Nandini books and stories free download online pdf in Marathi

नंदिनी

न्यूज मध्ये बातमी चालत होती, मुंबई-पुणे हायवेवर महाविद्यालयीन बसचा एक्सीडेंट झालेला आहे, बऱ्याच मुलींना गंभीर इजा झालेले आहे, ही बातमी ऐकताच नंदिनीच्या आई-वडिलांचा थरकाप होऊ लागला.
त्यांनी पटकन नंदिनीच्या मोबाईल वरती कॉल केला, पण समोरून कॉल कोणी उचलत नव्हतं.
त्यानी घाबरत, घाबरत त्यांच्या मोठ्या मुलीला फोन लावलं. तिचे नाव वेदिका, वेदिका म्हणाली आई मी पण आत्ताच बातमी ऐकली. मला पण काही सुचत नाही मी यांना लगेच फोन लावते, आणि माहिती काढायला सांगते.
पाच मिनिटांनी नंदिनीच्या वडिलांच्या मोबाईलवर कॉल कॉल आलता.मी इन्स्पेक्टर शिंदे बोलतोय," नंदिनी साने तुमची मुलगी का? तिचे वडील घाबरत,घाबरत:हो,ती माझीच मुलगी काय झालं?
इन्स्पेक्टर: तुमच्या मुलीचा मुंबई-पुणे हायवेवर एक्सीडेंट झालेला आहे. त्यांना आम्ही टिळक हॉस्पिटल ला ॲडमिट केलेला आहे तुम्ही लगेच या,
बाबा: अहो,पण माझ्या मुलीची तब्येत कशी आहे? प्लीज मला काहीतरी माहिती द्या.
बोलण्या अगोदरच इन्स्पेक्टरने फोन ठेवला, बाबांनी लगेच वेदिका ला फोन लावला आणि तिला सर्व सांगितलं वेदिका,मी आत्ताच फोन लावला, आम्ही लगेच येतो आपण लगेच टिळक हॉस्पिटल ला निघूया.

वेदिका आईबाबा आणि वेदिका तिचे मिस्टर टिळक हॉस्पिटल कडे निघाले. जेव्हा हॉस्पिटल ला पोहोचले,आईला तर चक्करच आली.
वेदिका आणि तिचे मिस्टर पटकन डॉक्टर कडे गेले त्यांना विचारत होते काय झालं? नंदिनीची तब्येत आता कशी आहे? डॉक्टरांनी सांगितले की तिच्या पोटामध्ये बसचे पत्र घुसलेला आहे, त्यामुळे खूप प्रमाणात रक्तस्त्राव झालेला आहे. डॉक्टरणि नंदिनीला पटकन ऑपरेशन थेटर मध्ये नीले.
अर्ध्या तासानंतर डॉक्टर बाहेर आले. वेदिका आणि तिच्या मिस्टरांना आत मध्ये बोलवलं. वेदिका आणि तिचे मिस्टर घाबरत घाबरत आत मध्ये गेले, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, "नंदिनीच्या गर्भाशयाच्या पिशवीला चिर पडलेली आहे, त्यामुळे तिची गर्भाशयाची पिशवी काढावी लागेल". वेदिका ला हे ऐकून धक्काच बसला पण, नंदिनीच्या आयुष्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावाच लागला, सगळे डॉक्युमेंट सही केले.
दोन तासानंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले. त्यांनी सांगितले की नंदिनी ची तब्येत आता चांगली आहे. तिला आता धोका नाही.
वेदिका आई-वडिलांना बाजूला बोलवलं. त्यांच्या हातावर हात ठेवून सांगितलं." आई नंदिनीची गर्भाशयाची पिशवी काढावी लागली",आई-बाबांना ऐकून धक्काच बसला.
नंदिनी आता तर सतरा अठरा वर्षाची कोवळी मुलगी. ती कधीच नाही होऊ शकणार नव्हती आता त्यांना पुढे नंदिनीचा कसं होईल? पण त्यांना नंदिनी साठी हा धक्का पचवायचा होता.

नंदनी चे ऑपरेशन सक्सेस झाले. ती हळूहळू नॉर्मल होऊ लागली.
आईवडिलांनी तिचापासून तर सध्या ही गोष्ट लपवली होती. दोन-तीन महिने गेल्यानंतर नंदिनी ने वेदिका ला विचारले? ताई सर्व ठीक वाटतं,:पण मला तीन महिने झाले piroeds येत नाहीये".
वेदिका ला वाईट वाटलं, नंदिनीला कशाप्रकारे बोलावे हे वेदिका ला समजत नव्हते. तरीपण नंदिनीला ह्या गोष्टी सांगाव्या लागणार होत्या. वेदिका आई-वडिलांकडे आली. आणि तिच्या आई-वडिलांशी चर्चा करू लागली की नंदिनीला सत्य सांगावे लागणार आहे. नंदिनीच्या आईची हिंमत होत नव्हती तरी पण त्यांना हे सत्य नंदिनीला सांगावेच लागणार होते.
त्या रात्री आई, वेदिका आणि नंदिनी बोलत होत्या.
वेदिका नंदिनीचे हात हातात घेऊन बोलू लागली," नंदिनी, आम्ही तुला एक सत्य सांगणार आहोत, हे बघ तू खचून जाऊ नकोस हिंमत हारू नकोस, आमच्यासाठी का होईना तुला हिम्मत घ्यावीच लागणार आहे".
नंदिनी चा चेहरा उतरला. ती विचारत होती,झालं तरी काय? सांग ना ,
वेदिका: जड अंतकरणाने म्हणाली, "नंदिनी एक्सीडेंटमध्ये तुझ्या गर्भाशयाच्या पिशवीला चीर पडल्यामुळे ती काढावी लागली", तुला वाचवण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागला.
नंदीला धक्काच बसला तिला असे वाटले की आपले स्त्रीत्व कोणी हिरावून घेतले ती खूप रडू लागली तिचे न झालेले बाळ निसर्गाने हिरावून घेतले.
वेदिकाने आणि आईने नंदिनीला खूप समजावून सांगितले. आई-वडिलांसाठी नंदिनीला समजदारपणा दाखवा लागला. पण ती एकांतात खूप रडायची. तिला तिचे जीवन निरर्थक वाटायचं,पण हळूहळू सत्य स्वीकारत जगावे लागत होते. ती अभ्यासात पूर्णपणे गढून जायची.
विचार करण्यासाठी स्वतःला वेळच देत नव्हती.
नंदिनी समोर आईबाबा काही बोलत नसे पण तिच्या काळजीपोटी रात्र रात्र जागून काढायचे.


इतर रसदार पर्याय