्ज्ञ म्हणून सल्ला हवाय “
“ काहीच हरकत नाही “ पाणिनी पटवर्धन म्हणाला. ” या आत या “ पाणिनी पटवर्धन त्यांना आतील खाजगी केबिन मध्ये घेऊन गेला.
“ ही सौम्या सोहनी माझी सेक्रेटरी , तुम्ही ओळखताच तिला “
“ हो हो चांगली ओळख आहे.” डॉ.डोंगरेम्हणाले; “ कशी आहेस सौम्या ? “
“ तुमची हरकत नसेल तर ती इथेच थांबेल. तिने चर्चेतील मुद्द्यांच्या नोंदी घेतलेल्या मला हव्या असतात “
“अगदी काहीच हरकत नाही माझी.” डॉ.डोंगरेम्हणाले, “ माझ फक्त एवढच म्हणणे आहे की मी इथे तुझा व्यावसाईक तज्ज्ञ या नात्याने सल्ला घ्यायला आलोय ,आणि मी इथे जे बोलेन ते अगदी गोपनीय राहिले पाहिजे. डॉ.डोंगरेम्हणाले, मला माहित्ये की मी तुझ्यावर भरोसा ठेऊ शकतो. मला माहित्ये की मी तुझ्या सेक्रेटरी वर भरोसा ठेऊ शकतो. मी आत्ता अशा परिस्थितीत सापडलोय की काय करू तेच मला सुचत नाहीये; मला सल्ला हवाय.
पाणिनी पटवर्धन ने खोलीच्या भिंतींकडे निर्देश केला , “ एका कायदे तज्ज्ञाच्या ऑफिस च्या चार भिंतीत तुम्ही आहात डॉ कार्तिक , तुम्ही जे काही बोलाल ते अत्यंत गोपनीय ठेवले जाईल.
“ समजा “ डॉ डोंगरेम्हणाले, “रुग्ण आणि डॉक्टर यातील चर्चा गोपनीय राखण्यात कायद्याच्या दृष्टीकोनातून काही तांत्रिक मर्यादा असल्याचे तुला आढळले तर / किंवा...”
पाणिनी पटवर्धन म्हणाला, “ कोणत्या व्यावसाईक चर्चेला गोपनीय म्हणायचे आणि म्हणायचे नाही या बद्दल कायद्यात पुरेशी स्पष्टता आहे. डॉ कार्तिक.”
“ कायद्याची ती एक अशी शाखा आहे जी मला अजिबात अभ्यासायची नाहीये. “
माझ्या पुरते म्हणाल तर माझं अशील मला जे काही सांगतात ते सर्व गोपनीय असत “ पाणिनी म्हणाला.
“ धन्यवाद “ डॉ डोंगरेम्हणाले,त्यांच्या थंड निळ्या डोळ्यात मिस्कील भाव चमकले.
“ तर मग आता मला त्या कायद्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. “
“ कुठला कायदा “”
“ रुग्ण व डॉक्टर यांच्यातील संवादा मधील गोपनीयतेचा. “
“ त्याच्या बद्दल काय ?”
“ मनात एक प्रकारची अपराधी भावना निर्माण झालेल्या एका स्त्री रुग्णाला मी तपासतोय. अगदी साध्या व्यावहारिक भाषेत सांगायचं झालं तर ती सध्या एका भावनिक दृष्ट्या असंतुलित झालेल्या अवस्थेत आहे. आणि लौकरच ती आम्ही ज्याला मानसिक ऱ्हास म्हणतो त्या अवस्थेला जाईल.”
“ मी तिला सर्वसामान्य पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला पण त्यात अयशस्वी ठरलो “ मला असा संशय होता की ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आहे. तरुण, अविवाहितमुलींबाबत अस नेहमी घडतं.मी सुचवलं की तिने सत्य शोधक द्रव्य प्राशानाची- ट्रूथ सिरम ची चाचणी द्यावी , तिने होकार दिला. मी तिची ती तपासणी केली....”
