ते चार दिवस - भाग 3 बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ते चार दिवस - भाग 3

ते चार दिवस
27 डिसेंबर 2020
स्थळ - चौकुळ - वेळ सकाळी 6.00
चौकुळमध्ये दाट धुकं पडल होत.अगदी दोन फुटांवर दिसत नव्हत. शरदच्या बंगल्याच्या आवारात एकून दोन कार तयार होत्या.एका कारमध्ये शरद व रेवती होती. तर दुसर्या कार मध्ये समीर,संजना व प्रशांत व त्यांच सामान त्यात लॅपटॉप,त्यानी चौकुळचे शूटिंग करण्यासाठी आणलेला ड्रोन,प्रशांतचे स्केचबुक इत्यादी. गावातले काही तरूण आपणही गाडी घेवून येतो अस म्हणत होते.पण इन्स्पेक्टर खानच्या सूचनेवरून शरदने नम्रपणे त्यांना थांबवले.चंद्रिकेला सोडवल्यावर पहिल्यांदा गावातच घेवून येवू अस सांगितलं.
कारच्या पिवळ्या लाईटस् चालू करून कार संथपणे पुढे सरकल्या.गावकर्यांचे डोळे पाणावले होते.आंबोली घाट उतरेपर्यत धुकं राहणार होत.कोणत्याही परिस्थितीत काळोख पडण्यापूर्वी अलिबागला पोहचायच होते. इन्स्पेक्टर खान सावंतवाडी वरून आपल्या टिमसहित निघणार होता. पेणला सर्व एकत्र येणार होते.तिथून उजवीकडच्या रस्त्याने अलिबागला ते एकत्र जाणार होते.
समीरने काल रात्रीच गूगल मॅपवरून राजमानेंच्या फार्महाऊसचे लोकेशन व इमेज मिळवली होती.त्यानंतर तिघांनी फार्महाऊसचा कच्चा नकाशा बनवला होता व तो खानला पाठवला.आंबोलीचा घाट अर्घा पार केल्यावर धुकं संपलं आणि दोन्ही कारनी वेग घेतला.
मध्ये मध्ये खान त्यांना फोन करून चौकशी करत होता.तर कधी चौकुळमधून फोन येत होता. साधारण दुपारी बारा वाजता ते चिपळूण पोहचले. चिपळूणचा घाट पार करत असताना अचानक एक गाडी रस्त्यात आडवी असलेली दिसली.शरदने कार थांबवली. अचानक कारमधून तिघेजण बाहेर आले व त्यांनी कारला घेरले.एकाने शरदच्या मानेवर धारदार सुरा धरला.क्षणभर शरद व रेवती गांगरले.दुसर्या इसमाने रेवतीला हाताला धरून बाहेर ओढलं.
" घेवून या तिला लवकर. त्याने गडबड केली तर गळा चिरा त्याचा.साली मला कुत्रा म्हणते काय?"
रेवतीने आवाज ओळखला. समोरच्या कारमध्ये बसलेला तो दर्शिल होता.त्याची एवढी हिंमत कशी झाली तेच तिला समजेना.
"ओ गॉड; शरद हे माझ्या कर्माचे फळ आहे. मी येते पण...पण त्याला इजा करू नका."
दोघे तिला ओढत नेत होते तेवढ्यात शरदने सुराधारी गुंडाचा हात पकडला व झटका दिला.त्या झटापटीत शरदच्या हाताला जखम झाली .पण सुरा उडून बाजूच्या गटारात पडला.त्याने त्या गुंडाला घट्ट पकडले.त्याच वेळी समीरची कार तेथे आली.रेवतीला कुणी तरी ओडत नेतोय हे लक्षात येताच.त्याने कार थांबवली. तिघांनी संकट ओळखून त्वरीत धाव घेतली.संजना व प्रशांत कराटे शिकलेले होते. काही वेळातच त्यांनी दोन्ही गुंडाना बदडल व रेवतीची सुटका केली.मदत आलेली बघताच शरदलाही जोर चढला व त्याने पकडलेल्या गुंडाची धुलाई केली.दर्शिलने भाड्याने आणलेले गुंड जीव वाचवण्यासाठी पळून गेले. चिडलेल्या रेवतीने कारमध्ये बसलेल्या दर्शिलवर हल्ला चढवला. दोनचार थोबाडीत बसल्यावर दर्शिलनेही दरवाजा उघडून पळ काढला.
