बावरा मन - 13 - Your time has begun..... Vaishu Mahajan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बावरा मन - 13 - Your time has begun.....

तिलकला पाच दिवस बाकी होते... उद्या रक्षाबंधन असल्याने सर्वजण आज जयपुर जाणार होते... रिद्धी सगळ्यांना भेटायला त्यांच्या घरी आली होती...

सीमा खाली हॉलची क्लिनिंग करत होत्या...

" कुठे आहेत सर्वजण..." रिद्धी

" सगळे जण खोलीत आहेत... तुम्ही बसा ना मी तुमच्यासाठी चहा नाश्ता आणते..." सीमा

" नाही नको मला काही... तुमच चालू देत..." रिद्धी वंशच्या रूमकडे जाते...

रिद्धी रूममध्ये आली तर तो तिथे नव्हता... तिने सर्व रूम चेक केल्या... बेडच्या साईडला बॅग उभी होती... कपडे घड्या करून बेडवर ठेवले होते... तिला काहीतरी क्लिक झालं तशी ती फ्लोअरच्या गार्डन एरिया मध्ये आली... तिथून आत गेल्यानंतर जीम होती... तिचा अंदाज बरोबर निघाला होता.. वंश एक्ससाइज करत होता...

ओह्ह गॉड काय हॉट दिसत होता... शर्टलेस बॉडी आणि त्याचे सिक्स पॅक वाली बॉडी , बायसेप्स...🔥🔥🔥🔥

रिद्धी दरवाज्याला टेकून कितीतरी वेळ त्याला न्याहाळत होती... मग मात्र भानावर येऊन रिद्धी आत येऊन त्याच्यासमोर थांबली... तिला बघून त्याने त्याच्या पुश अप्स सुरु ठेवल्या... त्यामुळे ती जाऊन त्याच्या पाठिवर बसली... वंश काही ना बोलता पुश अप्स पूर्ण करतो...

रिद्धी उठून उभी राहते... वंशची बॉडी पूर्ण घामाघूम झाली होती...

" तुम्ही बाथ घ्या... मी तुमच्यसाठी कॉफी आणते..." रिद्धी बोलून कॉफी आणायला जाते... वंश जाऊन शॉवर घेऊन येतो... तोपर्यंत रिद्धी कॉफी घेऊन येते... आणि त्याच्यासमोर धरते...

" तुला नाही आणलीस..." वंश

" मला नको होती... तुम्ही घ्या... मी तुमची बॅग पॅक करून देते..." रिद्धी बोलून त्याची बॅग पॅक करायला जाते... वंशने तिला आता नीट पाहिलं होत...



" वंश इथे असलेल्या सर्व गोष्टी पॅक केल्यात... अजून काही असेल तर ते पण द्या... वंश ऐकताय ना.. "रिद्धी बॅग पॅक करत बोलते... पण त्याच तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसत... त्याचा काही रिप्लाय नाही.. म्हणून रिद्धी वर बघते... तर तो तिला एकटक बघत होता...

" वंश..." रिद्धी त्याच्यासमोर जाऊन चुटकी वाजवते...

" हम्म.. काय झालं.." वंश भानावर येऊन बोलतो

" लक्ष कुठे आहे... मी विचारल अजून काही पॅक करायचं आहे का..." रिद्धी

" नाही..." वंश कॉफीचा मग टेबलवर ठेवून तिच्या मागे येऊन थांबतो... त्याच्या डियोचा सुगंध रूममध्ये पसरला होता...

रिद्धिला त्याच्या मागे थांबल्याची जाणीव झाली होती... तिने बॅग बंद केली आणि बाल्कनीकडे जायला लागली... वंशने तीचा हात धरून तिला थांबवल...आणि तसच मागे ओढल... त्यामुळे तिचे दोन्ही हात त्याच्या उघड्या छातीवर गेले...

वंशचे गरम श्वास तिच्या मानेला आणी कानांना जाणवत होते... तिची मान खाली झुकली होती...