“ खरच, अशी चाचणी कितपत परिणामकारक असते? “
“ तुम्हाला काय अपेक्षित आहे आणि तुम्हाला काय मिळतंय यावर ते अवलंबून आहे.” डॉ डोंगरेम्हणाले. “ प्रायोगिक दृष्ट्या विचार करता जेव्हा एखाद्या विशिष्ठ गोष्टी बद्दल विशिष्ठ माहिती हवी असते तेव्हा ते शंभर टक्के परिणामकारक ठरते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर तुम्ही विद्यार्थ्यांचा एक गट घ्या त्यांना एक कृत्रिम गुन्हा करायला लावा.नंतर तुम्ही त्यांना टूथ सिरम च्या अमलाखाली आणलेत तर ते तुम्हाला त्यांनी काय केल ते सर्व काही सांगतील, अर्थात योग्य तंत्र वापरले गेले तर.या उलट तुम्ही एखादा पोचलेला, म्हणजे वर्षानुवर्ष गुन्हे करून ते नाकारणारा गुन्हेगार घ्या,तो अमलाखाली येऊन सुद्धा काहीच प्रतिसाद देणार नाही. बरेच वेळा असही घडतं की आपल्याला जेव्हा खात्री असते की एखादा माणूस नक्की दोषी आहे,तो , तपासणीमध्ये ज्या गुन्ह्यासाठी तपासणी चालू आहे उदा. घरफोडी,तर तो विशिष्ठ गुन्हा नाकारतो पण त्याच वेळी त्यांनी केलेल्या पण त्याला शिक्षा न झालेल्या खुना च्या गुन्ह्याची मोकळेपणाने कबुली देतो.ज्यांच्या मनात अपराधी पणाची बोच सलत असते पण महत्वाची वस्तुस्थिती दडऊन ठेवली गेली आहे असं
तुम्हाला वाटत असेल तर टृथ सिरम तपासणी परिणाम कारक ठरते .रुग्ण तुम्हाला कोणती गोष्ट सांगायला घाबरतो हे एकदा तुम्हाला समजले की तुम्ही रुग्णाचा विश्वास मिळवू शकता. विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत हे खरे आहे.
हे प्रकरण एका तरुण मुलीशी संबंधित आहे. जी शांत, सुंदर आणि भावनिक दृष्ट्या अस्वस्थ आहे..मला खात्री आहे की औषधाच्या अमलाखाली ती गुपित उघड करेल. उदाहरणार्थ लादले गेलेले गर्भारपण ; त्या ऐवजी ती सकृत दर्शनी काकांचा खून केल्याचे कबूल करते “
पाणिनी पटवर्धन चे डोळे बारीक झाले.
“ तुम्ही सकृत दर्शनी असा शब्द वापरलात “
“सकृत दर्शनी “
“ अस का म्हणालात तुम्ही? “ पाणिनी ने विचारले.
“ कारण या घडीला मला माहित नाहीये की तपासणीतून मिळालेल्या निष्कर्षाच मूल्यमापन कस करायचं “
“ ती नेमकी काय म्हणाली ते जस त्या तस तुम्ही सांगू शकता का? “ तुम्ही टिपण घेता की .....? पाणिनी ने विचारले.
“ मी त्यापेक्षा अधिक चांगली कल्पना लढवतो. डॉ डोंगरेम्हणाले. “ जे जे बोलले जाते ते सर्व मी टेप रेकोर्डर वर ध्वनिमुद्रित करून घेतो. अर्थात काही शब्द समजायला तुम्हाला अवघड जाईल. रुग्ण बरेच वेळा बरळतो किंवा झोपेत बोलल्याप्रमाणे बडबडतो. टेप रेकोर्डर ची एक खासियत आहे,जो पर्यंत आपल्याला रुग्णाच्या आवाजाचा स्पष्ट पणे अर्थ लावता येत नाही तोपर्यंत आपण तो पुन्हा पुन्हा मागे नेऊन ऐकू शकतो .परंतू ही तरुणी विशिष्ट मर्यादेत राहून अगदी स्पष्ट पणे बोलली “
पाणिनी पटवर्धन ने विचारल “ तुम्ही कोणते औषध वापरता?
