बावरा मन - 7 - अभिमान.. Vaishu Mahajan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

बावरा मन - 7 - अभिमान..

" तुला सियाच्या आत्या माहीत आहे... त्यांच्या मुलासाठी म्हणजे वंश साठी राजमातांनी तुला मागणी घातली आहे... " मंजिरी

" काय... 😲😲" रिद्धी साठी हे खूप शॉक्ड झाली होती... वंशच्या वागण्याला तिने एवढं सिरीयस घेतलं नव्हतं.. पण तिला तो कुठे तरी आवडला होता... त्यामुळे तिला मनातून आनंद झाला होता...

" रिधु तुला लग्नानंतर कामं करायला त्यांची काही हरकत नाही... " मंजिरी रिद्धीला राजमातांसोबत झालेल बोलणं सांगतात...

" आई तुला आणि बाबांना काय वाटत... " रिद्धी
" बाबा तयार आहेत पण त्यांनी तुला तुला विचारल आहे... तुला कोणीही जबरदस्ती करणार नाही हे तुलाही माहीत आहे... नीट विचार कर आम्हांला जरी पसंत असलं तरी तुला पूर्ण आयुष्य काढायच आहे... " मंजिरी समजावणीच्या सुरात बोलतात...

" पण आई त्यांची रॉयल फॅमिली आहे आणि तिथे सर्व वेगळं असेल... मला जमेल का.. ? " रिद्धीला टेन्शन येत

" बाळा तु आत्तापर्यंत जे केलंस ते सर्व वेगळं होत पण तु केलंस... तसचं आता हे देखील जमेल... सगळे खूप छान स्वभावाचे आहेत.. आणि धरा ती तर तुझ्याबरोबर किती रुळली आहे.. " मंजिरी

" तुला आणि बाबांना योग्य वाटत आहे ना मग मी तयार आहे... माझा होकार सांग... " रिद्धी हसून सांगते..

तिच्या होकाराने मंजिरी आनंदित होतात आणि तिला मिठी मारतात...

" चल सगळे खाली वाट बघत असतील... जेवणासाठी पण थांबले आहेत... " मंजिरी आणि रिद्धी बाहेर येतात...

रिद्धी मुलींकडे निघून जाते... तिला बघून कोणाला काहिच कळत नाही.. मंजिरी सगळ्यांकडे येतात.... रिद्धिने काय सांगितल हे ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक होते... विशेषतः वंशला खुप घाई झाली होती...

" रिद्धी तयार आहे... तिने होकार दिला आहे... " मंजिरी सगळ्यांना सांगतात... तिच्या होकाराने वंशला खूप आनंद होतो... राजमाता बरोबर सगळे आनंदी असतात....

" रोहिणी सगळ्यांच तोंड गोड कर..." समीर रोहिणीला मिठाई आणायला सांगतात... त्या जाऊन सगळ्यांसाठी स्वीट घेऊन येतात... आणि सगळ्यांच तोंड गोड करतात....

त्यांच बोलणं सुरु असताना विकी रिद्धीसाठी लेटर घेऊन येतो...

" हे काय... मी आनंदाची बातमी देण्याआधी सेलेब्रेशन सुरु झाल... " विकी

" अरे व्वा.. तु काय आनंदाची बातमी आणलीस अजून..." यशवंत

" काकू रिधु कुठे आहे... " विकीच्या चेहऱ्यावरून तो किती आनंदात आहे ते कळत होत..

" ती मागे बसली आहे... पण तु एवढा का आनंदात आहे... " मंजिरी

" राम काका रिद्धी आणि बाकीच्या मुलींना बोलवाल.. " विकी जाणाऱ्या राम ला सांगतात... ते देखील बोलावतो म्हणून जातात...

" अरे सांग तर काय झालं... " यशवंत

" काका एकच मिनिट या सगळ्यांत रिधु खूप महत्वाची आहे.. " विकी

" काय झाल विकी... " रिद्धी सोबत बाकी सगळ्या येतात... विकी तिच्या हातात लेटर देतो... रिद्धी न समजून लेटर वाचते... क्षणात तिचे भाव बदलतात... आणि डोळे वाहु लागतात...

" ए वेडी रडते काय... आम्हाला सर्वांना माहीत आहे तु यासाठी किती मेहनत केली आहे... " विकी तिचे डोळे पुसतो...

" विकी - रिधु अरे आम्हांला पण सांगा काय झालं... " यशवंत सगळ्यांच्या वतीने विचारतात... रिद्धिला रडताना बघून वंश देखील समजेना...

" काका रिद्धिने RN fashion industry इंटरनेशनल लेव्हलला नेण्यासाठी US ला एक्झीबिशन झालं होत.. तेव्हा तिथे RN ला प्रेसेंट केलं होत... त्यांना तिचे डिझाइन खूप आवडले आणि आत्ता RN इंटरनेशनल मार्केट मध्ये पाऊल टाकणार आहे.... " विकि सगळ्यांना आनंदाची बातमी देतो... रिद्धी जाऊन यशवंतला मिठी मारते... यशवंतची अभिमानाने छाती फुलली होती... राज पुरोहितांना भावी सुनेचा अभिमान वाटत होता...

" I am proud of you beta... " यशवंत रिद्धिच्या केसांत ओठ टेकवतात...

" रिधु राजामातांचा आशीर्वाद घे.. " यशवंत रिद्धिला सांगतात... रिद्धी डोळे पुसून राजमातांजवळ जाऊन नमस्कार करते...

