बावरा मन - 6 - मागणी Vaishu Mahajan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

बावरा मन - 6 - मागणी

सरंजामे कुटुंबाबरोबर बाकी गँग देखील घरी गेली... उद्या सर्व पूजेला येणार होते.... धरा सिया सोबत वृंदावनला जातं होती... रिसेप्शन नंतर ती राज पुरोहितांसोबत परतणार होती...

गाडीत सिया अजूनही रडत होती... अंकित तिला मिठीत घेतो.. काही वेळात ती शांत होते... अंकित तिला स्वतः पासून दूर करतो... आणि तिचे डोळे पुसतो...

" आज रडली ते शेवटच... आज नंतर मला तुझ्या डोळ्यांत पाणी नकोय... तुला रडताना पाहिलं कि मला त्रास होतो... आणि तु का रडते आहेस आता तर मी रडायला हवं... " अंकितच बोलण ऐकून सिया हसायला लागते....

" थँक गॉड हसली... मला वाटलं आपल्या घरी न जाता तुझ्या घरी जावं लागतं कि काय... " अंकितच बोलण ऐकून सिया त्याला मारायला लागते..

" सीयु अग काय हे... लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवऱ्याला मारतेस... लोक बोलतील भांडकुदळ बायको आणली... रिद्धी तिला चिडवते...

" थँक्स अंकित... " सिया त्याला मिठी मारते..

" थँक्स नाही बोलायच... आता तु माझी जबाबदारी आहे..आणि सगळे आहेत ना तुझ्यासोबत... " अंकित तिला समजावतो...

काही वेळात सगळे घरी पोहचतात.... सुधा ताईंनी गृहप्रवेशाची तयारी करून ठेवली होती... अंकितची गाडी गेटच्या आत आल्यावर धुमधडाक्यात त्यांच स्वागत होत...अंकितने सियाला हात धरून खाली उतरवले...

मुख्य दरवाज्यापासुन गुलाबाच्या पाकळ्या आंधरल्या होत्या... मोठी रांगोळी काढली होती... दोघे दरवाज्या जवळ आले... रोहिणी ने दोघांना ओवाळले..

" सिया बाळा हे माप ओलांडुन आत ये... " रोहिणी

सियाचा मागुन येऊन अपेक्षा आणि रिद्धी समोर उभ्या राहतात...

" आधी उखाणा आणि आमच गिफ्ट... " रिद्धी बोलून दरवाज्यावर हात ठेवते....

"आकाशाच्या प्रांगणात ब्रम्हा विष्णू आणि महेश, अंकितच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.”

सगळे टाळ्या वाजवतात... आणि अंकित ला नावं घ्यायला सांगतात...

" मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट
सियाबरोबर बांधली जीवनगाठ...."

सिया माप ओलांडुन आत येते... मंजिरी तिला कुंकवाच्या पाण्याने हाताचे ठसे भिंतीवर उठवायाला सांगतात... नंतर ती परातीत पाय ठेवून लक्ष्मी पावलांनी आत येते... मंजिरी दोघांना देवघरात नेऊन नमस्कार करायला सांगतात... त्यानंतर दोघे मोठ्यांचा आशिर्वाद घेतात...

" चला आता सगळे आराम करा... उद्या सकाळी लवकर उठून बाकी विधी करयचे आहेत .. नंतर गुरुजी पुजेसाठी येणार आहेत... " मंजिरी सगळ्यांना सांगतात...

" रिधु सियाला तुझ्या रूम मध्ये घेऊन जा .. तिची बॅग तुझ्या रूममध्ये ठेवली आहे... अप्पू तु धराला तुझ्या रूममध्ये घेऊन जा... " रोहिणी बोलल्यानंतर अंकितचा चेहरा बघण्यासारखा होतो... त्याला बघून सगळे हसतात...

" हो काकू.." रिद्धी सियाला घेउन जाते...धरा देखील अपेक्षा सोबत रूममध्ये जाते...

" सीयु तु आधी change करून घे... मग मी change करते... " रिद्धी कबर्ड मधून ड्रेस काढत बोलते... दोघी change करून बेडवर पडतात... रिद्धी सकाळसाठी अलार्म लावते... लग्नाच्या धावपळीमुळे दोघी दमल्या होत्या... बेडवर पडल्यावर लगेच दोघी झोपून गेल्या...