“वेगवेगळ्या औषधांचे मिश्रण.मी आधी रुग्णाची तयारी करून घेतो.आणि त्याला बेशुद्ध अवस्थेत नेतो.जेव्हा रुग्ण त्या अवस्थेतून बाहेर यायला सुरुवात करतो,तेव्हा सोडीयम पेंटेथॉल चे सौम्य द्रावण वापरतो.आणि त्याच वेळी बोलण्याची इच्छा निर्माण होण्यासाठी,मानसिक उत्तेजना निर्माण करणाऱ्या वेगळ्या द्रवाचा वापर करतो.शारीरिक सुस्ती असते आणि त्याच वेळी बोलायची मानसिक इच्छा अशी आदर्श स्थिती काही मिनिटासाठी निर्माण होते. कधी कधी ती जास्त काळ ही टिकू शकते, ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं.”

डॉ डोंगरेयांनी पिशवीतून टेप रेकोर्डर बाहेर काढला आणि वायर पिन जोडून बटण चालू केले.
“ तुम्ही काळजी पूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका “
पाणिनी पटवर्धन आणि सौम्या सोहनी दोघांनी ते संभाषण ऐकले. आवाज पूर्ण थांबे पर्यंत टेप आल्यावर डॉ डोंगरेनी पुन्हा टेप गुंडाळली आणि मशीन बंद केले.टेप रेकॉर्डर पेटीत ठेऊन पाणिनी पटवर्धन कडे बघितले. “ मग, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुझं उत्तर काय आहे ? “
“ तुम्हाला काय उत्तर अपेक्षित आहे? “ पाणिनी पटवर्धन ने विचारलं
“ मला माझे कायदेशीर हक्क काय आहेत ते जाणून घ्यायचंय “
“ का? “
“ म्हणजे मला काय करायचं ते कळेल. “
“ कायद्या नुसार तुम्ही ही महिती पोलिसांना सांगितली पाहिजे अस जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही कराल ते?”
. डॉ डोंगरेनी क्षणभर विचार केला मग म्हणाले, “ नाही “
“ का नाही ? ”
“ माझी सद् सद् विवेकबुद्धी , नैतिक तत्वे याचा विचार करून. मानसोपचाराची शाखा निर्माण होण्यापूर्वीच रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संभाषणाच्या गोपानियतेबद्दल कायदा केला गेला आहे. आजकाल रुग्णावर उपचार करत असताना डॉक्टर ना रुग्णाच्या अंतर्मनात खोलवर रुतलेल्या रहस्यांचा अभ्यास करावाच लागतो. नैसर्गिक उपचार या विषयालाच मी माझं आयुष्य वाहून घेतलय. “
“ठीक आहे,कळल मला ” पाणिनी पाणिनी पटवर्धन म्हणाला. ” तुम्हाला काय करायचं आहे याची तुम्हाला कल्पना आहे. त्यात कायदा हस्तक्षेप करत नाही. तर मग प्रश्न येतो की तुम्ही माझ्याकडे नेमके कशासाठी आलात “
डॉ डोंगरे नी आपल्या जबड्यावर थोपटल्या सारखे केले. “ अगदी खरं सांगायचं तर मी तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घेतला होता अस समाधान मला मिळाव म्हणून आलो ! “
“ दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर “पाणिनी पाणिनी पटवर्धन म्हणाला, ” जर मी तुम्हाला अस सांगितलं असत की ‘कायद्या नुसार रुग्णाच्या विश्वासाचा तुम्ही मान राखला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्या कडून जी माहिती मिळाल्ये ती तुम्ही पोलिसांना द्यायची गरज नाही ‘ तर त्या स्थितीत तुम्ही स्वत:चे समर्थन करू शकला असता की मी वकिलांकडे जाऊन आलोय आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागतोय . “
“ अगदी बरोब्बर “ डॉ डोंगरे म्हणाले.
“ या उलट , जर मी तुम्हाला असा सल्ला दिला की जी काही माहिती तुम्हाला मिळाली आहे, ती
तुम्हाला पोलिसांना कळवावीच लागेल तर तुम्ही माझा सल्ला फेटाळून लावाल ? “
“ बरोबर आहे .”
