Saptpadi - 2 books and stories free download online pdf in Marathi

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 2

विक्रांत संयोगीता चा विचार करत होता . ती लवकर बरी व्हायला हवी तिच्या शिवाय आयुष्याला काही अर्थ नाही. का हा अपघात झाला ? दोन वर्ष ख़ुप छान आनंदात गेली संयोगीता ही ख़ुप प्रेम करायची विक्रांत वर . विक्रांत ची गीतु जान होती. तिला थोड़ सुद्धा तो दुखवत नव्हता त्याला कोणाचे प्रेम आयुष्यात मिळाले नाही जे सोबत होते ते त्याचे मित्रच त्याला जीव लावत होते. संदीप तर भावा सारखा त्याला जीव लावत होता. विक्रांत पुण्यातील टॉप टेन बिझनेस मन पैकी एक होता. त्याच्या हुशारीवर कर्तुत्वा वर आज तो इथ पर्यंत पोहचला होता. त्याचे काम चांगले होते त्यामुळे मार्केट मध्ये त्याच नाव होते म्हणूनच तो यशाच्या पायरीवर उभा होता. त्याच यश इतरांना खुपत होते त्यामुळे त्याचे शत्रु ही जास्त होते.विक्रांत च्या मनात आले की हा अपघात मुद्दाम कोणी घडवून तर आणला नसेल? विचार करून त्याच डोक दुखु लागले मग तसाच तो झोपी गेला. संध्याकाळी त्याला जाग आली. संदीप त्याच्या बाजूला बसला होता. विकी हॉउ यू फील नॉउ ? त्याने विचारले. ठीक आहे सैंडी पण मला असे वाटते की हा अपघात मुद्दाम कोणी घडवून आनला नसेल? विकी अस काही नसेल तू जास्त विचार नको करू. सैंडी तू विराज ला कॉल लाव त्याला सांगु याची चौकशी करायला. ओके तुला ड़ावुट असेल तर मी सांगतो विराज ला, आता त्याला तुझ्या बद्दल काहीच माहिती नाही. उगाच मग ते मीडिया ला ही समजनार यात तुला त्रास जास्त होईल सो तुझ्या अपघताची बातमी बाहेर कोणाला माहिती नाही. आता लगेच करू का कॉल विक्रांत? हो कर . संदीप ने विराज ला कॉल केला आणि विक्रांत च्या अपघाता बद्द्ल सांगितले. तेव्हा विराज लगेचच त्याला भेटायला येतो म्हणाला. विक्रांत आत येऊ का मी? कल्पना गितु ची आई रूम मध्ये येत बोलल्या. हो आई या कल्पना तिथल्या खुर्चीवर बसल्या. कशी आहे तब्येत तुमची आता? आई मी ठीक आहे पण गितु ची जास्त काळजी वाटते. ती शुद्धीवर लवकर यायला हवी. नका काळजी करू गितु ही लवकर बरी होईल. तुमचं प्रेम कायम तिला आधार देत आले आहे त्या प्रेमाच्या बळावर ती बरी होईल. होप सो विक्रांत म्हणाला. ते बोलत असताना विराज तिथे आला. हे विकी अचानक काय हे कसे झाले? तेच मला ही नाही समजत विराज म्हणून तुला बोलवून घेतले. मला वाटते कोणीतरी मुद्दाम माझा आणि संयोगीता चा अपघात घडवून आणला असेल. तू नको काळजी करू मी माझ्या पध्दतीने चौकशी करतो. बाकी वहिनी कुठे आहेत त्यांची तब्येत कशी आहे? ती आय सी यु मध्ये आहे विराज अजून शुद्ध नाही आली तिला. ओके डोन्ट वरि सगळं नीट होईल. मग थोडा वेळ बोलून विराज निघाला.विक्रांत तू ही आराम कर मी थोड़ा वेळ ऑफिस ला जावून येतो.