सा य ना ई ड - (भाग ८) Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

सा य ना ई ड - (भाग ८)

सा य ना ई ड (भाग ८)

सौम्या ऑफिस चे दार उघडून आत आली तेव्हा पाणिनी सुप्रीम कोर्टाचे अद्ययावत निवाडे वाचत बसला होता.” कशी झाली सहल, सौम्या?”


“ मी त्या होटेल मध्ये बसून समुद्र किनारी स्नान करत असल्याच्या आणि लाटांवर तरंगत असल्याच्या कल्पना मन:चक्षू समोर आणत होते !”


“आणि मी हेरंब खांडेकर बरोबर व्यावसायिक तत्वे, गुन्ह्या बाबतचा पुरावा, असल्या घाणेरड्या विषयावर चर्चा करत असल्याचे मनासमोर रंगवत होतो.”


“ आणि आता सगळा विषय संपलाय?,


कसा काय ?”


अनन्याला शेल्फ वर गोड गोळ्यांची एक जास्तीची बाटली सापडली. हर्षल चॉकलेट पिऊन पडे पर्यंत आणि तिच्या वर आरोप करे पर्यंत ती नेहेमीची बाटली नसावी असे तिला अजिबात वाटले नाही.ती लगेच तिच्या खोलीत पळत गेली आणि ज्या जागी विषाच्या गोळ्या लपवल्या होत्या तिथे जाऊन शोधले तेव्हा तिला कळले की त्या जाग्यावर नव्हत्या.तेव्हा तिला कळलं की तिने शेल्फवर गोड गोळ्यांची जादा बाटली ठेवली होती त्यातल्याच गोळ्या तिने घेतल्या होत्या हर्षलला चॉकलेट मध्ये घालण्यासाठी. तिच्यावर आरोप केला गेला तेव्हा तिला स्वाभाविक पणे वाटले की कोणीतरी तिच्या गोड गोळ्या ठेवण्याच्या जागी सायनाईड च्या गोळ्या ठेवल्या आहेत. आणि त्याच तिच्या हातून हर्षल मिरगल ला दिल्या गेल्या आहेत.”


“ पण तिने नाही दिल्या?” सौम्या ने विचारले.


“ अर्धवट माहिती वर विसंबून तिने घाई घाईत चुकीचा निष्कर्ष काढला. त्याच गोळ्या विषाच्या समजून तिने तळ्यात टाकल्या.ती स्वतः ला दोषी समजू लागली.परिस्थितीजन्य पुराव्याचा हा फार मोठा दोष असतो सौम्या.”


“ पण अनन्या गुळवणी ने तिच्या खोलीत ठेवलेल्या सायनाईड च्या गोळ्या चे काय झाले असावे असे तुम्हाला वाटतंय?” सौम्या ने विचारले.


“ ही गोष्ट मात्र आपल्याला लौकरात लौकर पण शांतपणे आणि समजदारीने शोधून काढायला लागणार आहे.. मनात आत्महत्येचे विचार येत असणाऱ्या तरुणीने विषाच्या गोळ्या जवळ बाळगणे हे स्वाभाविकच आहे.”


“ सर,मिरगलने अनन्याचा जो छळ चालवला होता त्यामागे काय असावे?, ज्याच्यावर तिने प्रेम केले त्याला सोडून कायमचे निघून जायला सांगायचे याचा विचारच करू शकत नाही.”


“ ते सांगणे ही महत्वाची गोष्ट नाहीये., ती तस करणार होती ही बाब महत्वाची आहे,, ती स्वतःला संपवायला निघाली होती याचा अर्थ तोच आहे. मिरगल हा सैतानच असला पाहिजे. गुळवणी ने केलेल्या विधानावर विसंबून मला मिरगल बद्दलच मत बनवायचं नाही.बर ते जाउ दे, अनन्याचे काय केलं आहेस तू?”


“ मी तिला सोडून दिल बीच वरच.” पाणिनी ने प्रश्नार्थक भुवया उंचावल्या.” तिला रहायचं होत तिथे शांततेला.तिला मी जेव्हा सांगितलं की सगळा विषय संपलाय, तेव्हा तिला खूप बर वाटलं, ती अशी मोकळ्या मनाची नाही आपल्या भावना दाबून ठेवणारी आहे. तिला सध्या घरी पण जायचं नाहीये अन् कोणाला भेटायचं पण नाहीये.तीच म्हणणे आहे की नाहीतरी होटेल चे भाडे उद्या पर्यंतचे दिलेलेच आहे तर आजची रात्र तिथे राहवे आणि सकाळी बस ने परतीन.