" यशस्वी भव: अशीच प्रगती करा आणि लवकर आमच्या घरी या... " राजमात रिद्धिच्या गालावर हात ठेवून बोलतात... रिद्धी मात्र लाजते... मनिष आणि अर्पितांना नमस्कार करून ती निंबाळकरांना नमस्कार करते...

" बाबा जेवणासाठी येताय ना... " विराज सगळ्यांना बोलवायला येतो... रुचिका त्याही आनंदाची बातमी देते... आज विराजला देखील रिद्धिचा अभिमान वाटत होता...

" Finally you did it .. I am proud of you.. " विराज रिद्धिच्या डोक्यावर हात ठेवत बोलतो..

" This credit goes not only to me but also to you because you too have worked very hard ... Congratulations Mr. Viraj Nimbalkar .. Finally you are stepping into the international market... ( हे श्रेय फक्त मलाच नाही तर तुला सुद्धा जाते कारण तु पण खूप मेहनत घेतली आहे... तर अभिनंदन मि. विराज निंबाळकर.. शेवटी तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाऊल ठेवत आहात... ) रिद्धी विराज समोर हात करते... दोघे एकमेकांशी हात मिळवणी करतात.... सगळे रिद्धिच अभिनंदन करतात... वंश मात्र तसाच थांबला होता.. रिद्धिच्या चेहऱ्यावरच्या आनंदाला पाहून त्यालाही आनंद झाला होता...

" वंश तुम्ही आमच्या सुनबाईंच अभिनंदन नाही करणार.." अर्पिता

" म्हणजे... " धरा ना समजून बोलते..

" म्हणजे आता तुम्ही रिद्धी दि नाही तर रिद्धी वहिनी बोलायच... " मनिष

" Really... I am so so happy.... आता मी तुला वहिनी बोलायच मग तु मला काय बोलणार... " धरा रिद्धीला जाऊन मिठी मारते...

" मलाच अजून कोणाला काय बोलायच माहीत नाही... " रिद्धी बारीक आवाजात स्वतःला बोलते... पण शेजारी उभी असणाऱ्या सियाने ते ऐकलं...

" Don't worry... मी आहे ना कशाला टेन्शन घेतेस.." सिया तिचा हात धरून हळू आवाजात बोलते..

" दादा अरे जेवणासाठी बोलवायला आलास ना मग... " विराट आत येतो...

" हो हो चला आधी जेवून घ्या... " यशवंत

सगळे जेवणासाठी निघतात... वंश सियाला थांबवतो..

" काय झालं... ? " सिया

" मला रिद्धी सोबत बोलायच आहे... थोडं ऍडजेस्ट कर ना... " वंश

" ok.. आधी जेवू या खूप भूक लागली आहे... " सिया

" तुझं काही नाही होऊ शकत... " वंश नकारार्थी मान हलवत हसतो...

" I know that... " सिया पण हसून बोलते... आणि दोघे जेवायला जातात...

रिद्धी आणि वंश समोरासमोर बसले होते... त्यामुळे मधेमधे त्यांची नजरानजर व्हायची... आणि रिद्धी मान खाली घालायची... दोघांना बघून सिया - अंकितला त्यांचे क्षण आठवत होते...

जेवण आवरून सरंजामे आणि राज पुरोहित कुटुंबीयांनी निरोप घेतला आणि संध्याकाळी व्हेंन्यू ला भेटू सांगितल... त्यानंतर सर्वजण खोलीत आराम करायला गेले...

अर्चना समिधाच्या रूम मध्ये आल्या... तर रूम मध्ये सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या... रूमचे कबाडखान्यात रूपांतरण झालं होत...

" समु अग काय हे... काय हाल केलेत रूमचे... " अर्चना

" तुला रूमच पडलं आहे इथे माझ्या स्वप्नांची वाट लागली आहे... " समिधा रागात बोलते.. 😡😡

" समु अग आता जे झालं त्यात आपण काय करू शकतो... आणि मी तुला आधीच बोलले होते... तुझं आणि वंशच लग्न नाही होऊ शकत... " अर्चना तिला समजवतात

" लग्न तर त्याच माझ्यासोबतच होणार बाकी कोणाशी नाही... तु फक्त बघ त्या रिद्धिला कशी माझ्या रस्त्यातून बाजूला करते... " समिधा कुत्सित हसते..😈😈

" समु नको ते उद्योग करू नकोस... जर या बाबतीत तुझ्या डॅडला आणि रिद्धीच्या भावांना कळलं तर तुला खूप महागात पडेल... " अर्चना

" I don't care... मला फक्त राज पुरोहितांसोबत मतलब आहे... " समिधा

" तु माझं ऐकणार नाहीस... पण एक लक्षात ठेव काही प्रॉब्लेम झाला तर मी काहीच मदत करणार नाही... " अर्चना बोलून निघून गेल्या...

" आजची रिसेप्शन पार्टी रिद्धीसाठी खूप भारी पडणार आहे.... I'm sorry अंकित भाई पण रिद्धीमुळे तुझी पार्टी खराब होणार... " समिधा बोलून कुत्सित हसते.. 😈😈




दुपारी आराम करून सर्व रिसेप्शन व्हेंन्यूला निघतात... रिसेप्शनसाठी ब्लॅक आणि रेड थीम होती.... मुंबईमधील luxury collection hotel मध्ये रिसेप्शनसाठी मोठा हॉल घेण्यात आला होता... हॉटेलबाहेर मीडिया जमली होती.. त्यांना आत एन्ट्री नव्हती... म्हणून गेटजवळून येणाऱ्या ऑनरेबल गेस्टचे फोटो काढले जातं होते..

सिया - अंकिची कार आल्यावर गार्ड्स त्यांना कव्हर करायला आले... फ्लॅश चा झगमगाट सुरु होता... दोघे आत गेल्यावर त्यांच्या मागे रिद्धी , विराज आणि रुचिका आल्या... रिद्धीची कार बघून सर्व कॅमेरा गाडीकडे वळाले... त्यानंतर बरेच गेस्ट आले होते... निंबाळकर आणि सरंजामे कुटुंबीय सगळ्यांचे स्वागत करत होते...

काही वेळात गाड्यांचा ताफ़ा आला... काही गाड्या आत गेल्यानंतर मीडियाला वंशची कार दिसली... त्याला कॅप्चर करण्याकरता सगळ्यांची धावपळ सुरु होती... गाडी आत गेल्यावर सगळे शांत झाले...

आत मध्ये सर्व जमले होते... वेटर सर्वांनां वेलकम ड्रिंक स्टार्टर सर्व्ह करत होते... dj वर सायलेंट सॉंग सुरु होते....

तेवढ्यात सिया - अंकितची एन्ट्री झाली.. त्यांना आल्याचे पाहिल्यावर सर्वानी टाळ्या वाजवल्या... दोघे स्टेजवर आल्यावर सगळे त्यांना विश करण्यासाठी जातं होते...



रिद्धी गँग सोबत थांबली होती... मनिष निंबाळकरांसोबत बिझनेस मॅन सोबत बोलत होते... वंश विराज सोबत होता... त्याला रिद्धी सोबत बोलायच होत पण ती अजून पर्यंत त्याला दिसली देखील नव्हती... त्याची नजर चहुकडे फिरत होती... विराजला त्याच्या मनातल कळालं...

" तुम्ही रिद्धीला शोधत असाल तर ती तिकडे आहे... " विराजने हसत त्याच्या बॅक साईड टेबलं कडे बोट दाखवलं...



त्याने तिला पाहून एक सुस्कारा सोडला... आणि विराजकडे वळाला...

" दादा मला एक मदत हवी होती... " वंश

" आधी तर आपण सेम age आहोत तर call me विराज... आणि आता बोला काय मदत हवी आहे... " विराज

" सकाळी रिद्धीने लग्नाला होकार दिलाय.. पण आमच त्याबद्दल अजून बोलण नाही झालं आहे तर मला तिच्यासोबत बोलायच होत... " वंश

" मी आत्ता भेटण्याबद्दल नक्की नाही सांगु शकणार पण उद्या नक्की भेट घडवून आणू शकतो... चालेल... " विराज

" जर रिसेप्शन नंतर मी रिद्धिला घरी ड्रॉप केलं तर चालेल... " वंशला काही करून आज तिला भेटायच होत..

" मला एकदा बाबांना विचाराव लागेल... कारण बाहेर मीडिया आहे... " विराज

" No problem... आणि मिडियाला अजून हि खबर नको कळायला... " वंश

" Good Evening Sir... " मॅक्स ( वंश PA ) त्यांना जॉईन होतो... वंश त्याला स्माइल देतो... विराज सोबत त्याची ओळख करून दिली...

डान्स फ्लोअर वर कपल डान्स साठी आले होते... विराज- रुचिका , आदि- संजू , रक्ष- तनु सगळे डान्स करत होते... रिद्धिला बऱ्याचश्या जणांनी डान्ससाठी विचारल होत पण तिने नकार दिला होता... तिला वंश सोबत डान्स करायचा होता पण तो सगळ्यांसोबत बोलत होता... शेवटी ती राजमाता आणि बाकी लेडीज कडे गेली....

" तुम्ही डान्स का करत नाही आहे ... " अर्पिता

" असंच... " रिद्धी हसरा चेहरा ठेवत बोलते... अचानक तिला तिच्याजवळ कोणी थांबल्याचा भास होतो... त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या हाताला होताच तिचे अंग शहारले...

त्याच्या स्पर्शाने तिला वंश असल्याचे समजलं होत... पण तिने नजर सरळ ठेवली...

" वंश तुम्ही नाही डान्स करत आहात... " राजमाता

" दादीसा आम्हांला कोणी जोडीदार नाही तर कोणासोबत डान्स करणार... " वंश रिद्धीकडे तिरप्या नजरेने बघत बोलतो...

" आता तर तुम्हांला तुमचा जोडीदार मिळाला आहे मग जा घेऊन... " अर्पिता रिद्धिकडे बघत बोलतात...

रिद्धीने अजून त्याच्याकडे पाहत नव्हती... वंशने तिच्यासमोर हात केला... तेव्हा तिने त्याच्याकडे पाहिलं... आणि हात त्याच्या हातात दिला... तिच्या कोमल हाताच्या स्पर्शाने त्याचे रोमरोम शहारले... वंश तिला घेऊन डान्स फ्लोअरवर आला....

त्याने अलगद तिच्या कमरेत हात घालून तिला अलगद जवळ ओढून डान्स करायला सुरुवात केली... समिधा रिद्धिला वंशसोबत बघून दातओठ खात होती...

रिद्धी डान्सर असल्याने डान्स मध्ये पटाईत होती... पण वंश देखील सराईत पणे डान्स करत होता... रिद्धीची त्याच्याकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती...

