बावरा मन - 9 - South Seap Pearl Necklace Vaishu Mahajan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

बावरा मन - 9 - South Seap Pearl Necklace

सकाळी सियाला जाग आली तेव्हा ती अंकितच्या मिठीत होती... त्याच्या चेहेऱ्यावर आनंद दिसत होता... कालची रात्र आठवून तिच्या गालावर लाजेची लाली चढली... ती उठायला बघते तर अंकितच्या हातांचा तिच्या कमरेभोवती विळखा होता.. हळुच त्याचा हात बाजूला करून ती पटकन रेडी होऊन येते....

छान अशी सिम्पल साडी नेसून ती आरशासमोर उभी राहते आणि तयारी करायला घेते... तिच्या कमरेला हातांचा विळखा बसतो तेव्हा ती मिरर मध्ये बघते... अंकित तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून तिला बघत होता..

" Good Morning बायको..." अंकित तिचे मानेवरचे केस पुढे करून ओठ टेकवतो.. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा येतो... पण ती पटकन भानावर येते...

" अंकित सोड मला.... खाली जायला उशीर झालाय... " सिया त्याच्या मिठीतुन सुटत बोलते..

" तुला कोणी काही बोलणार नाही... " अंकित

" अंकित...ती पूढे बोलण्याआधी अंकित तिच्या ओठांचा ताबा घेतो... काही वेळात ती पण त्याला प्रतिसाद देऊ लागते... मन भरल्या नंतर अंकित बाजूला झाला...

" मला रोज सकाळी मॉर्निंग किस हवी आहे... " अंकित तिच्या कानाजवळ जाऊन बोलतो... आणि टॉवेल घेऊन बाथरूम मध्ये निघून जातो... सिया तीच आवरून खाली येते...


मंजिरी हॉल मध्ये धूप देत होत्या... यशवंत आणि समीर डायनिंगवर पेपर वाचत होते... सिया सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलून किचन मध्ये येते... रोहिणी नाश्ता बाउल् मध्ये काढत होत्या...

" सॉरी मॉम .. मला उशीर झाला.." सिया

" असू दे ग... आधीच लग्नाची गडबड नंतर पूजा त्यामुळे दमली असशील..." रोहिणी

प्लेट आणि ब्रेकफास्ट घेऊन दोघी बाहेर् आल्या... आणि सर्वांना नाश्ता सर्व्ह केला...

" हे काय माऊ कुठे आहे..." यशवंतला रिद्धी दिसत नाही म्हणून ते विचारतात..

" ती आणि विराज आत्ताच जीम मधून निघाले आहेत.... फ्रेश होऊन येता येत ...." मंजिरी

" दोघे जण न चुकता जीम करतात..." यशवंत

" ते आहे आणि आता मध्ये गॅप पडला आहे तर जास्तच सुरु आहे..." मंजिरी

" गुड मॉर्निंग एव्हरीवन..." रिद्धी स्तेअरवरुन उतरताना बोलते... देवाला हात जोडून टेबलवर येऊन बसते...

" वहिनी पटकन नाश्ता दे... आज अजिबात वेळ नाही..." रिद्धी घाईत बोलते...

" ओय राजधानी एक्सप्रेस... कशाची घाई आहे एवढी..." अंकित आणि विराज येवुन बसतात..

" कशाची म्हणजे तुम्ही दोघे निघाले इस्तांबूल... तुला काय टेन्शन... मला इथून जायच आहे वंशच्या घरी.. मग अकॅडेमी तिथून ऑफिस दुपारी सियासोबत मॉल ..." रिद्धी तीच संपूर्ण शेड्युल सांगुन मोकळी होते...

" भाई मिस्टर मेहतासोबत तु मिटिंग करून घे... मी जेनीला सांगितल आहे.... " रिद्धी ब्रेकफास्ट करत बोलते..

" OK... धराला आपलं ऑफिस जॉईन करायच आहे..." विराज

" तिची इच्छा आहे तर देत.. तु काय सांगितल आहेस.. आणि आता आपल्याला स्टाफ इन्क्रिज करावा लागणार आहे..."

" मी हो बोललो आहे वंशला.." विराज

" अरे काय चालू आहे तुमच... नाश्ता करताना तरी तर काम बाजूला ठेवा... आता गप्प नाश्ता करा..." मंजिरी दोघांना दटावतात...

" रिद्धी आम्ही तिकडेच जातो आहोत तर सोबतच जाऊ..." यशवंत

" ठीक आहे बाबा.... " रिद्धी बाकिचा नाश्ता संपवत बोलते...

" सीयु निघालीस कि मला कॉल कर मी डायरेक्ट मॉलला येते..." रिद्धी निघताना बोलते..आणि मग यशवंत , मंजिरी आणि रिद्धी वंश कडे निघतात....

💠 💠 💠 💠 💠 💠

वंशच्या डेली शेड्युल्ड प्रमाणे सकाळी जीम मध्ये जाऊन आला .... शॉवर घेऊन ऑफिस साठी रेडी होऊन खाली आला... खाली सगळे आले होते...

" Good Morning Everyone... " वंश राजमातांना आणी मनिष - अर्पितांना नमस्कार करून चेअर वर बसतो... टेबलवर सगळे शांत होते... ब्रेकफास्ट करून सगळे हॉल मध्ये बसले...

