Saptpadi - 7 books and stories free download online pdf in Marathi

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 7

आय एम फाईन. तू चहा घे मग आपण हॉस्पिटल कडे जाऊ विक्रांत म्हणाला.
विक्रांत आणि संदीप हॉस्पिटल मध्ये आले. गीतु च्या रूम कड़े गेले. मल्हार संयोगिता चे केस विंचरून देत होता आणि संयोगिता च्या चेहऱ्यावर हासु होते. विक्रांत ने ते पाहिले तसे त्याच्या हाताच्या मुठी आपोआप वळल्या. रागाने त्याच्या कपाळा वरची शिर तड़तड़ करत राहिली. मल्हार ला खावु का गिळु या नजरेने विक्रांत बघत होता. संदीप ने विक्रांत कड़े बघितले म्हणाला,विकी शान्त रहा. मल्हार ने गीतु चे केस बांधले आणि त्याने पाहिले की विक्रांत आला आहे. तसा तो गीतु पासून बाजूला झाला. ते संयु बोलली की माझे केस बांधून दे म्हणुन मी मल्हार विक्रांत ला स्पष्टीकरण देत म्हणाला. विक्रांत रागाने त्याच्या कड़े बघत म्हणाला,तुला सांगितले ना गीतु ला तू संयु बोलायचे नाही ,एकदा सांगितलेले समजत नाही का? मि. विक्रांत मल्हार माझा बॉयफ्रेंड आहे तो मला कोणत्याही नावाने बोलवू शकतो . मल्हार च्या ऐवजी गीतूच बोलली. गीतु तू माझी वाईफ़ आहेस. तुला भले काही आठवत नसेल पन मला तर सगळ माहित आहे मग तुझ्या सोबत मी या मल्हार ला बघू शकत नाही भले नाइलाज म्हणुन सुद्धा. यात मी काही ही करू शकत नाही मि. विक्रांत. पण आताची फैक्ट हिच आहे की मल्हार माझा बॉयफ्रेंड आहे. ओके गीतु जसे तुला वाटते तसे समजू. तू कशी आहेस ? आय एम फाइन . आई नाही थांबल्या का तुझ्या सोबत विक्रांत ने तिला विचारले. आई ला थोड़ काम होत सो ती घरी गेलीय रात्री येईल. संयोगिता मी निघतो आता आई पन येतील. मल्हार म्हणाला. बर बाय मल्हार गीतु म्हणाली. रूम मधून बाहेर पड़त मल्हार हसत होता आणि मनातच म्हणाला,विक्रांत द ग्रेट बिझनेस टायकून (busniness tycoon) माझ्या पासून माझ्या संयु ला तोडलेस आणि बघ नियती ने पुन्हा मला संयु जवळ आणले. आता तुझी गीतु तुझ्या पासून कशी दूर जाते बघच. तिला तुझी आठवण येणारच नाही तू तिचा नवरा हे तिला या जन्मात मी आठवू देणार नाही. एक क्रूर हासु मल्हारच्या डोळ्यात दिसत होते. विक्रांत गीतु शी बोलत होता. तेव्हा डॉक्टर चेकिंगला आले. गीतूला चेक करत म्हणाले दोन दिवसांनी तुम्ही यांना घरी घेवून जावू शकता पण मेडिसीन अजिबात मिस नका करू त्या मेडिसिन मुळेच मिसेस संयोगिताची मेमरी पुन्हा परत यायला मदत होईल. हो डॉक्टर आम्ही तीची काळजी घेवू. डॉक्टर तुम्हाला ही माहित आहे की मी मि. विक्रांत यांची वाईफ़ आहे संयोगिता ने मध्येच डॉक्टरांना विचारले. हो मिसेस संयोगिता ,एक्सीडेंट झाला तेव्हा तुम्ही दोघे सोबत होता. पोलिसांनी तुम्हाला इथे आणले तेव्हा त्यांनीच सांगितले की मि. विक्रांत आणि त्यांच्या मिसेस आहेत या. ओके डॉक्टर गीतु म्हणाली. मिसेस संयोगिता तुम्ही जितका वेळ जास्त मि. विक्रांत यांच्या सोबत घालवाल तितक्या लवकर तुमची मेमरी परत येईल. तुम्ही विक्रांतना कोऑपरेट करा. तुमच्या घरी जा तिथे राहुन कदाचित तुम्हाला काही आठवेल. ओके डॉक्टर मी पूर्ण प्रयत्न करेन आणि मला ही लवकरात लवकर जाणून घ्यायचे आहे माझ्या लाईफ़ बद्दल. नो संयोगिता तुम्ही तुमच्या ब्रेन ला जास्त स्ट्रेस नाही देवू शकत ईट्स माइट बी डेंजरस. तेव्हा हळूहळू सगळ्या गोष्टी होऊ द्यात. हो डॉक्टर एंड थैंक यू सो मच विक्रांत म्हणाला. डॉक्टर गेले आणि गीतु चे आई बाबा आले. तिच्या बाबांना बघुन विक्रांत च डोक पुन्हा भडकले ,आई गीतु ला चांगल्या आठवणी आणि चांगल्या लोकांची सोबत हवी जेणे करून तिला तिच्या आयुष्यात घड़लेल्या चांगल्याच गोष्टी लवकर आठवतील. मि. विक्रांत संयु माझी मूलगी आहे तिला भेटायला मला कोणी ही आडवू शकत नाही. आणि आता तर तू तिच्या लेखी तिचा नवराच नाही आहेस. ओह्ह मि. विलास आता तुम्हाला आठवले का की संयोगीता तुमची मूलगी आहे मग तेव्हा कुठे होता तिचा बाप जो तिला आणि तिच्या आई ला क्षणात सोडून निघुन गेला. कोणताही पुढचा विचार न करता. विक्रांत तो आमचा पर्सनल मैटर आहे तो आम्ही बघुन घेवू आता माझ्या मूलीला माझी गरज आहे . विक्रांत प्लीज तुम्ही शान्त रहा गीतु साठी गीतु ची आई कल्पना मध्ये बोलल्या. आई काय चालले आहे हे सगळ? गीतु ने विचारले. काही नाही संयु तू नको लक्ष देवू. आई म्हणाली. आई डॉक्टर बोलले आता की दोन दिवसांनी गितुला डिस्चार्ज मिळेल. माझी इच्छा होती की मी माझ्या सोबत गितुला घरी घेवून जाइन. नाही नाही मी कुठे कोणा सोबत नाही जाणार. मी आई सोबत माझ्या घरी जाणार. गीतु म्हणाली. आणि आई माझी लॉ ची परीक्षा पन असेल ना मला आता अभ्यास करू दे . हो आपल्या घरी जावू कल्पना म्हणालया.तीच हे बोलने ऐकुन विक्रांत अजुनच अपसेट झाला. गीतु चा निरोप घेऊन तो आणि संदीप हॉस्पिटल मधून बाहेर पड़ले. कार मध्ये बसत विक्रांत म्हणाला,सैंडी अरे गीतु ला तीच आधीच कॉलेज लाइफ लक्षात आहे तिला लॉ करायचे म्हणुन हट्टाने लॉ कॉलेज ला एडमिशन घेतली पण नन्तर तिला समजले की तिची आवड़ आर्ट्स मध्ये आहे तिला शिल्पकला छान जमत होती. एका शिबिरात ती गेली होती तिथे तिला शिल्पकलेत रुचि वाढली. मग लॉ चे एक वर्ष करून ती आर्ट्स कॉलेज ला गेली. पन तिला त्या बद्दल काहीच आठवत नसेल का? विकी तिला लग्ना आधीचे सगळे आठवते म्हणुन लॉ कॉलेज बद्दल ही आठवत असेल तिथेच तो मल्हार भेटला ना तिला. हम्म्म्म विक्रांत इतकेच बोलला. विक्रांत ला घरी सोडून संदीप गेला. अजुन थोड़े दिवस आराम कर अशी संदीप ची स्ट्रीकट वार्निंग होती त्याला. त्यामुळे विक्रांत च्या मनात असून ही त्याला ऑफिस ला जाता येत नव्हते. विक्रांत जेवण करून रूम मध्ये आला. त्याचे आणि गीतु चे फ़ोटो बघू लागला. ख़ुप साऱ्या आठवणीं त्या अल्बम मध्ये होत्या.

क्रमश..


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED