बावरा मन - 11 - सोबत.. Vaishu Mahajan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बावरा मन - 11 - सोबत..

रिद्धी ऑफिसला जाण्यासाठी रेडी होऊन खाली यायला निघते... तेव्हा तिला तन्वीचा कॉल आला...

" बोला मॅडम..." रिद्धी स्टेअर उतरत बोलते...

" कामात आहेस का...?" तन्वी

" नाही ग ऑफिस साठी निघते आहे... बोल तु..." रिद्धी

" नेक्स्ट वीक फ्रेंडशिप डे आणि काय आहे......🤨" तन्वी

" काय आहे..." रिद्धी विचार करत... डायनिंग टेबलवर येऊन बसते... मग तिला क्लिक होत...

" ओह्ह शीट... पियुचा बर्थडे आहे... आणि दोन्ही पार्टी मी अरेंज करणार होते...😬" रिद्धी मनात कपाळावर हात मारून बोलते...

" बर आठवलं... मला वाटलच तु विसरली असणार..." तन्वी

" अरे यार विसरले नाही... सध्या ऑफिस लोड खूप वाढला आहे त्यात खूप कामं पेंडिंग आहे त्यामुळे लक्षात नाही राहील..." रिद्धी

" हम्म असु दे असु दे... मग माझं गिफ्ट रेडी आहे ना..." तन्वी

" हो रेडी आहे... पण मी काय करू... आता काय गिफ्ट देऊ..." रिद्धी

" तु काही डिझाइन केलं असेल ना..." तन्वी

" सध्या काही डिझाइन करायला वेळ कुठे होता... बघते आज ऑफिसला जाऊन काही तरी जुगाड करावा लागेल..." रिद्धी

" कर काही पण कर... फक्त आता लक्षात ठेव... आणि पार्टीची सर्व तयारी होईल ना..." तन्वी

" होईल होईल... डोन्ट वरी.. मी कॉल करते त्यांना..." रिद्धी

" ओके.. चल मला हॉस्पिटल जायच आहे... बोलू नंतर... बाय..." तन्वी

" बाय..." रिद्धी कॉल कट करून ब्रेकफास्ट संपवते...

" बाय एव्हरीवन... सी यु इव्हनिंग..." रिद्धी ऑफिसला निघाली.... मध्ये तिने कॉल करून पार्टीच्या अरेंजमेंट करायला सांगितल्या...

.......
...........

.................

रिद्धी ऑफिसला आल्यानंतर धराने तिला काही डिझाइन दाखवले... रिद्धीने त्यात काही अडिक्शन सांगितले... त्यानंतर धरा जायला निघाली...

" धरा वेट..." रिद्धीने तिला थांबवून स्केच बोर्ड वरील डिझाइन काढून तिला दाखवलं..."

" how is it... जेनीचा वेडींग गाऊन आहे..." रिद्धी स्केच टेबलवर ठेवते...

"How do you always design such amazing outfits..? This is fabulous..." धरा

[ तुम्हांला पण गाऊन पहायचा आहे का.... अहो मग तस बोलायच ना... नाही तुमच पण बरोब्बर आहे.. तुम्ही सांगणार तोपर्यंत तर पार्ट पोस्ट होईल ना...ओके फाईन दाखवते....]

 

( मग कसा आहे... कमेंट मध्ये नक्की सांगा.... आतां बघू यांच पुढे काय चालू आहे...)

" जेनी दी ला खूप छान दिसेल... तु तिला दाखवला.." धरा

" नाही आता दाखवते..." रिद्धी

" ओके... मी येऊ... डिझाइन फायनल करते..." धरा तिच्या कामला निघून जाते...

रिद्धी जेनीला बोलवून डिझाइन दाखवते... तिला देखील ते खूप आवडते... त्यानंतर डिझाइन वर्कशॉप मध्ये पाठवुन दिलं जातं...