सकाळी आलार्मच्या आवाजाने रिद्धिला जाग आली... तिने सियाला थोड्या वेळ झोपू दिलं आणि स्वतः आवरायला गेली... रेडी होऊन आल्यानंतर तिने सियाला उठवल... सिया जाऊन रेडी होऊन आल्यावर दोघी खाली येतात...

रोहिणी आणि मंजिरी किचनमध्ये सुधाला नाश्त्याच्या तयारी बद्दल सांगत होत्या... सियाने दोघींना नमस्कार केला..
" अखंड सौभाग्यवती भव: ... " दोघी सियाला आशीर्वाद देतात..
"अरे वा तुम्ही दोघी उठलात... आणि रेडी देखील झालात.. " रोहिणी
" बर चला आपण देवपुजा करून घेऊ... " मंजिरी

चौघी देवघरात जातात... देवपुजा करून झाल्यावर हॉल मध्ये येतात... मोठी मंडळी गप्पा मारत होते... मंजिरीने सियाला सर्वांना प्रसाद द्यायला सांगितला... सियाने प्रसाद देऊन नमस्कार केला... सुधाने रमा करावी चहा नाश्ता पाठवला... नाश्ता करून सगळे लॉन मध्ये निघून गेले... रुचिकाने प्रसादची तयारी करायला घेतली... सुधाला जेवणाच्या तयारीच बघायला सांगितल...

काही वेळात सगळे येतात.... हळद उतरवणीची सर्व तयारी लॉनवर झाली होती... रिद्धी सियाला घेऊन येते... सिया आल्यावर अंकित शेजारील पाटावर जाऊन बसली... पाच सुवासिनींनी दोघांना ओवाळुन घेतल...

रुचिकाने मोठं भांड त्यांच्या समोर ठेवलं... त्यात पाणी , दूध , गुलाबाच्या पाकळ्या होत्या... रोहिणी त्यांच्या जवळ जातात...

" आता हि अंगठी मी तीनवेळा पाण्यात टाकणार... जो जास्तवेळा काढेल तो जिंकणार... आणि ह्या घरात त्याची मर्जी चालणार... " रोहिणी बोलून अंगठी पाण्यात टाकतात... सिया आणि अंकित दोघे अंगठी शोधत असतात... रिद्धी आणि लेडीज सियाला सपोर्ट करत होत्या... बाकी सगळे अंकितला सपोर्ट करत होते...

अंकितला अंगठी भेटते... तसें सगळे लेडीजला चिडवतात.... सियाचा देखील चेहरा पडतो...😔😔 त्यामुळे अंकितला वाईट वाटत...
" अजून 2 राऊंड आहेत... come on सीयु... तुला जिंकायच आहे... " रिद्धी

रोहिणी पुन्हा रिंग टाकतात... यावेळेस दोघांना सोबत रिंग भेटते... अंकित सियाच्या हाताला पकडतो... सिया त्याला रागीट लुक देते , पण तो दुर्लक्ष करतो आणि तिच्या हातात अंगठी देतो... ती सगळ्यांना अंगठी दाखवते... आता लेडीज हुटिंग करतात...👏🏻👏🏻👏🏻

रोहिणी शेवटी अंगठी टाकतात.... अंगठी अंकितच्या हाताला लागते... सियाला त्याच्या चेहेऱ्यावरुन कळत... ती त्याच्या डोळ्यांत बघते... तिची नजर बघून तो तिच्यात हरवतो... तो तिच्या डोळ्यांत हरवल्यानंतर सिया त्याला डोळा मारुन अंगठी काढून घेते 😉😉 आणि सगळ्यांना दाखवते...