विक्रांत मग शान्त पडून राहिला. आजचा तीसरा दिवस होता त्याला हॉस्पिटलाइज होऊन. आय सी यू कड़े सारखे कोणाला जावू देत नव्हते. अधुनमधून तोच बाहेरुन गीतु ला बघुन येत होता. डॉक्टर त्याला ही सक्तिची विश्रांती घे अस सांगत होते. त्याला ही डोक्याला स्टिचेस पड़ले होते. कल्पना आई त्याला भेटायला येत होत्या. त्या आणि गीतु यांच्या शिवाय जवळचे नातेवाईक विक्रांत ला कोणी नव्हते.संध्याकाळी त्याच्या घरून शाम जो घरातील सगळी कामे बघायचा आणि सुरेखा मावशी स्वयपाक करायला होत्या ते दोघे विक्रांत ला भेटायला आले. साहेब कसे आहात तुम्ही? आणि वहिनी साहेब कुठे आहेत? सुरेखा ने विचारले. मी ठीक आहे मावशी आणि गीतु आय सी यू मध्ये आहे. उद्या समजेल तीची काय अवस्था आहे ते. साहेब तुम्ही सगळ्या साठी सगळ करता कोणाचे वाईट चिंतत नाही मग तुमच्या सोबत ही सगळ चांगलेच होईल. विक्रांत काही बोलला नाही. थोड़ा वेळ बसून मावशी आणि शाम निघुन गेले. " काटूँ कैसे रातां ओ सावरे जिया नहीं जाता सुन बावरे। के रातां लम्बियां लम्बियां रे कटे तेरे संगेयाँ संगेयाँ रे ।
छम छम छम अम्बरां दे तारे कहंदे ने सज्जन। तू ही चन मेरे इस दिल दा मान ले वे सज्जन। तेरे बिना मेरा होवे न गुजारा। छड़ के ना जावीं मैनु तू ही है सहारा। काटूँ कैसे रातां ओ सावरे जिया नहीं जाता सुन बावरे। के रातां लम्बियां लम्बियां रे कटे तेरे संगेयाँ संगेयाँ रे।
अशी काही शी विक्रांत ची अवस्था झाली होती. लग्नाचा दूसरा वाढदिवस होता त्यांचा आणि गीतु ला तो गोवा ला साजरा करायचा होता. दोघेही ख़ुप आनंदात होते . विक्रांत ने संयोगीता ला डायमंड चा नेकलेस गिफ्ट दिला होता. विक्रांत कड़े सगळ काही होत नाव, प्रसिद्धि, काम, सक्सेस,पैसा पण नव्हते फ़क्त जिवाला जीव देणारी माणस! लहान पनी जस जस त्याला समजू लागले त्याने सव्हताला आश्रमात वाढताना पाहिले होते. तो सारखे आश्रमातल्या संचालिका माधुरी ताई ना विचारत असे की मावशी माझे आई बाबा कोण आहेत? मी इथे कसा आलो? पण त्याच्या या प्रश्नां ची उत्तरे माधुरी ताई कड़े ही नव्हती. कारण आश्रमात तीच मूल येतात ज्याना त्यांचे आई वडील सांभाळन्यास असमर्थ असतात किंवा त्यांचा नाइलाज असतो. एक तर कुमारी माता किंवा मग स्त्री गर्भ नको असलेले लोक अस आश्रमात मूल आणून सोडतात किंवा कोणी मंदिरा बाहेर तर कोणी कचरा कुंडित मुलांना ठेवतात . अशा अनाथ मुलांना या आश्रमात आणले जायचे मग त्यांचे आई वडील कोण हे त्यांना ही माहित नसायचे. विक्रांत लहानपणा पासून एकदम तल्लख होता. मना पासून तो शिकायचा नेहमी म्हणायचा मावशी मी मोठा होऊन इतका पैसा कमवेन की माझ्या सारख्या अनाथ मुलांना त्या पैशाचा उपयोग होईल.

क्रमश कसा वाटला आज चा भाग नक़्क़ी कमेंट करा. संयोगिता बरी होईल की नाही ? पुढे काय घडेल विक्रांत च्या आयुष्यात ? त्या साठि मला फ़ॉलो करा आणि कथा वाचत रहा. नावा सहित इतरत्र शेयर नक़्क़ी करा. धन्यवाद💐


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED