प्रेमगंध... (भाग - ३६) Ritu Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

प्रेमगंध... (भाग - ३६)

(आपण मागच्या भागात पाहीलं की गोविंद भीम्याला मारतो... गोविंद अजयला बघून त्याला पण धमकी देतो...कुसुम त्याला तिथून निघून जायला सांगते... पण अजयची आई सगळ्यांना सांगते की अजयचं आता राधिकासोबत लग्न होऊ शकत नाही, तूम्ही तिच्यासाठी दुसरा मुलगा बघा... अजयच्या आईला सगळे समजावण्याचा प्रयत्न करतात, पण ती अजयला राधिका आणि ती... दोघींपैकी एकीची निवड करायला सांगते... आता बघूया पुढे...)


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


"बरं ठिक आहे आई... तुमची हिच इच्छा असेल तर मी राधिकाचा विचार सोडून देतो... पण माझी पण एक अट आहे, मी पण यापुढे लग्नाचा विचार अजिबात करणार नाही... आणि मला तुम्ही कोणीच लग्नासाठी फोर्स करणार नाही... जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हाच लग्न करेन मी... तोपर्यंत माझ्या लग्नाचा विचार इथेच थांबवा..." - अजय.


"बस... झालं ना तुमच्या मनासारखं... हेच हवं होतं ना तुम्हाला पण... रोज हसतखेळत वावरणारा पोरगा आता फक्त डोळ्यांत उदासीचे सावटं घेऊन फिरणार... तुमच्या पण मनाचं झालं ना आता समाधान... शेवटी आता चेहर्‍यावर हसण्याचा मुखवटा घालून फिरणार्‍यांमध्येच माझ्या पोराची गणती केली जाणार..." अजयचे बाबा.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



पेटलं आभाळ सारं, पेटला हा प्राण रे
उठला हा जाळ आतून करपलं रान रे
उजळताना जळुन गेलो राहील ना भान
डोळ्यातल्या पाण्यानेही विझेना तहान


दूर दूर चालली... आज माझी सावली
कशी सांज ही उरी गोठली
उरलो, हरलो, दुःख झाले सोबती...


काय मी बोलून गेलो, श्वास माझा थांबला
मी इथे अन् तो तिथे, हा खेळ आता संपला
मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा
रोज हातून जाळतो मी वेदनेचा गाव हा
अपुलाच तो रस्ता जुना, मी एकटा चालू किती
उरलो, हरलो, दुःख झाले सोबती...


ना भरोसा, ना दिलासा कोणता केला गुन्हा
जिंकुनीही खेळ सारा, हारते मी का पुन्हा
त्रास लाखो, भास लाखो, कोणते मानू खरे
कोरड्या त्या पावसाचे, ह्या मनावर का चरे
समजावतो या मना, समजावतो मी या मना
तरी आसवे का वाहती...
उरलो हरलो दुःख झाले सोबती...
(मराठी मुव्ही-- मितवा)


अजयच्या डोळ्यांसमोर तर फक्त राधिकाचाच चेहरा येत होता... त्याने घट्ट डोळे मिटून घेतले... सगळ्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले होते... सगळं वातावरण शांत झालं होतं...


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


श्रीरामपूर-- भालेकर वाडा--


वाड्यांत सगळी शांतता पसरली होती... आज सकाळीच कुसुमने अजयच्या घरी जाण्याची तयारी केली होती...


"नाम्या, मी अजयरावांच्या घरी जाऊन येते... त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते... हवं तर त्यांच्या पाया पडते... माझ्या राधीसाठी काहीही करेल मी... मला खात्री आहे, माझं ऐकतील ते... तू काळजी नको करूस, सर्व काही ठीक होईल... येते मी..." - कुसूम.


"ताई, अगं ऐक.. नको जाऊस तू त्यांच्या घरी... मला नाही वाटत तिथे जाऊन काही उपयोग होईल असं... ती माणसं तशी खूप चांगली आहेत, तूला काही उलटसुलट बोलणार नाहीत, पण त्यांनी सगळं डोळ्यांनी पाहीलंय, त्यांच्या मनात भीती बसलंय ताई... ते आता यावेळी काहीच ऐकणार नाहीत... असं बघायला गेलं तर त्यांच्या जागी तेही बरोबरच आहेत..." - राधिकाचे बाबा.