" ए नाही हिने चिटिंग केली... " अंकित
" मी काय चिटिंग केली... " सिया भोळेपणाचा आव आणते... 😟
" ए दादू तु हरला आहेस हे मान्य कर... " रिद्धी
" अग रिधु हिने चिटिंग केली... हिने ना... " अंकित पुढे बोलत असतो तेच सिया मध्ये बोलते..
" मी काय... सांग ना काय केलं मी... " सिया
" काही नाही... " अंकित चेहरा पाडून बोलतो.. 😏😏


" आता हा विडा दोघांनी अर्धा तोडून खायचा आहे... ते देखील ओठांनी तोडायचा आहे... मंजिरीच बोलणं ऐकून सिया लाजेने पाणी पाणी झाली... अंकितने विडा ओठात पकडून सियाकडे बघुन गालात हसतो... सिया त्याच्याकडे झुकते , तर तो मागे होतो... ती पुन्हा प्रयन्त करते तो पून्हा हुलकावणी देतो... सिया त्याच्याकडे झुकुन त्याला पाउट करते...😚😚 त्यामुळे तो जागीच थांबतो आणि सिया विडा तोडून घेते...

रुचिका पाणी घेऊन येते... रोहिणी दोघांना उभ रहायला सांगतात... आणि त्यांच्या अंगावरुन पाणी टाकतात... त्यानंतर सिया -अंकित एकमेकांच्या अंगावरुन पाणी टाकतात.... धरा सर्व खूप एन्जॉय करत होती... त्यांची अंघोळ झाल्यावर अपेक्षा आणि रुचिकाने रिद्धी आणि विराजच्या अंगावर पाणी ओतल... ते दोघे काही कमी नव्हते त्यांनी देखील त्यांना थंड पाण्याने ओल केलं... धरा मात्र कोपऱ्यात उभी राहिली होती... रिद्धीने अपेक्षाला इशारा केला... अप्पू पाण्याचा पाईप घेउन आली.... आणि पाण्याचा प्रेशर धरावर मारला.... सगळे खूप वेळ पाणी खेळत होते...

"अरे आता बस करा... थोड्या वेळात गुरुजी येतील... आवरा लवकर रिधु सियाला घेऊन जा... " मंजिरी सगळ्यांना सांगतात... मग सगळे तयार होण्याकरिता जातात... रिद्धी चेंज करून सियाला छान तयार करते.... तिच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजते.... मेसेज बघून ती गालात हसते....
"काय गं... कोणाचा मेसेज आहे.... " सिया मिरर मध्ये बघून बोलते..
" कोणाचा नाल्ही... मी आलेच तु थांब इथेच तुला बोलावलं कि मी येते न्यायला... " रिद्धी सांगुन रूम बाहेर पडते...

" माझं गिफ्ट... " रिद्धी अंकित समोर हात करते...
" भेटणार पण मला आधी बायकोला भेटू तर दे... " अंकित तिचे गाल ओढत बोलतो...
" ए दादू गाल सोड नाही तर मी भेटू नाही देणार... " रिद्धी त्याचा हात काढत बोलते...
" लवकर भेट.... गुरुजी येतच असतील... " रिद्धी सांगुन खाली जाते...

सिया मिरर मध्ये बघून तिचा नेकलेस सेट करत होती... अंकित तिला बघत तिच्या जवळ येतो... तिला मागुन मिठी मारतो आणि त्याच्या हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवतो.... त्याच्या अचानक येण्याने सिया घाबरते...




" अंकित तु इथे काय करतोय... तु जा बरं... कोणी बघितलं तर काय म्हणेल... " सिया त्याचा कमरेभोवतीचा हात सोडवत बोलते... पण त्याची पकड घट्ट असल्याने हात सुटत नव्हता....

" कोणीही येणार नाही.... रिधु लक्ष ठेवणार आहे... " अंकित आरश्यातुन तिच्याकडे बघत बोलतो... आणि तिला स्वतःकडे वळवतो...

" सीयु खूप सुंदर दिसते आहेस... अगदी माझ्या स्वप्नातल्या परीसारखी... " अंकित तिच्या गालावर हात ठेवतो...