" वंश स्वतःची काळजी घ्या.... आणि पुढच्या महिन्यात रिद्धी सोबत या..." अर्पिता

" हो मॉम... आणि तुम्ही सुद्धा सगळे काळजी घ्या... आजी साहेब गोळ्या वेळेवर घ्या... dad ऑफिस हॅन्डल करायला बाकी स्टाफ आहे.. तुम्ही काळजी करायची गरज नाही..." वंश प्रत्येकाला इन्स्ट्रक्शन देत होता..

" धरा तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या... आणि मन लावून कामं करा.... " मनिष धराला एका बाजूने मिठी मारतात...


त्यांच्या गप्पा सुरु असताना निंबाळकर कुटुंबीय येतात...


रिद्धिने येऊन सगळ्यांना नमस्कार केला... आणि धराजवळ येऊन थांबली...

" राजमाता पुढच्या वेळेस ताई साहेब आणि कुटुंबीयांना घेऊन या..." यशवंत

" हो... आत्ता तुम्ही यायच आहे तिलक रसम साठी.... म्हणजे लग्न पक्क होऊन जाईल..." राजमाता

" हो तुम्ही म्हणाल तेव्हा येऊन जाऊ आम्ही..." यशवंत

" अर्पिता ताई तुम्ही रिद्धीची पत्रिका मागितली होती..." मंजिरी त्यांना पत्रिका देतात..

" पत्रिका का..? " धरा

" लग्न ठरलं आहे तरी मनाच्या शांतीसाठी एकदा पंडितजींना दाखवायची आहे... म्हणजे ते पुढचे मुहूर्त काढतील... " अर्पिता

" ओह्ह... पण मला आता असं झालंय कि कधी वहिनी घरी येतील..." धरा आनंदित होत बोलते

" रिद्धी सांभाळून घ्या त्यांना... अल्लड आहेत खूप...आणि वंश तर त्यांनी कितीही हट्ट केला कि पुरा करतात त्यामुळे तुम्ही देखील लक्ष ठेवा..." अर्पिता

" हो मॉम... तुम्ही अजिबात काळजी करू नका... मी आहे ना... " रिद्धी त्यांना आश्वासित करते

" चला आई साहेब निघू या... फ्लाइटची वेळ झाली आहे..." मनिष

" चला यशवंतजी , वहिनी येतो...." मनिष हात जोडून नमस्कार करतात.... रिद्धी अर्पिताजवळ जाते...

" मॉम तुमच्यासाठी आमच्याकडून काही गिफ्ट्स आहेत..." रिद्धी त्यांच्या हातात बॅग्ज देते.... आणि रजमातांना नमस्कार करते....

" औक्षवंत व्हा... आणि लवकर घरी या... " राजमाता

मग मात्र तिघे एअरपोर्टला निघतात.... वंश त्यांना सोडवायला जाणार असतो पण राजमाता त्याला नको म्हणतात....

" चला वंश आम्ही पण निघतो... रिद्धी संध्याकाळी लवकर ये.. " यशवंत

" हो बाबा मी पण निघते... " रिद्धी

वंश दोघांना नमस्कार करतो... आणि दोघे निघतात....

" चला मी पण निघते.... मला अकॅडेमीला जायच आहे..." रिद्धी

" तुम्ही आत्ता अकॅडेमीला चाललात..." धरा

" धरा प्लीज तुम्ही वंशना जशा बोलतात तसच बोला हवा तर सगळे असताना रिस्पेक्ट द्या..." रिद्धी

" OK... पण तु पण मला फक्त धरा म्हण हे अहो जाहो नको घालुस... " धरा

" OK... मी रोज ऑफिस नंतर जाते पण मला चेंज करून ऑफिसला जायच आहे...." रिद्धी

" अग मग इथुनच चेंज करून जा ना... आणि मी पण येते ऑफिसला तुला विराज दादा बोलले ना..." धरा

" हो झालंय आमच बोलणं... पण तु उद्या पासून जॉईन केलं तरी चालेल.. घाई कशाला करतेस..." रिद्धी

" तस नाही ग... पण आता भाई गेला कि घरी मी एकटी राहील तर मला कंटाळा येईल म्हणून म्हणतेय..." धरा

" OK चल..." रिद्धी

" तु चेंज कर तो पर्यंत मी रेडी होऊन आले..." धरा आत निघून जाते...

" चला मिसेस पुरोहित तुम्हांला आपली रूम दाखवतो..." वंश तिचा हात पकडत बोलतो... त्यावर रिद्धी त्याला स्माइल देते... आणी दोघे आत येतात...

रिद्धी आता सर्व पॅलेस व्यवस्थित बघत होती... सर्व गोष्टी लक्झरी होत्या... दोघे पॅलेसच्या लास्ट फ्लोअर वर आले... तिथे चार रूम , लायब्रेरी आणि वंशची मास्टर बेडरूम होती.... ज्यात फक्त मॅक्सला एन्ट्री होती... आणि आता रिद्धीला....

वंशने रूम ओपन केली तशे रिद्धीचे डोळे मोठे झाले.... बेडरूम मध्ये अजून तीन रूम्स होत्या.... बेडरूम हॉल , स्टडी रूम , मेन बेडरूम....


