संघर्ष - 3 Akash द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संघर्ष - 3

सदा त्याला तसेच १० मिनिटे पाहत उभा राहिला ,अमन गार झोपी मध्ये होता सदा त्याच्या जवळ जाऊन बसला आणि आवाज न करता रडू लागला मंजे त्याला अमन ला बघून रडू येत होते, झोपलेला तो निरागस मुलगा
सदाला हि माहिती होता अमन ला त्याचा राग येतो त्याच्या दारू पिण्याचा राग येतो तसे पाहिले असता दारू पिणाऱ्या चा सर्वांना च राग येतो तरी लोक का पित असेल हा मोठा प्रश्न आहे ? येवढं दारू साठी आपली इज्जत .शरीर .घरची इज्जत.पैसा का घालवत असेल लोक ?
सदाला त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा होता पण तो जागा होईल या भीतीने हात न ठेवता तसेच आपले अश्रू पुसत मनातल्या मानत बोलू लागला
"माहिती आहे मला माजा लेका तुला माजा राग येतो तुला नाही आवडत माझे असे दारू पिणे ,मला तर कुठे आवडते असे राहणे.खूप प्रयत्न केला या चांडाळणी दारूचा नादातून सुटण्याचा पण नाही झाले हे दारूचा व्यसन असे दलदल आहे जा मध्ये एकदा माणूस अडकला की निघणे खूप अवघड आहे आणि जेवढं या तून बाहेर येण्याचा प्रयत्न केला तेवढं अडकत गेलो अजून आणि आता त्या दलदलीच्या चिखल सारखा झालो आहे.लहान होतो तेव्हा तुझ्या सारखाच मला पण खूप शिकायचे होते पण त्या वयात माझे वडली वारले आणि मला शाळा सोडावी लागली कोणी नाते वाएकानी मदत केली नाही आई एकटीच होती त्या मुळे मला कामाला जावेच लागले.आणि इथे वाईट संगती मुळे मला व्यसन लागले, पहिला काय वाटले नाही काम करायचे आणि पैसा याचा पण तो पैसा कुठे वापरायचा? हे मला त्या वयात कळे नाही आणि माझे सोबती मला वाईट वळणावर घेऊन गेले.पण मला तुला बघून खूप अभिमान वाठो की तू माजा मुलगा माजा सारखा नाही तुला अजून खूप शिकून मोठा व्हायचे आहे. या वाईट वळणा पासून तू खूप लांब रहा आणि चांगले शिक्षण घे
या दलदली मध्ये उगवलेले कमळ आहे माजा लेकरा "

असे बोलत सदाच्या दोनी डोळ्या मधून अश्रू चालूच होते.त्याच्या मनातले त्याला अमानला सगायचे होते, पण त्याची हिम्मत होत नव्हती तेवढी
तेवढ्या मध्ये अमन ला जाग आली आणि आपल्या बापाला आपल्या उषा पाशी बसून रडताना बघून तो थोडा घाबरला आणि त्याने सदल विचारले " काय झाले असे का रडत आहात?" सदाने काही नाही मानून मान हलवली आणि डोळे पुसत तो झोपाल निघून गेला
अमन विचारा मध्ये तसाच पडून राहिला की "हे असे का रडत होते ? येताना काय झाले तर नसेल? कुठे पडले आणि लागले तर नसेल ? किंवा कोणी काय बोल असेल? असाच विचार करत करत अमन झोपी गेला
अमन ला खरं तर सदा चा रागच याचा पण बाप आहे म्हटल्यावर थोडी फार तर माया असणारच
अमन सकाळी लवकर उठला आणि शाळेला जाण्यासाठी तयार होऊ लागला आंघोळ करून.आई ने शाळेचा गणवेश धून ठेवला होता तो घातला आणि तो शाळेला निघाला सदा अजून झोपलाच होता अमन ने सदा कडे पाहिले आणि त्याला कालचा विचार आला असे का रडत होते मानून पण त्याला शाळेला उशीर नको व्हायला मानून तो निघाला
शाळे मध्ये एक संस्था आली होती विद्या विकास त्या संस्थेचे नाव होते.ते संस्था हे गरीब हुशार मुलाचे शिक्षणासाठी मदत करत होती.त्या मध्ये ते एक छोटीशी टेस्ट घेत असे आणि जो त्या टेस्ट मध्ये पास होत असे त्या मुलांना त्याच्या विस्कासा साठी मदत करत . मंजे त्याचे जादा अभ्यास घेणे . जादा ट्युशन. परीक्षा फी ते भारत असे त्यांना लागणारे वही . पुस्तक सर्व हे संस्था बघत असे अमन नी ही ही टेस्ट दिली होती आणि त्यात तो पास झाला होता. त्यांनी एक फॉर्म अमन ला दिला तो घरी जाऊन भरून त्याच्या वर पालकाची सही आणायची होती?
शाळा सुटली अमन खूप खुश होता आणि तो फॉर्म आई ला दाखवण्या साठी तसाच हातात घेऊन घरी आला

To be continued......😊