" अंकित तु इथे का आलास... " सिया
" मला तुला भेटायच होत म्हणून... " अंकित तिच्या कमरेत हात गुंफतो...
" हो ना झालं भेटुन मग आता जा... " सिया
" ए सीयु असं काय ग करतेस.. मी तुला भेटायला आलो आणि तु मला हकलते आहे... परत दिवसभर तु सगळ्यांसोबत बिझी असशील... " अंकित
" अरे व्वा लग्न झाल्यावर मिस्टर अंकित खुपच रोमँटिक झालेत... Not bad.. " सिया त्याच्या गळ्यात हात गुंफते...
" ते काय आहे ना मी आधीपासून रोमँटिक होतो... फक्त तेव्हा थोडे रेस्ट्रीक्शन होते... आता माझी हक्काची बायको आहे... " अंकित
" पण काय आहे ना मिस्टर रोमँटिक अजून पूजा बाकी आहे... तर So be patient " सिया

" अजून किती पेशन्स धरू... आणि तुला असं बघून तर आता ते पण संपलेत..." अंकित
"अंकित तुला असं नाही वाटत जरा जास्त होतय... " सिया
" काय करणार बायकोच्या प्रेमाचा असर आहे..." अंकित
" झाल बोलून भेटून पाहून... आता निघ कोणी येईल.. गुरुजी पण आले असतील... " सिया त्याला बाजुला करते..
" जाईल पण त्याआधी थोडं स्वीट भेटलं असत तर... " अंकित
" हो देते ना.. खाली वहिनींनी प्रसाद केला आहे.. तो मिळेल पुजेनंतर... " सिया
" किती unromantic आहेस ग तु... नवीन लग्न झालय... मस्त रोमँटिक वागाव... हग करावं.. किस द्यायचा तर जा जा करतेय... " अंकित
" अंकित तुला ना सर्व भेटेल फक्त थोडा धीर धर... " सिया
" ह्म्म... आता जातोय पण रात्री सोडणार नाही आहे... " अंकित तिच्या गालावर किस करून खाली जातो...
" वेडा... " सिया स्वतःला बोलते आणि बाकी आवरते...

हॉल मध्ये सर्वजण आले होते.... निंबाळकर कुटुंबीयांनी सरंजामे आणि राज पुरोहितांचे स्वागत केलं... वंशची नजर रिद्धिला शोधत होती... समिधा राजमाता आणि अर्पिता सोबत बोलायला गेली... काही वेळात बाकी गँग हि आली ... रिद्धी अपेक्षाच्या रूम मध्ये धराला साडी घालून देत होती... अपेक्षा आणि रिद्धीने साडी घातल्यामुळे तिलाही साडी घालावीशी वाटलं...

गुरुजींनी पुजेची सर्व तयारी झाल्यानंतर सियाला बोलवायला सांगितल... संजू आणि तनु सियाला घेऊन आल्या... सिया जाऊन अंकित शेजारी बसली... रुचिकाने तिच्या साडीच्या पदराची अंकितच्या उपरण्यासोबत गाठ बांधली.... त्यानंतर गुरुजींनी पुजेला सुरुवात केली...

त्यामागे अप्पू आणि धरा आल्या... धराला साडीत बघुन राजमाता आणि अर्पिता आनांदित झाल्या...

" You are looking so preety my princess.." अर्पिता तिच्या कानामागे काजळाचा टीका लावतात....
" Thank you maa... तुम्हांला माहीत आहे मला रिद्धी दि ने तयार केलं आहे... " धरा
" अच्छा... कुठे आहेत तुमच्या रिद्धी दि... " राजमाता
" तिला ऑफिस मधून महत्त्वाचा कॉल आला होता.... येईल ती... " धरा

वंश जेन्टस सोबत बोलत होता... पण त्याचे सर्व लक्ष धराच्या बोलण्याकडे होत...

" रिधु इकडे ये... " रक्ष
" हो आले... " रिद्धी च्या आवाजाने राजमाता , अर्पिता आणि वंश ने आवाजाच्या दिशेने पाहिलं...




वंश तर तिला पाहून पुरता हँग झाला.... राजमाता आणि अर्पिता देखील तिला पाहत राहिल्या.... रिद्धी रक्षकडे निघुन गेली...

