बावरा मन - 8 - सियांकित.. Vaishu Mahajan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

बावरा मन - 8 - सियांकित..

सर्व कार्यक्रम आवरल्याने घरातील पाहुणे रिसेप्शन नंतर परतले होते.... समिधाची फॅमिली ब्रेकफास्ट नंतर निघणार होते...

रिद्धीने सकाळी उठल्यावर वंशला Good Morning msg केला होता... त्यावर त्याचा good morning msg आणि 😘 emoji आला होता..

रिद्धी आणि सिया रेडी होऊन खाली आल्या.... मंजिरी आणि रोहिणी मंदिरात घेऊन जाण्याचे साहित्य चेक करत होत्या...

"Good Morning आई... Good morning मम्मी" ( रोहिणी )... रिद्धी दोघींना हग करते...

" Good Morning..." मंजिरी आणि रोहिणी दोघींना विश करतात....

" बर सिया तयारी झाली ना.... आणि रात्री वंशच्या घरचे येणार आहेत लक्षात आहे ना... " मंजिरी मागे वळत बोलतात.

" रिधु हे काय तु अजून तयार नाही झालीस... " रोहिणी

" आई मी पण यायला हवं आहे का... ऑफिस मध्ये सध्या कोणाच लक्ष नाही तर मी तिकडे जाते ना..." रिद्धी

" रिधु फक्त आजच्या दिवस ना बाळा.. मग उद्या पासून तुम्ही सगळे कामात अडकाल..." मंजिरी

" ठीक आहे... पण मला वंशच्या घरी कसं रहतात... कसं बोलतात.... काहीच माहीत नाही... मी तर सगळ्यांना अहो जाहो करतानाच पाहिलं आहे... फक्त कोणी नसेल तर सीयु आणि धरा वंशना अरे तुरे करतात..." रिद्धी टेन्शन मध्ये येते..

" रिधु don't worry... मला जेवढं माहीत आहे त्यांच्या कडे कसं राहतात ते मी सांगेल..." सिया तिला आश्वस्त करते...

" झालं तर... बर आता आम्ही तर जाण्यासाठी तयार झालोय , पण अंकित तयार आहे कि नाही हे पाहायचं आहे तर सिया जरा बघून येशील... " रोहिणी

" लवकर ये फक्त... नाही म्हणजे आपल्याला आजच मंदिरात जायच आहे उद्या नाही..." रिद्धी तिला चिडवत बोलते.. त्यावर सिया गोड लाजते आणि निघून जाते...

" रिधु तुला तयार व्हायच आहे ना ... जा लवकर नाही तर लेट होईल..." रोहिणी बोलल्या

" हो मम्मी..." रिद्धी रूम मध्ये निघून गेली.. रोहिणी आणि मंजिरी किचनमध्ये गेल्या....

थोड्या वेळाने सगळे डायनिंग टेबलवर जमले... सिया आणि रिद्धी अजून आल्या नव्हत्या...

" हे काय ताई.. नवीन लग्न झालंय नवीन नवरीने लवकर उठाव पण तुमच्या सुनेचा अजून पत्ताच नाही.." अर्चना रोहिणीला म्हणाल्या

" अर्चना ती तुझ्या आधीच उठली आहे... मी तिला तयारी करायला पाठवलं आहे... तु नाश्ता करून घे.." रोहिणी अर्चनाला बोलतात.. त्याच्या अशा बोलण्याने अर्चनाला अपमान झाल्यासारखं झालं... रुचिका आणि रोहिणीने सगळ्यांना नाश्ता सर्व्ह केला...

सिया आणि रिद्धी आल्या.... सियाच्या बांगड्यच्या आवाजाने सगळ्यांच्या नजरा स्टेअर्सवर ( जिन्याच्या पायऱ्या) त्याच्यांकडे वळाल्या... सियाला पाहून अंकितची बत्ती गुल्ल झाली.... त्याच्या बघण्याने सियाने लाजून मान खाली घातली....




रिद्धी जाऊन अंकित शेजारी बसली....

" दादू अरे तुम्ही दोघेच नाही आहात फक्त बाकी फॅमिली पण आहे..." रिद्धी अंकितच्या कानाजवळ जाऊन बोलली...

" काय करू माझी बायको एवढी सुंदर दिसतेय कि नजर हटतच नाही आहे..." अंकित सियाकडे एकटक बघत बोलतो... त्यावर रिद्धी गालात हसत असते...

" दादू तु जर असं बघत बसला आणि आपल्याला जायला लेट झालं तर घरी यायला लेट होईल आणि रात्री माझ्या सासरचे येत आहेत म्हणजे तुझ्या बायकोला आज किचनमध्ये मुक्काम होईल.. विचार कर.." रिद्धी त्याला शेवटच बोलते... त्याच्या बोलण्याचा अर्थ त्याला कळतो तसा तो आपलं लक्ष प्लेट कडे वळवतो... त्या वागण्यावर रिद्धीला मात्र खूप हसू येत होत...


नाश्ता करून सगळे मुंबईमधील महालक्ष्मी मंदिराकडे निघाले.... समिधाची फॅमिली मुंबई मध्येच राहत होती म्हणून ते घरी निघून गेले...

💠💠💠💠💠💠💠



सगळे जण डायनिंग टेबलवर येवून बसले तरी वंश अजून आला नव्हता.... अर्पिताने त्याच्या रूम मध्ये इंटरकॉमला कॉल केला...

" वंश सगळे वाट बघत आहेत लवकर या.. " अर्पिताने कॉल कट केला... पाचव्या मिनिटाला वंश खाली आला... राजमातांना नमस्कार करून तो त्याच्या चेअर जवळ येवुन बसला....

" वंश तुम्हांला लक्षात आहे ना आपल्यला रात्री निंबाळकरांकडे जायच आहे..." राजमाता त्याला आठवण करून देतात....

" हो आजीसाहेब..." वंशच्या तोंडुन आजीसाहेब निघाल्याने सगळ्यांना आश्चर्य वाटलं..

" आजीसाहेब तुम्ही तर दादिसा बोलतात ना भाई.." धरा

" हो पण आम्हांला आजीसाहेब जास्त आवडत आणी आम्ही त्यांना या नावाने देखील हाक मारतो..." वंश

" तुमच्या तोंडुन आमच्यासाठी निघालेला प्रत्येक शब्द आम्हांला आवडतो मग तो कोणत्याही भाषेत असू दे ... आणि एवढया वर्षात आम्ही मराठी बोलायला देखील शिकलोय... अर्पिता लग्न करुन आल्या त्यानंतर आम्हांला शंका होती कि त्या मराठी आहेत तर आपलें रीतिरिवाज कशा सांभाळतील पण त्यांनी सगळं अगदी छान पद्धतीने सांभाळल.. " राजमाता

" माँसा तुम्ही आणि राजेंनी रिद्धिला मागणी घालून खूप छान केलंत.. मला तर ती पहिल्या नजरेत आवडली होती.." अर्पिता

" आणि तुमच्या चिरंजीवांना देखील..." मनीष वंशकडे बघून बोलतात... ज्याने वंश लाजून मान खाली घालतो..

" but dad this is not fair... तुम्हांला सर्वांना माहीत होत फक्त मला माहीत नव्हतं कि रिद्धी आमच्या वाहिनी होणार आहेत.." धरा नाटकी रुसत बोलते..

