सा य ना ई ड - (भाग ९) Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

सा य ना ई ड - (भाग ९)

सा य ना ई ड
प्रकरण ९

अच्छा, तर तुम्ही पाणिनी पटवर्धन आहात, प्रसिद्ध वकील.” हस्तांदोलन करता करता बलदेव म्हणाला.

“ हो, आणि तुम्ही बलदेव.” पाणिनी थोडावेळ त्याचा अंदाज घेत म्हणाला.

सरळ ताठ उभा राहिला असता तर तो चांगला सह फूट उंच भरला असता पण वयामुळे आता त्याच डोक थोड पुढे आलं होत, खूपच हडकुळा होता तो.

“ बस खाली . ओजस ने मला सांगितलं की तुमचं व्यक्तिमत्व खुपच उत्कंठा वाढवणारे आहे, मला तुम्हाला काही विचारायचं आहे.“

“ विचारा पुढे, त्यांनी मला इथे यायला आणि बोलायला म्हणून पैसे देऊ केले. माझ्या आयुष्यातला आजवरचा पैसे मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग होता. काय विचारायचे आहे तुम्हाला?”

“ मला समजलंय की पोलीस मिरगलच्या मृत्यूची चौकशी करताहेत.”

“ काय बोलताय काय तुम्ही? “ त्याने विचारले.” त्यात चौकशी करण्या सारखे काहीही नाही. आपण सगळेच जसे एक दिवस जाणार आहोत तसं तो ही गेला.”

“ तो गेला तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर होतात? “

“ हो, होतोच मी तेव्हा त्याच्या बरोबर.”

“ मला म्हणायचय की त्याच्या त्या खोलीत.? “

“ नाही त्याच्या खोलीत नव्हतो, आत , जेवायच्या खोलीतल्या खिडक्या धूत होतो. साधारण हे काम मी करत नाही हे बायकांचे काम आहे. पण आज काल या कामाला बायका मिळणे कठीण आहे., कामवाली आहे पण ती आठवड्यातून एकदा येते नाही तासावर पैसे घेते, मला तर वेडच लागतं असं विचार केला तर.”

“ तू पण तासावरच काम करतोस?”

“ नाही मी तासावर नाही करत , पगार घेतो कामाचा आता मला बहुदा दुसरीकडे काम करून पगार नाही मिळवता येणार.मी मिरगल कडे एवढी वर्षे काम केलंय की मला दुसऱ्याकडे काम करावे अशी इच्छा नाही.आम्ही दोघेही एकमेकांना समजावून घ्यायचो.”

“ तू काय करणार आहेस पुढे?’’

मिरगल ने मला पुढचे चार महिने अर्धा पगार मिळेल अशी तरतूद केली आहे. त्या जागेत खनिज साठा मिळाला नाही तर स्थावर –जंगम मिळकत निम्मी सुद्धा नाहीये, मिरगलच्या पुतणीचा नवरा खनिज खाणी मधला तज्ज्ञ आहे, त्याला अस वाटतंय की त्यात खनिज साठे आहेत , ती जागा विकावी म्हणून मिरगल च्या तो गेले दीड वर्षं मागे लागला होता. त्याने त्याला नाही सांगितलं, नात्यात व्यवहार करायला मिरगलला आवडायचं नाही.”

‘’ पण हे खर कारण होत का?”

“ अजिबात नाही.मिरगलचा अंदाज होता की वाट बघितली की चांगला सौदा करता येईल.त्याला वाटत होत की मिलिंद बुद्धीसागर बुद्धीसागर बुद्धीसागर चा त्या जागेवर डोळा आहे. माझाही तोच अंदाज आहे.पण मिरगल चतुर होता, मिलिंद बुद्धीसागर बुद्धीसागर बुद्धीसागर चे इरादे त्याने पूर्ण करून दिले नाहीत.”

“ अनन्याबद्दल काय?”

“ अतीशय चांगली मुलगी.एखाद्या चित्रातल्या मुलीसारखी सुंदर,गोड. रात्री अभ्यास करायची,मला मदत ही करायची. हर्षल मिरगल ने कधीच तिचे कौतुक केले नाही.भयानक वागला तिच्याशी तो. “

“ तू किती वर्षं होतास मिरगल बरोबर?”

“तीस वर्षं.त्याची बायको हयात होती तेव्हा त्याचा ड्रायव्हर आणि माळी म्हणून होतो.ती गेल्यावर तो एकटाच राहायचा तेव्हा त्याचा हरकाम्या म्हणून होतो.मी त्याच्या आणि माझ्या साठी स्वयंपाक करायचो.. मी म्हातारा होत चाललोय पाणिनी पटवर्धन !

“ तुझी नोकरी आता संपुष्टात आल्यासारखीच आहे. पुढे काय करणार आहेस?”