" I know I don't look handsome like you .. so won't you look at me ... ( मला माहीत आहे की मी तुझ्यासारखा देखणा नाही...म्हणून तू माझ्याकडे बघणार नाहीस...) वंश तिच्या कानाजवळ बोलतो...

" असं काही नाही.... You are looking so handsome... " रिद्धी त्याच्या डोळ्यांत बघत बोलते..

पण खरंच आज वंश खूप हँडसम दिसत होता....




dj ने song बदलवून लाईट डिम केल्या...

दबी-दबी साँस में सुना था मैंने
बोले बिना मेरा नाम आया
पलकें झुकीं और उठने लगीं तो
हौले से उसका सलाम आया

हम्म..
दबी-दबी साँस में सुना था मैंने
बोले बिना मेरा नाम आया
पलकें झुकीं और उठने लगीं तो
हौले से उसका सलाम आया

जब बोले वो, जब बोले
उसकी आँख में रब बोले
जब बोले वो, जब बोले
उसकी आँख में रब बोले
पास-पास ही रहना तुम
आँख-आँख में कहना तुम
देखा तुम्हें तो आराम आया

दबी-दबी साँस में सुना था मैंने
बोले बिना मेरा नाम आया
पलकें झुकीं और उठने लगीं तो
हौले से उसका सलाम आया

रोज़ ही दिल की आग उठाकर
हाथ पे लेकर चलना है
तेरे बिना, बिना तेरे बूँद-बूँद
अब रात रात भर जलना है
तू मिले ना मिले, ये हसीं सिलसिले
वक़्त के सख्त हैं अब ये कटते नहीं
तेरे बिना साँस भी चलती है
तेरे बिना दिल भी धड़कता है
याद नहीं था याद आया

दबी-दबी साँस में सुना था मैंने
बोले बिना मेरा नाम आया
दिन की तराह तुम सर पे आना
शाम के जैसे ढलना तुम
ख्वाब बिछा रख्खे हैं राह में
सोच-समझ कर चलना तुम

नींद की छाँव से, तुम दबे पाँव से
यूँ गये वो निशाँ अब तो मिटते नहीं
तेरे लिए चाँद भी रुकता है
तेरे लिए ओस ठहरती है
याद नहीं था याद आया

दबी-दबी साँस में सुना था मैंने
बोले बिना मेरा नाम आया
पलकें झुकीं और उठने लगीं तो
हौले से उसका सलाम आया
सलाम आया, सलाम आया
सलाम आया, सलाम आया

सलाम आया, सलाम आया
सलाम आया, सलाम आया

( Song Title :- Salaam Aaya
Movie : -Veer )

वंश रिद्धिसोबत हरवून डान्स करत होता...

" मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढा छान डान्स करतात... " रिद्धी त्याचा डान्स बघून बोलते...

त्यावर तो हलकी स्माइल देतो...ती देखील त्याला रिटर्न स्माइल देते... हसल्यानंतर पडलेली खळी पाहून त्याला समाधान वाटले... दोघांना हा डान्स संपू नये वाटत होत..

गाणं संपल्यावर सगळे टाळ्या वाजवतात.... आणि रक्ष माईक घेऊन येतो...

" hello everyone.... एवढी छान पार्टी ज्यांच्यासाठी आहे त्या आपल्या न्यू वेड कपलचा डान्स हवा ना... so put your hands together for ankit & siya...

रक्ष गेल्यावर अंकित आणि सिया डान्स फ्लोअर वर येतात....आणि गाणं सुरु होत...

जब तक तेरी आँच में
बूँद बूँद मैं जल ना लूँ
जब तक तेरे साथ में
चाँद तक मैं चल ना लूँ

हां मेरे पास तुम रहो
जाने की बात ना करो
मेरे साथ तुम रहो
जाने की बात ना करो

जब तक तेरी आँच में
बूँद बूँद मैं जल ना लूँ
जब तक तेरे साथ में
चाँद तक मैं चल ना लूँ

हां मेरे पास तुम रहो
जाने की बात ना करो
मेरे साथ तुम रहो
जाने की बात ना करो..

तुझपे सजे खूबसूरत लगे
ऐसा क्या दूँ तुझे
ऐसा क्या दूँ तुझे
हां हाथो की ये लकीरे सभी
पहना दूँ तुझे
पहना दूँ तुझे

जब तक मेरी आँखें
तेरा चेहरा पी ना ले
जब तक तेरी धुन में
हम मर ना ले, जी ना ले

हां मेरे पास तुम रहो
जाने की बात ना करो
मेरे साथ तुम रहो
जाने की बात ना करो..

जब तक तुझे प्यार से
मैं बेइंतेहा मैं भर ना दूं
जब तक मैं दुआओ सा
सौ दफ़ा तुझे पढ़ ना लूं

हाँ मेरे पास तुम रहो
जाने की बात ना करो
मेरे साथ तुम रहो
जाने की बात ना करो..

तुम आ गए बाजुओं में मेरे
सौ सवेरे लिए, सौ सवेरे लिए
हाँ बादलों से उतारा गया
तुमको मेरे लिए, सिर्फ मेरे लिए

जब तक मेरी उँगलियाँ
तेरे बालों से कुछ कह ना ले
जब तक तेरी लहर में
ख्वाहिशें मेरी बह ना ले

हाँ मेरे पास तुम रहो
जाने की बात ना करो
मेरे साथ तुम रहो
जाने की बात ना करो..