"पण असं हातावर हात धरून राहण्यापेक्षा थोडा प्रयत्न करायला काय हरकत आहे... कदाचित त्यांतून काही मार्ग निघू शकेल... बघू प्रयत्न करून..." कुसुम.


"बरं ठिक आहे ताई, जाऊन ये तू, पण काळजी घे..." राधिकाचे बाबा...


सावित्रीमाय आणि कुसुम दोघीही अजयच्या घरी जायला निघाल्या...


राधिका खिडकीत शांत बसून बाहेर बघत होती... पण तिच्या डोळ्यातून वाहणारी आसवं काही थांबत नव्हती...


"राधी, अशी किती वेळ रडत बसणार आहेस गं...? सावर स्वतःला... तुझी अशी अवस्था बघून सगळ्यांनाच त्रास होतोय गं... हिंमत नको हारू तू, होईल सगळं नीट..." - सुमी... राधिका तिला मिठी मारून रडू लागली... सगळ्यांचे अश्रू अनावर झाले...


"सुमी, आता काहीही नीट होणार नाहीये गं... सगळं संपलंय आता... माझ्या आयुष्यात प्रेमाचा गंध दरवळण्या अगोदरच तो गंध वार्‍यावर विरून गेला गं..." राधिका खूप रडू लागली....


"नाही गं राधी, असं काही होणार नाही... तुझ्या प्रेमाचा गंध हा कायम तुझ्याच आयुष्यात दरवळणार आहे... आणि जरी तो गंध वार्‍यावर विरला तरी तो प्रेमाचा गंध तुझ्याच अवतीभवती घुटमळत राहणार आहे..." सुमी.


गंध प्रेमाचा आयुष्यात तुझ्या
निरंतर असाच दरवळत राहील,
नवीन किरणांची उजळेल दिशा
सुखाची ओंजळ भरूनी वाहील...
ऋतू प्रेमाचा बहरून जाईल
नको आसवांनी लोचने ओलावू,
परतीची वाट मिळेल प्रेमाला
प्रेमगंधाने आयुष्य बहरत राहील...


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कुसुम आणि सावित्रीमाय दोघीही अजयच्या घरी येऊन पोहोचले... अजयने दोघींना नमस्कार केला... आणि बसायला सांगितलं...


"अजयराव, तुमची तब्येत कशी आहे आता...?" -कुसुम..


"आतू, मी एकदम ठिक आहे आता... तुम्ही कसे आहात? आणि घरी कसे आहेत सर्व?" - अजय...


"मी पण बरी आहे आणि घरी पण सगळे ठीक आहेत..." कुसुम... अजयची आई आणि बाबा आले...


"ताई, आज कसं काय येणं केलंत इथे...?" - अजयचे बाबा...


"मला जरा अजयराव आणि राधिकाच्या लग्नाबद्दल थोडं बोलायचं होतं..." - कुसुम.


"हे बघा ताई, माफ करा मला पण माझ्या अजयचा विचार सोडून द्या तुम्ही... मला माहीती आहे राधिका खूप चांगली मुलगी आहे पण जर तिच्याशी लग्न केलं आणि माझ्या मुलाचं काही बरंवाईट झालं तर आम्ही दोघांनी जगायचं कसं तुम्हीच सांगा...? आणि माझा एकुलता एक मुलगा आहे तो, आणि त्याला गमवायचं नाहीये मला..." अजयची आई...


"ताई, अजयरावांसोबत तसं एकदा झालं म्हणून साहजिकच आहे भीती वाटणं... पण तुम्हाला वचन देते मी, यापुढे त्यांच्यासोबत असं काहीच होणार नाही... दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे, मग आपण का दोघांना वेगळं करायचं...? खरं तर प्रेमाशिवाय संपूर्ण आयुष्य काढणं खूप कठीण जातं... आणि प्रेमाची साथ असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करून जातो... आणि लग्न मोडणं हा एकच तर उपाय नाही ना... आपण त्यातून बाहेर निघण्यासाठी इतरही मार्ग शोधू शकतो ना... आणि तो मार्ग मी शोधलेला आहे.... लवकरच सर्व काही ठीक होईल... तुम्ही फक्त दोघांच्या लग्नाची परवानगी द्या बस..." कुसुमने त्यांच्यासमोर हात जोडले...