रिद्धी पियू साठी डिझाइन बनवायला घेते... तिला काही तरी छानसा ड्रेस डिझाइन करायचा होता... त्यामध्ये ती बिझी होते... लंच ब्रेक मध्ये तिने आणि धराने सोबत लंच केलं... त्यानंतर ती पुन्हा डिझाइन मध्ये गुंतली...

तिला कॉल आला तेव्हा ती स्टॅन्डला ड्राफ्ट पेपर लावून डिझाइन बनवत होती... तिने कानातील ब्लूटूथ जॉईन करून कॉल रिसिव्ह करून डिझाइन सुरु केलं...

" hello.... रिद्धी निंबाळकर स्पिकिंग...." रिद्धी

" hello princess.... Are you busy... " वंश

" थोडीशी... बोला ना ... लंच झालं.." रिद्धी चेअरवर येऊन बसते...

" जस्ट लंच करून बसलो... तू स्किप नाही ना केलास लंच... " वंश

" नाही लंच करून मग काम करत होते..." रिद्धी

" रिद्ध आज फ्री कधी होणार... I want to meet you... " वंश

" मी ऑफिसनंतर अकॅडेमी जाणार आहे... month ending ला कॉम्पिटिशन आहे तर त्याची रिहर्सल घ्यायची आहे... त्यामुळे मला लेट होईल...😔😔" रिद्धी

" ok... fine 🤐..." वंश

" vansh I also want to meet you... पण सध्या वर्क लोड आहे... नेक्स्ट मंथ फॅशन वीक असेल त्याची प्रेपरेशन पण करायची आहे..." रिद्धी

" I know princess... don't over think ok..." वंश

" हम्म.." रिद्धी

" ok... You continue your work and we will talk later..." वंश

" वंश..." रिद्धी

" हम्म.." वंश

"I love you..." रिद्धी

" I love you too... " वंश

" bye... " रिद्धी

" bye... " वंश
..............

..........................

...,.................................

दोघे आपापल्या कामात बिझी झाले... रिद्धीने तिची बॅग आवरली आणि धराला कॉल करून रेडी रहायला सांगितल... त्यानंतर दोघी अकॅडेमीला गेल्या...

रिद्धी अकॅडेमीला पोहचली... तेव्हा सर्व तयारीत होते...

" अरे व्वा... सगळे एकदम तयार आहेत...म्हणजे ट्रॉफी आपलीच आहे तर...." रिद्धी सर्वांना मोटिव्हेट करत बोलते...

" डोण्ट वरी मॅम... ट्रॉफी आपल्याच अकॅडेमीला मिळणार... सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे..." पहिली स्टुडन्ट

" good... मी आलेच... तोपर्यंत विकी सर्व चेक करून घे..." रिद्धी केबिन मध्ये जाते...

रिद्धी जाऊन पटकन फ्रेश होऊन आली.... विकिने सध्या सर्वांना डान्सच्या बेस स्टेप सांगितल्या होत्या... बाकिचा संपूर्ण डान्स रिद्धी सेट करणार होती... त्यामुळे ती आज फक्त बघणार होती....

रिद्धी आल्यानंतर सर्वांनी पोज घेतल्या आणि विकिने गाण प्ले केलं.... रिद्धी प्रत्येकाची फेस एक्स्प्रेशन , स्टेप सर्व नीट निरीक्षण करत होती... रिद्धी असल्याने सर्वजण आपला बेस्ट देत होते.... डान्स संपल्यावर सर्वजण तिथेच् खाली बसले....

" सो गाइज तुम्हांला विकिने डान्सच्या बेस स्टेप सांगितल्या आहेत.... पण उद्या पासून आपल्या डान्सच्या प्रेपरेशन स्टार्ट होणार आहेत.... उद्या पासून मी संपूर्ण वेळ अकॅडेमी मध्ये असणार आहे... आपल्या जवळ फक्त एक वीक आहे त्यामुळे सर्वांनी बेस्ट द्यायच आहे... is it clear..." रिद्धी

" yes ma'am... " सर्वजण

"गूड... कॅरी ऑन..." रिद्धी तिथून बाजूला जातं असताना तिने वंशला पाहिलं.... आणि तिच्या चेहऱ्यावर खळी वाली मिलिअन डॉलर वाली स्माइल आली...

वंश रिद्धी जवळ आला... त्याला अचानक बघुन सगळेच थक्क होते...सगळ्या मुली त्याच्याकडे टक लावुन बघत होत्या...

मग काय विषय आहे का... आपला हिरो एवढा हॉट दिसतच होता... शर्टचे वरचे दोन बटण ओपन होते... स्लीव्हस फोल्ड केल्यामुळे त्यातुनही त्याचे बायसेप्स एकदम स्पष्ट दिसत होते... एक हात पॉकेट मध्ये होता आणि दुसऱ्या हातात ब्लेझर होत...

 

वंश येऊन तिच्या जवळ थांबला... त्याच्यासोबत मॅक्स देखील होता...

" तुम्ही अचानक कसे आलात... मला काही बोलले देखील नाही..." रिद्धी

" इकडे मिटिंगसाठी आलो होतो म्हणून तुम्हांला भेटायला आलो..." वंश

" केबिन मध्ये बोलू या... विकी सगळ्यांना कॉफी प्लीज..." रिद्धि विकिला रिक्वेस्ट करते... आणि दोघे केबिनमध्ये जातात...

" तुम्ही बसा मी आलेच..." रिद्धी वंशला सांगून चेंज करायला जाते... वंश तो पर्यंत तिची केबिन बघत होता...

त्यात तिचे आणि बाकी मेंबर्सचे फोटो होतो... तिच्या टीचर्सचे फोटो होते... तिच्या फॅमिली आणि फ्रेंड्सचे काही फोटो होते... आणि चेअरच्या मागे तिचा मोठा कथ्थक करतानाचा फोटो होता...

 

वंश फोटो बघत उभा होता तेव्हा रिद्धी आली... वंश अजूनही फोटो बघत होता...

" काय बघताय..." रिद्धी त्याच्या शेजारी जाऊन थांबली...

" तुला सर्व डान्स फॉर्म येतात ना..." वंश तिच्या कडे वळुन थांबतो...

" हो... मला कथ्थ्क आणि भरतनाट्यम आधी पासून आवडायच... पण नंतर मी सर्व फॉर्म शिकले..." रिद्धी त्याला सांगत असते तोपर्यंत विकी कॉफी घेऊन येतो...

" हे काय दोनच..." रिद्धी दोन कप बघून बोलते...

" धरा बोलल्या बाहेरच द्या... त्यामुळे तुमच्या दोघांची कॉफी आणून दिली..." विकी निघून जातो...

दोघे तिथल्या सोफ्यावर बसतात...

" तुम्ही येणार होतात तर मला सांगायच तरी... असे अचानक आलात..." रिद्धी

" मी ठरवलं नव्हतं... मग वाटलं तुला देखील भेटायच आहे तर जावं म्हणून आलो..." वंश

" सॉरी वंश मी तुम्हांला वेळ नाही देऊ शकत आहे..." रिद्धी चेहरा बारीक करून बोलली...

" असं अजिबात नाही आहे... मी समजू शकतो... आधी ऑफिस नंतर अकॅडेमी यामध्ये तुझा संपूर्ण दिवस जातो... मी आज फ्री होतो म्हणून भेटायच बोललो होतो.. बस्स.." वंश तिला समजावत बोलतो...

" फक्त दोन महिने मला अजून समजून घ्या... I promise या नंतर माझा वेळ मी तुम्हांला देईल... तुम्ही म्हणाल तेव्हा भेटेल मी..." रिद्धी

" Just two months... then I don't want a reason... I want all your time..." वंश तिच्यावर नजर रोखून बोलतो... रिद्धी त्यावर त्याला नजरेने आश्वास्थ करते...

दोघे पुढे बोलत असतात तेव्हा वंशचा कॉल येतो...

" wait a second... " वंश रिद्धीला बोलून कॉल रिसिव्ह करतो...

" राधे कृष्णा आत्या साहेब...." वंश

" राधे कृष्णा... कसे आहात वंश... तुम्ही तर विसरलात आम्हांला..." संजना

" आम्ही ठीक आहोत... असं काही नाही आहे... कामाचा व्याप वाढला आहे..." वंश

" असू देत... आमच्या सुनबाई निवडल्या पण आम्हांला कळवलं नाही..." संजना

" तुम्हांला सांगणार होतो व त्याआधी आजी साहेबांनी विषय काढला आणि सर्व ठरलं... तुम्हांला आवडल्या नाहीत का..." वंश

" आमच्या साठी तुमचा आनंद महत्वाचा... तुम्ही खुश तर आम्ही खुश..." संजना

" थँक यु आत्या साहेब.." वंश

" बर... उद्या अंतरा परत येत आहेत तर त्या मुंबईला येणार आहेत तुम्हांला भेटायला... तिलक ला येताना तुमच्या सोबत घेऊन या..." संजना

" ठीक आहे... आम्ही करतो त्यांना कॉल आणि डिटेल्स घेतो..." वंश

" ठीक आहे... ठेवतो आम्ही... काळजी घ्या स्वतःची आणि धरांची..." संजना

" हो.. तुम्ही देखील काळजी घ्या... आणि मामासाहेबांना नमस्कार म्हणून सांगा..." वंश

" हो सांगतो... राधे कृष्णा..." संजनानी कॉल कट केला...

वंशने कॉल कट केला आणि धरा डोअर नॉक करून आत आली...

" भाई उद्या अंतरा येत आहेत..." धरा

" हो आत्ताच आत्या साहेबांचा कॉल येऊन गेला... तु उद्या घरीच थांब... म्हणजे चालेल ना तिने उद्या लिव्ह घेतली तर..." वंश रिद्धीला विचारतो..

" हो चालेल... अंतरा म्हणजे तुमच्या आत्यांची मुलगी ना.." रिद्धी

" हो... तिची स्टडी कंप्लीट झाली आता इकडे त्यांच्या हॉस्पिटलला इंटर शिप करेल... स्वभावाला खुप छान आहेत... भाई आणि समर भाई तर खूप लाड करतात तिचे... " धरा

" अच्छा... मी सांगते ऑफिस मध्ये तुझ्या लिव्ह बद्दल... मी पण उद्यापासून दोन- तीन ऑफिस मध्ये नाही आहे... पण जमल तर डिझाइन कंप्लीट करा..." रिद्धी

" हो मी करते सर्व डिझाइन या वीक मध्ये कंप्लीट... don't worry... " धरा

" निघू या.. उशीर झालाय..." रिद्धी

" रिद्ध डिनर करूया सोबत..मी ड्रॉप करतो नंतर घरी..." वंश

" येस... वहिनी चल ना जाऊ या... आपण सोबत असे कधी गेलोच नाही बाहेर..." धरा

" OK... मी घरी कॉल करून सांगते... चला..." रिद्धी बॅग उचलते... आणि घरी कॉल करते... बाहेर सर्वांना भेटून पार्किंग लॉट मध्ये येऊन ड्रायव्हरला जायला सांगते...

" मॅक्स तु धराला घेऊन त्यांच्या कार मध्ये येते... मी कार ड्राइव्ह करतो..." वंश मॅक्सला बोलून ड्राईव्हींग सीटला बसतो... मॅक्स रिद्धी साठी डोअर ओपन करतो तशी रिद्धी आत जाऊन बसते... आणि सगळे हॉटेलला निघतात.... 🚗🚗🚗🚗🚗

.............

......................

..............................

वंश गाडी चालवत तिच्याकडे बघत होता... रिद्धी कारमधून बाहेर बघत होती...

" काय झालं... एवढी शांत का आहे..." वंश तिचा हात गिअरवर ठेवतो...

" काही नाही.... असच...🙂🙂 " रिद्धी त्याला स्माइल देत बोलली

" I want to tell you something...." वंश सिरिअस होऊन बोलतो...

" काय झालं... काय सांगायच आहे..." रिद्धीला टेंशन येत...

" तुझा बिझनेस अटायरची फिटिंग परफेक्ट आहे...😉😉" वंश डोळा मारत बोलतो...

" oh really.... by the way today you also look handsome..." रिद्धी त्याच्या गालावर ओठ टेकवत बोलते...हे सगळं इतक्या पटकन होत कि वंशला सर्व कळायला थोडा वेळ लागला... आणि त्याचा हात गालावर गेला...

" रिद्ध याचा बदला मी घेणार..." वंश ड्राइवर वर लक्ष देत बोलतो...

दोघेही काही वेळाने हॉटेलवर पोहचतात... धरा आणि मॅक्स त्यांच्यामागे लगेच पोहचतात... मॅक्सने आधीच सर्व अरेंजमेंट केली होती... रिद्धी आणि वंश वेगवेगळे अरेंजमेंट केलेल्या जागी येतात.... त्यांना प्राइव्हेट रूम दिली होती... त्यामुळे बाहेर असलेल्यांना आत कोण आहे समजत नव्हतं...

हेड मॅनेजर स्वतः मेन्यु कार्ड घेऊन आले होता... डिश ऑर्डर केल्या... मॅक्स देखील रिद्धी सोबत कम्फर्टेबल झाला होता... डिनर करून मग घरी निघाले...

वंशने गाडी घराकडे वळवली.... वंश रिद्धीचा हात धरून बसला होता...

" वंश आपण मनात असताना देखील फ्रीली भेटू नाही शकत... कोणी बघेल आणि न्युज होईल म्हणून किती सांभाळून रहाव लागतं आहे ना..." रिद्धी

" फक्त काही दिवस मग सर्वांना कळणार आहे..." वंश तिला बघून पून्हा समोर बघतो...

बाहेर पावसाचे वातावरण झाल्याने थंड वारा सुटला होता... रिद्धीने वंशला सांगुन आधीच विंडो ओपन केली होती... हवेने तिचे सोनेरी सिल्की केस तिच्या चेहऱ्यावर येत होते... वंशने FM स्टार्ट केला... ड्राइव्ह करत् त्याची नजर राहून राहून तिच्यावर जातं होती...

सिच्युएशनला धरून परफेक्ट गाणं लागल होत....

 

मुस्कराहट या नमी होगी
जितने ग़म जितनी ख़ुशी होगी
बाँट लेंगे मिलके दोनों
क्या कमी होगी

संग तेरे ज़िंदगी
कितनी हसीन होगी
संग तेरे ज़िंदगी
कितनी हसीन होगी
कितनी हसीन होगी

दिल ने पायी राहतें
कम हुए कुछ ग़म
जबसे मेरी ज़िंदगी में
आ गए हो तुम

मेरी सूनी रात में
खाली बंजर आँख में
ख्वाब लाये तुम

इन लबों पे फिर हंसी होगी
हो हर तरफ बस रौशनी होगी
आसमान से खूबसूरत
ये ज़मीन होगी

संग तेरे ज़िंदगी
कितनी हसीन होगी
हमम संग तेरे ज़िंदगी
कितनी हसीन होगी

कितनी हसीन होगी
संग तेरे ज़िंदगी
कितनी हसीन होगी
कितनी हसीन होगी.

(Song: Kitni Haseen Hogi
Movie: HIT: The First Case )

 

काही वेळाने रिद्धिने विंडो बंद केली...

" What are your favorite things?...." रिद्धी

" तु..." वंश एक नजर तिला पाहून बोलतो...

" असं काय ओ करतात... नीट सांगा ना तुम्हांला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडते..." रिद्धी

" seriously I like you from the bottom of my heart..." वंश

" OK... अजून काय आवडत..." रिद्धी

" तुझी डिम्पल..." वंश तिच्या खळीवर बोट टेकवतो...

" जाऊ देत मी कशाला बोलतेय तुमच्या सोबत...😏😏 " रिद्धी

" रिध्द तु रागावलीस कि खूप क्युट दिसते..." वंश बोलून तिचे गाल ओढतो...