“ तर मग या स्थितीत तुम्ही स्वतःला अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत आणाल .तुम्ही कायद्या पासून फक्त माहितीच दडवली असे होणार नाही तर कायद्याचे उल्लंघन करत आहात हे माहित असूनही तुम्ही माहिती दडवली असा अर्थ होईल. कायदेशीर भाषेत याला ‘ एक्सेसरी आफ्टर द फॅक्ट ‘ अस म्हणतात. “
“ हा एक नवाच दृष्टीकोन आहे. मी एका इथे आलो होतो., मी मान्य करतो यात बरेच कंगोरे आहेत. “
“ नक्कीच आहेत “ पाणिनी पाणिनी पटवर्धन म्हणाला. “ मला एक विचारून घेउ दे, तुम्हाला आधी. ही मुलगी खरं बोलत असेल अशी शक्यता किती आहे ? “ डॉक्टर म्हणाले, “ ज्या पद्धतीने ती बोलत होती त्यावरून ती खरच बोलत होती अस मानायला पाहिजे.” “ पण ती संपूर्ण सत्य सांगत नसावी. औषधामुळे आणि बोलण्यामुळे तिला मानसिक थकवा आल्यासारखा झालं होत. क्लिष्ट विचार मनात येताच तिने ते सहजतेने टाळले. तिने वस्तुस्थिती कथन केली पण स्पष्टीकरण करू शकली नाही.”
“ किंवा युक्तिवाद करू शकली नाही असे म्हणता येईल ? “ पाणिनी पाणिनी पटवर्धन ने विचारले.
“ तसं म्हण हवं तर . ती शुद्धीवर असण्याच्या अगदी शेवटच्या टोकावर होती. तिची विवेक बुद्धी जागरूक नव्हती. “
पाणिनी पटवर्धन ने त्यावर विचार केला., “ ज्या गुन्ह्याचा तिने उल्लेख केला तो तिचा कल्पनाविष्कार असण्याची शक्यता किती आहे ? “
“ मला नाही वाटत तसं “
“ मी काय म्हणतोय ते नीट ऐका डॉ. कार्तिक, मी तुम्हाला विचारतोय की ज्या गुन्ह्याची ती कबुली देत्ये तो तिच्या मनातील कल्पनेचा भाग असण्याची थोडीतरी शक्यता आहे का ? “
“ ओ हो ! मला अत्ता कळलं तुला काय म्हणायचय ते ! “डॉ. कार्तिक मोकळेपणाने हसून म्हणाले., “ आहे-आहे, तशी शक्यता आहे. “
“ किती शक्यता आहे ? “
“ फार नाही , पण शक्यता आहे हे नक्की.”
“ तर मग ,” पाणिनी पटवर्धन म्हणाला , “ ही खुनाची तथाकथित गोष्ट सांगायला तुम्ही समजा पोलिसांकडे घाई घाईत गेलात आणि मग हे सिद्ध झालं की ती मुलगी औषधाच्या अंमलाखाली असतानाचा हा सर्व परिणाम होता, तर ती रुग्ण मुलगी तुमच्यावर अब्रू नुकसानीचा आणि व्यावसायिक हित संबंध जपले न गेल्याचा दावा ठोकेल. तुमचं व्यावसायिक जीवन अक्षरशः पूर्णपणे उध्वस्त होईल.तुमच्या आणि तुमच्या रुग्णाच्या संबंधात बाधा निर्माण होईल. त्यामुळे तिने दिलेली गुन्ह्याची कबुली हा औषधाच्या अंमलाखाली असल्याचा परिणाम होता असं डॉक्टर म्हणून तुम्ही मला सांगू शकत असाल तर मला तुम्हाला सल्ला द्यावाच लागेल की खूप काळजीपूर्वक काय ते करा, सर्वात प्रथम वस्तुस्थिती शोधून काढा. “
“ खूप छान ! “ डॉ. डोंगरे उद्गारले.त्यांच्या आवाजातूनच मनावरचा तणाव हलका झाल्याचं कळत होत. “ तुला सांगतो मी आता, तिने दिलेली खुनाची कबुली ही औषधाच्या अंमलाखाली आल्यामुळे तिने केलेला एक कल्पना विलास असावा अशी शक्यता आहे. अगदी लाखात एक का असेना पण आहे.”
“ मग तर मी तुम्हाला सल्ला देईन की तुम्ही तातडीने या गोष्टीची माहिती काढायला सुरवात करावी. “
“ आणि अशा कामात मी अनुभवी नसल्याने, मी हे काम तुझ्यावरच सोपवतो ! “
पाणिनी पटवर्धन हसला, “ अगदी, काही हरकत नाही कार्तिक, पोलिसांकडे त्यासाठी ज्या गोष्टी सहज उपलब्ध असतात त्या आपल्याकडे नाहीत.त्यासाठी आपल्याला सावकाशीनेच पुढे जायला हवं, या शिवाय आपण रंगे हात पकडले जाऊ असे प्रश्न विचारायचे धाडसही आपण करू शकत नाही. “
“अगदी बरोबर तेच म्हणायचय मला.” डॉ डोंगरे कार्तिक म्हणाले. “ ही सर्व भानगड मी तुझ्यावरच सोपवतो.”