"सावी, काय विचार करतेस? काय ठरवलंस तू?" - अजयचे बाबा...


"ताई, बघा, काही घाई नाही आपल्याला... तुम्ही यांवर नीट विचार करा... नंतर तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय द्या... तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल..." कुसूम...


"खरं तर माझा निर्णय मी तुम्हाला दिलेला आहे... आणि त्यांत काहीच बदल होणार नाही..." - अजयची आई.


कुसुमने अजय आणि त्याच्या बाबांकडे पाहीलं, पण दोघांनीही आपल्या माना खाली घातल्या... कुसुम काय समजायचं ते समजून गेली...


"काही हरकत नाही... जशी तुमची इच्छा... काळजी घ्या.. येतो आम्ही..." - कुसुम... अजय त्यांना सोडायला बाहेर आला...


"आतू, मला माहीती आहे राधिकाने खूप टेन्शन घेतलं असेल... तिला थोडं समजवा...काळजी घ्या तिची... मी तिला भेटलो की मी पण माझ्या परीने समजावेन तिला..." अजय...


"हो बाळा, खूप प्रेम करतोस ना माझ्या राधीवर... जीवाची घालमेल तुझ्या कळतेय मला... पण आईची मर्जी सांभाळतोस ना तू... खूप छान वाटलं मला... शेवटी आई आहे तूझी ती आणि आईचं ऐकायलाच हवं... पण एक वचन देते पोरा तूला... तू काहीही काळजी करू नकोस... तूझं लग्न राधिकासोबतच होईल... सगळं ठीक होईल बघ... तोपर्यंत तूझी आणि आईबाबांची काळजी घे बरं..." कूसुम...


"हो आत्या, तुम्ही पण काळजी घ्या..." - अजय. कुसुम आणि सावित्रीमाय घरी निघून गेल्या....


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


श्रीरामपूर -- भालेकर वाडा


कुसुमने घरी येऊन अजयच्या घरी जे काही झालं ते सगळं सांगितलं... राधिकाला तर खूपच रडू येत होतं... तीला पाहून सगळ्यांचेच डोळे भरून येत होते...


"राधी, सावर स्वतःला पोरी... असं रडून कसं चालेल... सगळं होईल नीट..." - कुसुम...


"हो राधी ताई, तुम्ही आता असं रडत बसायचं नाही... आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत... हा भाऊ कायम तुमच्या पाठीशी उभा आहे... तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे मी...." - भीम्या. राधिकाला सगळेच समजावत होते....


"भीम्या, आपल्याला लवकरात लवकरच काहीतरी गोविंदच्या विरोधात पाऊल उचलावं लागेल... आता थांबून चालणार नाही... आणि काय करायचं ते तर तूला माहीती आहेच..." - कुसुम.


"हो मावशी, ठिक आहे... आजपासूनच कामाला सुरुवात करतो..." भीम्या गावात निघून गेला. भीम्या गावातील प्रत्येक घरी जाऊन त्यांना कुसुमने सांगितल्याप्रमाणे काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करू लागला... गावातली एक एक माणसं भालेकर वाड्यावर जाऊ लागली... कुसुमने काय करायचं, काय बोलायचं ते आधीच सगळं ठरवलं होतं.... संध्याकाळ पर्यंत गावातली बरीच माणसं वाड्यावर येऊन पोहोचली...


"ताईसाहेब, भीम्या आम्हाला जे काही बोलला, ते सगळं खरं आहे का...?" गावकरी...


"हो, मीच त्याला तसं सांगितलं होतं... पण आमची कोणावरही जबरदस्ती नाही... तुम्ही तुमच्या इच्छेचे मालक आहात... आम्हाला साथ द्यायची की नाही... हा पूर्णपणे तुमचा निर्णय असेल..." कुसुम...


"पण ताईसाहेब, गोविंद तुमचाच मुलगा आहे आणि भीम्या त्याच्याकडेच काम करतो... मग आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर?" गावकरी...