Song Title : Jab Tak
Movie : M.S. Dhoni – The Untold Story(2016)



दोघेजण आपल्या विश्वात रमले होते.... गाणं संपल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ... त्याने ते भानावर आले आणि वेगळे झाले...


रिद्धी , संजू , तनु , पियू सगळ्यांसोबत बसली होती... पियूला ज्युस हवा होता... पण वेटर दिसत नव्हता...

" थांब मी आणते... " रिद्धी बोलून जाते....

समिधा केव्हापासून याच वेळेची वाट पाहत होती , कि केव्हा रिद्धी एकटी असेल.... आणी आता रिद्धी एकटीच होती....

रिद्धीने काउंटरला जाऊन एक ऑरेंज ज्युस मागितला... तेव्हा समिधा तिथे आली...

" तु इथे काय करते आहेस... ", समिधा

" पियू साठी ज्युस घ्यायला आले होते... " रिद्धी ज्युस घेत बोलते...

" तु नाही घेतलास... " समिधा

" नाही मला नको आहे... तु घे..." रिद्धी

" come on यार... तुझं लग्न ठरलं यासाठी तर चिअर्स कर..

" मी ड्रिंक करत नाही.... " रिद्धी

"ok ..मग ज्युस तर घेऊ शकतेस ना... " समिधा रिद्धिला आग्रह करते त्यामुळे तिला नकार देता येत नाही... समिधा तिच्यासाठी चॅम्पियन आणि रिद्धिसाठी ज्युस घेते...

" रिद्धी ते तुझे कॉलेज फ्रेंडस आहेत का... " समिधा रिद्धीच्या मागे असलेल्या गँग कडे बोट करत बोलते... रिद्धी मागे वळून बघते.... आणि समिधा तिच्या ग्लास मध्ये अल्कोहोल मिक्स करते...

" हो.... " रिद्धी बोलून ज्युसचा सिप घेत असते.... तर तिला धराचा धक्का लागतो.... आणि ज्युस अंगावर सांडतो...

" so sorry... माझा चुकून धक्का लागला.... " धरा टेन्शन मध्ये येते...

" It's ok dhara.... " रिद्धी टिशूने ड्रेस क्लीन करत बोलते...

" तु वॉशरूम मध्ये क्लीन कर त्याला नाही तर खराब दिसेल...मी येते सोबत चल ... " धरा

" अग राहू दे मी जाते... " रिद्धी

" असं कसं माझ्याकडून सांडल ना मग चल... " धरा

रिद्धी वेटरसोबत पियुसाठी ज्युस पाठवून देते...आणि तिथून जातात... वंश दोघींकडेच बघत असतो... धरा त्याला स्माइल करून 👍🏻 करते... वंश तिला स्माइल देतो...


🔷 🔷 🔷 🔷 🔷 🔷 🔷 🔷 🔷 🔷

तर झालं असं... कि वंशची नजर रिद्धीवरुन काही केल्या हटत नव्हती.... ती जिथे जाईल तिथे तो तिच्याकडे अडून पाहत होता... आणि तेव्हाच त्याने समिधाला रिद्धिच्या ग्लासमध्ये अल्कोहोल मिक्स करताना पाहिलं... नेमकी त्याला तिथून धरा पास होत होती... त्याने तिला थांबवुन घेतलं...

" समोर रिद्धीच्या हातात जो ज्युस आहे तो पिण्यापासून तिला थांबव..." वंश

" पण का ज्युस तर आहे... त्यात काय " धरा न समजून बोलली...

" त्या ज्युस मध्ये अल्कोहोल मिक्स केलं आहे... जा पटकन.." वंशने तिला सांगितल्यावर तिला काय करून तो ज्युस काढून म्हणून सुचत नव्हतं... म्हणून तिने रिद्धिला धक्का दिला आणि ज्युस सांडला....

🔷 🔷 🔷 🔷 🔷 🔷 🔷 🔷 🔷 🔷

समिधाचा प्लॅन फ्लॉप झाल्याने ती चांगलीच चिडली होती... " हिला पण आत्ताच धडकायच होत... पण हि जाताना हसत का गेली... " समिधाच डोक्यात आता या प्रश्नाने घर केलं... आणि ती अर्चना कडे निघून गेली...

एकएक करून सगळे गेस्ट निरोप घेत होते.... सगळ्यात शेवटी रिद्धी सिया आणि अंकित जवळ येते...

" तर वहिनीसाहेब हे तुमच्या नणंदे कडून तुम्हांला वेडिंग गिफ्ट... " रिद्धी सियाच्या हातात बॉक्स देते...

" रिधु कशाला... " सिया पुढे बोलत असते.

" कशाला ... काय गरज होती... आधीच खूप केलं आहे... मला गिफ्ट पेक्षा तु हवी आहे... and all... मला सर्व माहीत आहे... पण तु हे घेणार आहेस... " रिद्धी तिच पुढेच वाक्य पूर्ण करत बोलते...

" ए सीयु बघु तरी तुझ्या नणंदेने काय गिफ्ट दिलंय... " संजू

सिया गिफ्ट रॅप काढते आणि ज्वेलरी बॉक्स ओपन करते... नेकपिस बघून तिचे डोळे मोठे झाले... अंकित साठी देखील हे सरप्राइज होत... गिफ्ट तर दोघांनाही आवडलं होत....

" अरे दाखवताय कि नाही... " विराज त्यांना आवाज देतो... सिया बॉक्स समोर धरते.... नेकपिस बघून सगळे खुश होतात....