" आम्हांला माहित नव्हतं..." वंश धराकडे पाहून बोलतो

" आम्हांला देखील माहीत नव्हतं.." अर्पिता

" म्हणजे भाईंसाठी हे सरप्राइज होत तर..." धरा

" हो.. आम्हांला मनिष बोलले नसते तरी आम्ही रिद्धींना लग्नासाठी मागणी घालणार होतो.." राजमाता मनिष कडे बघून नंतर वंशला बोलल्या...

" म्हणजे.." अर्पिता न समजून बोलल्या... वंश फक्त ऐकण्याचे कामं करत होता... कारण तो काही बोलला असता तर धरा लगेच चिडवायला बसली होती...

" म्हणजे असं कि... " राजमाता पुढे बोलू लागतात..



💠💠💠 फ्लॅशबॅक 💠💠💠



लग्नाच्या दिवशी अर्पितांनी रिद्धीची ओळख करून दिल्या नंतर तिघे सियाकडे निघून गेले होते... राजमाता आणि मनिष दोघे तिथेच बसले होते...

( कथेत स्थळ जयपुर दाखवले आहे.. जयपुर मध्ये बोलण्यासाठी हिंदी आणि मारवाडी भाषेचा वापर केला जातो... पण या कथेतील राज पुरोहित कुटुंबीयांचे आणि संबंधित व्यक्तींचे सर्व संवाद मराठी भाषेत लिहिले जातील..." )

" आई साहेब मुलगी छान आहे नाही.." मनिष जाणाऱ्या रिद्धीकडे बघत बोलले..

" हो ना.. स्वभावाबरोबर संस्कारी आहे.. आम्ही आल्यापासुन बघतो आहोत मुलाची बहीण आहेत पण मैत्रीण म्हणून देखील सियांच्या सोबत आहेत.." राजमाता

" धरा आल्यापासुन त्यांच्या सोबत आहेत... " मनिष

" मनिष तुमच लग्न ठरलं तेव्हा आम्हांला काळजी होती.. अर्पिता पुरोहित घराण्याची सून म्हणून जबाबदारी पेलू शकतील कि नाही त्या लहानाच्या मोठ्या झाल्या त्या मराठी संस्कृती मध्ये... पण नंतर त्यांनी आमची सर्व काळजी नाहीशी केली आणि सर्व रीतिरिवाज छान प्रकारे शिकून घेतले.." राजमाता अर्पितांचे भरभरुन कौतुक करत होत्या... मनिष आपल्या आवडीवर अभिमान वाटतं होता..

" आईसाहेब तुम्ही हे सर्व आता का बोलत आहात..." मनीष न कळुन बोलले..

" कारण रिद्धींना पाहिल्यानंतर आम्हांला अर्पिता आठवल्या त्या देखील अशाच होत्या...म्हणून आम्ही वंश आणि रिद्धी यांच्या लग्नाचा विचार करत आहोत.." राजमाता बोलल्या तसा मनिष यांचा आनंद द्विगुणीत झाला...

" आई साहेब तुम्ही आमच्या मनातल बोलल्या आहात..." मनिष आनंदात बोलले..

" म्हणजे तुम्हांला देखील त्या आवडल्या आहेत तर मग आपण पुजेला जाणार आहोत त्या दिवशी त्यांच्या घरी या बद्दल बोलून घेऊया..." राजमाता

" तुम्हांला योग्य वाटेल तस करू या..." मनिष यांनी सहमती दर्शवली...

" बर एकदा तुम्ही वंश सोबत देखील बोलून घ्या... त्यांच काय मत आहे जाणून घेतलेलं बर.. तसे ते आमच्या शब्दाबाहेर नाहीत तरी विचारुन घ्या..." राजमाता

" अहो त्यांना तर ती पहाता क्षणी आवडली आहे.. लग्न झाल्यानंतर ते बोलणार होते तुमच्यासोबत पण आता तुम्हीच विषय काढला..." मनिष

" असं आहे तर.. पण आपलं बोलण सध्या त्यांना सांगु नका.. आपण त्यांना सरप्राइज देऊ या.. " राजमाता हसत बोलतात...

" ठीक आहे.. जस तुम्ही म्हणाल..." मनिष त्यांना दुजोरा देतात..

त्यानंतर लग्नाचे विधी सुरु झाले म्हणून दोघे तिकडे गेले...

💠💠💠 💠💠


वर्तमानकाळ :-

" क्या बात आहे आजी साहेब तुम्ही पण सरप्राइज देऊ शकतात तर..." धरा हसत बोलली

" का नाही देऊ शकत.. आम्ही आमच्या मुलांच्या आनंदासाठी काहीही करू शकतो..." राजमाता वंश कडे बघून बोलतात..

" थँक्स आजी साहेब.. आम्हांला खूप आवडलं तुमच सरप्राइज.." वंश त्यांना स्माइल करत बोलतो

" आमचा ब्रेकफास्ट झालाय आम्ही निघतो.. ऑफिस मध्ये कामं पेंडिंग आहेत.. " वंश उभा राहत बोलतो

" भाई आम्हांला बोलायच होत थोडं.." धरा

" बोला पटकन... " वंश पुन्हा खाली बसतो..

" आमच फॅशन डिझाइन पूर्ण झालं आहे तर आम्ही रिद्धी वहिनींची कंपनी जॉईन करू का..." धरा

" मला काही प्रॉब्लेम नाही.. रिद्धीं सोबत बोलून घ्या..." वंश जायला निघतो..

" थँक्स भाई..🙂🙂" धरा त्याला मिठी मारत बोलते

" येतो मी.. " धरा राजमातांना नमस्कार करतो

" संध्याकाळी लवकर या.. " अर्पिता त्याला पुन्हा आठवण करून देतात... त्यांना आणि मनिषला नमस्कार करून वंश बाहेर पडतो...

मॅक्स बाहेर त्याची वाट पाहत असतो... वंश आल्यावर तो पटकन कारचा डोअर ओपन करतो... वंशची गाडी स्टार्ट झाल्यावर पुढील गार्डची गाडी निघते.. त्यामागे वंशची कर आणी त्यामागे दुसरी गार्डची कार होती..

× × × × × × × × × ×


निंबाळकर कुटुंबीय मंदिरात पोहचले.... सिया आणि अंकित बोलत चालत होते.. रिद्धी आणि अप्पूचे चालण्याबरोबर फोटोज काढणं सुरु होत... बाकी सगळे सोबत चालत होते... काही वेळात सगळे मंदिरात पोहचले.. सगळ्यांनी देवीच दर्शन घेतला.. गुरुजींनी सियाकडुन देवीची ओटी भरून घेतली... आणि नवीन जोडप्याला आशिर्वाद दिला....

दर्शन घेऊन यशवंतरावांनी सिया आणि अंकित कडून तेथील गोर गरिबांना कपडे आणि महप्रसाद दिला... सगळे दोघांना भरभरुन आशिर्वाद देत होते....

सगळे घरी जाण्यासाठी निघाले... पण जाताना रिद्धीच्या म्हणण्यावर सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन घरी निघाले.... गणपती बाप्पा म्हणजे रिद्धीचे बेस्ट फ्रेंड होते... दर मंगळवारी तिच्या दिवसाची सुरुवात हि सिद्धिविनायक मंदिरात जाऊन व्ह्यायची...



