पुनर्विवाह उमेद का smita V द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुनर्विवाह उमेद का

सदरील कथा मालिका ही काल्पनिक असून तिचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही . तसेच सदरील मालिका ही कोणत्याही मालिका अथवा पुस्तकावरून प्रेरित केलेली नाही .

विवाह तीन अक्षरी शब्द पण जेवढ नाजूक तेवढाच गंभीर तेवढाच आयुष्याला कालटनी देणारा विषय.
विवाहात साथीदार जर योग्य मिळाला तर आयुष्यात स्वर्गसुख प्राप्त होतात.
विवाहात माणसाला केवळ आणि केवळ उमेदच असतात उमेद नवीन आयुष्याची...उमेद सुखी, सोनेरी स्वप्नांची, उमेद परफेक्ट जोडीदाराची .
विवाह मध्ये जेवढ्या अपेक्षा असतात. तेवढच अक्षेप हे पुनर्विवाहात असतात.
पुनर्विवाह पाच अक्षरी शब्द, विवाह जेवढा आशादाई तर पुनर्विवाह हा तेवढाच निराशदाई शब्द असतो.
कारण यात मनुष्याचा पहिला विवाह असफल झालेला असतो..
असंफलाचे कारण जोडीदाराचा अपमृत्यू, तो सोबत नसण यामुळे त्या व्यक्तीला घरच्यांसाठी तर कधी समोर आलेल्या परिस्थितीमुळे पुनर्विवाह करावा लागतो.

पूर्वी पुनर्विवाह हा शब्द केवळ पुरुषांसाठीच प्रचलित होता . परंतु सामाजिक उत्क्रांती सोबत हा शब्द आता स्त्रियांसाठी ही प्रचलित होत आहे .
तरीही सध्याच्या जमानात एखाद्या स्त्रीचा पुनर्विवाह आहे असे ऐकण्यात येताच लोकांच्या भुवया उंचावल्या जातात.
विवाह जेवढा आशादाई असतो, तेवढाच पुनर्विवाह भावनिक गुंतागुंतीने जडलेला शब्द आहे.
यात जे साथीदार असतात त्यांना त्यांच्या पूर्वीच्या साथीदाराच्या कडू-गोड आठवणी सोबत असतात..
त्या आठवणी सोबत ते या पुनर्विवाहात उतरतात .
कधी-कधी मनुष्य पूर्वीच्या साथीदारावर इतका प्रेम करत असतो का तो नवीन साथीदाराला स्वीकारण्यासाठी त्याचं मन तयार नसतो.
ही भावनिक गुंतागुंत सोडवून रुद्र आणि गौरी त्यांचा पुनर्विवाह यशस्वी करतील का?
स्थळ- जयपुर राजस्थान.
राघव गोएंका 65 तिल गृहस्थ त्यांच्या बंगल्यात भराभर चालत आपल्या 80 वर्षीय आईच्या रूम मध्ये जातात.
राघव- आईsss आत्ताच शोभाचा फोन आला.. अशोकला हार्ट अटॅक आला. त्याला ऍडमिट केल, आपल्याला लगेच मुंबईला जावं लागेल.
आई:" अरे देवा, असं कसं झालं एवढया लहान वयात कसा अटॅक येऊ शकतो? त्याची तब्येत कशी आहे? शोभा काय म्हणाली,गौरी त्यांच्याजवळ होती ना?
राघव:" हो आई गौरीनेच सगळी खटाटोप केली, आपल्याला लगेच निघावं लागेल!"
आई:"अरे रुद्रला पण सोबत घेणा, तरुण मुलगा सोबत असला तर त्याचा आधार वेगळाच असतो!"
राघव:"आई त्याला त्याचे काम संपत नाहीत. हल्ली तो एकटाच रहात असतो.. तो आपल्या सोबत कुठे येणार?

