सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 3 Author Sangieta Devkar.Print Media Writer द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 3

अनाथ मुलांना त्या पैशाचा उपयोग होईल . आज विक्रांत आणि संयोगिताला हॉस्पिटल मध्ये येवून चार दिवस झाले होते. विक्रांत सकाळीच संयोगीता ला बघुन आला होता. ती अजुन शुद्धिवर आली नव्हती. दुपारी संदीप आला त्याने विक्रांत साठी नवीन सेल फोन आनला होता कारण एक्सीडेंट मध्ये विक्रांत आणि संयोगीता चा फोन ही डैमेज झाला होता. विक्रांत हा न्यू फोन तुझ्या साठी यात मी माझ्या कडचे बरेच कॉन्टैक्ट ऍड केलेत बघ अजुन कोणाचे नम्बर हवेत तुला. ओके सैंडी . मि. विक्रांत देयर इज अ गुड़ न्यूज फ़ॉर यू म्हणत डॉक्टर रूम मध्ये आले. काय झाले डॉक्टर विक्रांत ने विचारले? मि. विक्रांत तुमची वाइफ आता ऑउट ऑफ डेंजर आहे आणि त्या शुद्धिवर ही आल्या आहेत. ओह्ह थैंक यू डॉक्टर कैन आय सी हर? हो तुमच्या बाजुच्या रूम मध्ये त्यांना नर्स शिफ्ट करत आहेत ,तुम्ही भेटु शकता.विक्रांत आणि संदीप दोघे ही संयोगिता ला भेटायला गेले. संयोगिता ने आता डोळे उघड़ले होते तिची आई बाजूला बसली होती. विक्रांत तिच्या जवळ गेला. गीतु कशी आहेस तू? आता बरे वाटते ना तुला? पण संयोगिता विक्रांत कड़े अनोळखी नजरेने बघत म्हणाली,कोण तुम्ही आणि मला कसे ओळखता? गीतु अग मी तुझा नवरा विक्रांत आपण गोवा ला गेलो होतो आणि येताना हा अपघात झाला . मग तीची आई ही बोलली अग संयू असे काय करतेस तुझ विक्रांत बरोबर लग्न झाले आहे. दोन वर्ष झाली तुमच्या लग्नाला. आई मला नाही आठवत काही पण मल्हार कुठे आहे? मी अशी हॉस्पिटल मध्ये असताना तो कसा काय माझ्या जवळ नाही.? तेवढ्यात डॉक्टर आत आले. डॉक्टर माझी वाईफ़ मलाच ओळखत नाही. असे कसे? एक मिनिट मि. विक्रांत मला त्यांना चेक करू दे म्हणत डॉक्टरां नी संयोगिता ला चेक केले. मला वाटते मि. विक्रांत अपघातात त्यांची मेमरी लॉस झाली आहे. डोक्याला जबरदस्त मार लागल्या मुळे अस होऊ शकत. म्हणजे डॉक्टर तिला पुन्हा कधीच आठवनार नाही का की आमच लग्न झाले आहे ते. विक्रांत ने विचारले. मि. विक्रांत त्यांना लग्ना आधी च त्यांचे लाईफ़ आठवते आहे त्यानन्तर चे आठवत नाही. पण त्या आठवणीं किंवा काही घटना पुन्हा त्यांना आठवण करून दिल्या तर कदाचित त्यांची मेमरी परत येईल. पण याला कीती दिवस लागतील हे मी नाही सांगु शकत. त्यांची मेमरी महीना भरात परत येईल किंवा वर्ष सुद्धा लागू शकते. आई मल्हार कुठे आहे मला त्याला भेटायचे आहे संयोगिता बोलत होती. मल्हार च नाव गीतु च्या तोंडून ऐकुन विक्रांत च्या हृदयाचे अगणित तुकडे झाले. त्याच्या डोळ्यातुन अश्रु अखण्ड वाहत चालले होते. हे मल्हार कोण ? त्यांना बोलवून घ्या. मिसेस संयोगिता यांना त्यांना भेटून