शरदचा रक्ताळलेला हात बघून रेवतीच्या डोळ्यात आसवे आली. रुमालाने त्याची जखम बांधता-बांधता ती स्फुंदत म्हणाली...
"शरद..शक्य झाल तर मला क्षमा कर हे माझ्यामुळे घडल."
"पण त्याला कस कळल की आपण आज इथून जाणार ते!"
"कदाचित तो तुमच्या मागावर असावा. चला आपल्याजवळ वेळ कमी आहे." समीर म्हणाला. त्याने दर्शिलच्या कारची चावी काढून घेतली व समोरच्या गटारात फेकली.त्याने पुन्हा पाठलाग करू नये हाच त्याचा उद्देश होता.
रेवतीने आसवे पुसत कार चालू केली.
-----*------*-------*--------*--------*------*--------
स्थळ- अलिबाग वेळ-दुपारी 1.00
अगदी समुद्र किनार्याला लागून असलेल्या एका फार्म हाऊसच्या मध्यावर माडा- फोफळींच्या गर्दीत एक लहानसा टुमदार एक मजली बंगला होता. या बंगल्याच्या मजल्यावर किनार्यालगतच्या खोलीत चंद्रिकेला बंदिस्त करून ठेवले होते.काल दिवसभर ती रडत होती.त्या दाढीवाल्या इसमाने गच्चीवरून खाली आणल्यावर तीचे तोंड पट्टीने बंद करून त्यावर टेप लावली व हात बांधले होते.तिला मागच्या सीटवर झोपवून तो तिथून पळाला होता.त्याचा चेहरा विलक्षण करडा व क्रूर वाटत होता. तो गाडी चालवताना मध्येच स्वतःशी बोलत होता. चंद्रिका तर भयाने गर्भगळीत झाली होती.प्रवासात तो एकदाच कुठतरी थांबला होता व तिला पाणी व काॅफी दिली होती.
बंगल्यावर आल्यावर त्याने तीला वरच्या खोलीत बंदिस्त केल होत.त्यानंतर तो दाढीवाला माणूस तिच्याजवळ आला नव्हता. पण एक म्हातारा माणूस जेवण घेवून यायचा...काल दुपारी ती जेवली नाही. पण रात्री त्या म्हातार्याने तिला समजावून थोड जेवायला लावलं होत. पण आता रडायचं नाही तर धिराने संकटाला तोंड द्यायच अस तिने ठरवलं.
तिला ज्या खोलीत ठेवलं होत ती छानपैकी सजलेली होती. अनेक खेळणी...एलईडी टि.व्ही. लॅपटॉप...हार्मोनियम.. तिथे होता.भिंतीवर फुगे लावलेले होते...सर्वात महत्वाचे म्हणजे भिंतीवर सगळीकडे एका मुलीचे वेगवेगळ्या ड्रेसमधले फोटो लावले होते.ती मुलगी अगदी तिच्यासारखीच दिसत होती. क्षणभर तिला ते आपलेच फोटो वाटले.आज जेवण घेऊन येणार्या आजोबांना विनवूण पप्पांना फोन लावायचा अस तिन ठरवलं.तेवढ्यात म्हातारा जेवण घेवून आला.
" आजोबा मला मोबाईल द्या. मला पप्पांशी बोलायच....तरच मी जेवणार." चंद्रिका ठामपणे म्हणाली.
" ताईसाब तस करता येणार नाही. हट्ट नका करू...जेवा."
चंद्रिकेचे रागाने समोरची खेळणी भिंतीवर फेकून मारली.
आवाज ऐकून दाढीवाला इसम वर आला.
"काय झाल ;जीवबा?"
जीवबाच्या डोळ्यात भय तरळले.
"मालक, ती जेवण नको म्हणतेय.."
"का?" त्याने ओरडून विचारले.