रिद्धी सर्व बघून हँग झाली होती.... वंश तिला बेडरूम मध्ये घेऊन गेला.... बेडरूम बघून तिला काय बोलाव समजेना झाले होत.....



वंश तिचे सर्व एक्सप्रेशन न्याहाळत होता... त्याने तिला मागून मिठी मारून तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवली...

" How is your bedroom... you like it..? " वंश

" such a fabulous bedroom this is...." रिद्धी भिंतीवर असलेल्या वंशच्या मोठ्या फोटोकडे बघून बोलते...

" You get ready.... " वंश तसाच तिच्या गालावर ओठ टेकवत बोलतो आणि बाहेर जातो..... रिद्धी डोअर लॉक करून चेंज करते.... आणि रेडी होऊन डोअर ओपन करते.... डोअरच्या आवाजाने वंश तिकडे येतो... रिद्धी मिरर समोर हेअर सेट करत असते...




रिद्धी मिरर मधुन त्याच्याकडे बघून डोळा मारते... ज्याने तो भानावर येऊन तिच्याजवळ येतो...

" चल लॉन्ग ड्राईव्हला जाऊ...." वंश तिला जवळ ओढत बोलतो...

" मिस्टर पुरोहित कंट्रोल युअर माईंड.... " रिद्धी त्याच्या चेस्टवर हात ठेऊन अंतर ठेवते....

" तु अशी तयार होऊन माझ्या समोर आलीस आहेस.... कसं माईंड कंट्रोल करू..." वंश तिला जोरात अजून जवळ ओढतो.... ज्याने तिचे हात त्याच्या खांद्यावर जातात....

तिचा चेहरा त्याच्या अगदी जवळ होता.... वंश तिचे चेहऱ्यावर आलेले केस मागे करतो... आणि मानेत हात घालतो.... तिला काही कळण्या अगोदर तिचे ओठ बंदिस्त झाले होते.... तिला अगोदर काही कळतच नाही.... नंतर तीही त्याला प्रतिसाद देऊ लागते... थोड्या वेळात दोघे भानावर येतात.....

" निघू या.... " वंश तिच्याकडे बघत बोलतो... रिद्धी मान हलवून होकार कळवते.... तिची लिपस्टिक आणि हेअर नीट करून दोघे खाली येतात.... धरा त्यांचीच वाट बघत होती....

" धरा संध्याकाळी ड्रायव्हर येईल तुला न्यायला.... take care yourself.... " वंश तिच्या गालावर हात ठेवत बोलतो....

" don't worry भाई.... आणि वहिनी आहे..." धरा

" अरे हो धरा.... तु मला बाकी वेळेस काही बोल पण ऑफिस मध्ये किंवा पब्लिक प्लेस मध्ये वहिनी अजिबात बोलू नकोस.... मीडियाला छोटीशी हिंट सुद्धा TRP साठी महत्वाची असते...." रिद्धी

" OK... मी ऑफिस मध्ये तुला मॅम बोलणार आहे.... बाकी जागी ' दि ' ओके आहे.." धरा

" तु फक्त मला ' दि ' बोललीस तरी चालेल..." रिद्धी

" OK.... BTW ( बाय द वे ) you look so beautiful... " धरा तिला कॉम्प्लिमेंट देते

" थँक यू.... आता निघूया... वंश तिला आज मी ड्रॉप करते... उद्या पासून ड्रायव्हर सोडेल..." रिद्धी

" OK.... Take care.... " वंश

तिघे ऑफिस साठी निघतात.... बाहेर मॅक्स वंशची बॅग घेऊन थांबला होता.... रिद्धी आणि धरा ऑफिस साठी निघून गेल्या...

" मॅक्स दोघींच्या नकळत गार्डस ठेव.... " वंश ऑर्डर देऊन कार मध्ये बसतो... आणि गाड्यांचा ताफा ऑफिसला निघतो.....

💠 💠 💠 💠 💠

रिद्धी ऑफिसला आल्यावर सगळे तिला ग्रीट करतात.... रिद्धी आणि धरा तिच्या केबिन मध्ये जातात.... तो पर्यंत त्यांच्या मागे पूजा ( रिद्धी PA ) आत येते....

" गुड मॉर्निंग मॅम...." पूजा

" गुड मॉर्निंग.... पूजा हि धरा पुरोहित आहे... आणि धरा हि पूजा आहे.... धरा उद्यापासुन आपल्या ऑफिस मध्ये डिझाइन डिपार्टमेंट जॉईन केलं आहे.... तिला सर्व समजावून सांग आणि तिची केबिन दाखव.. संजू भाऊंना सांगुन क्लीन करून घे...." रिद्धी

"ओके मॅम...." पूजा रिद्धिला तीच शेड्युल सांगते....

" ok... you may go now... dhara go with her.... नंतर केबिन मध्ये ये... " रिद्धी कामाला सुरुवात करते...

धरा पुजा सोबत जाते.... पुजा तिची ऑफिस मध्ये सर्वांसोबत ओळख करून देते... तिला तिची केबिन दाखवून तिला कामं समजावुन सांगते.....

