दीन-दलितांचा त्याग महापर्वतावानी ADV. SHUBHAM ZOMBADE द्वारा कविता मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दीन-दलितांचा त्याग महापर्वतावानी

दीन-दलितांचा त्याग महापर्वतावानी

 

 

अमानवतेच्या काळोख्यात अखंड ज्वलंत मशाली । दीन-दलितांच्या खांद्यावरती
सारी मशाली आमुच्या आधारी । मशाली खालचा अंधार आमुच्यावरती

जाणिले आम्ही ती जबाबदारी आमुच्या खांदी । मशाली सोडता मानवता जायी
मानवता ही दीन-दलितांनी तारली । ज्ञान आणि सत्ता-संपत्ती आधारी

जातीवादी पडले हे सारे मस्तकी । संरजाम करे सारे जातीवादी
जातीवादी खलबते करती । दीन-दलितांची सत्ता संपत्ती हिरावून घेण्याकामी

दीन-दलितांचे पुर्वज भारी । मानसन्मान पदरी रक्षती मानवता सारी
जातीवादी जाणती मानवता ही भारी । त्यांनीच केले महानायक दीन-दलितासी

जातीवाद्यांची महत्त्वकांक्षा बनणे महानायक ठायी । तेव्हा सुरू केला डाव तो रडीचा शास्त्राधारी
महानायकास खलनायक करणे ठरविले त्यानी । मानवतेचे अस्त्र वापरिले त्या कामी

दीन-दलितासी करे मागणी । मानण्यास या वसंुधरेवरवचा भुदेव आम्ही
असे स्वतः सांगी ईश्वरीय नभोवाणी । सारी जनता मग्न झाली अंधभक्ती करणेकामी

भदुेव जे सांगी ते विश्वास करी । म्हणे मानवता नाही मानवकल्याणापायी
तेव्हा अंधभक्त जनता त्यागी त्यासी । विन मानवता संपुष्टात येई मानवीजाती

दीन-दलित करे विनवणी । जगी मानवता समाजात तारण्याकामी
नका करू त्यासी अनवाणी। क्रुरपणे मरतील सारे भाजुनी

आम्ही काहीही करू त्याला टिकविण्यापायी । सांगे सारी दीन-दलित मंडळी
जातीवादी म्हणे त्यागा मानवता सारी । मज व्हावयाचे महानायक जगती

मग ठरवू नांदवावी का मानवता समाजी । वाटेची मानवता त्यागली दीन-दलितांनी सारी
मानवता नांदावी म्हणूनी मानवीसमाजी । निर्धार करूनी अखंड मानवजात जगविण्यापायी

सोडली मानवता जगात टिकविण्यापायी । कुळ झाले आमुचे मानवताहीन लोकहितापायी
त्याग हे आमुचे महापर्वतावानी । ना जाणिले कोणी अहंकारापायी

करार झाला जातीवाद्यांशी लोकिहितापायी । घातली त्याने अट प्रथमता सोडा मानवता सारी
मानवता त्यागली दीन-दलितांनी लोकहितापयी । जनावरी जीवन स्वीकारले लोकहितापायी

 

                                                              - अॅड. शुभम कालिदास झोंबाडे

 

 

--------------------------------------------------

 

 

 

तोंड दाबून बुक्यांचा मारा

 


अठरा-विसाव्या घरचे दारिद्र्य । थोपविले दीन-दलितांवर
संधी मागताच । मिळाला तो तोंड दाबून बुक्यांचा मारा

जन्म तो झाला मानवात । पण मानवता नव्हे आली आमुच्या वाटात
मानवता मागताच । मिळाला तो तोंड दाबून बुक्यांचा मारा

राज्य होते आमुचे अटकेपार । त्यावर षडयंत्राचे झाले वार बारंबारं
हक्क मागताच । मिळाला तो तोंड दाबून बुक्यांचा मारा

समाजात होती आमुची प्रतिष्ठा । लादता अस्पृष्यता झाली अप्रतिष्ठता
सांगूनी सत्य प्रतिष्ठा मागताच । मिळाला तो तोंड दाबून बुक्यांचा मारा

जगत होतो मानव म्हणूनी । प्राणीजीवनाचा शिक्कामोर्तब होतो आमुच्या कपाळी
मानवी जगणे मागताच । मिळाला तो तोंड दाबून बुक्यांचा मारा

होतो आम्ही बुध्दीजीवी । लादली आमुच्यावर ज्ञानबंदी
ज्ञान मिळविण्याचा हक्क मागताच । मिळाला तो तोंड दाबून बुक्यांचा मारा

न्यायदाता होतो आम्ही । कैफियती मांडण्यासाठी लोक येती आमुच्या सदनावरती
आज पदरी न्याय मागताच । मिळाला तो तोंड दाबून बुक्यांचा मारा

होतो आम्ही निव्र्यसनी । व्यसनाधीन करण्याचा डाव आखला आम्हावरती
निव्र्यसनीपणाची संधी मागताच । मिळाला तो तोंड दाबून बुक्यांचा मारा

अनेक धर्म खेळिले आमुच्या कुशीत । जगभर पाहचिले आमुच्या काळ किर्तीत
पोरके झालो धर्मासी आज धर्म मागताच । मिळाला तो तोंड दाबून बुक्यांचा मारा

ख्याती होती आमुची जगविख्यात । बदनाम केले आम्हास फाजील शास्त्रात
सत्याचे शास्त्र मागताच । मिळाला तो तोंड दाबून बुक्यांचा मारा

होतो धनको केले ऋणको आम्हासी । डाव हा सारा जातीवादा पायी
डाव उलटण्यापायी आर्थिक हक्क मागताच । मिळाला तो तोंड दाबून बुक्यांचा मारा

महाशक्ती आमुच्या ठायी महामानवे आमुच्या कुळी । फाजील नभोवाणी दुर्बल करी
नभोवाणीचा पुरावा मागताच । मिळाला तो तोंड दाबून बुक्यांचा मारा

 

 

                                                    - अॅड. शुभम कालिदास झोंबाडे