" आह्ह... दुखतय.... " रिद्धी गाल चोळत बोलते

" actually I like guiter , swimming , horsing... " वंश

" seriously.... " रिद्धी

" तुम्ही कधी मला गिटार नाही वाजवून दाखवलं..." रिद्धी

" आपण पहिल्यांदा या बद्दल बोलतो आहोत..." वंश

" हम्म... आपण एकमेकांना काहीच ओळखत नाही ना..." रिद्धी

" But I still love you..." वंश

" काही कपलच कसं असतना आधी भेटतात मग मैत्री करतात आणि मैत्रीच रुपांतर नंतर प्रेमात होत..." रिद्धी

" ओह्ह्... कोणी सांगितल तुला हे..." वंश

" सिया आणी अंकित भाईच उदाहरणं आहे ना..." रिद्धी

" ok... मग आपली जर्नी कशी आहे..." रिद्धी

" आधी आपल लग्न ठरलं... नंतर प्रेम व्यक्त केलं आणि आता समजून घेतोय..." रिद्धी

" बर... आता मला सांग तुला काय काय आवडत... मी तर माझ्याबद्दल सांगितल..." वंश

" मला जे आवडत ते तर तुम्हांला माहित आहे... डान्स माझं प्याशन आहे... आणि ते सोडून मला लॉन्ग ड्राइव्ह आणि ट्रॅव्हलिंग आवडत..." रिद्धी

" मग आपण लॉन्ग ड्राइव्हला जाणार तेव्हा कशाने जाणार... 2 wheeler , 4 wheeler , open car..." वंश

" 4 व्हिलरने जाऊ तुम्ही ड्राईव्ह करा मी तुम्हांला बघते...😉" रिद्धी

" स्मार्ट आहेस...😀" वंश

" I'm... 😉 " रिद्धी

" वंश मी फ्री झाल्यानंतर आपण बाहेर जाऊया... " रिद्धी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते...

" जाऊ या... मला देखील तुझ्या सोबत टाइम स्पेंड करायचा आहे..." वंश

" Riddh stay always with me... I can't leave without you..." वंश तिच्या कपाळावर ओठ टेकवत बोलतो...

गप्पा मारत दोघे रिद्धीच्या घरी पोहचले.... गेटवर विराज कॉलवर बोलत होता आणि लुसी आणि ब्रावो त्याच्या पायाभोवती खेळत होते...

 

 

( लुसी )

 

 

( ब्रावो )

 

रिद्धी आल्यानंतर लुसी पळत तिच्या जवळ आली... तिची लाडकी आहे ना... रिद्धिने तिला उचलून घेतलं... रिद्धीच्या मागे वंश देखील उतरला... वंशला बघून विराजने कॉल कट केला...

" चला येतो मी..." वंश

" असं कसं आत चला ना..." विराज

" नाही आत्ता नको नंतर येईल... आता उशीर झाला आहे...धरा एकट्या आहेत..." वंश

" बर... ठीक आहे... पुढच्या वेळेस जेवायलाच या..." विराज

" हो नक्की... येतो मी..." वंश

" चालेल... गुड नाईट..." विराज

" गुड नाईट... पोहचल्यावर msg करा.." रिद्धी

" हो ... गुड नाईट..." वंश बाय बोलून निघतो...

रिद्धी आणि विराज पण आत निघून जातात.... ब्रावोला त्याच्या हाऊस मध्ये सोडतात.... विराज मेन डोअर लॉक करतो... आणि रिद्धिला गुड नाईट बोलून रूम मध्ये निघून जातो...

रिद्धी रूम मध्ये येऊन लुसीला बेडवर सोडते आणि फ्रेश होऊन येते... तोपर्यंत वंशचा मेसेज येतो...

" पोहचलो मी नीट... झोप आता... गुड नाईट..." वंश

" गुड नाईट..." रिद्धी मेसेज करून मोबाईल साईट ठेवते... आणि झोपून जाते...


क्रमशः

वैष्णवी मोकासे "
०१ / ०८ / २०२२