बर वाटनार असेल तर लवकर त्यांना बोलवा. आणि हो एकदम त्यांना ताण येईल अस काही बोलू किंवा विचारु नका . शक्यतो त्यांच्या कलाने घ्या इतके बोलून डॉक्टर निघुन गेले. विक्रांत ने पुन्हा गीतु ला विचारले गीतु तू खरच मला ओळखत नाहीस का? बघ ना थोड़ तरी आठवते का तुला? नाही मिस्टर तुम्ही कोण आहात हे मलाच माहित नाही आणि मी कधी तुम्हाला भेटलेचे मला आठवत नाही. तसे ही माझी आणि मल्हार ची एंगेजमेंट झाली आहे मग तुम्हाला मी का भेटेन? तुम्हाला मी बघितलेचे ही आठवत नाही मला. तीची आई ही हे ऐकुन शॉक झाली. ओह माय स्वीट प्रिंसेस तू शुद्विवर आलीस बेटा संयु चे बाबा आत येत म्हणाले. त्यांना बघुन विक्रांत ने हाताची मुठ रागाने आवळली. संदीप ने त्याच्या खांद्या वर हात ठेवला. त्याला शान्त रहा असच संदीप ला सूचवायचे होते.बाबा मल्हार कुठे आहे आणि मला अजुन तो भेटायला का नाही आला? हो बेटा तू शांत हो मी मल्हार ला सांगतो तो लवकरच तुला भेटायला येईल. तुला कसे वाटते आता संयोगिता बाबा नी तिला विचारले. मी ठीक आहे पण डोक दुखत आहे माझे संयोगिता बोलली. हु तुझे ऑपरेशन झाले आहे सो थोड़ दुखेल पण तू जास्त विचार नको करू लवकर आपण आपल्या घरी जावू अस बोलून बाबांनी तिच्या डोक्या वरुन हात फिरवला. बाबा मल्हार ला कॉल करा. हो हो तु झोप मी करतो कॉल. विक्रांत तर सुन्न झाला होता त्याची जिवलग बायको त्याला आता ओळखत नव्हती पण तिचा एक्स बॉयफ्रेंड मल्हार मात्र तिच्या लक्षात होता कस शक्य आहे हे? मी इतका जीव लावला ,प्रेम केले त्याची किंमत शून्य! असा विचार करत तो आपल्या रूम मध्ये आला. त्याच्या डोळ्यातुन अश्रु वाहतच होते. विकी नको इतका स्ट्रेस घेवू मी समजू शकतो तुला कीती त्रास होत असेल या सगळ्याचा. सैंडी अरे गीतु ला मी आठवत नाही ,माझ प्रेम आठवत नाही मात्र तो नालायक मल्हार ज्याने फ़क्त आणि फ़क्त त्रासच दिला माझ्या गीतु ला तो तिच्या स्मृतित आहे पण मी नाही? विकी हे थोड़े दिवसा साठी असेल बघ . वहिनी ना सगळ आठवेल अरे आज मेडिकल सायन्स इतके ऍडवान्स झाले आहे आपण वहिनी ना चांगल्या स्पेशलिस्ट ची ट्रीटमेन्ट देवू नको काळजी करू तू. संदीप त्याच मन राखण्या साठी बोलला. पण आतुन त्याला ही ख़ुप त्रास होत होता. तुला लवकर रिकव्हर व्हायचे आहे विकी असा तू निराश नको होऊस. सैंडी कोणा साठी मी बरा होऊ मी सांग जी माझ सम्पूर्ण जग आहे तीच मला विसरून गेलीय. विकी आता नियती च्या मनात काय आहे हे आपण कसे सांगु शकणार ना? पण आपणच होप्स सोडल्या तर मग काहीच नाही होणार आपण उलट जास्त प्रयत्न करू मी ,विराज आहोत ना सोबत तुझ्या सगळ निट होईल.मग संदीप ने जबरदस्ती विक्रांत ला झोपवले.

क्रमश.. विक्रांत आता काय करेल? गीतु मल्हार सोबत जाईल का विक्रांत सोबत बघुया पुढील भागात.कसा वाटला हा भाग नक़्क़ी कमेंट करा