सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 8 Author Sangieta Devkar.Print Media Writer द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • अनुबंध बंधनाचे. - भाग 18

    अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्य...

  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

श्रेणी
शेयर करा

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 8

विक्रांत जेवण करून रूम मध्ये आला. त्याचे आणि गीतु चे फ़ोटो बघू लागला. ख़ुप साऱ्या आठवणीं त्या अल्बम मध्ये होत्या.विक्रांत एका फ़ोटो जवळ थांबला . त्या दिवसाची आठवण आज ही जशीच्या तशीच त्याच्या लक्षात होती. त्याच्या हस्ते संयोगिता ला शिल्पकलेचे सर्टिफिकेट आणि ती स्पर्धे मध्ये पहिली आली त्याचे मेडल तिला देण्यात आले तो क्षण फ़ोटोत कैप्चर केला होता. तेव्हा संयोगीताला पाहुनच तो तिच्या प्रेमात पडला होता. सिल्की केस,काळेभोर टपोरे डोळे ,गोरा रंग,गुलाबी नाजुक ओठ,आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास ,हस्तमुख अशी संयोगिता तिला पुन्हा पुन्हा पाहन्याचा मोह विक्रांत ला होत होता. तो त्या आठवणीत गढुन गेला. विक्रांत ते एक शिल्पकलेचे प्रदर्शन आहे तुला ऍज अ गेस्ट आणि परीक्षक म्हणून बोलवले आहे. संदीप म्हणाला. सैंडी कधी आहे ते प्रदर्शन आणि माझ्या काही मीटिंगज वैगेरे नसेल तर त्यांना तसे कळव. विकी रविवारी आहे ते प्रदर्शन सो आपण फ्री आहोत मी कळवतो त्यांना की आपण येतो आहोत. ठीक आहे विक्रांत म्हणाला. रविवारी संध्याकाळी विक्रांत आणि संदीप त्या प्रदर्शनाला जायला तयार झाले. विक्रांत ने डार्क मरून कलर चा शर्ट घातला होता हाफ व्हॉइट पैंट आणि क्रीम कलरचा ब्लेझर घातला होता. ख़ुप रूबाबदार दिसत होता विक्रांत. त्याची पर्सनालिटी एकदम डैशिंग होती. एक सक्सेसफुल बिझनेस मन शोभत होता पण त्याला अजिबात त्याच्या कामाचा किंवा पैशाचा गर्व नव्हता. ख़ुप यश मिळवून ही त्याचे पाय जमिनीवर होते. कारण तो स्व:ता अनाथ म्हणुन मोठा झाला . पैशाची कींमत तो जाणून होता. इथ पर्यंत पोहचायला त्याने ख़ुप कष्ट घेतले होते. म्हणूनच तो आपल्या सारख्या गरीब आणि गरजु लोकांना मदत ही करायचा. विकी ख़ुप हैंडसम दिसतोस यार काश मी मूलगी असते ना तर तुझ्या प्रेमात पडलो असतो. संदीप त्याला बघुन म्हणाला. काही ही बोलतोस सैंडी चल उशीर होईल. अरे खरच आज तिथे मुलीं असल्या ना तर तुझ काही ख़र नाही विकी,नक़्क़ी मागे लागतील तुझ्या. असु दे चल म्हणत संदीप ला ढ़कलत विक्रांत कार कड़े आला. ड्राइवर ने दरवाजा उघडला तसे दोघे आत बसले. विकी एक विचारु का? संदीप बोलला. हो विचार . विकी तू तुझ्या लग्ना बाबत काही विचार केला आहेस की नाही?अजून तरी नाही आणि माझे काम बघता मला त्यातून वेळ ही नाही. अरे पण काम कामाच्या जागी आणि पर्सनल लाईफ वेगळे ,कोणी तरी हवे की नको सोबत करणार. हम्मम बघू कोणी भेटली तर विचार करेन ओके आणि तुझं काय? तुला नको कोणाची सोबत सँडी? ते तुझं आधी होऊ दे मग माझं बघू संदीप हसत म्हणाला. ते दोघे त्या प्रदर्शनाच्या ठिकाणी आले. खूप लोक ते प्रदर्शन बघायला आले होते. तिथल्या आयोजकांनी विक्रांत ला बघितले आणि लगेचच त्याच्या स्वागताला समोर आले. वेलकम मि. विक्रांत तुम्ही वेळ काढुन आमच्या या कार्यक्रमाला आलात त्या बद्दल धन्यवाद. तो आयोजक म्हणाला. इट्स ओके आभार नका मानू विक्रांत म्हणाला. सर आपण अगोदर प्रदर्शन बघुयात का ? तुम्हालाच त्यातले सर्वोत्कृष्ट शिल्प निवडायचे आहे त्याला प्रथम क्रमांका चे बक्षीस दिले जाईल . आयोजक बोलले. मला या शिल्पकले बद्दल इतकं काही नाही समजत तेव्हा तुम्ही माझी मदत करा विक्रांत म्हणाला. ओके सर चला म्हणत तो आयोजक ही विक्रांत आणि संदीप सोबत प्रदर्शन मध्ये ठेवलेल्या कलाकृती बघू लागले. तिथे खूप वेगवेगळ्या विषयांवर घडवलेल्या कलाकृती होत्या. कुठे आई आणि बाळ हे शिल्प तर कुठे पाणी वाचवा या थीम वर शिल्प असे खूप छान छान कलाकृती होत्या . प्रत्येक जण म्हणजे ते शिल्प बनवणारा कलाकार आपल्या कलाकृती बद्दल माहिती विक्रांत ला देत होता. तिथे असणारे बऱ्या पैकी लोक विक्रांत ला ओळखत होते नावाने एक सक्सेसफुल बिझनेस मन म्हणून. पण काही लोकांना त्याच्या बद्दल माहिती नवहती. शिल्पा बद्दल काही शंका असेल तर विक्रांत विचारत होता आणि समोरचा त्याला व्यवस्थित माहिती देत होता. विक्रांत प्रत्येक शिल्प जवळून बघत होता. एक शिल्प मदर टेरेसा यांचे होते त्यांच्या हातात लहान बाळ होते. खूप सुंदर आणि आकर्षक असे ते शिल्प होते. हुबेहूब त्या मदर टेरेसा दिसत होत्या आणि त्यांचे भावपूर्ण डोळे खूप बोलके वाटत होते. विक्रांत त्या शिल्पा जवळ थांबला ,त्याने आयोजकाला विचारले की हे शिल्प कोणी बनवले आहे म्हणजे इथे कोणी दिसत नाही. तो पर्यंत धावत पळत संयोगीता तिथे आली. सो सॉरी सर ते थोडं काम होत म्हणून मी माझी जागा सोडून गेले आय एम रियली सॉरी. विक्रांत संयोगीता कडे बघतच राहिला. सिल्की केस,काळेभोर टपोरे डोळे,गुलाबी ओठ आणि चेहऱ्यावर हासू . त्याला जाणवले की आपण तिलाच बघत आहोत. तसे तो भानावर आला म्हनाला,इट्स ओके मॅडम पण तुम्ही एकदम सुंदर अप्रतिम शिल्प बनवले आहे. आई आणि तीच मुला प्रति असणार प्रेम हे यातून दिसून येत. मदर टेरेसा तर अनाथांच्या नाथ होत्या. खूप सुंदर रेखाटन आहे तुमचे. तुमचे नाव मिस? विक्रांत ने विचारले. सर मी संयोगीता निंबाळकर ,मी गेल्याच वर्षी आर्ट कॉलेज मधून शिल्पकलेची पदवी घेतली . शिल्पकला मला खूप आवडते हे माझं पॅशन आहे. वेरी गुड कीप इट अप विक्रांत म्हणाला. तिने तेवढ्या वेळेत विक्रांत चे निरीक्षण केले. हँडसम,यंग बिझनेस मन विक्रांत एकदम सॉलीड दिसत होता. ग्रेट पर्सन विथ ग्रेट पर्सनॅलिटी असच काहिसे तिच्या मनात येऊन गेले. जवळ जवळ एक तास झाला विक्रांत ते प्रदर्शन बघत फिरत होता संदीप ही सोबत होता. हे संयु झालं का एक्झीबिशन मल्हार तिथे आला होता. नाही पण तू का लेट आलास? जस्ट आताच ते ग्रेट बिझनेस मन विक्रांत ते बघून गेले माझे शिल्प त्यांना खूप आवडले . हि एप्रिसिएट मि मल्हार. संयु बोलली. ओहह दयाटस ग्रेट डियर. आता तू थांब हा मल्हार प्राईज सेरेमनी आताच आहे त्या विक्रांत यांच्या हस्ते. हो ग मी थांबनार आहे तुझ्या सोबत मल्हार बोलला.

क्रमश ..