"म....मला पप्पांशी बोलायच." चंद्रिका
" कोण पप्पां? आं...कोण पप्पां..? आता मीच तूझा पप्पा..!"
काही क्षण तो गप्प राहिला. मग डोक्यावरचे केस विस्कटून विचित्र आवाजात हसू लागला.
" सगळे मला वेडा समजतात..माझी ईशिता.. माझी लाडकी मुलगी मला..मला सोडून गेली...त्या मूर्ख बयेबरोबर.....पप्पांचा द्वेष करते ती....मी..मी.वाईट आहे...मी वेडा आहे." तो हसत राहीला.
चंद्रिका घाबरून थरथरत कापत होती तर जीवबा हताशपणे आपल्या मालकाकडे बघत होता.तो खूप वर्षे त्याच्याकडे कामाला होता.घरातली सगळी काम करायचा.
रणजित राजमाने केमिकल इंजिनियर होता.तो कोणात फारसा मिसळायचा नाही.त्याचे कोणी मित्र नव्हते.एका औषध कंपनीत जॉब मिळाल्यावर आपल्या हुशारीला वाव मिळेल अस त्याला वाटल. दरम्यान त्याच लग्न झाल.वर्षभरात ईशिताचा जन्म झाला.तो जीवनात रस घ्यायला लागला.पण चार वर्षे काम केल्यावर त्याच्या लक्षात आल की इथ एकमेकांचे पाय ओडले जातात...चापूलाशी करणारा पुढे जातो.काही नव सुचवले की ते हसण्यावारी नेलं जात.त्याला अचानक घोर नैराश्य आल व वैतागून त्याने जॉब सोडला. शर्मिलाने त्याच्या या निर्णयाला साथ दिली. ती स्वतः बँकेत जॉब करत होती.त्यामुळे चिंता नव्हती. त्याने अलिबागला जागा विकत घेतली.तिथे स्वतःची औषध कंपनी सुरू केली.काही नवे फॉर्म्युले शोधून त्याचे पेटंट घेतले. या दरम्यान हवेतले विषारी व प्रदूषणकारी वायू वेगळे करून त्यांच रूपांतर करण्याच एक यंत्र बनवण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली.तो झपाटल्या सारखा या प्रोजेक्टवर काम करू लागला. त्याच संसाराकडे ...व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले.खूप संशोधन व चाचण्या करून अखेर त्याने यंत्रांच डिझाईन बनवले.त्या दिवशी तो प्रचंड खूष होता.त्याची योजना अशी होती की अशी यंत्रं तयार करून मोठ्या शहरात चौकचौकातून बसवून प्रदूषण कमी करता येईल.या साठी खूप पैसा लागणार होता शिवार सरकारी परवानगी लागणार होती.त्याने आपली योजना व डिझाईन राज्य व केंद्रसरकारकडे सादर केल पण सरकारी लाल फितीत त्याच काम अडकलं.कोणी त्याला गांभिर्याने घेतलं नाही.
निराशेचा प्रचंड झटका त्याला आला .आयुष्य निरस वाटू लागल.तो सर्वांवर चिडू लागला.हाताला येईल ते फेकू लागला.पत्नीला मारहाण करू लागला.कधी कधी बडबडू लागला की मी विषारी वायू तयार करेन व बसल्या जागेवरून मुंबई बेचिराख करेन.घाबरलेल्या शर्मिला राजमानेनी मालाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली व ईशिताला घेवून दोन महिन्यांपूर्वी गुपचूप निघून गेली.
रणजितच्या मनात हळवा कोपरा होता तो ईशितासाठी.ती निघून जाताच तो वेडापिसा झाला.त्याने मालाडचा फ्लॅट विकला.त्याला थोडीफार गाण्याची आवड होती.टि.व्ही वर लिटल चॅम्पस् बघताना..त्याने चंद्रिकेला बघितल अगदी ईशितासारखी दिसणारी व तिच्याच वयाची मुलगी बघून त्याने ठरवले हिला आपल्याकडे आणायचे आपली मुलगी म्हणून!त्याने चंद्रिकेची माहिती काढली. मुंबईतून पळवुन नेणे सोपं नव्हते. पण डिसेंबरमध्ये ती मैत्रीणींसोबत गावी जाणारं हे कळल व त्याने पुढचा प्लान आखला.