" रिधु तु केव्हा घेतलास हा नेकपिस... बाकी ज्वेलरी घेतली तेव्हा आणि ज्वेलरीचे डिझाइन सिलेक्ट केले तेव्हा तु नव्हता घेतलास... " रोहिणी

" काकू आपण कोश्चुमस बघितले त्या दिवशी मी भाई कडून वंशचा नंबर घेतला होता आणि त्यांना हा नेकपिस डिझाइन करायला सांगितला होता.... " रिद्धी

" खरच वंश खुप छान डिझाइन केलं आहे... " समीर

" काका मी फक्त बनवून दिला आहे... डिझाईन रिद्धिने केलं आहे... " वंश

" खरच रिद्धु.... म्हणजे हे सरप्राइज होत... " सिया

" हो... तुला आठवत तु मला बोलली होतीस... रिधु तु फॅशन डिझाइनर पेक्षा ज्वेलरी डिझाइनर हवी होती... म्हणजे माझ्या लग्नाची ज्वेलरी तु डिझाइन केली असती.... फिर आपकी फर्माइश और हम पुरी ना करे ऐसा हुआ है क्या.... " रिद्धी तिचे गाल ओढत बोलते... सिया तिला मिठी मारते....

नंतर सर्वजण जेवण करतात... राज पुरोहितांचे जेवण आधीच झालं होते... त्यामुळे बाकी जेवण करून घेतात....

जेवण झाल्यावर सगळे घरी जाण्यासाठी निघतात.... रिद्धी जाऊन गाडीत बसत असते तर विराज तिला थांबवतो....

" रिधु मागे त्या गाडीत बस... " विराज मागच्या गाडीकडे बोट करतो...

" अरे दादू ती तर वंशची गाडी आहे... " रिद्धी

" हो पण दुपारी सगळं अचानक झालं त्यामुळे दोघांना बोलायला जमलं नाही ... त्याला तुझ्याबरोबर बोलायच आहे... " विराज

" पण आई - बाबा आणि राजमाता त्यांना माहीत आहे का... " रिद्धी

" सगळ्यांना माहीत आहे... तो तुला घरी ड्रॉप करेल... जा आता... " विराज बोलल्यावर ती गाडीकडे निघते...

वंश तिची वाट बघत होता... रिद्धी आल्यावर गाडी निघाली... कारच्या विंडोज़ शेड्सने बंद केले होते... त्यामुळे कोणाला आतील दिसत नव्हतं... गाडीत देखील पार्टिशन असल्याने ड्रायव्हिंग सीटवर असलेल्यांना मागील काही दिसत नसायचे... वंशला हवं असेल तेव्हा तो पार्टीशन काढायचा...

गाडीत शांतता होती... कोणीही बोलत नव्हतं... गाडी एका शांत टेकडीवर येते.... मॅक्स वंशचा डोअर ओपन करतो.. वंश खाली उतरुन रिद्धिच्या साइडचा डोअर ओपन करतो.... रिद्धी बाहेर आल्यानंतर दोघे थोडं पुढे जातात....

वातावरणात गारवा होता... ओपन शोल्डर गाऊन मुळे तिला थंडी जाणवत होती... केसांमधून दोन बट निघून हवेत उडत होत्या... आणि तिची बोटे त्यांना सावरत होते...

वंश तिला पाहून तिच्यात हरवत होता.... तिची सहज नजर त्याच्याकडे गेली...त्याच्या बघण्याने तिच्या गालावर लाली पसरली....

" तुम्हांला काही बोलायच होत ना... " रिद्धी त्याला भानावर आणते...

" अ... काय झालं... " वंश भानावर येतो...

" तुम्हांला काहीतरी बोलायच होत ना.... " रिद्धी

" हो.... तु नक्की तयार आहेस ना लग्नाला कि आई - बाबा बोलले म्हणून... " वंश तिच्याकडे पाहत बोलतो...

" असं नाही आहे... मी मनापासुन तयार आहे.... " रिद्धी त्याच्याकडे बघते...

" मी तुला पहिल्यांदा गोव्याला पाहिलं होत तुझ्या फ्रेंड्स सोबत.... त्याच क्षणी तु मला आवडली होती... तेव्हा तुझ्यासोबत सिया नव्हती त्यामुळे तुझ्याबद्दल कळलं नाही... तुझा चेहरा मनातून जाता जात नव्हता... सियाच्या whats app ला तुझा फोटो पाहिला... तेव्हा तुझ्याबद्दल विचारणार होतो पण काय विचारणार म्हणून नाही विचारल.... तोपर्यंत तुझं नाव कळलं होत... इंडस्ट्रीमध्ये तुझ्याबद्दल खुप ऐकलं.... त्यादिवशी तुझा कॉल आला तेव्हा तुझ्या असण्याबद्दल जाणवल आणि शेवटी सियाच्या लग्नात आपली भेट झाली... तिच्या लग्नानंतर मी दादीसां बरोबर तुझ्याबद्दल बोलणार होतो... कारण तु मला बघता क्षणी आवडली होती...मी काही बोलण्याअगोदर दादीसांनी तुला लग्नासाठी विचारल... त्या तुझ्या घरी लग्नाबद्दल बोलणार आहेत या बद्दल मला काही कल्पना नव्हती...." वंश तिला सर्व सांगत होता...