💠 💠 💠 💠 💠

मर्सिडिज ऑफिस बाहेर येताच प्युन सगळ्यांना वंश सर आल्याचे सांगतो.... तसें सगळे डेस्क कडे पळतात.... वंशची एन्ट्री होते तेव्हा सगळे कामं करत होते.... एकदम पिन ड्रॉप सायलेन्स होता.... त्याने दोन मिनिट थांबून सगळ्यांवर नजर टाकली.... आणि केबिन कडे निघाला.... त्याला सर्व ग्रीट करत असतात.... तो सरळ त्याच्या केबिन मध्ये गेल्यावर सगळे सुस्कारा सोडतात....

" अरे यार सर आले कि सगळे कसे कामं करतात.... नाही तर..." संदिप

" कारण सगळ्यांना त्यांची नोकरी प्यारी आहे.... त्यांचा राग म्हणजे त्सुनामी आहे..." अबोली आवंढा गिळत बोलते...

" पण बॉस पेक्षा हँडसम कोणी नाही.... मी तर एका पायावर तयार आहे मिसेस पुरोहित बनायला...." मायरा

" तुला तुझी नोकरीं जड झाली आहे कि जीव...." संदिपच्या बोलण्यावर अबोलीला हसु येत...

" ए गप्प बस रे.... जी सरांची वाईफ होईल ती खूप लकी असणार... " मायरा

" हो ना... कारण त्यांना आयुष्यभर त्सुनामी सांभाळावी लागेल...." संदिप हसत बोलतो..

" What's going on .... don't you have work ...(काय चाललय.... तुम्हांला काम नाही का...) " मॅक्स आत येत बोलतो...

" आला सरांचा चमचा..." अबोली हळुच बोलते... तरी ते मॅक्स ऐकतो...

" Mis Aboli you say something... ( मिस अबोली तुम्ही काही बोलताय...)" मॅक्स

" No sir nothing.... I was asking Sandeep for a file....(नाही सर काही नाही... मी संदीपला फाईल मागत होतो.. ) " अबोली फाईल घेऊन जागेवर बसते.... संदिप आणि मायरा देखील कामाला लागतात.... मॅक्स वंशच्या केबिन कडे जातो...

वंशची केबीन नॉक होते...

" yes.... come in.... " वंश फाईल बघत बोलतो...

मॅक्स आत येऊन त्याची बॅग टेबलवर ठेवतो....

" sir your today schedule ( सर तुमचा आजचा शेड्युल ) ... मॅक्स

" I have seen.. Get the conference room ready and have a staff meeting in half an hour ( मी बघितला आहे... कॉन्फरन्स रूम तयार करा आणि अर्ध्या तासात स्टाफ मीटिंग आहे... ) वंश लॅपटॉप बघत बोलतो...

" OK sir.... " मॅक्स निघून जातो...

मेल चेक करून वंश अर्धा तासांत मिटिंग साठी जातो.... ऑफिस मिटिंग नंतर त्याला बॅक तु बॅक आऊटडोअर मिटिंग होत्या.....

💠 💠 💠 💠 💠

रिद्धी कामं करत असताना तिला सियाचा निघाल्याचा कॉल आला.... धरा डिझाइन सेकशन मध्ये होती... रिद्धी सेक्शनला कॉल करून धराला केबिनमध्ये बोलावते... काही वेळात डोअर नॉक होतो...

" may i come in... " धरा

" yes.. come in.. sit " रिद्धी

" काय झालं..." धरा

" काही नाही झालं... उद्या सीयु आणि अंकित भाई इस्तांबूल जात आहेत...तर मि आता लंच ब्रेक मध्ये सीयु सोबत मॉलला जातेय.. तर तुला काही शॉपिंग करायची असेल तर तु पण चल ... " रिद्धी लॅपटॉप बंद करते

" मला ऑफिस साठी काही ड्रेस घ्यायचे आहेत... पण आत्ता कसं..." धरा

" सध्या तु ऑफिस जॉईन नाही केलं आहेस तर काही प्रॉब्लेम नाही... तु उद्या जॉईन होते आहेस... तर चला नणंदबाई..." रिद्धी हसत बोलते....

दोघी बाहेर येतात.... रिद्धी केबीन लॉक करते... लंच ब्रेक झाला होता... रिसेप्शन वर गुंजण होती...

" गुंजण मी थोड्या वेळ बाहेर जाते आहे... काही महत्त्वाचे असेल तर मला लगेच कॉल कर..." रिद्धी तिला सांगुन धरा सोबत बाहेर पडते...

" हि धरा मॅमच्या ओळखीची आहे बहुतेक... मॅम सोबत आली आता मॅम सोबत गेली...." गुंजण

" असेल आपल्याला काय... पण तिच्यात टॅलेंट खूप आहे.... आत्ता डिझाइन सेक्शन मध्ये मी डिझाइन करत होते तर खूप युनिक आयडिया देत होती... " शुभदा

" म्हणून मॅमने अपॉईंट केलं असणार... मॅम ओळखीच्या बेसवर जॉब देत नाही..." गुंजण

" चल खूप भूक लागली आहे लंच ब्रेक संपेल..." शुभदा...

💠 💠 💠 💠 💠

सिया , रुची आणि अप्पू आधीच फिनिक्स मार्केट सिटीला पोहचल्या होत्या.... काही वेळात धरा आणि आणि रिद्धी देखील पोहचतात...

" अरे व्वा... वहिनी आणि नणंद बाई सोबत..." रुची

" काय करणार.. तुम्ही तुमच्या नणंद बाईंना घेऊन आल्या म्हणून मी पण घेऊन आले... " रिद्धी हसत बोलते..

" अग ती उद्या पासुन ऑफिस जॉईन करते आहे तर तिची शॉपिंग करायची आहे म्हणून घेऊन आले... " रिद्धी

" बर जायच का.. तुम्हांला परत ऑफिसला जायच आहे..." अप्पू

सगळे आत जातात..... आधी सियाची शॉपिंग करायला घेतात.... तिची शॉपिंग करायला एक तास जातो...

" वहिनी सियाची अलमोस्ट शॉपिंग झाली आहे... तर आम्ही दोघी जाऊन धरासाठी काही ट्राउजर वैगेरे बघतो..." रिद्धी रुचिकाला बोलते

" ठीक आहे... आमच झालं कि आम्ही येतो तिकडे..." रुची

" तुमच झालं कि तुम्ही कॅफेटेरिया मध्ये जा.. आम्ही दोघी तिकडेच येतो..." रिद्धी सांगून धरा सोबत जाते...

दोघी बिजनेस डिपार्टमेंटला जातात..... रिद्धी सिया साठी काही ट्राउजर सिलेक्ट करते आणि तिला ट्राय करायला पाठवते.... आणि ती तिच्यासाठी काही सिलेक्ट करत असताना तिचा मोबाईल रिंग होतो... नाव बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते...

" बोला..." रिद्धी

" बिझी नाहिस ना... " वंश

" नाही... मॉल मध्ये आलेय..." रिद्धी

" मॉल..." वंशधरा

" सीयु आणि भाई उद्या इस्तांबुल जाताय तर सीयुला शॉपिंग करायची होती... मग धराला पण घेऊन आले तिच्यासाठी काही ट्राउजर वैगेरे घेतले..." रिद्धी

" पण मी तिला काही पैसे पण दिले नव्हते मला कॉल करायचा ना..." वंश "

" ती कऱणार होती तुम्हांला कॉल पण मीच नको बोलले... मी घेऊन दिले तर काय झालं... माझ्याकडून तिला गिफ्ट समजा..." रिद्धी

" OK.... आता घरीच जाणार आहात ना..." वंश

" मी ऑफिस जाईल.. धराला घरी जायला सांगते सीयु सोबत... मला संध्याकाळी अकॅडेमीला जायच आहे..." रिद्धी

" मला कॉल करून कळव... " वंश

" हो... सांगते..." रिद्धी

" चल बाय... मला मिटींग आहे..." वंश

" बाय..." रिद्धी कॉल कट करते... तोपर्यंत धरा येते...

" डन..👍🏻 " रिद्धी

" हो..." धरा

रिद्धी बिल पे करते... आणि दोघी कॅफेटेरिया कडे जातात.... रुचिका दोघींसोबत आली होती...

" झाली शॉपिंग... " सिया

" हो...किती भारी चॉईस आहे वहिनीची... मी मेजरमेंट सांगण्या आधी तिने मेजरमेंट सांगितल...😀" धरा

" शेवटी फॅशन आयकॉन आहे..😀" रुची हसत बोलतात

त्यांच्या गप्पा सुरु होत्या तोपर्यंत ऑर्डर आली... पोटभर खाऊन मग सगळ्या निघाल्या....

" धरा तु हवं तर घरी जा... सीयु सोडेल तुला... मला संध्याकाळी अकॅडेमीला जावं लागेल... मग उशीर होईल... " रिद्धी कार मध्ये बॅग ठेवते...

" अग नाही दि येते ना मी ऑफिसला... आणि मला तुझी अकॅडेमी सुद्धा पाहायला भेटेल.." धरा एक्साईट होत बोलते..

" बर चला.... वहिनी मला रात्री लेट होईल... आईला सांग नाही तर काळजी करत बसेल..." रिद्धी

" बर सांगते..." रुचिका

एकमेकांना निरोप देऊन निघतात.... रिद्धी कार ड्राईव्ह करत धराला त्यांच्या ऑफिस बद्दल सांगत होती.... काही वेळात दोघी ऑफिसला पोहचतात....

" मॅम तुम्हांला विराज सरांनी बोलावलं आहे..." पूजा

" ok... " रिद्धी विराजच्या केबिनमध्ये निघून जाते...

" दादु येऊ का...? रिद्धी

" ये बस..." विराज फाईल बाजूला ठेवतो... रिद्धी त्याच्या समोर जाऊन बसते....

" रिधु आपल्याला फर्स्ट डील या महिन्यात आहे.... त्यामुळे सगळ्यांसोबत बोलून घ्यायला हवं... म्हणजे त्यांना ब्रिफ सांगितली कि त्यांना डिझाइन करायला वेळ मिळेल... " विराज

" डोन्ट वरी... मी सगळं हॅन्डेल करते... आणि डिझाइनच्या कामात मी स्वतः लक्ष घालते... " रिद्धी

" OK... मग कामाला लागा... उद्या आपल्या डिझाइनर सोबत सोबत मिटिंग प्लॅन कर... आणि सर्व ठरवून घेऊ..." विराज

" मी सांगते पुजाला...आणि जेनीची नेक्स्ट मंथ वेडींग आहे लक्षात आहे ना...तिचा गाऊन रेडी करायचा आहे..." रिद्धी

" आपल्या कडून तिला तो गिफ्ट करायचा आहे..." विराज

" लक्षात आहे माझ्या... बर येते मी डिझाइन स्टार्ट केलंय... " रिद्धी तिच्या केबीन मध्ये निघून जाते...

जेनीच्या वेडिंगचा गाऊन रिद्धीने रेडी करावा हि जेनीची इच्छा होती... जेनी रिद्धी सोबत सुरुवातीपासून असल्याने रिद्धीने तिला नकार दिला नव्हता....

💠 💠 💠 💠 💠

संध्याकाळी ऑफिस संपल्यावर रिद्धी अकॅडेमीला निघून गेली... धरा खूप एक्साईट होती... आत्तापर्यंत तिने रिद्धीची अकॅडेमी टीव्ही , सोशल मीडियावर आणि रिद्धीच्या यु ट्यूब ब्लोग मध्ये पाहिली होती.... काही वेळाने दोघी तिथे पोहचल्या....

अकॅडेमी मध्ये म्युझिक सुरु होत... त्याचे आवाज डोअर बाहेर येत होता... रिद्धीला बघून सगळे खुश झाले होते... रिद्धीने विकी आणि धराची ओळख करून दिली....

रिद्धी तिच्या केबिन मध्ये गेली... बॅग ठेवून चेंज करून बाहेर आली... रोज अकॅडेमीला आल्यानंतर रिद्धी प्रॅक्टिस करायची.....

" आजची थीम फिक्स झाली का...? " रिद्धी

" हो झाली आहे... त्यांचा कथ्थक डान्स होता या वीकला त्यामुळे तोच फायनल केलाय....

" झालाय ना.. मग बस... मी सांगितल होत तेच सॉंग आहे ना... "

" हो... त्यांना तुझ्यासोबत फायनल डान्स करायचा होता म्हणून थांबले आहेत..." विकी

" ok... let's play music... " रिद्धी तिच्या पोज ला जाऊन थांबली... धरा डान्स व्हिडिओ बनवत होती... विकिने कॅमेरा सेट केला आणि म्युझिक सुरु केलं.... आणि त्यांना जॉईन झाला...

रघुकुल रीत सदा चली आई
प्राण जाए पर वचन ना जाई

जय रघुवंशी अयोध्यापति
राम चन्द्र की जय
सियावर राम चन्द्र की,
जयजय रघुवंशी अयोध्यापति
राम चन्द्र की जय
सियावर राम चन्द्र की, जय

ता दी या ना धीम..
दे रे ता ना दे रे नोम
ता दी या ना धीम
दे रे ता ना दे रे नोम
ता दी या ना धीम..

रघुवर तेरी राह निहारें
रघुवर तेरी राह निहारें
सातों जनम से सिया

घर मोरे परदेसिया
आओ पधारो पिया
घर मोरे परदेसिया
आओ पधारो पिया

ता दी या ना ता दे रे ना दुम
ता दी या ना ता दे रे ना धीम
ता दी या ना ता दे रे ना धीम
ता दा रे ना दे धीम ता दा नि

मैंने सुध-बुध चैन गवाके
मैंने सुध-बुध चैन गवाके
राम रतन पा लिया

घर मोरे परदेसिया
आओ पधारो पिया
घर मोरे परदेसिया
आओ पधारो पिया

धीम ता धीम तानाना देरे ना
धीम ता धीम तानाना देरे ना
धा नि सा मा, सा गा मा धा, नि धा मा गा पा
गा मा पा सा सा, गा मा पा नि नि
गा मा पा नि धा पा मा गा रे गा मा धा पा
रे मा पा धा मा पा नि नि धा पा मा पा गा मा
रे सा नि सा रे रे मा मा पा पा धा धा मा मा
नि नि नि रे सा नि धा नि धा पा मा पा धा नि
धा पा मा गा रे गा रे सा नि सा रे रे गा

ना तो मैया की लोरी
ना ही फागुन की होरी
मोहे कुछ दूसरा ना भाये रे
जबसे नैना ये जाके
इक धनुर्धर से लागे
तबसे बिरहा मोहे सताए रे

हाँ..ना तो मैया की लोरी
ना ही फागुन की होरी
मोहे कुछ दूसरा ना भाये रे
जबसे नैना ये जाके
इक धनुर्धर से लागे
तबसे बिरहा मोहे सताए रे

दुविधा मेरी सब जग जाने
दुविधा मेरी सब जग जाने
जाने ना निरमोहिया

घर मोरे परदेसिया
आओ पधारो पिया
घर मोरे परदेसिया
आओ पधारो पिया

हाँ गयी पनघट पर भरण
भरण पनियां दीवानी
गयी पनघट पर भरण
भरण पनियां..

गयी पनघट पर भरण
भरण पनियां दीवानी
गयी पनघट पर भरण
भरण पनियां..

हो नैनो के, नैनो के तेरे बाण से
मूर्छित हुई रे हिरनिया
झूम झ ना ना ना ना..
झना ना ना ना ना..
बनी रे बनी मैं तेरी जोगनिया
घर मोरे परदेसिया
आओ पधारो पिया
घर मोरे परदेसिया
आओ पधारो पिया...
( Lyrics Title: Ghar More Pardesiya
Movie: Kalank
Singers: Shreya Ghoshal, Vaishali Mhade )

त्यांच्या घिरट्या सोबत धराला स्वतः फिरल्यासारख वाटत होत.... डान्स संपल्यावर रिद्धीने सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या...

" आऊट स्टँडिंग गर्ल्स.... खूप छान डान्स झालाय.... नेक्स्ट मंथ मुंबई फेस्टिवल आहे आणि त्यात आपल्या ह्या ग्रुपने पार्टीसिपेट केलच पाहिजे... काय...? " रिद्धी

" yes.. " सगळे एकसाथ ओरडल्या

" गुड... उद्यापासून हिपहॉप सुरु होईल... विकी आपल्या बॉईजला पण रेडी कर... मुंबई फेस्टिवल साठी टॉप परफॉर्मन्स झाला पाहिजे... परवा फायनल परफॉर्मन्स मला हवा आहे... Got it.. " रिद्धी

" Yes ma'am... " सगळे ओरडतात....

" Good... go to your practice... " रिद्धी बोलून बाजूला होते...

" क्या बात है यार दि... मी आत्तापर्यंत फक्त तुझे व्हिडिओ पाहिले होते तर वेडी व्हायचे.. आणि आता लाईव्ह बघून तर विचारु नको... " धरा खूप एक्साईट झाली होती...

" तु अजून तिला लाइव्ह बाकिचे फॉम करताना बघ... कथ्थक पेक्षा हिपहॉप मध्ये मास्टर आहे ती... " विकि

" मला तर तिचे सगळे फॉम आवडतात... " धरा डोळे मिचकावत बोलते...

" विकि आपल्या बाई साहेब कधी येताय... " रिद्धी

" आज रात्री येणार आहे .... " विकि

" बर... चला मी निघते... आता ही लास्ट बॅच आहे ना.." रिद्धी

" हो... हे गेले कि मी पण निघतो हे सगळे गेले कि..." विकि

" ok... मी आलेच..." रिद्धी केबिन मध्ये जाऊन चेंज करुन येते... सगळ्यांना बाय करून दोघी निघतात... त्यांना उशीर होणार माहित असल्यामुळे विराजने ड्रायव्हर सोबत पाठवला होता...

धराला वंशचा कॉल आला...

" हा भाई..." धरा

" कुठे आहेस..." वंश

" आता घरीच निघालो आहोत... पोहचते थोड्यावेळाने... " धरा

" रिद्धी आहे ना सोबत..." वंश

" हो सोबत वहिनी आहे ..." धरा रिद्धी कडे बघून बोलते... त्यावर रिद्धी हसते...

" बर... ये लवकर..." वंश

" हो.. बाय..." धरा कॉल कट करते... आणि वंशला रिद्धीचा डान्स व्हिडिओ सेंड करते... जास्त ट्रॅफिक न लागण्यामुळे दोघी लवकर पोहचल्या...

" अग आत तर चल..." धरा विंडो मधून बोलते...

" नाही आता नको... घरी सगळे वाट बघत असतील... उद्या ऑफिसला भेटू..." रिद्धी

" ok... घरी पोहचलीस कि msg कर..." धराच्या बोलण्यावर रिद्धीला हसू येत..

" काय झालं.. तु हसते का आहेस.." धरा न कळून बोलते...

" अग मी घरून ऑफिसला निघते तेव्हा आई मला अशीच बोलते म्हणून हसू आलं...😄" रिद्धीच ऐकून धरा देखील स्माइल् करते...

" ok... चल बाय... good night... " रिद्धी

" bye... good night... " धरा तिला बाय करते... आणी रिद्धीची कार निघते...

धरा आत येते... वंश हॉल मध्ये कामं करत होता...

" काय करताय भाई..." धरा येऊन सोफ्यावर बसते..

" आली का... हे काय रिद्धी नाही आली..." वंश डोअरकडे बघत बोलते...

" आली होती... पण मला सोडून गेली... घरी सगळे वाट बघत असतील बोलली..." धरा

" OK... जा फ्रेश होऊन ये... जेवण करून घेऊ.. दमली असशील..." वंश लॅपटॉपवर बोट फिरवत बोलतो...

" आलेच...." धरा रूम मध्ये निघून जाते.. तेवढ्यात वंशच्या मोबाईलची msg टोन वाजते... रिद्धी चा msg बघून तो msg ओपन करतो...

" मला माहित आहे तुम्हांला मला भेटायच होत... पण मी आत आले... उशीर झाला आहे आणि घरी सगळे वाट बघत असतील म्हणून लगेच निघाले.... रात्री कॉल करते... I Love You 😘 " रिद्धी

मेसेज वाचून वंशच्या चेहऱ्यावर स्माइल येते.. ' वेडी ' बोलून तो नकारार्थी मान हलवतो... आणि तिला I Love You 2 चा msg करतो... धरा आल्यावर दोघे जेवायला बसतात.... धरा त्याला दिवसभर काय केलं... ऑफिस कसं आहे... रिद्धीची अकॅडेमी सगळ्या बद्दल सांगत होती... वंश देखील सगळं मन लावून ऐकत होता.....

💠 💠 💠 💠 💠

रिद्धी घरी आली तेव्हा यशवंत आणि समीर यांच्या हॉल मध्ये गप्पा सुरु होत्या... अंकित आणि अप्पू मोबाईल बघत होता... महिला मंडळ जेवणाची ताट घेत होते...

" हे घ्या आली रिद्धी.... जा पटकन फ्रेश होऊन ये..." यशवंत

" हो बाबा आलेच..." रिद्धी रूममध्ये निघून जाते.... मस्त शॉवर घेऊन मोबाईल चार्ज करायला लावून खाली येते.... तोपर्यत सगळे टेबलवर आले होते...

मंजिरी यांनी सक्त ताकीद दिल्याने कामाच कोणी विषय काढला नव्हता.... दिवसभर घरी फक्त लेडीज असायच्या... त्यामुळे घरातील नियम होता कि रात्री सगळ्यांनी एकत्र जेवण करायच.... जेवण करून रिद्धी थोड्यावेळ सगळ्यां सोबत बसुन रूम मध्ये आली.... मोबाईल हातात घेतल्यावर त्यावर वंशचे 3 मिस्ड कॉल दिसले.... डोअर लॉक करून ती गॅलरी मध्ये येऊन बसली.... दोन रिंग मध्येच कॉल रिसिव्ह झाला...

" हॅलो प्रिन्सेस...." वंश

" काय करताय.... जेवलात.." रिद्धी

" जेवण करू आलो... मेल चेक करत होतो.... तु जेवलीस..." वंश

" हो... जस्ट रूम मध्ये आले.... मोबाईल चार्जिंगला लावला होता... म्हणून कॉल रिसिइव्ह नाही केला... " रिद्धी

" मग आज मजा केली दोघींनी... धरा तर आल्या पासुन काय काय केलं तेच सांगते आहे..." वंश

" ती आज अकॅडेमी मध्ये आली तेव्हा खूप आनंद झाला होता..." रिद्धी

" रिद्ध तु गिफ्ट ओपन केलं.... " वंश

" नाही समोर टेबल वर अजून असतच आहे.... वेट ओपन करते..." रिद्धी आत येते... मोबाईल खांद्याला टेकवुन कानाला लावते.... गिफ्ट घेऊन त्याच रॅप काढते... त्यात ऑस्ट्रेलियन व्हाईट साऊथ सी पर्ल नेकलेस होता....



" wow.... " नेकलेस बघून रिद्धीच्या तोंडून आपसूक निघाले....

"लाईक इट..." वंश

" खूप... आणि हा नेकलेस मी एका शॉप मध्ये बघितला होता... तेव्हा मला खुप आवडला होता... पण तो ऑलरेडी कोणी तरी घेतला होता... आणि ते सिंगल पीस होत फक्त.... त्यानंतर मी किती ठिकाणी शोधला पण नाहिच भेटलं..." रिद्धी

" तो पीस मीच परचेस केला होता.... आणि पहिल्यांदा तुला तिथे पाहिलं होत... तेव्हाच तुला देणार होतो पण तो पर्यंत तु गेली होती..... " वंश

" थँक्यू वंश.... आय लाईक इट सो मच.... " रिद्धी

" आता मला रिटर्न गिफ्ट हवं आहे..." वंश सिडिक्टिव्ह आवाजात बोलला....

" मिळेल ना... जेव्हा भेटेल तेव्हा.... " रिद्धी

" उद्या लवकर ये मला कामं आहे तुझ्याकडे.... " वंश

" मला माहीत आहे तुमच कामं.... मी उद्या डायरेक्ट ऑफिसला जाणार आहे.... धरा ऑफिसला येईल.... " रिद्धी

" इट्स नॉट फेअर..." वंश

" इट्स फेअर.... आणि आता कामं खूप पेंडींग आहेत... एक अर्जेन्ट गाऊन..." रिद्धी

" आय कॅन अंडर स्टॅंड..... " वंश

" चला झोपू आता... उशीर झाला आहे... उद्या ऑफिस आहे... " रिद्धी

" हो सांग... तु इकडे येतेस कि मीही तिकडे येऊ झोपायला...." वंश तिला चिडवत बोलतो... त्यावर रिद्धी लाजून काहीच बोलता नाही...

" रिद्ध लाजू नको बोल काही तरी...." वंश

" वंश बास झालं चिडवण... झोपा आता..." रिद्धी

" गुड नाईट... आय लव्ह यु..." वंश

" गुड नाईट.... आय लव्ह यु टू... " रिद्धी हसत कॉल कट करते... आणि नेकलेस घालून तिचा पीक वंशला सेंड करते.... वंश जागाच असल्याने मेसेज लगेच रिसिव्ह करतो.... फोटो बघून तो तिला 😘 ईमोजी सेंड करतो...

" किती सुंदर दिसतो आहे हा नेकलेस तुझ्या गळ्यात... शेवटी जिच्या साठी घेतला होता तिच्या पर्यंत पोहचला..." वंश स्वतःला बोलून मोबाईल ऑफ करतो... आणि लाईट ऑफ करुन झोपतो.... रिद्धी देखील वंशचा विचार करत झोपून जाते....




क्रमशः