“ अशा तपासण्या चालू असताना तुमच्या बरोबर नर्स असते ? ” पाणिनी पटवर्धन ने विचारले
“ हो, अर्थातच. “
“ या तपासणीच्या वेळी कोण नर्स होती? “
“ एकता फेणाणी. तुला महित्ये ती ? उंच, करड्या डोळ्यांची, काळ्याभोर केसांची.“
“ हो, हो, मी भेटलोय तिला एकदा.”
“ मला तिची खात्री वाटत नाही. गूढ व्यक्तिमत्व आहे तिचं.”
“ तपासणीच्या वेळी जे घडलं ते ती सांगायची शक्यता आहे का ? “
“ मला नाही सांगता येणार “
“ जो रुग्ण खुनाची कबुली देतो आहे अशा साठी विशेष असा कोणता औषधोपचार असतो? “
“ म्हणजे अनन्या गुळवणी बद्दल म्हणायचय का ? “
पाणिनी पटवर्धन ने मान डोलवली.
“ अनन्या गुळवणी “ डॉ.डोंगरेम्हणाले, “ ही अपराधी भावनेची शिकार आहे.तिने केलेला गुन्हा , .... तुम्ही त्याला गुन्हा म्हणत असाल तर...”
“खुनाला गुन्हाच म्हणायची पद्धत आहे. “
“ लक्षात घे, की आपल्याला नेमक्या घटना माहीत नाहीत. संपूर्ण वस्तुस्थिती माहीत नाही.त्या तरुणीने केलेले विधान फक्त आपल्याला माहिती आहे.खास करून तिला असं वाटतंय की तिच्या हातून पाप घडलंय.ती चुकीची वागली आहे,कायद्याच्या ,शिक्षेच्या कचाट्यातून ती सुटली आहे.त्यामुळे स्वतःला शिक्षा करून घ्यायची इच्छा तिच्या मनात आहे.तिला प्रायश्चित्त घ्यायचं आहे. मानसिक दृष्टया खचलेल्या आणि नाजुक स्वभावाच्या तरुणीला असं वाटणे खूप गंभीर ठरतं. तिला सर्वात पहिली कशाची गरज असेल तर , त्याची कबुली देणे.सुप्त मानसिक अवस्थेत तिला त्याची जाणीव आहे.म्हणून तर तिने ट्रुथ सिरम घेऊन तपासणी करून घ्यायला संमती दिली. “
“ उपचाराचा एक भाग म्हणून मी तिला माझ्या समोर कबुली देण्याची संधी देणार आहे. नंतर तुझ्या समोर तिला द्यायला लावणार आहे. “
“ माझ्या समोर ? “
डॉ डोंगरेनी मान डोलवली.
“ अर्थात , डॉ. कार्तिक, आपण विस्तवाशी खेळतोय हे तुम्हाला सांगायची गरज नाही.”
“ मला माहित्ये. पण मी माझ्या रुग्णांना मदत करायचाच नेहमी प्रयत्न करतो. तेच माझ मुख्य तत्व आहे.”
“ आणि मी माझ्या अशिलांना मदत करायचा प्रयत्न करतो. “ पाणिनी पटवर्धन म्हणाला.“ आणि हे माझे तत्व आहे.”
दोघेही काही काळ शांत बसले.