" मी लंडनहून MBA केलं आहे... आणि आता आमचा बिझनेस सांभाळतो आहे... तुझं जसा स्वप्न होत कंपनीला इंटरनेशनल लेव्हल नेण्याच तसच मला आमची कंपनी इंटरनेशनल मध्ये न्यायची आहे... त्याकरता हवी ती मेहनत घेत इंडिया मध्ये टॉप केलं आहे... आणि पुढे तुझी साथ मला हवी आहे... देशील ना..." वंश तिच्यासमोर हात करतो.... रिद्धी सर्व मनापासुन ऐकत होती... तिने त्याच्याकडे बघून त्याच्या हातात हात दिला...


" जेव्हा पहिल्यांदा मी तुम्हांला मॅगझिन आणि Tv वर पाहिलं ना तेव्हा मी मनातच कितीतरी स्वप्न बघितले.... मी तुमचा प्रत्येक इंटरह्यु पाहिला आहे... मॅगझिन मधून फोटो कट करून ठेवले होते... मला कधीच फॅशन मध्ये इंटरेस्ट नव्हता.... पण तुमची भेट होईल म्हणून फॅशन इंडस्ट्रीमध्ये आले.... पण आपली भेट झालीच नाही... मी सियाच्या स्टेटसला तुमचा फोटो पाहिला होता... तिला विचारणार होते पण आमच बोलण नाही झालं.... शेवटी ठरवून अंकित भाई कडून तुमचा नंबर घेतला आणि कॉल केला... मला बोलायला काय बोलणार सुचत नव्हतं पण बोलून पटकन कॉल कट केला.... आणि मेहेंदीला तर तुम्हांला समोर बघून स्तब्ध झाले होते... Your my first crush Vansh... " रिद्धीच्या तोंडुन स्वतःसाठी ऐकताना वंशला खूप छान फिलिंग येत होत...
" तुला लग्नानंतर जर जयपूर राहाव लागलं तर...." वंश

" चालेल मला काही प्रॉब्लेम नाही....पण जर लग्नानंतरही मी कंपनी जॉईन केली तर चालेल ना... " रिद्धी

" मला काही प्रॉब्लेम नाही...." वंशच्या बोलाण्यावर रिद्धी त्याला खळीवाली स्माइल देते... त्याने तो पुरता फ्लॅट झाला... आणि तिला जवळ ओढल...

" वंश काय करताय... सोडा कोणी बघेल... " रिद्धी मागे मॅक्स कडे बघत बोलली...

" त्याने बघितलं तरी नाही बघितलं बोलेल समजलं... आणि आधी स्वतः समोरच्याला भुरळ पाडायची आणि नंतर दूर जायला सांगायच... ए तो नाइंसाफी हुई 😉... तुझी हि खळी आहे ना मला नेहमी वेड लावते... " वंश तिचे पुढे आलेल्या केसांच्या बटा कानामागे करत बोलतो.... त्याच्या बोटांच्या झालेल्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला....

" वंश ना जागा रोमँटिक होण्याची आहे ना वेळ.... घरी सगळे वाट बघत असतील.... " रिद्धी

" हम्म... उद्या तुमच्या घरी बोलावलं आहे डिनरसाठी..." वंश

" मी तुमच्या साठी स्पेशल डिनर बनवते... " रिद्धी

" अरे व्वा.... म्हणजे सासरच्यांना खुश करायचा प्लॅन आहे... पण माझ काय मला कसं खुश करणार... " वंश तिच्या मानेवरचे केस मागे करत बोलतो...

" तुम्हांला काय हवं ते नंतर बघू.... चला आता... " रिद्धी त्याच्यापासुन दूर होत बोलते.... आणि त्याचा हात धरून गाडीकडे घेऊन येते...

दोघे घरी निघतात.... वंशने रिद्धीला हग केलं होत... रिद्धिला काय सुचल म्हणून तिने तिचा फोन ऑन केला... आणि दोघांचा सेल्फी काढला.... आणि त्याच्या कॉन्टॅक्ट प्रोफाइलला सेट केला...


काही वेळात दोघे रिद्धिच्या घरी पोहचले.... वंशला हग करून रिद्धी निघाली... पण मागे वळून पटकन त्याच्या गालावर ओठ टेकवुन बाहेर निघाली.... सर्व एवढ्या पटकन झाल वंशला काही कळलच नाही... कळलं तोपर्यंत रिद्धी तिथून पळाली होती... त्याने हसत नकारार्थी मान हलवली आणि मॅक्सला निघायला सांगितल....


रिद्धी आली तेव्हा सर्वजण झोपायला गेले होते.... रुचिका रिद्धिची वाट पाहत होती...

" हे काय वहिनी तु झोपली नाहीस अजून... " रिद्धी आत येते

" तुमचीच वाट पाहत होते... " रुचिका तिला पाणी आणून देते

" अग कशाला थांबलीस... तु पण दमली असशील ना..." रिद्धी पाणी पिऊन ग्लास ट्रे मध्ये ठेवते...

" अहो आई थांबत होत्या... पण त्यांना मी थांबते सांगितलं तेव्हा गेल्या... आता आल्या ना तुम्ही मग जाते मी पण झोपायला... " रुचिका

" सियू झोपली... " रिद्धी

" हो ती थांबते बोलत होती पण तिला झोपायला पाठवल ... " रुचिका

" बरं चल झोप तु पण... Good Night... " रिद्धी रूममध्ये निघून जाते...

रिद्धी रूममध्ये येते... सिया झोपून गेली होती... रिद्धी हळुच आत येऊन पटकन चेंज करून आली...

