संघर्ष - 4 Akash द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संघर्ष - 4

अमन घरी येताच त्याला मोठं मोठ्याने ओरडण्याचा भांडणाचा आवाज कानावर पडला तो तसाच धावत घरा मध्ये शिरला पाहतो तर त्याच्या आईचे आणि सदा चे जोरदार भांडण चालू होता आज्जी कडेला बसून रडत होती.अमन ला पण काय करावे समजत न्हवते तो फॉर्म तसाच त्याच्या हातामध्ये होता खूपच जोरात भांडण चालू होते
सदाने रागाला येऊन उमा ला मारायला एक काठी उचलली आणि तिच्या अंगावर धावला अमन ला पण काही कळे नाही आणि त्यांनी तो हातामधला फॉर्म सोडून सदा ला अडवायला मध्ये गेला सदाने अमन ल ढकलून बाजूला केले आणि जोरात काठी उमाच्या डोक्यात घातली काठी तिच्या डोक्यात लागतच उमा जोरात जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध पडली तीच्या डोक्या मधून रक्त वाहू लागले उमाच्या डोक्यातले वाहते रक्त बघून अमन चा राग अनावर झाला आणि त्यांनी जमिनीवर पडलेल्या त्या फॉर्म ला पाया खाली तुडवत सदाच्या अंगावर धावून गेला.दोघांची चंगलीच भांडण लागली सदनी अमन च्या थोबाडीत हाणली आणि बोला "बापाच्या अंगावर येतो मारला." अमन बोला "तू कसला बाप आहे.ना स्वतःची काळजी ना मुला बाळाची. तुजा सारखा बाप असण्या पेक्षा नसलेला बर" मानून त्याने सदाला जोराड माघे धकले तो थेट जाऊन एका भिंतीच्या कॉपऱ्यला जाऊन त्याचे डोके जोरात आदळे आणि तो ही बेशुद्ध पडला अमन नी सदा कडे ना बघत उमा ला बघायला गेला आणि खिषा मधला रुमाल काढून त्याने उमाच्या रक्त येणाऱ्या डोक्यावर धरला हे पाहताच शेजार पाजारचे भांडण बघणारे लेगच आत आले आणि त्यांनी उमा ल लगेच उचले आणि हॉस्पिलला घेऊन गेले काही जणांनी सदाची काही होत नसलेली हालचाल बघून त्याला पण हॉस्पिटल मध्ये घेऊन आले होते पण अमन नी त्याच्या कडे काही येवढ्या लक्ष दिले नाही
उमा वर उपचार केल्यावर ती शुद्धीवर आली आणि अमन ला पाहून त्याला मिठी मारू रडू लागली तेवढ्या मध्ये त्यांचा शेजारी तिथे तो तोच होता जनी सदा ला हॉस्पीटल मध्ये आणले होते.तो आत आला आणि आणि एकदम हळू आवाजात त्यांनी सदाच्या आई ला सागितले "काकू तुम्हाला डॉक्टर बोलावत आहेत" सदाच्या आई ला वाटले की सदा पण शुद्धीवर आला असेल मानून डॉक्टर बोलवत असतील .किती जरी झाले तरी मुला साठी आईचे काळजी वेगळेच असते "मी आलेच" मानून ती सदा कडे गेली ती तिथे फोचली पण सदा तसाच डोळे मिटून पडला होता.ती आत येताच डॉक्टर सदाच्या आई ला बोले "आज्जी धीर धरा ,तुमच्या मुलाच्या डोक्यावर जोरात लागल्या मुळे त्याचा ब्रेन डेड झाला आहे." ती काय शिकली नसल्यामुळे तिला काय समजले नाही तेव्हा तो बोलवायला आलेला माणसांनी हळू वर व रडक्या आवाजात त्यांना सागितले की सदा आपल्यात आता राहिला नाही हे एकटाच त्या मातेने आपला हंबरडा फोडला आपल्या डोळ्या समोर आपल्या मुलाचा मृतदेह पाहणे या जगातील सर्वात मोठे दुःख आहे तो एका मातेचा हंबरडा होता काळजाला भेदणार पण आता सर्व संपले होते राग .चीड सगळे सदा बरोबर गेले होते. आता ती उमा आणि अमन ला कसे सागणार होती? काय बोलणार होती?
एका दिवसा मध्ये त्याचे सारे आयुष्य बदले होते पुना तीच परिस्थिती आली होती सदा सारखा अमन ला पण कामाला जावे लागणार होते का? पुना तेच घडणार होते का ? त्यांनी आणलेला तो फॉर्म तसाच घरी जमिनीवर पडून होता सर्वच्या पाया खाली येऊ मळकट चिरडून गेलेला तो फॉर्म चिरडला होता की अमन चे पुढचे आयुष ?
मला कळले नाही या मध्ये चुकी कोणाची होती ? समाजाची ? सदाच्या आईची ? जिने सदाला लहान पणी त्याची शाळा सोडून कामाला पाठवले की सादाची? जाणे स्वतःला नीट राहून सुध्रवण्याचा प्रयत्न नाही केला की उमा ची? जिने अशा माणसा सोबत संसार केला का अमन ची ? सदाच्या मित्रांची ?
परिस्थितीची ?
चुकी होती तरी कोणाची? असेच किती सदा आणि अमन असतील या जगा मध्ये ? किती वेगवेगळा असेल त्यांचा
संघर्ष