आई :"प्रीती ए प्रीती जाऊन रुद्रला आवाज दे बरं!"
प्रीती-"आजी काय झालं, तुम्ही एवढ्या घाबरलेल्या का आहेत?
आई:" प्रीती तुझ्या सासूला बोलव खाली आणि हो रुद्रला आवाज दे।
ती भराभर पायऱ्या चढून रुद्रला आणि तिच्या सासूला बोलवते
प्रीती-"रुद्रजी,आजी आवाज देताय तुम्हाला।
34 वर्षाचा रुद्र त्याचा पिळदार शरीर होतं.. तो पुश-अप करत होता.
प्रीतीचा आवाज ऐकून त्याने लगेच शर्ट घातला. खाली आला "आजी काय झाले एवढी का घाबरलीस?"
तिकडून राघवची पत्नी, रचना येते..
रचना- काय झालं आहे, आई.. एवढ्या का घाबरला?"
राघव रुद्रला सांगतो, अशोक काकाला हार्ट अटॅक आलाय, आपल्याला मुंबईला जावं लागणार आहे, तुला जर वेळ असेल तर येतो का?"
रुद्र- हो येतो बाबा, प्रीती विघ्नेशला सांग ऑफिसमध्ये लवकर जायला!"
प्रीती-हो रुद्रजी, सांगेल मी त्यांना!"
रचना- आता जाऊन काय फायदा, तब्येत वाढली असेल?

राघव (रागात येतो) रचना बोलायला जीभ, कशी वळते ग तुझी.. कधीतरी चांगलं तर बोलत जा!
रचना- मी काय बोलले, जे ऐकते तसंच तर बोलते!"
समीरा समोरून येते, रुद्रदादा मुल आवरायला तयारच नाही. थोडं त्यांना सांगत जा ना, लवकर आवरायला मलाही कॉलेजला जावं लागतं."
रुद्र:' ऐक आज मावशी येतील सांभाळायला,
तुझं तू आवरून जा. मी मुंबईला निघतो. रुद्र ने दोन-तीन फोन लावले..
रुद्र:" आजी आपले प्लेनचे तिकीट बुक झाले आहे चला निघूया।
रुद्र गोयंका:" गोयंका ऑफ clothing इंडस्ट्रीजचा सीईओ स्वभावाने डॅशिंग, मोजक बोलणारा घरात त्याचा चांगलाच दरारा होता. सगळेच त्याला घाबरायचे!"
रुद्रच घरच्यांवर खूप प्रेम आहे. घरच्या सगळ्यांची काळजी घ्यायचा."
तीन तासात सगळे मुंबईला पोहोचतात.
हॉस्पिटलच्या समोर येताच राघव घाबरत असतो.
रुद्र- बाबा,काकांना काही होणार नाही चला आत मध्ये."
आई, रुद्र आणि राघवला पाहताच शोभा पळत येऊन आजीच्या गळ्याला पडून रडते..
"आई, बघाना त्यांना काय झालंय?
आई-काळजी करू नको शोभा!"
रुद्र- काकु, काय झाले काकाला?"

शोभा:" रात्री चक्कर आल्यासारखं झालं, तरीही गौरीने लगेच ॲम्बुलन्स बोलवली, हॉस्पिटलला आणलं तेव्हा डॉक्टरने सांगितलं,"अटॅक आहे. त्यामुळे लगेच ऍडमिट कराव लागणार आहे."
रात्रीपासून आयसीयू मध्येच आहे, मला तर काहीच सुचत नव्हतं, गौरी सगळं हँडल करते.