“ एखाद्या नदीच्या किनारी झोपडी बांधून राहीन .माझी नका काळजी करू.”

“ मिरगल कोणत्याही परिस्थितीत तुमच्या उर्वरित आयुष्याची काळजी घेऊ शकला असता अस तुला वाटत नाही?”

“ त्याने कशाला घ्यावी ?”

“ तू त्याची अनेक वर्षे प्रामाणिक सेवा केली आहेस म्हणून.”

त्याच्या बदल्यात त्याने पगार नाही का दिला मला? आम्ही दोघेही एकमेकांना काही देण घेण लागत नाही.”

“ त्या घरात आता तू काय करतो आहेस?”

“ मला कोणीतरी हाकलवून द्यायची वाट बघतोय. मिरगलची पुतणी आणि तिचा नवरा काही त्या घरी राहणार नाहीत.”

“ अनन्यात्याच्या बरोबर कशीकाय राहत होती?”

“ त्याने तिला बोलावून घेतले होते.”

“ मिरगल गेला त्यावेळेची स्थिती आठवून सांग,काय घडलं तेव्हा?”

“ मी तुम्हाला पाच मिनिटापूर्वी सांगितल्या नुसार मी खिडक्या धूत होतो”

“मिरगल ने नर्स ठेवली होती “

“ दोन ठेवल्या होत्या, एक दिवसा,एक रात्री.१२-१२ तासांच्या पाळीत.त्या प्रशिक्षित नव्हत्या पण अनुभवी होत्या.”

मिरगल ला काय त्रास होता ? “

“हृदयाचा , पूर्वी तो खूप जाडजूड होता.गेला तेव्हा त्याचे वजन एकशे पंच्याऐंशी होते.”

“ हे शनिवारी घडले?”

“ हो . शनिवारी दुपारी.अनन्याशनिवारी त्या घराचा पूर्ण पणे ताबा घेत असे.दुपारी ती दिवसा येणाऱ्या नर्स ला थोडी विश्रांती देत असे.ती लोकांशी खरच खूप चांगली वागते. पुतणी आणि तिच्या नवऱ्याचे छान घर आहे सगळ्या आधुनिक सुविधा असलेलं.”

“ते दोघे कायम मिरगलला भेटायला यायचे का?”

“ यायचे तर ! आणि प्रत्येक वेळी आल्यावर अनन्याच्या पुढे काहीतरी भेटायला ?”

“ पुतणी आली होती....थांबा थांबा,... दोघेही आले होते.ते आत गेले,त्याच्याशी बोलले, आणि....”

“ किती वाजता आले होते ते?”

“अकरा च्या सुमारास.नंतर मिलिंद बुद्धीसागर बुद्धीसागर म्हणाला की काहीतरी काम आहे,आणि गाडी काढून गेला.बायकोला न्यायला दुपारी परत येणार होता , त्या प्रमाणे आला ही.”

“ मिरगल गेल्या नंतर किती वेळाने आला?”

“ फार उशिरा नाही.अनन्यात्याचे दुपारचे जेवण तयार करीत होती.टोस्ट आणि साखरेला पर्यायी गोड गोळ्या टाकून हॉट चॉकलेट. नंतर ती गेल्या सारखी वाटली. मला नाही सांगता येणारसाधारण नक्की पण दहा मिनिटासाठी असेल.मी माझे जेवण जेवण्याच्या तयारीत होतो. अगदी तेव्हाच मी अनन्याची किंकाळी ऐकली., नंतर ती धावतच खाली आली आणि डॉक्टरांना फोन केलं.नंतर पुन्हा धावतच जिना चढली.मी ही वर गेलो तेव्हा हर्षल मिरगल धापा टाकत होता.चक्कर येत होती त्याला,नंतर गेलाच तो.मला तरी तो गेला अस वाटलं.”

“ डॉक्टर यायला किती वेळ लागला?”

“ फार वेळ नाही लागला.दहा पंधरा मिनिटे. आल्यावर त्यांनी तपासलं आणि म्हणाले की नशिबाने फार वेदना न होता गेला तो.अनन्याला पण त्याने गोळ्या दिल्या आणि झोपायला सांगितले.पुढची व्यवस्था मी करतो असे म्हणाले., ती नंतर तिच्या खोलीत जाऊन पडून राहिली.”

“ तिच्या खोलीत जायला स्वयंपाक घरातून जावे लागते?”

“ बरीबर, तिच्या झोपायच्या खोलीला ही अर्थ नाहीये.ती तळघरात आहे.जेमतेम एक बाथ रूम आणि संडासाची सोय आहे.मला कधीच कळल नाही की तिला हर्षल ने पाहुण्याना असलेली एखादी खोली का दिली नव्हती.ती त्यालाही खूप सोयीस्कर पडली असती आणि रात्री अपरात्री केव्हाही तिला लगेचच मिरगल ला भेटता आले असते.”