“ बरं, मग तुझं अशील या नात्यानं तू मला काय सल्ला देणार आहेस? “
“ माझा सल्ला आहे की आपण वस्तुस्थिती काय आहे हे शोधून काढू पण आपण काळजीपूर्वक पुढे जाऊ. “
“ ठीक आहे ,छान, मी तुला पुन्हा संपर्क करीन.उद्या मी तिला साडे नऊ वाजता घेऊन येतो. “
ती ज्यांचा उल्लेख करत्ये,त्या तिच्या हर्षल काकांचे काय? “ पाणिनी पटवर्धन ने विचारले. “ सकृत दर्शनी तुम्हाला तो माहिती होता असं दिसतंय. “
मला माहीत होता तो., खरं तर तो तिचा नातलग होता, काका नव्हता. तिचा बरोबर कायम असायचा.त्याच्या शेवटच्या आजारपणात तीच त्याच्याबरोबर घरात होती.तीन महिन्यापूर्वी हर्षल गेला.रक्ताच्या गुठळ्या झाल्याने मृत्यू आला असं कारण डॉक्टरांनी दिलं. “
“ पोस्ट मार्टम झालं नाही का? “
‘ नाही. शव दफन केलं गेलं.”
“ शरीरात मसाला वगैरे भरून ? “
“ अर्थात “
“हा मुद्दा अजूनच एक गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण करतो. वापरलेलं विष जर पोटॅशियम सायनाइड असेल तर शरीरात भरलेल्या मसाल्यामुळे विष प्रयोगाचे सर्व पुरावे नष्ट होतील.अर्थात, विषाची बाटली जर मिळवता आली किंवा त्या तरुणीचा कबुली जबाब मिळाला तर वेगळी गोष्ट अन्यथा गुन्ह्याचा ठोस पुरावा राहणार नाही “
“आणि जर गुन्ह्याचा ठोस पुरावा राहणार नसेल,” डॉ. डोंगरेम्हणले, “ तर माझी माहिती मी पोलिसांना देण्यात काहीच अर्थ राहणार नाही.बरोबर? “
“ मी तसं म्हणालेलो नाही.” पाणिनी पटवर्धन म्हणाला.
“ तुझ्या म्हणण्याचा तोच अर्थ निघतो.”
“ तसं करू नका.” पाणिनी पटवर्धन म्हणाला,” मी फक्त तुमचं लक्ष महत्वाच्या मुद्द्याकडे वेधलं ” तुम्हाला मी प्रकरणाचा तपास करायला हवाय ; मी करीन तो.जर असं लक्षात आलं की वापरलं गेलेल विष हे पोटॅशियम सायनाइड च होतं आणि शरीरात मसाला भरला होता तर मुलीला दोषी ठरवणे पोलिसांना अशक्य होईल.अशा स्थितीत तुम्ही पोलिसांकडे स्वतःहून गेलात आणि सांगितलं की मानसिक दृष्टया खचलेल्या एका तरुणीने औषधांच्या अंमलाखाली असताना आणि भ्रम झाला असताना एका गुन्ह्याची कबुली दिली आहे , अन्यथा अशी कबुली मिळवणे अशक्यच होते, तर पोलीस तुम्हाला लगेच अक्षरशः हाकलून देतील आणि सांगतील की हे सर्व विसरून जा आणि ही बातमी लोकांत पसरू देऊ नका.”
“ असं झालं तर फारच मस्त होईल. “ पण समजा दुसरंच विष वापरलं गेलं असेल तर ? डॉ डोंगरेनी शंका व्यक्त केली.
“ जे विष वापरलं गेलं ते फारच जलद गतीनं परिणाम करणार होतं,’रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू’. असं दाखला डॉक्टरांनी दिलाय . या दोन गोष्टी, ते पोटॅशियम सायनाइड च होते हे सिद्ध करायला पुरेशा आहेत. ”
डॉक्टरांनी मान हलवली.
“ त्यामुळे मी आता तपास चालू करतो.दरम्यानच्या काळात तुमची कोणी अधिकृत रित्या चौकशी केली तर सांगा मला. म्हणजे तुम्हाला काही माहिती मिळाली आहे,एका वकिलाचा सल्ला घेतला आहे.आणि त्या वकिलाने असं सांगितलंय की कोणतीही आतताई पणाने आणि घाईने कृती करण्यापूर्वी सखोल तपास करायला पाहिजे.
या सर्वात माझे चार्जेस अगदी नाममात्र असतील.पण मला तपासाच्या कामासाठी वेगळी माणसे नेमावी लागतील. कमीत कमी खर्च होईल असे मी पाहीन.त्या अनन्या गुळवणी कडे पैसे आहेत का ? “
“तिच्याकडे नाहीत , पण माझ्याकडे आहेत.”
“ नाही नाही मला तुमच्यावर तो भर टाकायचा नाही.....”