डॉक्टर- येतात हातात अजून र्पिस्क्रिप्शन देत. हे बघा,या सलाईन्स लागतील, प्लीज जाऊन आणून द्या.
शोभा:" तुम्ही बसा..मी हे सलाईन आणून देते."
शोभाला सुधरत नव्हतं . तरी तशीच ती धडपटात जायचा प्रयत्न करत होती..
रुद्र:"काकु, ते प्रेस्क्रीप्शन माझ्याकडे द्ये, मी जाऊन सलाईन आणतो."
रुद्र, मेडिकल वर आला तिथे एक मुलगी ऑलरेडी औषधी घेत होती."
रुद्र तिच्या बाजूला जाऊन थांबतो...( मेडिकल वाल्या मुलाला म्हणतो,)" एस्क्युज मी हे औषध मला आत्ताच्या आत्ता पाहिजे पेशंट सिरीयस आहे!"
रुद्रच्या, रुबाबदार आवाजामुळे मेडिकल वाला मुलगा लगेच त्याच्या हातातली प्रिस्क्रीप्शन घेतो..
मेडिकल वाला मुलगा एकटाच होता. तो त्या मुलीचे औषध बाजूला ठेवून..
रुद्रची औषध काढून देत होता. तेवढ्यात ती मुलगी:" मी यांच्या अगोदर आलेली आहे आणि आमचाही पेशंट सिरीयस आहे. प्लीज मला अगोदर औषध द्या. बिल घेऊन मोकळं करून द्या."
रुद्र:"एक्सक्यूजमी! आमचे पेशंट आयसीयू मध्ये आहेत. त्यामुळे मला जरा जास्तच गडबड आहे."
ती मुलगी:"लूक मिस्टर, हे हॉस्पिटल आहे इथे सगळ्यांनाच गडबड असते आणि तुमच्या अगोदर मी आलेली आहे."
रुद्र तोंडातल्या तोंडात पुटपूटतो मॅनर्सलेस!
ती मुलगी:"मला जर वेळ असताना मी तुम्हाला नक्कीच शिकवलं असतं मॅनर्स कसा असतो!"असं म्हणून ती मेडिसिन घेऊन निघून जाते।
रुद्र तिच्यापाठोपाठ सलाईन घेतो आणि तडक आयसीयू समोर जातो. डॉक्टरांना सलाईन देतो.
रुद्र जेव्हा शोभा काकू समोर येतो तेव्हा ,
शोभा..रुद्र मी आजीला आणि बाबांना घेऊन घरी जाते. तू तोपर्यंत गौरीसोबत हॉस्पिटलमध्ये थांबशील का?
तसही तन्मय गौरीच्या बहिणी जवळ थांबलेला आहे."
रुद्र:'ठीक आहे काकू, तुम्ही जाऊन या. ड्रायव्हर आहे ना सोबत?"
शोभा:" हो आहे,आम्ही एका तासात येतो. तेवढ्यात शोभाने गौरीला आवाज दिला," गौरी इकडे ये!"
गौरी:" रुद्र समोर येते, दोघांची नजरा नजर होताच रुद्र रागात येतो...
शोभा गौरी हे रुद्र, ओंकारचा मोठा भाऊ!
गौरी:" तिचे डोळे लगेच खाली करते.
मोठ्या मोठ्या टपोऱ्या डोळ्याची गौरी, रंग सावळा पण दिसायला अगदी सुंदर दिसायची.
गौरी तीच होती, जी मेडिकल मध्ये रुद्रला म्हणली,"मला जर वेळ असता तर तुम्हाला मॅनर्स शिकवले असते."
गौरीला हे आठवून पस्तावा होत होता.
गौरी खांद्यावर पदर घेऊन त्याच्या पाया पडते.
रुद्र-(मागे सरकतो) घरच्या सुनांनी पाया पडलेल आवडत नाही. सुना म्हणजे लक्ष्मी असतात..
गौरी, उठते...
शोभा- गौरी, मी आजी आणि काकांना घेऊन घरी जाते. एका तासात आम्ही आवरून येतो. सोबत तन्मयलाही आणते.
गौरी- हो आई, मी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांच म्हणणं आहे आता बाबा आऊट ऑफ डेंजर आहेत..
.सगळे गेल्यावर ..
गौरी: सॉरी रुद्रजी टेंशन मध्ये होते. त्यामुळे खाली तोंडातून एकदम निघून गेले..सॉरी..
रुद्र: ठीक आहे. थोड्यावेळाने रुद्र जाऊन चहा पिऊन येतो.
गौरी:"मी पण किती वेंधळी आहे, एरवी लोकांना गोड बोलते. अणि नेमक यांनाच उलट बोलले, काय वाटत असेल त्यांना, मी किती उद्धट आहे, हेच विचार करत असतील... अगोदरच माझ नि ओंकारच लव्ह मॅरेज..
त्यामुळे या लोकांनी आम्हाला एक्सेप्ट केलं नव्हतं. आता तर सगळे माझ्याबद्दल काय विचार करतील.
○○○○○○●●○○○○○○○●●○○○○○○○○○●●○○○○○