वंश घरी पोहचला तोपर्यंत सगळे झोपले होते... रूम मध्ये जाऊन त्याने शॉवर घेतला आणि आधी रिद्धिला कॉल केला... दुसऱ्या सेकंदाला तिकडून कॉल रिसीव्ह झाला...

" हॅलो वंश.. नीट पोहचलात ना घरी... " रिद्धी गॅलरीमध्ये येऊन काउचवर बसली...

" हो आत्ताच पोहचलो... फ्रेश होऊन तुला कॉल केला... तुला कोणी काही बोललं का...? " वंश टॉवेलने केस पुसत बोलला...

" नाही सगळे झोपले होते... वहिनी वाट पाहत होती... पण काही बोलली नाही... " रिद्धी

" पण मला तुझं वागणं आवडलं नाही... पुन्हा असं होता कामा नये..." वंश आवाजाचा टोन बदलवत बोलला

" काय झालं... काही चुकलं का माझं..." रिद्धी पुरती घाबरली 😧😧...

" हो चुकलच... माझं लक्ष नसताना तु काय करून गेलीस..." वंश टोन मेंटेन करत बोलतो...

" ते मी.. ते.. वंश " रिद्धिला काय बोलाव सुचत नव्हतं... त्यामुळे ती अडखळत बोलत होती...

" मी काय विचारतो आहे... बोलणार आहेस का... " वंश थोडा टोन चेंज करतो

" वंश प्लीज गैरसमज नका करून घेउन... मी काही ठरवून नाही केलं ते नकळत घडलं... " रिद्धी आपली बाजू मांडत बोलली...

" अच्छा नकळत असं घडलं आणि जर ठरवून केलं असत तर काय केलं असत..." वंशचा आवाज थोडा स्मुथ होतो... त्याने रिद्धी थोडी शांत होते... पण त्याला काय रिप्लाय द्यावा हे मात्र तिला सुचेना

" तुम्हांला माझं वागणं आवडलं नसेल तर.. I'm really sorry... पुन्हा असं नाही होणार... " रिद्धी

" पण मला आवडेल पुन्हा असं झालं तर... पण नेक्स्ट टाइम जर मला लिप्सवर मिळालं तर जास्त आवडेल..." वंश मिश्किलपणे बोलतो

वंशच्या बोलण्यावर रिद्धी थोड्यावेळ शांत राहते.. पण तिला त्याच् बोलणं समजल्यावर तिचे गाल लाजेने लाल होतात...पण ती तस जाणवू दिलं नाही...

" म्हणजे तुम्ही एवढ्या वेळ माझी मस्करी करत होतात..." रिद्धी चिडत बोलते

" जे बोललो ते खरं बोललो... तु मला भुलवून गेलीस...आणि याचा बदला मी उद्या घेणार... So get ready for revenge..." वंशच्या बोलण्यावर रिद्धी काहिच बोलत नाही... वंश मात्र सर्व एन्जॉय करत बेडरूमच्या मोठ्या बेडवर पडला होता...

" तु काही बोलत नाही म्हणजे मला मिळणार आहे कि नाही... " वंश तिची मस्करी करत बोलतो... रिद्धी मात्र लाजेने पाणी झालं होत... ती लाजत गालातल्या गालात हसत ...

" म्हणजे नाही का भेटणार... " वंश

" मी कुठे असं बोलले... " रिद्धी पटकन बोलून जाते... आणि जीभ चावते.... 😜😜 वंशला मात्र तिच्या वागण्याच हसू येत होत...

" म्हणजे तुला चालणार आहे तर... " वंश मिश्किलपणे बोलतो...रिद्धीचे गाल लाजून लाजून लालेलाल झाले होते... वंशला समजत होत कि रिद्धी लाजते आहे... म्हणून तो मुद्दाम तिला अजून छळत होता...

" राहू दे नको सांगू... I know your answer.." वंश

" जाऊ दे मला बोलायच नाही तुमच्यासोबत ... " रिद्धी लाजत बोलते..

" बघ विचार कर.." वंश तिला अजून चिडवतो...

" वंश..." रिद्धी आता वैतगलेल्या आवाजात बोलते... पण वंशने चिडवलेल तिला आवडत होत...

" बरं...झोप तु... उद्या भेटूया... " वंश

" हम्म्म.... Good Night... " रिद्धी

" Good Night.... " वंश

दोघे कॉल कट करतात.... रिद्धी कॉल कट करून गालातच हसत असते... काहीवेळ गॅलरीमध्ये थांबून ती झोपायला जाते...

वंश बेडवर पडून झोपायचा प्रयत्न करत होता , पण काही केल्या त्याला झोप लागतं नव्हती... त्याने मोबाईल ऑन केला आणि रिद्धीचे फोटो बघत बसला.... शेवटी रिद्धिचा विचार करत त्याला झोप लागली...


क्रमशः


• राजमाता लग्नाबद्दल बोलणार हे वंश आणि अर्पिताला कसं माहीत नाही...
• रिद्धिने सर्वांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली...
• समिधाचा प्लॅन तर वंशने धुळीस मिळवला... पण ती आता पुढे काय करेल... ?

I hope तुम्हाला कथा नक्की आवडत असेल...

तुम्हांला हा भाग कसा वाटला.. नक्की कमेंट्स करून कळवा ...


प्लीज लाईक , कंमेंट , शेअर , रेटिंग आणि फॉलो करा..
लिहिताना व्यकरणात काही चुक झाली असेल, शब्द चुकीचा लिहिला गेला असेल तर नक्की कळवा ...
Stay Tuned.. 🙂🙂