-----*-----*------*-------*------*-------*------*---
स्थळ- अलिबाग वेळ- सायंकाळी 6.00वाजताची
राजमानेच्या फार्महाऊसला लागून असलेल्या लॉजच्या दुसर्या मजल्यावरच्या एका रूममध्ये समीर,संजना,प्रशांत,शरद , रेवती व इन्स्पेक्टर खान व त्याचे दोन सहकारी ;जे पट्टीचे नेमबाज होते एकत्र बसले होते. खानने त्याना ईशिताचा फोटो दाखवला . फोटो बघताच सारे चमकले.
" ही अगदी चंद्रिके सारखी दिसते." संजना व रेवती एकदम म्हणाल्या.
" होय. अन म्हणूनच त्याने तिच अपहरण केलय."
"सर, आपल्याला लोकल पोलीसांची मदत द्यावी लागेल? किंवा त्यांची परवानगी घ्यावी लागेल?" शरदने विचारले.
" सध्या नको.... 'ऑपरेशन राजमाने ' आपल्याला सावधगिरीने कराव लागेल." खान दुर्बिणीतून फार्महाऊसचे निरिक्षण करत म्हणाला.
" तिथे फारसी माणसं दिसत नाहीत. फक्त एक वयस्कर व्यक्ती दोनवेळा दिसली.तो राजमाने निश्चित नाही.कदाचित तो नोकर असावा.पण दोन डाॅबरमॅन जातीचे कुत्रे परिसरात फिरताना दिसताहेत." खान म्हणाला.
"साहेब आपण ड्रोनचा वापर करून फार्महाऊसवर शूटिंग करूया काय.? आत शिरताना आपल्याला त्याचा उपयोग होईल."
" त्याला संशय आला तर !"
" नाही येणार सर, अगदी छोटा आहे सर..आवाजी येत नाहिय. मी मघाशी किनार्यांवर दोन ड्रोन बघितलेयत त्यामूळे संशय येणार नाही. " समीरने विचारले.
खानने परवानगी देताच समीरने ड्रोन बाहेर काढला.तो लॅपटॉपला अॅटच केला. आता सगळं शूटिंग लॅपटॉपवर दिसणार होत .ड्रोन खिडकीतून बाहेर झेपावला.
माडा-फोफळीं वरून अलगद बंगल्याभोवती फिरू लागला. फार्म हाऊसच्या चारी बाजूला कठडा होता.त्यावर तारांच कुंपण होत...कदाचित त्याला इलेक्ट्रिक करंट जोडलेला असावा.समीरने ड्रोन बंगल्याच्या वरच्या मजल्याकडे नेला. एका रूमकडून जाताना आत कुणीतरी असल्यासारखं वाटलं. त्याने ड्रोन स्थिर केला.
" ही बघा चंद्रिका... " तो जवळपास ओरडलाच.
सार्यांची डोळे स्क्रिनवर स्थिरावले व पाहू लागले.बेडवर चंद्रिका उदासवाणी बसली होती.रेवतीच्या डोळ्यात पाणी आले तिने डोळे बंद केले.शरदचा चेहराही उदासवाणा झाला. पण ती सुखरूप आहे हे पाहून थोड समाधान वाटल.
" हे बघा आपण पहाटे चार वाजता फार्महाऊसवर शिरणार आहोत.शरद व रेवती इथंच राहतील.वेळ लागली तर अलिबाग पोलीस स्टेशनला संपर्क करतील. कुत्र्यांचा बंदोबस्त हवालदार सावंत करतील. त्याना फक्त बेशुद्ध करायचंय. बाकीचा प्लान मी रेकॉर्डींग बघून पहाटे सांगेन.सावधपणे सगळं हाताळावे लागेल.जेवण झाल्यावर छानशी झोप घ्या. त्याची गरज आहे. " खान गंभीरपणे म्हणाला.
-----*------*----*------*-------*-------*------*------