" माँ तुम्हांला माहीत आहे माझी साडी आणि रिद्धी दि ने घातलेली साडी रिद्धी दि ने डिझाइन केली आहे... ", धरा
" oh... खूप छान डिझाइन केली आहे... " अर्पिता
" दादिसा मी रिद्धी दि सोबत कामं करू... मी पण त्याच फिल्ड मध्ये आहे ना... आणि भाई देखील मुंबई मध्ये राहतात... " धरा राजमातांना लाडिगोडी लावते...
" धरा तुम्हांला करायच आहे आमची काही हरकत नाही पण त्यांना चालेल का.. " राजमाता
" मी विचारते ना तिला ... " धरा आनंदित होते
" बर बघू आता पुजा सूरू आहे तर तिकडे लक्ष द्या... " राजमातांच्या बोलण्यावर सगळे पूजेमध्ये लक्ष घालतात...

पूजा संपल्यानंतर सिया आणि अंकित वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतात.... लॉन वर जेवणाची व्यवस्था केली होती... सगळे जेवंणासाठी गेले... हॉल मध्ये निंबाळकर , राज पुरोहित , सरंजामे , आणि समिदधाचे वडिल बसले होते...

रिद्धी मुलिंसोबत समोरच्या स्पेस मध्ये बसली होती... वंश तिच्या अगदी समोर बसला होता... त्याची नजर अजूनही तिच्यावरुन हटत नव्हती.... तिची सहज समोर नजर गेली त्याच्या बघण्याने तिला लजल्या सारखे झाले... पुढे काही वेळ असच चालू होत... ती जेव्हा त्याच्याकडे पहायची त्याची नजर तिच्या वर होती... तेव्हा त्याचा फोन वाजला... रिद्धीचा मेसेज होता... तिने समोर पाहिलं तर तो तिलाच पाहत होता... त्याने मेसेज ओपन केला... 💬

" असं काय बघताय... कोणी बघितलं तर काय म्हणेल.." रिद्धीचा मेसेज वाचुन तो गालात हसतो...

" आता तु एवढी सुंदर तयार झाली आहेस कि मी ठरवूनही माझी नजरच हटत नाही आहे 😍... वंशने तिला रिप्लाय केला.. रिद्धी msg वाचुन लाजते... धरा पुढे काही बोलते म्हणुन पुढे लक्ष देते... आणि मोबाईल बाजूला ठेवते...

इकडे मोठ्यांच्या गप्पा चालु होत्या... अंकित आणी विराज सगळ्यांच्या जेवणाच बघत होते...

राजमाता मनिष आणि विजय कडे बघून बोलतात...
" यशवंत तुमच्या मुली खूप सुंदर सुशिल आणि कर्तबगार आहेत.. स्वतःच्या पायावर उभ्या आहेत... " राजमाता

" त्यांना करावस वाटलं आणि त्यांनी केलं हे महत्त्वाच... रिद्धीला डान्स आवडतो म्हणून तिने डान्स आणि म्युजिक मध्ये M. A केलं पण त्याबरोबर मला आणी विराजला बिजनेसमध्ये मदत व्हावी म्हणून फॅशन डिझाइन मध्ये मास्टर केलं.. अपेक्षा पण तिच्या पावलावर पाऊल ठेवत M. A करून रिद्धिची अकॅडेमी सांभाळणार आहे... बाकी दोघी खूप हुशार आहेत.." यशवंत

" आता मुलांची लग्न झाली मग मुलीच काय तिच लग्न कधी करायच... " राजमाता थेट विषयाला हात घालतात..

तेव्हाच समिधा आणी अर्चना तिथे येतात आणि अर्धवट ऐकतात... समिधाच्या मनात फटाके फुटतात... विलास ( समिधाचे वडील ) यांना या बद्दल काही कल्पना नव्हती..

" हो आता मुली वयाच्या झाल्यात आता त्यांच्या साठी बघू... " यशवंत

" तसं आम्ही आणि मनिष विजयला विषय काढायला सांगणार होतो , पण आता वेळ आहे तर आम्हीच बोलतो.. " राजमातांच बोलणं ऐकून यशवंत बरोबर बाकिचे गंभीर झाले.. वंशला देखील कळेना त्याने मनिष आणी अर्पिता कडे पाहिलं ... अर्पितांना देखील काही कल्पना नव्हती... मनिषने डोळ्यांनीच दोघांना शांत राहायला सांगितल...