“ ते सोडून दे ! “ डॉ. कार्तिक त्याला मधेच तोडत म्हणाले. “ मी या आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स च्या दृष्टीने बऱ्याच वरच्या स्लबॅ मध्ये आहे. कायदेशीर बाबी वर म्हणून मी जेवढा खर्च करीन तेवढी मला वजावट मिळेल.मला मानसिक शांतता लाभेल.या सर्वात माझी पत दानाला लागल्ये. तू लगेच कामाला लाग ,कशाचीही कमतरता ठेऊ नको.”
“ मी कमीत कमी खर्च येईल असं पाहीन. “
“ मी सांगितलंना तुला एकदा ? कोणतीही कमतरता ठेऊ नको. “
“ तरी पण मी कमीत कमी खर्च येईल असं पाहीन. “
डॉक्टर काहीतरी बोलणार तेवढ्यात पाणिनी पटवर्धन मधेच म्हणाला, “ अर्थातच खर्चाचा मुद्दा कदाचित तपासणीच्या वेगावर परिणाम करेल तरीसुद्धा एक सुजाण नागरिक आणि आपल्या रुग्णासाठी माझं सहाय्य घेणारा डॉक्टर या नात्याने,आपल्याला.....”
डॉ. डोंगरे हसले. “ तुला काय वाटतंय हे माझ्या लक्षात आलय पाणिनी पटवर्धन. तुझ्या अंदाजाने तुला योग्य वाटेल ते कर.”
‘ त्या टेप रेकॉर्डिंग चं काय करणार आहात तुम्ही ? “ पाणिनी पटवर्धन ने विचारले.
डॉ. डोंगरेहातात टेप रेकॉर्डर घेऊन दाराकडे निघाले.” माझ्या दृष्टीने फक्त पाच माणसांनीच हे रेकॉर्डिंग ऐकलय; तू,सौम्या सोहनी,माझी नर्स,अनन्या गुळवणी,आणि मी स्वतः “
पाणिनी पटवर्धन विचारात पडला. “ पाच माणसे म्हणजे खूप झाली. “
“ ही संख्या कशी कमी करता येईल? काही सुचतंय का ? “
पाणिनी पटवर्धन ने मान हलवली. “आता काही होण्यासारखे नाही. तुमची नर्स तिथे नसती तर बर झालं असत.”
“ मला ही आता तसं वाटतंय. पण केवळ बेशुद्ध अवस्थेतील रुग्णाला सांभाळण्यासाठी च नर्स लागते असं नाही तर भावनिक दृष्ट्या अस्वस्थ अशा तरुणीला,खोलीत नर्स मदतीला असल्याशिवाय तुम्ही औषधाच्या अमलाखाली आणू शकत नाही.,”
पाणिनी पटवर्धन ने मान डोलवली.
डॉ. डोंगरेम्हणाले, “ आपण उद्या नऊ तीस ला भेटू मग.” त्यांनी दारातून अच्छा केला.
सौम्या सोहनी ने पाणिनी पटवर्धन कडे पहिले. “ कनक ओजस हवाय? “
तो एक उत्कृष्ट असं खाजगी गुप्त हेर होता.पाणिनी पटवर्धन चा खास मित्र .पाणिनी पटवर्धन ची सर्व कामे तोच करायचा, त्याची स्वतःची डिटेक्टिव्ह फर्म होती. हाताखाली अनेक माणसे होती.
पाणिनी पटवर्धन ने मान हलवली “ त्याला फोन कर,तो लगेच इकडे येऊ शकतो का विचार .”कनक ओजस चं ऑफिस पाणिनी पटवर्धन च्याच मजल्यावर असल्याने सौम्या चा फोन आल्यावर काही मिनिटातच तो पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसात हजर झाला.एका विशिष्ट पद्धतीने त्याने दारावर दार टक- टक केली. ती पद्धत पाहून कनक आल्याचे दोघानीही ओळखले.सौम्या ने दार उघडून त्याला आत घेतले. चांगला उंचपुरा असूनही कुणाच्या सहज नजरेत न भरण्याची कला त्याने आत्मसात केली होती.तो आत येऊन अशीलांसाठी ठेवलेल्या गुबगुबीत खुर्चीत तिरका बसला.खुर्चीच्या एका हातावर आपली पाठ टेकवली तर दुसऱ्या हातावर तंगड्या पसरल्या !