“ तुला वाटतंय ना ती ठीक होईल?” पाणिनी ने विचारले.


“ मला वाटतंय . तसा तिचा अंदाज येणे सोपे नाही पण ती म्हणाल्ये की ठीक होईन म्हणून.माझ्या मनात आले होते की कदाचित तिला निमिषला फोन करायचा असेल आणि तिथे भेटायचं असेल. जे काही घडलं ते त्याने दुसऱ्या कोणाकडून ऐकण्यापेक्षा तिला स्वतःलाच त्याला सांगण्याची इच्छा असेल.”


‘’ तसे असेल नक्कीच. चला आजचा दिवस भरला असे समजू आणि........”पाणिनी म्हणाला. तेव्हढ्यात कनक ओजस ने दारावर विशिष्ट प्रकारे वाजवलेली टकटक ऐकू आली.सौम्या ने भुवया उंचावून खुणेनेच पाणिनी ची परवानगी मागितली.त्याने ही दार उघडून ओजस ला आत घेण्याची सौम्या ला खूण केली.ती दार उघडायला गेली


“ आम्ही अत्ताच आवरा आवर करायच्या बेतात होतो. तू खूप अधीर आणि उत्तेजित झाल्यासारखा दिसतो आहेस.काय झालं?”


दार बंद करून ओजस आत आला , नेहमी प्रमाणे गुबगुबीत खुर्चीच्या हातावर एक पाय टाकून बसला नाही,सरळ आणि अर्धवट उठायच्या स्थितीतच बसला.पाणिनी च्या डोळ्याला डोळे भिडवून विचारले


“ पाणिनी, एखादी गोष्ट मला न सांगता ओढवून घेशील का स्वतःवर?”


“ काय झालं काय पण ?”

“ मला आश्चर्य वाटतंय की ते करण्याजोगा तू मूर्ख कसा?”


“ काय मूर्खपणा केलाय मी?”


“ त्या गोड गोळ्यांची बाटली तूच त्या तळ्यात टाकणे आणि त्या पोरांना ती काढण्यासाठी पैसे देणे.” ओजस म्हणाला.


“ तुला अस तर म्हणायचे नाहीना की हेरंब खांडेकर मी हे केले असावे असे सुचवण्याचा प्रयत्न करताहेत?”


“ त्यांनी अजून तुझ्यावर खास असा आरोप ठेवलेला नाही पण नंतर ठेवतील.सध्या ते सगळ्या परिणामांचा विचार करताहेत.”


“ त्यांच्या मेंदूत ही कल्पना कोणी भरवली?


“ तुला मान्य करायला हव की अनन्या गुळवणी ने ज्या बाटलीत सायनाईड आहे असं आग्रहाने म्हंटल ती बाटली ....”


“ तिने तसा कोणताही आग्रह धरला नव्हता.” पाणिनी त्याला मधेच तोडत म्हणाला.


“ तिला तस फक्त वाटलं होत.”


“ मला ज्या पद्धतीने विषय कानावर आलाय त्या नुसार तिने डॉक्टरांना त्या बाटलीत सायनाईड आहे असे खात्रीलायक पणे सांगितले.”


“ तुला अशा अनेक भाकड कथा कानावर येतील.पण मी ती बाटली तळ्यात टाकली असेल अशा कल्पनेने तुला एकदम भडकायला काय झालं हे ऐकण्यात मला जास्त रस आहे.”


“ त्यांना दुसरी बाटली सापडली.”


“ “ काय ? “ पाणिनी दचकून ओरडलाच.


“ खांडेकर आणि इतरांना निरुत्तर करून तू जेव्हा पोलीस चौकीतून बाहेर पडलास तेव्हाच खांडेकर ना अंदाज आला होता की तू नेहेमी प्रमाणे काहीतरी धक्कादायक नाटक केले असशील.पोलिसांनी तळ्यापाशी जाऊन पुन्हा पाणबुड्यांना आत उतरवले आणि बाटली मिळवली.”