" कोणता विषय राजमाता.. " यशवंत
" आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला तुमची एक मुलगी खूप आवडली आहे... आणि आम्हाला त्यांना राज पुरोहित घरण्याची सून करायच आहे... "

राजमातांच बोलणं ऐकूण निंबाळकर स्तब्ध झाले... राजमाता नक्की कोणासाठी बोलत आहेत हे त्यांना कळत नव्हत... त्यांना काय बोलाव कळेना... समिधा फक्त उड्या मारायची बाकी होती... संध्या देखील कंफ्युज झाल्या होत्या... त्यांच अजून अर्पिता सोबत बोलणं झालं नव्हतं... मग कोणाबद्दल बोलताय...?

" यशवंतजी घाई नाही विचार करा... मग सांगितल तरी चालेल... " मनिष त्यांच्याकडे बघत बोलतात

" मला नक्की कळलं नाही तुम्ही नक्की कोणासाठी बोलताय... " यशवंतनी त्यांच्या मनातली गोष्ट विचारली...

" आम्हांला तुमची मोठी मुलगी रिद्धी आवडली आहे... "

राजमातांनी रिद्धीच नावं घेतलं तसा समिधा आणि अर्चना हवेतुन धबकन खाली पडल्या... आणि त्यांच स्वप्न मोडल... पण त्या दोघीं ऐवजी वंश मात्र तिथे पोहचला.. सगळे आनंदित झाले होते... समिधा पाय आपटत निघून गेली... जाताना तिने रिद्धीकडे रागीट नजर टाकली..

" राजमाता हे तुम्हां लोकांच मोठं मन झालं कि तुम्ही आमच्या रिद्धिला निवडलत... तुमच्या सारख्या राजघराण्यात मुलगी देणं भाग्य लागतं..." यशवंत रिद्धिकडे बघून बोलतात...

" पण आता तुम्ही अचानक बोलात तर काही सुचल नाही... तिचही मत बघाव लागेल.. आणि आम्ही एवढ्या लवकर विचारही केला नव्हता... " यशवंत

" मग आता विचार करा... मुली कितीही मोठ्या झाल्या तरी आई- वडिलांसाठी त्या लहानच असतात... त्यांनाही विचारुन बघा... लग्नानंतर त्या कामं करू शकतात... " राजमाता

" मंजिरी जरा बोलून बघा काय म्हणते तर.... सर्व कल्पना दे तिला... " यशवंत मंजिरीला सांगतात...

मंजिरी रिद्धी कडे जातात...

" रिधु बाळा जरा कामं होत येतेस... " मंजिरी
" हो आई चल... " रिद्धी मंजिरी सोबत त्यांच्या रूममध्ये जाते...

" काय झालं आई... काय कामं होत... " रिद्धी
" ये बस इथे... " मंजिरी तिला बेडवर बसवतात आणि तिच्या शेजारी बसतात...

" तुला आम्ही कोणी फोर्स करणार नाहीत पण नीट विचार् करून सांग... " मंजिरी तिचा हात हातात घेऊन बोलतात.. रिद्धीला काही कळत नव्हतं...

" आई कशा बद्दल बोलते आहेस तु... " रिद्धी

" तुला सियाच्या आत्या माहीत आहे... त्यांच्या मुलासाठी म्हणजे वंश साठी राजमातांनी तुला मागणी घातली आहे... " मंजिरी

" काय... 😲😲" रिद्धी

क्रमशः

समिधाचा तर प्लॅन पूर्ण विस्कटला... पण ती शांत बसेल कि काही करेल... ?
रिद्धी लग्नाला हो म्हणेल.. ?
वंश आणि अर्पितांला मागणी घालण्याबद्दल कसं काही माहित नाही.. ?

बघूया आता पुढे या प्रश्नांची उत्तर मिळतीलच...

पुढील भाग हा रिसेप्शनचा असेल... तर बघूया काय कमाल धमाल करतात रिसेप्शन मध्ये...

I hope तुम्हाला कथा नक्की आवडत असेल...

तुम्हांला हा भाग कसा वाटला.. नक्की कमेंट्स करून कळवा ...

प्लीज लाईक , कंमेंट , शेअर , रेटिंग आणि फॉलो करा..
लिहिताना व्यकरणात काही चुक झाली असेल, शब्द चुकीचा लिहिला गेला असेल तर नक्की कळवा ...🙂🙂