“ बोला महाशय ! “
पाणिनी पटवर्धन म्हणाला , “ माझ्याकडे नेहमीपेक्षा वेगळच प्रकरण आलंय. माझ्यासाठी माहिती काढायची आहे तुला. काळजीपूर्वक आणि सावकाश काम सुरु कराव लागेल.असा काही तपास केला जातोय हे कुणालाच कळता कामा नये. या प्रकरणात तुझ्यावर वेळेचे बंधन नाही.जरा निवांत पणेच हे सर्व करायचं आहे.”
ओजसने डोळे चोळले,कान ओढल्या सारखे केले.
“ काय झालं ? “ पाणिनी पटवर्धन ने विचारले.
“ स्वप्नात तर नाहीये ना मी ? “ ओजस उद्गारला. “ अत्तापर्यंतची तुझी पद्धत म्हणजे मला बोलवायचं अन् सांगायचं की माझ्याकडे एक प्रकरण आलंय जे मला तुझ्याकडून काही तासात किंवा मिनिटातचं पूर्ण करून हवंय. हा क्लिष्ट तपास पूर्ण करण्यासाठी कितीही माणसे कामाला लाव. मला उद्या सकाळ पर्यंत ते पूर्ण झालेलं दिसलं पाहिजे. आणि आता या प्रकरणात मात्र तू वेगळच काहीतरी बोलतो आहेस ! “
“ अगदी बरोबर ! पाणिनी पटवर्धन हसून म्हणाला.” तू नेहमी म्हणायचास ना की पुरेसा वेळ मिळाला आणि जास्त माणसे कामावर नेमली नाहीत तर तू जास्त चांगले काम करू शकतोस ! “
“ आता ऐक जरा नीट, मी म्हणालो होतो की आपण आर्थिक दृष्ट्या अधिक काटकसरीने काम करू शकतो.जेव्हा जास्त माणसे अधिक वेगात कामाला लावली जातात, तेव्हा कधीकधी त्याच कामाला दुप्पट श्रम खर्च होतात आणि मानसिक आणि शारीरिक ताण येतो.खर्चावरही बोजा पडतो. तू......”
“ माहित्ये मला.” पाणिनी पटवर्धन म्हणाला. “ या प्रकरणात तू जेवढे शक्य असेल तेवढे काटकसरीने पण सक्षम पणे काम करायचं आहेस. हर्षल मिरगल नावाच्या माणसाची पूर्ण पार्श्वभूमी खणून काढ.तो याच शहरात राहत होता.तीन महिन्यापूर्वी तो गेला. म्हणजे वारला.रक्ताच्या गुठळ्या झाल्याने मृत्यू असं कारण दिलय.त्याची मालमत्ता आहे का ? ,किती आहे?,कोणी त्याची मागणी केली आहे का? हे मला काही माहीत नाही पण मला ते सर्व हवंय.त्याच्या वारसांची नाव मला हव्येत.तो मेला तेव्हा त्याच्या बरोबर कोण होते, त्याने मृत्युपत्र केले होते का? केव्हा केले,त्याने विमा उतरवला होता का? ज्या डॉक्टर ने मृत्यू दाखल्यावर सही केल्ये त्याच्याशी तुला बोलावे लागेल.मृत्यू समयी काय लक्षण दिसत होती ते मला शोधून काढायच आहे.तू विमा कंपनीचा प्रतिनिधी आहेस असं भासवायला लागेल तुला “
“ छे, छे ! “ ओजस म्हणाला “ असले प्रकार आम्ही नेहमी करतो. बऱ्याच वेळी आम्ही विमा कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करतो ”
“ मला वाटल त्यांचे स्वतःचे तपास करणारे अधिकारी असतात. “
“ असतात तसे, पण कधी कधी ते आम्हाला बोलावतात. “
“ ठीक आहे .” पाणिनी पटवर्धन म्हणाला.” सुरु कर तपासाला. सावकाश कर फार घाई नाहीये,ज्याला तू काटकसरीने व सक्षम पणे असं म्हणतोस , अशा पद्धतीने हे प्रकरण हाताळ.”
“ बरं, करुया तसच “ ओजस म्हणाला. आणि त्याने निरोप घेतला.

प्रकरण २ समाप्त