“ ‘बाटली ‘ म्हणजे?”


“दुसरी एक बाटली. ती अगदी आधीच्याच बाटली सारखी होती , त्यात शिशाचे गोळे आणि गोळ्या होत्या, आणि त्या सायनाईड च्या होत्या.! ”


“ अरे देवा ! “ पाणिनी हळहळला.


“ खांडेकर यांच्या दृष्टीकोनातून विचार कर,त्यांनी तुला रंगे हाथ पकडलाय. मान्य आहे मला की तपासणी च्या तुझ्या कल्पना नेहमीच्या चौकटीत बसणाऱ्या नसतात.पण गोड गोळ्यांची बाटली स्वतः तळ्यात फेकून ती पोरांकडून बाहेर काढून अनन्याला निरपराधी सिद्ध करायचा तुझा डाव असेल तर तू त्यात तुझं नाक पुरतं अडकवून घेतलं आहेस.”


“ हे मी केल्याचा काही पुरावा आहे का ?” पाणिनीने विचारले..


“ दोन मुलांनी तुला पाण्यात काहीतरी फेकताना बघितलंय”


“ किती बेसावध होतो मी ! अनन्याने बाटली साधारण किती लांब टाकली असेल याचा अंदाज त्या मुलांना देण्यासाठी मी दगड भिरकावून पहिला.ते मुलांनी पाहून खांडेकर ला सांगितले असेल.”


“ खांडेकर ना हे सर्व म्हणजे तू केलेली क्लुप्ती किंवा चमत्कार वाटला म्हणून तर त्यांनी पुन्हा मूळ बाटली सापडत्ये का हे पाहिले.त्यांना जी बाटली मिळाली ती खरी आहे असा त्यांचा दावा आहे.तू खांडेकर च्या जागी असतास तर हाच विचार केला असतास. त्यांनी एक अंदाज केला, तो बरोबर ठरला आणि त्यांना पुरावा मिळाला.”


“कनक, तुला ही माहिती कशी मिळाली?”


“ माझ्या एका पत्रकार मित्रा कडून.”


“ खांडेकर ती पेपर ला देणारेत?”


“ ते अत्यंत नीतीमत्तेला धरून वागतात ! त्यामुळे ते स्वतः नाही देणार ! पोलिसांना ती बातमी पेपर वाल्यांना द्यायला लावणार आहेत.पोलीस त्याची मोठी नाटकी बातमी करायच्या विचारात आहेत.जेव्हा तळ्यातून काढलेली ती बाटली गोड गोळ्यांची निघाली,तेव्हाच खुनाच्या प्रकरणाचे बारा वाजले.पण खांडेकर नी आग्रह धरला की पाणिनी पटवर्धन ने तळ्यातून काढलेली बाटली ही अनन्याने टाकलेलीच बाटली होती याचा थेट पुरावा उपलब्ध नाही.त्यामुळे त्यांनी पुन्हा तळ्यात पाणबुडे पाठवून आणखी एखादी बाटली आहे का हे शोधायला लावलं, त्यांना ती मिळाली.त्यात सकृत दर्शनी सायनाईड आहे.ते तपासायला दिलंय.”


पाणिनी ने सौम्या ला खूण केली.” अनन्याला फोन लाव.” सौम्या ची बोटे फोन च्या डायल वरून फिरत होती तेव्हा ओजस म्हणाला, “ पाणिनी तू केलेले नाहीस ना?”


“ काय केलेले नाहीस ना?”


“ती बाटली तळ्यात तू टाकली नाहीस ना? “


“ तुला मी मूर्ख वाटलो का?”


“ पण त्यातून तू सुटून गेला असतास तर या सारखी योजना नव्हती ! सगळ्या कोड्याला उत्तर मिळाल असतं. खांडेकर चं जनमानसात हसे झाले असते.”


“ थोडक्यात खांडेकर ज्याला पाणिनी पटवर्धन ने केलेला नाट्यमय चमत्कार म्हणतात ! ”तुझ्या माहितीसाठी सांगतो, ही काही माझी युक्ती किंवा चमत्कार नाही.पोलिसांच्या सिद्धांता मधील कच्च्या दुव्यांना समोर आणण्यासाठी मी काही गोष्टी करतो.साक्षीदाराच्या तपासणी मधील खोटे पणा उघडा पाडण्यासाठी मी त्यांची उलट तपासणीही घेतो पण मी मुद्दाम पुराव्याची पेरणी करायला जात नाही.”


ओजस चा चेहेरा थोडा निवळला .तो खुर्चीत जरा आरामात बसला.” मला कळलं तर बरंच होईल, की तू हे केलेले नाहीस हे कसं सिद्ध करणार आहेस?”


“मी हे केलंय असे खांडेकर यांनीच सिद्ध करूदे.”


ओजस ने मानेने नकार दिला.” जनतेच्या मानसिकतेचा विचार केला तर खांडेकर ने त्याला हवंय ते सिद्ध केलंय.”


सौम्या हातात फोन धरून म्हणाली.” होटेल मधून सांगताहेत ही अनन्या होटेल सोडून निघून गेली.”


“कोण आहे पलीकडून बोलणारे?”


‘ मॅनेजर बाई आहे.”


“बोलतो मी तिच्याशी.” पाणिनी ने फोन घेतला.” तुम्हाला त्रास देतोय जरा, गुळवणी बद्दल मला माहिती हवी आहे. तुम्ही म्हणताय की तिने होटेल सोडलं म्हणून? कसं सोडलं तिने?


” एका तरुणाचा फोन आला होता ,त्याने तिचा नंबर मागितला,मी दिला. त्याने तिला फोन केल्यावर ती दोघे मिळूनदहा पंधरा मिनिटा पूर्वी गाडीतून बाहेर निघून गेले., पण मला सांगा, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला यात रस का आहे? ”


“मी त्यांचा स्थानिक पालक आहे. ” पाणिनी म्हणाला आणि ओजस कडे वळून पुन्हा म्हणाला,” तर तू काहीतरी तक्रार करत होतास.”


“ घाई घाईत तपास करायची तुला एवढी सवय आहे की आरामात तू काही करू शकत नाहीस.ते आता काही राहिले नाही.तू आता तुझ्या हाताखालचे गुप्तहेर कामाला लावणे, फोना फोनी करणे, रात्री अपरात्री कामे करणे असे दैनंदिन कामकाज करू शकतोस ! “पाणिनी म्हणाला.


“ काय हवंय तुला पाणिनी? “


“मला निमिष जयकर ची सर्व माहिती हवी आहे. अनन्याचा प्रियकर आहे.आणि त्याच्याच बरोबर ती पंधरा मिनिटा पूर्वी होटेल मधून बाहेर पडली. मला हर्षल मिरगल ची सर्व पार्श्वभूमी हवी आहे. तशीच लीना बुद्धीसागर जोडप्या बद्दल सुद्धा. या प्रकरणात पोलीस काय करताहेत ते ही हवंय. ज्याचा ज्याचा यात संबंध आहे त्या सर्वाची माहिती हवी आहे.”


ओजस म्हणाला. “बलदेव माझ्या ऑफिस मधे आलाय.त्याने कित्येक वर्षे मिरगल साठी काम केलेआहे.तो एक नमुनाच आहे.मी त्याला सुचवलंय की तुला भेट.खर तर त्याला ऑफिस च्या वेळेत ये म्हणून सांगितल होत पण मला त्या दुसऱ्या बाटलीचा अहवाल मिळण्यापूर्वीच तो आला.मी त्याला तिथेच बसवूनच इथे आलोय.”

“त्याला काय माहित्ये?”


“सर्व काही. तो मिरगल चा गेली तीस वर्षे हरकाम्या होता.माझ्या माणसाने जेव्हा त्याची मुलाखत घेतली तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो असा माणूस होता की त्याच्या नजरेतून काही म्हणजे काहीच निसटत नसे. माझ्या माणसाने अहवाल आणि त्याचा सारांश दिलाय पण त्याचे म्हणणे आहे की बलदेव शी मीच बोलले पाहिजे. कारण काहीतरी स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे जो अहवालात देता येत नाही.म्हणून मला वाटलं की आधी मी त्याचा जरा अंदाज घेतो आणि नंतर वाटलं तर तू त्याला भेटू शकतोस. ”

“बलदेव तयार झाला यायला ?”


“त्याला यायचं नव्हत” ओजस म्हणाला.” खूप व्यस्त आहे अस भासवल त्याने, पण माझ्या माणसाने त्याला काही लाच देऊ केली येऊन तुला भेटण्या साठी त्या बरोबर तो तयार झाला.मिरगल ने त्याला छदाम सुद्धा ठेवला नाही.”


“ जा आणि त्याला घेऊन ये इकडे.” पाणिनी म्हणाला.“ आणि तुझी माणसे कामाला लाव.तुझे सगळे अहवाल एकत्रच आण, पटापट माहिती गोळा कर.”


“ हे कितपत गंभीर असू शकेल?” ओजस ने विचारले.


“ काय गंभीर असेल?”


“ खांडेकर ने तुझ्यावर बाटली बद्दल आरोप करणे.”


“खूप गंभीर.पण मी काहीही करून त्यातून बाहेर पडीन. मला काळजी आहे ती अनन्याचे काय होईल याची.” पाणिनी सौम्या कडे पाहून म्हणाला,” डॉ. कार्तिक कुठे जाणार होते काही कल्पना आहे का?”


“ नाही माहिती. मी त्यांच्या ऑफिस ला फोन करून.....”


“ नको करू फोन. त्यांची ती नर्स पोलिसांशी संपर्क ठेऊन असते.टेप रेकॉर्डिंग ची बातमी तिच्या मार्फतच बाहेर फुटली.” “ ठीक आहे कनक, आण त्या बलदेव ला इथे.”


दारातून बाहेर पडतानाच ओजस म्हणाला, “ पाणिनी तुला या प्रकरणात पटापट हालचाल व्हायला हव्ये ना? मला त्यासाठी काही खर्च करावा लागेल....”


“ जेवढा हवा तेवढा खर्च कर. माहिती मिळव म्हणजे झालं.” त्याच्या डोळ्यातली काळजी सौम्या ला दिसत होती.


“ काय घडलं असावं अस तुम्हाला वाटतंय सर्?” उत्तरा दाखल पाणिनी ने खांदे उडवून त्यालाही सांगता येत नसल्याचा इशारा दिला.


“ तुम्हाला वाटत का अनन्याला आपण दिलेली खुनाची कबुली आठवली असेल आणि तिनेच गोड गोळ्यांची बाटली ,त्यात शिसे टाकून तळ्यात फेकली असेल? “


“ ती का करेल तसे?.... आग थांब, तू म्हणतेस तसेच झालेलं असू शकते.”


“ सर, काय वस्तुस्थिती आहे बघा.आपण तिला तिचे टेप रेकॉर्डिंग केलेले बोलणे ऐकवल्यावर ती म्हणाली की मला विचार करायला चोवीस तास द्या. तिच्या मनात जे काही करायचं होत ते करायला तिला तेवढा अवधी मिळाला. डॉ. कार्तिक नी तिला वाटेत सोडू का अस विचारलं त्यासाठी तिने नकार दिला होता. तेवढया अवधीत गोड गोळ्यांची बाटली ,त्यात शिसे टाकून तिनेच तळ्यात फेकली हा अत्यंत तर्कशुद्ध विचार आहे.तिला माहीत होत की पुढे मागे केव्हातरी त्या बाटलीचा शोध घेतला जाईलच.”


“असं करायच्या दृष्टीने ती फार म्हणजे फारच हुशार असली पाहिजे.” पाणिनी विचारात पडून म्हणाला.


“ बायका हुशार असतात , तुम्हाला माहित्ये ! “ सौम्या मिस्कील पणे म्हणाली.

“ माहित्ये. , तुला आश्चर्य वाटेल पण लीना बुद्धीसागर , म्हणजे मिरगल ची पुतणी, इथे येऊन मला तिच्या बद्दल सावध करून गेली. तिचा अंदाज तुझ्याच सारखा आहे अनन्याबद्दल.”


तो पुढे काही बोलणार तेवढ्यात ओजस ची खुणेची विशिष्ठ थाप दारावर पडली.


“ तुझ्याशी बोलायला बलदेव आलाय पहा इथे. मी आता कामाला लागतोय, कहो मोठी आणि महत्वाची बातमी मला येऊ घातल्ये, काही हवं असेल तर मला सांग मी लगेच खाली येतो.”