“ हर्षल कडे कधीच पाहुणे येत नसत पण त्यांच्या साठी खोल्या सज्ज असत.अनन्याआणि दोन्ही पाळीतील नर्स साठी त्याने घरात बेल बसवून घेतली होती.”

“ त्याने तुझे काम हलके केले होते?” पाणिनीने विचारले.

“ बिलकुल नाही ! अनन्याआणि मला त्या रात्र पाळीच्या नर्स साठी जेवण बनवावे लागायचे. तिला रात्री सुद्धा अगदी गरम खायला हवे असायचे.मी जेमतेम जेवण करू शकतो फार चांगल नाही पण या दोन बायका त्यावरून माझ्याशी दादागिरी करायच्या, असंच बनव, तसचं कर वगैरे.”

“ हर्षल ने कधी तुला त्यांना हवे तसे बनवायला लावले?”

“ नाही कधीच नाही.”

“ अनन्याला त्याने त्याच्या घरी का बोलावले रहायला?”

“ तिला घर मिळावे म्हणून.तो तिच्या आईला चांगला ओळखत होता.”

“ती त्याची मुलगी असायची शक्यता आहे का?” पाणिनी ने विचारले.

“ मला ते समजायचा काय मार्ग आहे?”

“ मला वाटलं तस, तू म्हणालास ना की तो तिच्या आईला चांगला ओळखत होता.”

“ जेव्हा तो रात्री बाहेर जायचा तेव्हा मी हातात बॅटरी घेऊन त्याच्या मागे जात नसे ! “

“ पोलिसांना अस वाटतंय की मिरगल च्या मृत्यू संबंधातील ज्या घटना आहेत त्या पुन्हा एकदा चाचपून पहाव्यात.ते कदाचित तुझ्याशी संपर्क करतील.”

“ मला वाटतं तो त्यांचा हक्क आहे.” बलदेव म्हणाला

‘’ त्या दिवशी बुद्धीसागर जोडपे घरी आले होते तेव्हा ते स्वयंपाक घरात गेले होते का?”

“ नाही , तसे मधे मधे नाक खुपसण्यासाठी आणि नावे ठेवण्यासाठी ते घुटमळले असतील सुद्धा.त्या पुतणी ला आपले बोट सारखे कुणावर तरी आरोप केल्या सारखे दाखवायची सवय आहे.”

“तिने तुला कधी काही सांगितलं का? किंवा तू तिला काही ?”

“ बिलकुलच नाही.,तिला काय करायचे ते मी करू द्यायचो मी. शेवटी तो तिचा प्रश्न होता.”

“ पण तुला नाही वाटत की ते त्या दिवशी स्वयंपाक घरात गेले असावेत?”

“ ती गेली असेल कदाचित. मला नीट नाही आठवत.पण ते काहीही असले तरी ती वर जाऊन हर्षल ला भेटली.नंतर तिचा नवरा वर गेला आणि हर्षल ला भेटला. नंतर तो गाडी घेऊन बाहेर गेला आणि तिला घेण्यासाठी परत आला.मला माहित्ये की तो स्वयंपाकघरात गेला आणि आला. अस वाटत होत की तो अनन्याला शोधत असावा.मग तो वर गेला.हर्षल बरोबर दहा मिनिटे होता. त्यांना त्याच्या बद्दल काहीही वाटत नव्हत.त्यांना फक्त खात्री करायची होती की त्याने मृत्युपत्रात बदल केलेला नाही.”

“ छान, मला फक्त वस्तुस्थिती जाणून घ्यायची होती. खूप धन्यवाद.”

बलदेव खुर्चीतून उठला. “ मी नेहेमी माझ्या हक्काच्या पैशांसाठी काम करतो. तुला आणि तुझ्या त्या माणसाना , त्यांनी मला दिलेल्या पैशां एवढी माहिती मिळाली ना?" बलदेव ने विचारलं.

" हो. मिळाली.तरी एक शंका आहे, मिरगल ने तुझ्या साठी काही ठेवलं नाही याचा तुला राग नाही? " पाणिनीने विचारलं.

" अजिबात राग नाही.मी जेवढी नोकरी केली त्याचा पगार तो मला देत होताच ना?तोच माझ्या हक्काचा होता. नोकरी संपल्यावर का म्हणून मी अपेक्षा करावी त्याच्या कडून?" बलदेव ने विचारले . पाणिनी ने पटल्यामुळे मान हलवली. बलदेव पुढे म्हणाला, "आता आपण एकमेकांना काहीही देण घेण लागतं नाही.आपण पुन्हा भेटणार ही नाही. गुड बाय ! ”

( प्रकरण ९ समाप्त)