घरी आल्यावर सगळे फ्रेश झाले.... रिद्धीने फ्रेश होऊन मोबाईल हातात घेतला तर वंशचा मिस्ड कॉल आलेला दिसला... तिने लगेंच त्याला कॉल केला... दोन तीन रिंग नंतर त्याने कॉल रिसिव्ह केला...

" बोला राणी सरकार झालात का फ्री... " वंश लॅपटॉप वर बोट चालवत बोलतो

" हो ... जस्ट घरी पोहचलो... " रिद्धी

" हे काय तु पण स्वतःला रिस्पेक्ट द्यायला लागलीस.." वंश

" नाही.. पण सवय करावी लागेल बहुतेक आता... वंश मला जमेल ना..." रिद्धी काळजीत पडत.

" don't worry रिध्द...मी आहे ना.. आपण रात्री भेटल्यानंतर बोलू या विषयासंदर्भात... ok.. " वंश तिला समजावतो

" हम्म... तुम्ही कामात असाल ना.. ठेवते मी.. Bye" रिद्धी

" Bye... " वंश कॉल कट करून कामाला लागतो... थोड्या वेळात त्याची मिटिंग असल्यामुळे तो तिकडे निघतो...


रिद्धी खाली येते... तर मंजिरी आणि रोहिणी सिया कडून अन्नपूर्णा देवीची पूजा करून घेत असतात...

" सिया आता काहीतरी गोड बनव सगळ्यांसाठी.. रिद्धी तिला मदत कर..." रोहिणी

" हो मॉम..." सिया पटकन खीरची तयारी करते... रिद्धी तिला हव्या असलेल्या गोष्टी देत होती...

" सियु मला वंशच्या फॅमिली बद्दल सांग ना.." रिद्धी किचनमधल्या डायनिंग चेअरवर बसत बोलते..

" राज पुरोहित म्हणजे जयपुरचे राजघराणे... वंश भाईचे आजोबा आत्ताचे तिथले राजा होते त्यांच्या नंतर ते पद मनिष मामांकडे जाणार होते.. पण आजोबांच्या जाण्याअगोदर वंश भाई पदभार सांभाळण्यासाठी योग्य झाले होते.. म्हणून त्यांच्या उपस्थिती मध्ये वंश भाईचा राज्याभिषेक करून घेतला... आणि आता तो जयपुरचा राजा आहे... सर्व जयपुर मध्ये त्यांना खूप मान आहे... त्यांच्या राजपदाचा त्यांना अजिबात गर्व नाही... आणि आजही कोणाला काही अडचण असेल तर राजमाता मनापासुन त्यांना मदत करतात..

त्यांचा पॅलेस म्हणजे स्वर्ग आहे... त्या पॅलेस मध्ये तर हरवायला होत... कुठून कुठे जायच हे पटकन कळतच नाही.. मी वंश भाईच्या राज्याभिषेकाला गेले होते...

" राज्याभिषेक , पॅलेस.... यार सीयु हे तर खूपच अवघड वाटतंय मला... 😟" रिद्धी विचार करूनच आवंढा गिळते...

" don't worry रिधु... तिथे सगळे खूप छान आहेत... आणि वंश भाई आहे.. धरा आहे... मग कशाला काळजी करतेस तु..." सिया तिला धीर देते..

" पुढे.." रिद्धी सियाल पुढे बोलायला सांगते..

" वंश भाईला एक आत्या आहे... संजना आत्या... त्यांच लग्न मेवाडच्या राजघराणी झालय.. त्यांचे मिस्टर जयसिंग् शेखावत ते डॉक्टर आहेत.. आणि त्यांना दोन मुलं आहेत.. मोठा मुलगा सॅम भाई म्हणजे समर हार्ट सर्जन आहे... आणि लहान मुलगी तरा म्हणजे अंतरा धराच्या वयाची आहे ती लंडनला MBBS करतेय...

संजना आत्या स्वभावाला तशा शांत आहेत.. पण त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागते... वंश भाई मध्ये तर त्यांचा खूप जीव आहे... त्याच्यासाठी राजमाता जसं काही करू शकतात तसचं संजना आत्यांच आहे... " सिया तिला पूर्ण माहिती पुरवत असते..

" सीयु त्यांच्या इथे सगळे कसं बोलतात.." रिद्धी उत्सुकतेनं विचारते..

" आता तुझ्यासमोर जसे सगळे स्वतःबरोबर समोरच्याला पण मान देतात... समजा तुला आता हा शिरा हवा आहे तर तु असं बोलायच कि आम्हांला शिरा हवा आहे... " सिया तिला उदाहरण देते...

" चला रिद्धी मॅडम आत्ता पर्यंत बऱ्याच जणांना गाण्याच्या तालावर नाचवल आता आपण नाचायला तयार राहा... " रिद्धी अँपल चा बाईट खात बोलते

" ए नाचायला काय ग.." सिया तिला खांद्यांवर चापट मारते

" तस नाचायला नाही ग.. म्हणजे तिथे राहण्याकरिता आत्तापासूनच तयारी करावी लागेल ना..." रिद्धी

" त्या साठी तुला लग्नाआधी तिथे जाऊन राहायचं आहे..." सिया तिला स्माइल् देत बोलते..

" काय..😲😲" रिद्धी जागीच उडाली..

" हो.. कारण तुला तिथल्या राहणीमानाबद्दल कळेल.. तिथे कसं राहतात.. कसे बोलतात... तिथल्या लोकांसोबत कसं बोलायच ... हे सर्व तुला मी कितीही सांगितल तरी तिथे गेल्याशिवाय तुला समजणार नाही..." सिया शिरा बाउल मध्ये काढते..

" चला राणी सरकार... " सिया बाउल घेऊन निघते... रिद्धी तिच्या मागे विचार करत निघते...

मंजिरी सियाला देवाला नैवेद्याची एक वाटी द्यायला सांगतात आणि दुसरी गॅसजवळ ठेवायला सांगतात... नैवेद्य देऊन सगळे जेवणाला सुरुवात करतात... सगळ्यांनी सियाचे भरभरुन कौतुक केलं... जेवणानंतर मंजिरी- यशवंतने सियाला सोन्याचे कडे गिफ्ट केले... रोहिणी -समीरने तिला नेकलेस दिला... रुचिका- विराजने डायमंडच्या बांगड्या दिल्या...

मग मात्र सर्वजण रूम्स मध्ये आराम करायला निघून गेले... सिया अजून रिद्धीच्या रूम मध्ये होती... रिद्धिने रूम मध्ये येऊन लॅपटॉप हातात घेतला... लग्नाच्या धावपळीत कामाकडे लक्ष दिलं नव्हत म्हणून ती फॉलो अप घेत होती... इंटरनेशनल मध्ये एन्ट्री झाल्यामुळें कामाचा लोड वाढणार होता... त्यासाठी तिने आणि विराजने दिवसरात्र करून खूप मेहनत घेतली होती.... त्याबरोबर अकॅडेमीकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं.. विकी असल्यामुळे तिला जास्त काळजी नव्हती... थोड्या वेळ कामं करून तिने देखील एक झोप काढली...


× × × × × × × × × ×



संध्याकाळी वृंदावन मध्ये सगळे चहा पीत बसले होते तेव्हा आदीश आणि संजिता आले...

" कसे आहात सगळे गेला कि नाही अजून लग्नाचा थकवा.." आदिश आत येत बोलला...

" अरे व्वा.. आज दोघे इकडे कसे वाट चुकलात.. आणि फक्त तुमची जोडी बाकी कुठे गेले....." मंजिरी

" अस नाही काकू... आता आमची दुसरी मैत्रीण पण तुम्ही इकडे आणली मग काय करणार..." संजिता जाऊन त्यांच्या शेजारी जाऊन बसली..

" आणि बाकिची गँग म्हणाल तर लग्नाच्या गडबडीत काम पेंडिंग आहे तर सगळे त्यात अडकले आहेत... " आदिश

" बर बसा तुम्ही मी तुमच्या चहा नाश्त्याच बघते.." मंजिरी

" काकू रिधु आणि सिया कुठे आहे..." संजिता

" सिया रुचिका सोबत बागेत आहे.. आणि रिधु झोपली आहे.. जा उठव तिला..." मंजिरी त्यांना बोलून किचन मध्ये जातात...

संजिता आणि आदीश रिद्धीच्या रूम मध्ये येतात... तर रिद्धी उशीला कवटाळून झोपली होती... संजिताने जाऊन बेडवर उडी मारली...

" ए रिध्या उठ चल खूप झोप झाली आपल्याला खूप कामं पडलं आहे अजून..." संजिता तिला हलवत उठवू लागली..

" ए सीयु झोपू दे यार.. तु मस्त झोप काढली आहे दुपारी.. माझी झोप नाही झाली.." रिद्धी कुस बदलून झोपते

" ए कुंभकर्ण मी संजू आहे... आणी काय ग तु कुठे गेली होतीस जिजुंना भेटायला.. 😉" संजिता तिला चिडवत बोलली

" त्यांना कशाला भेटायला जाऊ ते तर स्वतः रात्री मला भेटायला येणार आहेत..." रिद्धी झोपेत हसत बोलली..

" अरे व्वा... खूपच प्रगती आहे तर.. पण आपण तुझी प्लॅनिंग नंतर ऐकू आता आपल्याला सिया आणि भाईच्या फर्स्ट नाईट ची प्लॅनिंग करायची आहे.." आदिश त्यांच्या गप्पांना ब्रेक लावत बोलला...

" ए रिधु उठ ना..." संजिताने तिला पिलो मारली

" ए संजू काय कटकटी आहेस ग त्या आदिचा जीव खाणा मला का छळते आहे... " रिद्धी तिची उशी संजूकडे भिरकवते..

" ते तर ती रोज करते...😜 " आदिश पटकन बोलतो

" आदी..😡 " संजू त्याला रागीट लुक देते

" सॉरी सॉरी... थांब तिला मी उठवतो " आदिश बोलून बेडच्या दुसऱ्या बाजूला जातो

" रिधु तु जर आता उठली नाही तर हे जग मध्ये जेवढं पाणी आहे ना ते तुझ्यावर ओतेल मी..." आदिश तुला जवळपास धमकी देतो.. पण रिद्धी थोडी पण हलत नाही... त्याने आदिश खरच जग हातात घेतो..

" आदी नो ती चिडेल..." संजू त्याला वॉर्न करते

" चिडू दे.. कुंभकर्ण असा तरी उठेल.." आदिश तिला शांत करतो...

" रिधू बघ हा मी खरच टाकेल..." आदिश रिद्धिला शेवटच सांगतो.. पण ती काही हलेना

" Ok.. 3 2 1..." त्याने काउंन्टडाउन सुरु केलं तस संजू बाजूला झाली... आणि 💦💦💦 ज्याने रिद्धी धाडकन जागी झाली... आणि आदिश कडे खाऊ कि गिळू नजरेने बघू लागली... 😠😠😠😠

" तु आता मेला आदया... पळ इथून पटकन.." आदिश स्वतःला सल्ला देतो..

रिद्धी उठून त्याच्याकडे येते.. तसा तो एकएक पाऊल मागे टाकतो.. ' आलो काकू...' म्हणून पळतो... रिद्धी मागून त्याच्या नावाने ओरडते... संजू दोघांना हसत असते

" तु काय हसते आहेस...मी तुझ्या नवऱ्याला सोडत नसतेच " रिद्धी

" ते तुमच तुम्ही बघा... तु जा ना फ्रेश होऊन ये पटकन आम्हांला डेकोरेशन करुन घरी जायच आहे..." संजिता


रिद्धी पटकन फ्रेश होते... तो पर्यंत रमा त्यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते... खाण्याचा कार्यक्रम करून सगळे अंकितच्या रूम कडे जातात... रिद्धीने विराजला सांगितल असल्याने त्याने विराजला त्याच्यासोबत ठेवलं होत...

तिघांनी पटकन जाऊन सर्व पसारा बेडवर टाकला आणी रूम डेकोरेट करायला घेतली... किचनमध्ये महिला मंडळाने स्वयंपाकघराची तयारी करायला घेतली होती... सियाला नको म्हणत असताना तिने किचन मध्ये पाऊल टाकलं होत... रिद्धीने स्वत: गोड बनवणार सांगितल असल्याने बाकिच जेवणाची तयारी सुरु होती.. यशवंत , समीर, विराज आणि अंकित लॉन मध्ये बिझनेस वाइल्ड उप करून इकडे येण्याबद्दल बोलत होते...

सात वाजेपर्यंत सगळं डेकोरेशन झालं तस आदी आणि संजू जायला निघाले.. मंजिरी आणि यशवंतनी जेवणासाठी थांबायला सांगितल पण घरी आदिशचे आई - बाबा आल्याने दोघांनी निरोप घेतला...

" आई मी गोडाच बनवून घेते... " रिद्धी किचन कडे जाताना विराजल इशारा करून अंकितला रूममध्ये जाऊ न देण्याचा इशारा केला... त्याने पण 👍🏻 केलं...

× × × × × × × × × ×

सात वाजेपर्यंत वंश घरी आला... तो आल्याबरोबर सरिता त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी घेवून आल्या... कॉफी मग घेउन तो स्टेअरकडे वळला

" अरे आलात तुम्ही... फ्रेश होऊन घ्या.." अर्पिता खाली येत बोलतात

" Where have these three gone ..." वंश कॉफी सिप घेत बोलला..

" ते रेडी होत आहेत निंबाळकरांकडे जायच आहे ना... तुम्ही देखील जाऊन तयार व्हा... राजमाता वेळेच्या पक्क्या आहेत..." अर्पिता

" मॉम मी किती वेळा बोललो आहे.. आपण दोघजण असताना मला अरे तुरे कर.." वंश

" काय करणार ना.. सवय आहे... बर जा तुम्ही तयार होऊन या... " अर्पिता

वंश रूम मध्ये येऊन शॉवर घेतो.... त्याच्या वॉर्डरोब मधून टी-शर्ट आणि जॅकेट घेऊन पटकन रेडी झाला आणि खाली आला... हॉल मध्ये चौघे त्याची वाट बघत होते...

" व्वा भाई.. आज काही स्पेशल आहे का.. नाही तुम्ही इतके हँडसम दिसत आहात कि वहिनी तुम्हाला पाहत राहतील... " धरा त्याला चिडवते ज्याने त्याच्या चेहेऱ्यावर स्माईल येते...

" ते काय आहे ना धरा.. तुमच्या वहिनी आधीच लग्नाला तयार आहेत त्यामुळे आम्ही कसेही दिसलो तरी आता त्यांना ऑपशन नाही आहे..." वंश तिच्या शेजारी जाऊन बोलतो... ज्यावर सगळे हसतात...

" चला निघू या..." राजमातांच्या बोलण्यावर सगळे घराबाहेर पडतात...

राजमाता , मनिष - अर्पिता एका कारमध्ये बसतात... दुसऱ्या कारमध्ये वंश आणि धरा बसतात... दोन्ही कारच्या मागे पुढे गार्ड्स च्या गाड्या निघतात... वंश रिद्धीला मेसेज करतो...

× × × × × × × × × ×


रिद्धी स्वीट बनवून रूम मध्ये रेडी होत होती.. तेव्हा तिला वंशचा मेसेज आला...

📩 :- We're gone ... I want to see you for the first since I arrived...

मेसेज वाचून ती गालात हसते... आणि त्याला रिप्लाय देते...

" आधी या तरी मग जेव्हा दिसेल तेव्हा बघ... " रिद्धी रिप्लाय देऊन राहिलेली तयारी करून घेते... तोपर्यंत पुन्हा मोबाईल वाजतो...

" नाही दिसलीस तर तुला सहजासहजी सोडणार नाही... I'm vansh raj purohit... I can do anything anywhere..😉 " वंश

वंशचा मेसेज पाहून तिला काय रिप्लाय द्यावा कळेना..

" I'm waiting... 😉 " त्याला रिप्लाय देऊन रिद्धी खाली आली... हॉल मध्ये सगळे बसले होते... रिद्धी आली आणी यशवंत शेजारी जाऊन बसली...

" खूप सुंदर दिसते आहेस..." मंजिरी तिच्या गालावर हात ठेवत बोलतात...

" मुली खूप लवकर मोठ्या होतात नाही... आता रिद्धी देखील लग्न करून सासरी निघून जातील... आणि आम्हांला घर मोकळ होईल..." यशवंत तिच्या डोक्यावरुन हात फिरवतात... त्यांच्या बोलण्याने रिद्धी त्यांना मिठी मारते... सगळे थोडं इमोशनल झाले होते..

" काका ती काही एवढ्या लवकर जाणार नाही... माझी आणि दादाची फुल्ल वाट लावून जाणार ती..." अंकित वातावरण बदलवत बोलला...

" भाई... " रिद्धी बारीक फेस करुन बोलते..

" हे असं असत हिच असं चेहरा केला कि सगळे विरघळून जातात..." विराज

" चला सगळे आता सेंटी नका होऊन ते लोक येतच असतील.." समीर बोलायला आणी गाडी यायला एक वेळ...


यशवंत, समीर , विराज आणि अंकित बाहेर जाऊन त्यांच स्वागत करतात... आणि राजमातांना नमस्कार करतात... वंश यशवंत आणि समीरला नमस्कार करतो... विराज आणि अंकित हॅन्डशेक करतात... आणि सगळे आत येतात... वंश आत येताना रिद्धीला बघत येतो तर ती समोरच उभी होती.. सिम्पल लुक मध्ये देखील ती आकर्षक दिसत होती...



रिद्धीला केव्हा वंशला बघते झालं होत... तो समोर दिसताच ती त्याला बघतच राहिली... तिला बघून सिया आणि रुचिका गालात हसत होत्या...



" ताई अहो असं बघू नका.. त्यांच्यासोबत तुमचे सासू - सासरे देखील आहेत..." रुचिका तिला भानावर आणत बोलते... तिच्या बोलण्याने ती भानावर येते... समोर वंश तुला बघून हसत होता...

मंजिरी , रोहिणी राजमातांना नमस्कार करतात...त्यानंतर रिद्धी , सिया , रुचिका तिघांना नमस्कार करतात.... रमा पाणी घेऊन येते.... सगळे गप्पा मारत बसले होते... वंश तिरक्या नजरेने रिद्धीला बघत होता... समोर सर्व असल्याने रिद्धीला त्याच्याकडे बघण्याचे धाडस होत नव्हतं... सिया आणि रुची आत निघाल्या तस रिद्धी त्यांच्यामागे किचनमध्ये निघाली...

" हे काय तु का आत आलीस.." सिया चहा ट्रे मध्ये ठेवत बोलली...

" मग काय करू... तुमचे बंधूराज असे बघत आहे जस कि सभोवती दुसरे कोणी बसले नाही आहेत..." रिद्धी च्या बोलण्यावर दोघी हसतात...

" तु त्याला अजून नीट ओळखत नाही... वंश राज पुरोहित आहे कुठे काय करेल काही सांगता नाही येत..." सिया हसत बोलली...

" हेच मला पण हेच बोलले..." रिद्धी

" बर चला बाहेर जाऊ.. ताई चहा तुम्हीच द्या कदचित तुमच्या हातचा चहा त्यांना अजून गोड लागेल..." रुची तिला चिडवते...

" वहिनी..🙈🙈" रिद्धी लाजत ट्रे घेऊन बाहेर निघाली... सगळ्याना चहा देऊन तिने वंश समोर चहा धरला...पण नजर खालीच होती... चहा घेत असताना त्याने मुद्दाम तिच्या बोटांना स्पर्श केला.. तीने त्याच्याकडे पाहिलं तसा त्याने हलकेच डोळा मारला😉... रिद्धी पटकन जाऊन सिया आणि रुची जवळ जाऊन थांबली... वंश तिला बघून गालात हसत होता...

सगळ्यांच्या गप्पा सुरु असताना राजमातांनी विषय काढला...

" यशवंतराव आमच्या कडे पद्धत आहे कि लग्नाआधी पंधरा दिवस घराण्याच्या होणाऱ्या सूनबाई या आमच्या इथे येऊन राहतात... म्हणजे त्यांना आमच्या इथली वागण्याची - बोलण्याची - राहण्याची पद्धत कळते... घराण्यातील रीती - रिवाज कळतात.... अर्पिता देखील लग्नाआधी येऊन राहिल्या होत्या... " राजमातांच्या बोलण्याने कोणाला काय बोलाव कळेना..

रिद्धीला सियाने सांगितल होत तरी तिला आता भीती वाटली होती... तिच्या चेहेऱ्यावर असलेली भीती वंशने पहिली होती...

" नाही म्हणजे राजमाता त्या एकट्या कशा राहतील..." मंजिरी काळजीने बोलल्या...

" मंजिरी लग्नानंतर त्यांना एकटच रहायचे आहे... तर तेव्हापासुन सवय होईल.. आणि एकट्या कुठे असतील त्या त्यांच्यासोबत धरा असतील..." शेवटी राजमाता रिद्धी कडे बघून हसत बोलतात... त्यावर ती हलकेच स्मित करते...

" ठीक आहे राजमाता जसं तुम्ही बोललात रिद्धी येईल... कधी यायच आहे तसं सांगा..." यशवंत आदरपूर्वक बोलले...

" आता लगेंच पाठवायला हवं असं काही नाही... आता त्यांच्यावर कामाला ताण आहे तर सध्या राहू द्या... नंतर वंश येणार आहे पुढच्या महिन्यात तेव्हा येऊ द्या..." राजमाता

" ठीक आहे राजमाता .... " यशवंत

" चला ताट घेतलं आहे...." रोहिणी सर्वांना जेवणासाठी बोलवतात ...

महिला मंडळ सोडून सगळे जेवायला बसतात.... अगदी साग्रसंगीत जेवणाचा बेत बनवलेला होता..... राजमातांनी जेवणाची चांगलीच तारीफ केली होती... रिद्धीने शेवटी सगळ्यांना स्वीट सर्व्ह केलं... जेवण करून सगळे हॉल मध्ये येऊन बसले... नंतर लेडीजने जेवण करून घेतलं... वंश , अंकित आणि विराज टेरेस लॉन मध्ये बसले होते...

" विराज मला थोडं बोलायच होत तुमच्यासोबत..." वंश

" हो बोला ना..." विराज

" धराने जस्ट तिचे फॅशन डिझाइन कंप्लिट केले आहे... आणि रिद्धी सोबत कामं कराव अशी तिची इच्छा आहे... मला या बाबतीत काही ऑब्जेक्शन नाही आहे... " वंश

" तिला कंपनी जॉईन करायची आहे तर माझी काही हरकत नाही मी रिधूला कल्पना देतो तशी..." विराज

" OK... आणि मला असं नाही म्हणायच कि रिद्धीच आता लग्न ठरलं तर तुमच नातं बदलेल.. पण राजमाता समोर असताना तिला रिद्धी बोला कारण त्यांना ते आवडणार नाही.. बाकी वेळेस तुम्ही तिला ज्या नावाने बोलतात तस बोलू शकतात..." वंश

" आम्ही नोटीस केलं ते... डोन्ट वरी मी सगळ्यांना सांगतो.." विराज


जेवण करून रिद्धी तिच्या रूम मध्ये गेली तेव्हा अंकितने पाहिलं... राजमाता बोलल्यापासुन तिला आलेलं टेन्शन त्याने पाहिलं होत... त्याने विराजला मेसेज केला... मेसेज बघून विराज वंश कडे वळाला...

" वंश तुम्हांला रिद्धीला भेटायच असेल तर ती तिच्या रूम मध्ये गेली आहे... तुम्ही भेटू शकतात... आम्ही आहोत इथे..." विराजच्या बोलण्याने वंशला आनंद झाला...

" थँक्स... " वंश बोलून रिद्धीच्या रूम मध्ये निघून जातो...


रिद्धी मिरर समोर उभी होती... तिला आता सर्व गोष्टींविषयी टेन्शन आलं होत... वंश आला तरी तीच लक्ष नव्हतं... वंशने दबक्या पावलांनी आत येऊन डोअर लॉक केला आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिला... तिच्या मनात सुरु असलेले विचार तिच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते... वंश हात पॉकेट मध्ये टाकून तिला मिररमधून न्याहाळत होता... तिची सहज नजर समोर गेली तर त्याला बघून ती शॉक झाली... आणि मागे वळली त्यांच्या फक्त काहीस अंतर बाकी होत...

" तुम्ही.. तुम्ही केव्हा आलात.. आणि तुम्ही इथे काय करताय... तुम्ही जा इथून कोणी पाहिलं तर..." रिद्धी नॉनस्टॉप बोलत होती... त्यामुळे वंशला काही बोलता येईना...

वंशने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढल... तिचे हात त्याच्या छातीवर जातात... त्याच्या स्पर्शाने पुढचे शब्द तोंडातच राहिले... तिच्या हृदयाची धडधड वाढली होती... वंश तिच्या डोळ्यांत हरवला होता... रिद्धी त्याच्यापासुन नजर चोरते...

" अहो काय करताय... सोडा ना .. कोणी येईल.." रिद्धी त्याच्या हाताच्या विळख्यातून सुटण्याचा प्रयत्न करत बोलते.. पण त्याची पकड घट्ट असल्याने तिला सुटता येत नव्हतं..

" कोणी नाही येणार.. मला विराजने पाठवल आहे..." वंश तिला अजून जवळ ओढून बोलतो आणि मिठी सैल करतो... रिद्धी स्वतःला सावरत बाजूला होते... वंश गालातल्या गालात हसत होता... रिद्धी तिथून विंडो जवळ निघून जाते...

बाहेर गार वारा सुटला होता... वंश येऊन तिच्या शेजारी उभा राहिला...

" कोणता विचार करत होतीस..." वंश तिच्याकडे बघून विचारतो.. ती नकारार्थी मान हलवून कोणता नाही सांगते...

" आजी साहेब जयपूर यायच बोलल्या त्याबद्दल विचार करते आहेस ना..." वंश विंडोच्या स्टूलवर बसून तिच्याकडे बघत बोलतो...

" वंश मी एकटी कसं राहणार तिथे... मला भीती वाटते आहे..." रिद्धी त्याच्याकडे बघत बोलते... वंश तिला हाताला पकडून जवळ घेउन हात हातात घेतो...


" तु एकटी नसणार आहेस.. तुझ्याबरोबर मी देखील तिथेच राहणार आहे.. आपण सोबत जाणार आहोत आणि सोबत येणार आहोत.🙂..." वंश

" आणि बाकीच म्हणशील तर त्याच तुला टेन्शन घेण्याची गरज नाही... तुझ्यासोबत मॉम असेल ती तुला सर्व समजावेल... आणि लग्नानंतर आपण इथे राहणार आहोत.. कधी तरी तिकडे राहणार आहोत... हम्म.. आता सर्व टेन्शन सोडा राणी सरकार....." वंश तिला समजावत बोलला... त्याच्या बोलण्याने तीच थोडफार टेन्शन कमी झालं होत..

" थॅंक्स वंश..... " रिद्धी त्याला स्माइल देत बोलली..

" इतकं सिम्पल थँक्स मला नको आहे..." वंश तिला कमरेत धरून जवळ ओढतो... त्याच्या जवळ येण्याने तिच्या पोटात गोळा आला होता.. तिचे हात गार पडले होते...

रिद्धी त्याला मागे स्लाइडवर ढकलून ती डोअरकडे जात असते कि वंश तिचा हात पकडतो... त्याच्या गरम हाताच्या स्पर्शाने तिचे थंड हात लाल होऊ लागले होते...

वंश तिला जोरात मागे ओढतो.. त्याच्या ओढण्याने तिचे हात त्याच्या खांद्यावर जातात.... तिचे वाढलेले श्वास वंशला जाणवत होते... त्याच्या नजरेला नजर देण्याची रिद्धीला हिम्मत होत नव्हती... वंशला तिची मजा घेण्याचे सुचत होत...

" रिध्द मी अजून फक्त मिठीत घेतलं आहे तर एवढी गार पडली.. मी तर बाकी अजून काही केलच नाही आहे..." वंश तिच्या कानाजवळ जाऊन बोलते... त्याचे गरम श्वास तिला जाणवत होते...

रिद्धी पटकन वंश कडे बघते.. तो तिला डोळा मारतो 😉 ... लाजेने रिद्धीची मान खाली जाते... रूम मध्ये दोघांचे श्वास आणि धडधड जाणवत होती...

वंशने तिच्या हनुवटीला धरुन तिचा चेहरावर केला... तिचे बंद केले डोळे तिचे ते निरागस रूप पाहून त्याला भावना अनावर होत होत्या... त्याने तिच्या मानेत हात घातला... त्याचे गरम श्वास तिच्या चेहेऱ्यावर जाणवत होते... तिच्या हृदयाची धडधड बुलेट ट्रेन प्रमाणे सुरु होती... तिचे डोळे घट्ट बंद झाले होते...अंग थरथर कापत होते... तिचे थरथरणारे गुलाबी ओठ बघून त्याला त्या ओठांचा रसपान करायचा मोह होत होता... वंशला तिची अवस्था कळत होती... स्वतःवर कंट्रोल ठेवत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि बाहेर जाऊ लागतो...

रिद्धी डोळे उघडून बघते तर तो बाहेर जात असतो... रिद्धी तसाच त्याचा हात पकडते... तिच्या हात पकडल्याने वंश तिथेच थांबतो... रिद्धी मागे वळून त्याला भिंतीला टेकवते आणि त्याचा टी-शर्टचा गळा पकडते... तिच्या वागण्याचा वंशला अर्थ लागतं नव्हता...

" तुम्ही समजता काय स्वतःला वाटल कि जवळ येतात.. आणि वाटलं कि दूर होतात.. मला काय हवं ते पण कळत नाही तुम्हांला..." रिद्धी बारीक फेस करत बोलते... तिच्या बोलण्यावर वंश गालात हसतो... आणि तिचे टी-शर्ट वरचे हात काढून तिला गोल फिरवून भिंतीला टेकवतो...

" तु मला बोलली नाहीस तर मला कसं ना कळणार..." वंश मोहक आवाजात बोलतो... त्यावर रिद्धीला काय बोलावे सुचेना तिने लाजून त्याला मिठी मारली... वंश मात्र तिच्या लाजण्याने पाणी पाणी होत होता...

वंश तिला बाजूला करून तिच्या मानेत हात घालून तिच्या डोळ्यांत बघतो... त्याच्या डोळ्यातील अनामिष भाव तिला कळत होते... तिने डोळे बंद करून घेतले... तिची मूक संमती त्याला कळाली होती.. त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर जाणवत होते... त्याचे गरम श्वास जाणवताच तिच्या हातांची जॅकेटवरील पकड घट्ट झाली...


वंशने क्षणांचाही विलंब न करता तिच्या ओठांचा ताबा घेतला...💋💋💋 तिचे जॅकेट वरील हात त्याच्या मानेभोवती गुंफले होते... तीही त्याला साथ देऊ लागली होती... हृदयाची स्पंदने दोघे जवळून अनुभवत होते... वंश तिला डीप किस करत होता... त्याची बोटे तिच्या मानेवर , गळ्यावर आणि पाठीवर फिरत होते... रिद्धीला देखील त्याचा स्पर्श हवासा वाटत होता.. तिचे हात त्याच्या मानेवरुन , केसांत फिरत होते.. तीही त्याला प्रतिसाद देत होती...बराच वेळ दोघे एकमेकांमध्ये गुंतले होते...💋💋💋 रिद्धीला श्वास घ्यायला त्रास व्ह्यायला लागला तशी ती बाजूला झाली.... आणि जोरात श्वास घेऊ लागली...


वंश तिच्याकडे एकटक बघत होता... रिद्धीने लाजून त्याच्या मिठीत चेहरा लपवला.... वंशने तिच्या भोंवती हात गुंफ़ून तिला घट्ट मिठी मारली.....

" I Love You Vansh... " रिद्धी मान वर करून त्याच्याकडे बघत बोलते...

" I Love You too Princess..." वंश तिच्या कपाळावर ओठ टेकवतो.... वंश रिद्धिला मिठीत सामावुन घेतो...


" रिधु खाली सगळे वाट बघत आहेत..." सिया डोअर नॉक करते...

" हो आले..." रिद्धी वंश पासून बाजूला होत बोलते... पण तो तिला जवळ ओढतो...

" ठीक आहे मी लॉन मध्ये आहे... तिकडे ये... " सिया

" हो..." रिद्धी बोलल्यानंतर सिया निघून जाते..

" वंश सोडा ना खाली जाऊ या..." रिद्धी त्याची मिठी सोडवण्याचा प्रयत्न करते..

" 2 मिनिट... नंतर कधी भेटणार अशी..." वंश तिच्या डोळ्यांत बघत बोलतो...

" तुम्ही म्हणाल तेव्हा..." रिद्धी त्याच्या नजरेला नजर देत बोलते...

" बघ हा... नंतर नाही बोलायच नाही..." वंश तिला अजून जवळ ओढत बोलतो...

" ते तेव्हा बघू..." रिद्धी त्याचा हात काढायचा प्रयत्न करत बोलते..

" नाही सुटणार तु एवढ्या सहज माझ्या पासुन...." वंश तिला चिडवत बोलतो...

" सुटायच तर मला पण नाही आहे... पण सध्या पर्याय नाही..." रिद्धी

" तु उद्या घरी येणार आहेस... " वंश तिला ऑर्डर देत बोलतो...

" ते तर यायचच आहे... उद्या सगळे रिटर्न जात आहेत तर..." रिद्धी

" हो पण मी ऑफिस नंतरच बोलतो आहे..." वंश तिला डोळा मारत बोलतो

" बर... पण त्यासाठी आधी आपल्याला खाली जावं लागेल ना..." रिद्धी त्याच्या गळ्यात हात गुंफत बोलते

" चला..." वंश तिला सोडतो... आणि डोअर कडे निघतो

" रिद्ध ती लिपस्टिक तर नीट कर..." वंशच बोलणं ऐकून रिद्धी मिरर समोर जाते...

" नीट आहे चला..." रिद्धी त्याच्याकडे येत बोलते...

" wait... " वंश अंगठा तिच्या ओठांजवळ आणून तिच्या ओठांवर ओठ टेकवुन बाहेर निघून जातो... सगळं एवढं अचानक घडत कि रिद्धीला काही समजतच नाही...
भानावर येत कि गालात हसते... आणि खाली जायला निघते...

लॉन वर सगळे तिची वाट पाहत होते... वंश तिला पाहून गालात हसत होता...

" चला खाली सगळे वाट बघत असतील.. " विराज

" दादा एक मिनिट भाई आणि वहिनी एवढे छान दिसत आहेत... फोटो तो बनता है..." धराच्या बोलण्यावर दोघांचे फोटो काढले जातात.... आणि सगळे खाली जातात...

पुरोहित कुटुंबीय निघत होते.... अर्पिता रिद्धी जवळ आल्या....

" आपल्या घराण्याची रीत आहे.. जेव्हा सून पसंत करतात तेव्हा तिला खानदानी कडे दिले जातात... पण इथे आल्यानंतर सगळं अचानक ठरलं... म्हणून हे तुम्हांला आमच्या कडून उघडून बघा आवडेल तुम्हांला..." अर्पिता रिद्धीच्या हातात बॉक्स देतात...




" काकू हा नेकलेस..." रिद्धी पुढे बोलण्या अगोदर अर्पितामध्ये बोलतात..

" आधी तर आता काकू म्हणणं बंद करा... वंश आणि धरा प्रमाणे तुम्ही आम्हांला मॉम नाही तर आई साहेब म्हणा... आणि हा नेकलेस शगुन आहे त्याला परत नाही देता येत..." अर्पिता तिला समजावत बोलतात...

" ठीक आहे मॉम..." रिद्धी आधी जाऊन राजमातांना नमस्कार करुन नंतर मनिष - अर्पितांना नमस्कार करते...

" वहिनी साहेब थांबा तुमचा फोटो काढू द्या प्रत्येकासोबत... " धरा तिला तिघांसोबत फोटो काढायला सांगते... त्यांचे फोटो काढून झाल्यावर ती अप्पुला तिचा रिद्धी सोबत फोटो काढायला सांगते...

" येतो आता यशवंतजी.... तुम्ही सहकुटुंब जयपुर नक्की या..." मनिष हात जोडत बोलतात...

" हो नक्की येऊ..." यशवंत हात जोडत बोलले.... सगळ्यांनी राजमातांना नमस्कार केला... वंशने सगळ्यांना नमस्कार केला... मग मात्र पुरोहितांनी निरोप घेतला...



रिद्धी पटकन सियाला घेऊन तिच्या रूममध्ये आली... रुची आणि रिद्धीने मिळून तिला छान तयार केलं... तोपर्यंत विराजने अंकितला अडकवुन ठेवलं... सियाला तयार करून रिद्धी तिला अंकितच्या रूम मध्ये घेऊन आली... रूम बघून सियाच्या पोटात गोळा आला होता... तिच्या हृदयाची धडधड वाढली होती...

" All the best siyu... " रिद्धी तिला चिडवुन निघून जाते... आणि विराजला अंकितला रूम मध्ये पाठवायला सांगते.. विराज अंकितला पाठवून देतो....

अंकित रूमचा डोअर ओपन करतो... रूममध्ये फुलांचा सुगंध दरवळत होता... सर्व लाईट ऑफ करून सेंटेड कण्डेलस लावल्या होत्या... बेडच्या सभोवती सर्व प्रकारच्या फुलांच्या माळा सोडल्या होत्या... बेडच्या मधोमध गुलाबांच्या पाकळ्यांनी हार्ट शेप काढला होता... सर्व बघून त्याला आता सियाला बघण्याची घाई झाली होती... त्याची नजर तिला संपूर्ण बेडरूम भर फिरली... तेव्हा त्याला गॅलरीचा डोअर ओपन दिसला... आणि त्याची पावले गॅलरी कडे वळाले... सिया त्याला पाठमोरी थांबून बाहेर बघत होती... तिला पाहून तर दोन मिनिट तो ब्लँक झाला....




तो केव्हा तिच्या जवळ गेला हे त्याला देखील कळालं नाही.... त्याने तिला मिठीत घेतलं... त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला...

" किती वाट पाहिली आहे मी या दिवसाची या क्षणांसाठी... मला अजूनही विश्वास बसत नाही आहे कि आपल लग्न झालंय आणि आता तु माझी झाली आहेस..." अंकित

" मी देखील वाट पाहिली आहे... मला देखील विश्वास बसत नाही आहे... जर रिधुने मला समजावल नसतं तर मी तुला कायमची गमावुन बसले असते..." सिया त्याच्याकडे वळते

" जाऊ दे ना तो विषय आता.. आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली आहे... या प्रवासात मला तु कायम सोबत हवी आहेस...

" मी कायम तुझ्या सोबत असणार आहे अंकित.... I love you... " सिया त्याला मिठी मारते

" I love you too jaan... " अंकित तिच्या भोंवती विळखा मारतो...

" जान रूम कोणी डेकोरेट केली..." अंकित

" दुसरं कोण असणार... संध्याकाळी आले नव्हते का दोन माकड..." सिया हसत बोलते...

" सीयु तु नक्की तयार आहेस ना... नाही म्हणजे..." अंकित पुढे बोलत असतो तर सिया त्याच्या ओठांवर बोट ठेवते...

" मी तयार आहे अंकित.. मला सर्वार्थाने तुझं बनावयच आहे... अजून दूर नाही रहायच मला तुझ्यापासून... " सिया त्याच्या डोळ्यांत बघत बोलते... अंकित तिच्या कपाळावर ओठ टेकवून हातात उचलून घेतो.... सियाचे हात त्याच्या गळयात गुंफले होते...

अंकित तिला आणून बेडवर बसवतो आणि तिच्या डोळ्यांत बघतो... लाजेने तिची नजर खाली जाते.... अंकित बोटांनी तिची हनुवटीवर करून तिच्या कपाळावर किस करून डोळ्यांवर किस करतो.... अंगावर शहारा येऊन तिचे डोळे बंद होतात... त्याची नजर तिच्या चेहऱ्याकडे जाते तर तिचे ओठ थरथरत होते... त्याचे हात तिच्या गालावर जातात आणि अंगठा तिच्या ओठांवर रब करतो... त्याच्या स्पर्शाने सियाला वेड लागतं होता.... तिला देखील आता त्याच्या स्पर्श हवासा वाटत होता... काही क्षणात अंकित तिच्या ओठांचा ताबा घेतो... ती देखील त्याला प्रतिसाद देत होती...

अंकितने तसच तिला बेडवर झोपवलं... आणि तिच्या अंगावर गेला.... त्याचे ओठ तिच्या कॉलर बोन , मानेवरुन फिरू लागले होते.... त्याच्या स्पर्शा बरोबर तिची त्याच्यावरची पकड घट्ट होत होती.... तिच्या मानेवर ओठ टेकवत त्याने तिचा पदर बाजूला करून तिच्या पोटावर ओठ टेकवले... त्याच्या स्पर्शाने तिच्या तोंडून अस्पष्ट अंकित बाहेर पडले... तिच्यावर नजर टाकून त्याने सुस्कारा सोडला... हळूहळू त्याचे ओठ तिच्या सर्वांगावर फिरू लागले.... दोघांमधे असलेले कपड्यांचे अडसर दूर झाले... तो देखील तिला एखाद्या फुलाप्रमाणे हळुवार पणे फुलवत होता... सुरुवातीला होणाऱ्या वेदना तिला नंतर हव्याशा वाटत होत्या... त्याच्या प्रेमात आज ती न्हावून निघाली होती... आज खऱ्या अर्थाने त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात झाली होती.... मध्यरात्री केव्हा तरी दोघे एकमेकांपासुन विलग झाले आणि मिठीत झोपी गेले....


क्रमशः


I know पार्ट पोस्ट करायला खूप लेट केलं आहे... त्यासाठी really so sorry.. .पण आधी एक्साम आणि नंतर आजारी पडले....म्हणून लेट झालं... आणी म्हणूनच हा पार्ट मोठा लिहिला आहे.... पुढचा पार्ट लवकर पोस्ट करेल...... तोपर्यंत हा पार्ट वाचा आणि कळवा कसा वाटला....


इथपर्यंत वाचले आहे तर आता पुढे वाचन सुरु ठेवा कारण आता कहाणी खऱ्या अर्थाने सुरु झाली आहे.. I hope तुम्हाला नक्की आवडेल...

तुम्हांला हा भाग कसा वाटला.. नक्की कमेंट्स करून कळवा ... कमेंटस खूप कमी करतात तुम्ही... 😔😔

प्लीज लाईक , कंमेंट , शेअर , रेटिंग , स्टिकर्स आणि फॉलो करा..
लिहिताना व्यकरणात काही चुक झाली असेल, शब्द चुकीचा लिहिला गेला असेल तर नक्की कळवा ... पुढील भाग लवकरच प्रकाशित होईल... Stay Tuned. 🙂🙂