अनूप... smita V द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

अनूप...

आपल्या घरासाठी आणि कुटुंबासाठी एखाद्या मुलीला किंवा त्या घरातल्या महिलेला जेवढ तडजोड करत जिवन जगावं लागत, त्याचप्रमाणे त्या घरातल्या पुरुषाला व मुलाला जिवन जगावं लागत.
ही त्याच मुलाची कहाणी आहे.,





सकाळ पासून रिचाने जवळपास सात-आठ फोण केले होते.
संध्याकाळी 4 वाजता कॅफे हाऊस मध्ये भेटायला बोलावले.
माझी सर्व कामे आटोपली.भेटायला गेलो.
रिचा : hellos अनुप, काय घेणार?
मी : असे काय अनोळखी सारख बोलते. तुला माहीत आहे की मी कॉफी घेतो.
रिचा : सॉरी! अरे मजा घेत होते.
मी: हो का मॅडम!
रिचा: बर! आता seriously बोलते. तू काही विचार केला
का, पप्पानी दिलेले ऑफरचा!
मी: सिरियसली सांगतोय, मला खरंच जमणार नाही.माझी काम करायची पद्धत आणि त्यांची काम करायची पद्धत खूप वेगळी आहे.
रिचा: अनुप विचार कर! तू जर, सेटल झाला तर आपलं लग्न पण लावून देणार आहे, असं पप्पांनी मला वचन दिले.
मी: प्लीज रिचा माझी जीवन जगण्याची तत्व वेगळे आहे, आणि तुझ्या पप्पा चे तत्व वेगळे आहे, त्यांना पैसा म्हणजेच सर्व काही वाटतो
रिचा: अनुप माझ्या पप्पाविषयी काही बोलायचं नाही.
अरे कधी विचार करणार आहेस? कधी सेटल होणार?
तुझा लहान भाऊ लग्न करून मोकळा ही झाला आहे त्याने नाही केली का श्रीमंताची मुलगी? आणि तो तिथे आता त्याच कंपनीच्या बाॅस झाला नाही का?
तुला काय प्रॉब्लेम आहे
मी: रिचा मी तुझ्या वडिलांचे नाव ऐकून तुझ्यावर प्रेम केले नाही तर तुझ्यावर प्रेम केलं.
मी ज्या परिस्थितीत आहे या परिस्थितीतच लग्न करायला तयार आहे.
मी कधीही तुझ्या वडिलांच्या हॉस्पिटल मध्ये काम करणार नाही
रिचा: ठीक आहे! तुला तुझा निर्णय बदलायचा नाही का?

मी: रिचा,मला स्वतः घर आहे, प्रॅक्टिस चांगली चालते.
तुझा माझा उत्तम चालेल.
रिचा: अरे! तुला कळत कसे नाही ते घर तुमच्या तिघा भावांच आहे, तुझ्यावर येवढ्या जिम्मेदारी.
आपल एवढ्या पैशात नाही भागणार, तू पापांच हॉस्पिटल join केला तर ते आपल्याला नवीन बंगला पण राह्यलाय देतील.
मी: रिचा मी माझा निर्णय नाही बदलणार....शेवटी तू तुझा निर्णय घे.
रिचा: ठीक आहे.तुला नाही बदलायचा निर्णय तर मी माझा निर्णय बदलते.
पपाणी माझ्या साठी अमेरिकेच स्थळ आला मी त्याच मुलाला होकार देते..
8 दिवसानी ये माझ्या लग्नाला.
असे बोलून रिचा तावातावाने निघुन गेली. अशीच आहे.माझी
रिचा.
मी अनुप, एमबीबीएस एमडी बाल रोग तज्ञ नाशिकला राहतो माझ्या घरी माझे आई-वडील आम्ही ,तिघे भाऊएक घरात सर्वात मोठा मी,
माझी नेमकी M.B.B.S complete झाल, माझ्या वडलांना suspended केल, भावाची शिक्षण पूर्ण ही झाली नव्हते, त्यामुळे मला अमेरिकेत जाऊन M.S करायचे स्वप्न स्वप्न... राहीले,
घर चालवण्यासाठी मला लगेच नोकरी करावी लागली..
रिचा रिचा माझ्या कॉलेजची मैत्रीण माझी गर्लफ्रेंड,
आमच पूर्वीपासून एकमेकांवर प्रेम होत. आम्ही relationships मधे होतो...रिचा अणि माझे स्वप्न वेगवेगळी होती..मला वाटायचे ती माझ्या साठी तिचा मार्ग बदलेल
तसाच गैरसमज रिचाला माझ्या बाबतीत झाला..
तिला तिच्या वडलांनकडून हव्या असलेल्या सर्व गोष्टी चुटकीसरशी मिळायच्या अणि मला घरात हवा असणार्‍या गोष्टी लगेच available करून द्यावा लागायचा त्यामुळे मी गेली 5 वर्ष पैसे मिळविण्यासाठी रिचा ला वेळ देऊ शकत नव्हतो..
पण ती समजते माझ तिच्यावर प्रेम नाही.. तसे पाहता
आमच्या दोघांचा स्वभावही सारखा आहे म्हणजे थोडासा तापट आणि थोडासा रागीट. रिचार्ज चे वडील नाशिकच्या सिटी हॉस्पिटलचे डीन आहे.
त्यांचं म्हणणं आहे की मी त्यांच्या हॉस्पिटलला जॉईन व्हावे पण मी डॉक्टर झालो येथे समाजसेवेसाठी त्यामुळे मी माझी प्रॅक्टिस करतो.