"तुमचं म्हणणं अगदीच बरोबर आहे... आमच्यावर विश्वास ठेवणं तुम्हाला थोडं जडच जाणार... पण परिस्थिती आता पहिल्यासारखी राहीलेली नाही... भीम्याने गोविंदकडचं काम सोडलेलं आहे... आणि इतकी वर्षे झाली, गोविंदची गावात गुंडगर्दी खूप वाढली आहे... आता ते कुठेतरी थांबायला हवं... गावातलं कोणीच त्याच्या विरोधात उतरणार नाही हे माहीती आहे मला म्हणून आता मीच माझ्या मुलाच्या विरोधात पाऊल उचलायचं ठरवलं आहे... आणि ते मी एकटी करू शकणार नाही... जर आपल्या गावाला गोविंदच्या अत्याचारापासून मुक्तता हवी असेल तर तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल... बोला आहेत का तयार तुम्ही सगळे....???" - कुसुम.


"हो ताईसाहेब, जर असं असेल तर आम्ही तुम्हाला साथ द्यायला नक्कीच तयार आहोत... आम्ही काय करायचं ते आम्हाला फक्त समजावून सांगा आम्ही तयार आहोत..." -गावकरी...


"हो हो, आम्ही सगळे तयार आहोत..." सगळे गावकरी एकदम बोलू लागले...


"बरं ठिक आहे... काय करायचं ते मी सांगेन तुम्हाला... पण कोणीही गाफील रहायचं नाही... सगळ्यांनी आपापल्या घरात सतर्क राहायचं आहे... कारण ही बातमी जर गोविंद पर्यंत पोहोचली तर तो शांत बसणार नाही... तो काहीतरी वाईट पाऊल उचलेलच... आणि असं काही झालंच तर सगळ्यांनी मिळून एकजुटीने त्याचा सामना करायचा लक्षात ठेवा... आणि मी तुमच्या सोबत आहेच..." - कुसुम...


"बरं ठिक आहे ताईसाहेब...." आणि सगळे गावकरी आपापल्या घरी निघून गेले....


समोरून एक माणूस हलतडुलतच सावित्रीमायसमोर येऊन उभा राहिला... आणि त्याने दारूची बाटली तोंडाला लावली....


"माय, मी पण तुमच्यासोबत काम करेन... कोणाला मारायचं सांग हातपाय तोडतो त्याचे पण माझी दारू अजिबात बंद करायची नाय हा..." तो माणूस म्हणाला.


"मुडद्या, आधी स्वतः दोन पायांवर नीट चालायला शिक आणि नंतर बढाया मार, चोवीस तास दारूत बुडालेला असतो आणि आलाय मोठा हातपाय मोडायला... एखाद दिवशी तुझेच हातपाय मोडणार आहे मी...." - सावित्रीमाय...


"आनंदा, तू काय हालत करून ठेवलंय ही स्वतःची... आता तरी दारू सोड...." - राधिकाचे बाबा...


"या, या भीम्यामुळे माझी अशी हालत झालंय... याच्यामुळे माझी गंगीपण गेली मला सोडून... आता मी तरी काय करू जगून.... आता मला पण मरायचं आहे..." - आनंदा...


"असं का बोलतोस आनंदा... तुझ्या पोराला तर त्याची चूक कळली आणि तो सुधारला पण.... आणि अजूनही वेळ गेलेली नाही... तुझ्या आईसाठी, सोन्यासारख्या नातवासाठी जग... त्यांना गरज आहे तुझी..." - राधिकाचे बाबा...


"नाम्या, तू बोलतोस ना... तर बघ आजपासून दारू बंद... आता तू आलास ना इथे... आधी जशी आपली दोस्ती होती ना तशीच कायम ठेवायची... मला गरिबाला विसरणार तर नाय ना तू...?" - आनंदा...


"गरीब काय आणि श्रीमंत काय.... सगळी माणसंच आणि फक्त पैशाची श्रीमंती काय कामाची...? मनाची श्रीमंती म्हणजे खरी श्रीमंती..." - राधिकाचे बाबा...


सगळंच चांगलं होत होतं... सगळीच आपली माणसं जवळ येत होती पण राधिका मात्र अजयच्या आठवणीत रात्रंदिवस रडत होती... तिच्याकडे बघून सगळ्यांचं हृदय पिळवटून निघत होतं... तिच्याबद्दल सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होतं... पण सगळेच आपापल्या परीने तिला खूश ठेवण्याचा प्रयत्न करत होते...






क्रमशः-


(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)


[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]


🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹


💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - ३६


➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