" काय झालं राणीसरकार.... आल्यापासून बघतो आहे तुम्ही मला नजर देत नाही आहे..." वंश तिचा चेहरा वर करत बोलतो...

" 🥺🥺🥺🥺...." रिद्धी

" प्रिन्सेस तु रडते आहेस....? काय झालं..? तुला कॊणी नाही बोललं का..." वंश तिच्या गालावर हात ठेवून विचारतो... रिद्धी मान नकारार्थी हलवते...

" then why are you crying..." वंशला तिच्या रडण्यामुळे काळजी वाटते... रिद्धी त्याच्या कमरेभोवती हातांचा विळखा घालून मिठी मारते... वंशला तिला काय झालंय काही कळत नसतं... तो हळुच तिच्या डोक्यावर हात फिरवत होता...

काही वेळाने रिद्धी बाजूला होते.. वंश अंगठ्याने तिचे डोळे पुसतो...

" ठीक आहेस..." वंश तिच्या गालाला हात लावत विचारतो...ती डोळ्यांनी होकार दर्शवते...

" काय झालं... का रडत होतीस..." वंश बेडवर बसून तिला मांडीवर बसवतो...

" माहीत नाही का... पण मला रडू येत होत...🥺" रिद्धी

" missing me... " वंश

रिद्धी मान हलवून होकर कळवते....

"वेडू... फक्त सात दिवस... मी लगेच येणार आहे..." वंश

" ह्म्म्म..." रिद्धी

" तु जर अशी रडत बसणार असशील तर मी नाही जातं..." वंश

" काही काय... तुम्ही रेडी व्हा... तुम्हांला लेट होईल..." रिद्धी त्याचा कमरेभोवती असलेला हात काढत उठते... पण वंश तील पुन्हा खाली बसवतो... आणि तिला हग करतो... तिचे हात त्याच्या मानेभोवती गुंफते...

त्याचे गरम श्वास तिच्या मानेला जाणवत होते... त्याने अलगद तिच्या मानेवर ओठ टेकवले.... त्याबरोबर तिचे डोळे बंद होवून मिठी झाली झाली...

" I Love you sweetheart.... " रिद्धी त्याच्या कानाजवळ बोलल्याने तिचे श्वास त्याच्या कानाला झाले काही वेळात त्याला त्याच्या कानाला बाईट केल्याच लक्षात आलं...

" I Love you more... " वंशने बोलून तिला मानेला बाईट केलं...

" आह..sssss " रिद्धी त्याच्या पासून दूर झाली..

" काय केलं तुम्ही..." रिद्धी

" त्याला लव्ह बाईट बोलतात...." वंश शांत पणे बोलला...

" पण आता..." रिद्धी पुढे काही बोलण्याआधी वंशने तिचे ओठ बंद केले...सुरुवातीला तिला काही कळालच नाही पण नंतर ती देखील प्रतिसाद देऊ लागली...

दोघे बराच वेळ एकमेकांत हरवले होते... इंटरकॉमच्या आवाजाने दोघे वेगळे झाले... वंशने जाऊन कॉल रिसिव्ह केला..

" भाई आम्ही खाली वाट पाहतो आहे..." धरा

" आलोच..." वंश बोलून कॉल कट केला... रिद्धी मिररमध्ये हेअर व्यवस्थित करत होती... जेणेकरून कोणाला बाइट दिसणार नाही...

वंशने क्लोसेट मधुन त्याचा सूट काढून रेडी झाला... रिद्धी त्याला बघत होती... हेअर सेट करून त्याने टाय नॉट बांधायला घेतल्यावर रिद्धी त्याच्या समोर गेली...

" May I..." रिद्धीने हात समोर केल्यावर वंशने त्याचे हात खाली केले...

" कोणती नॉट करू..." रिद्धी

" तुला आवडेल ती..." वंश तिच्याकडे बघुन बोलतो... रिद्धीने त्याच्या टायची ट्रिनिटी नॉट करून दिली आणि त्याच्या मानेल हल्का बाईट केला...

" लवकर या... मी वाट पहाते आहे..." रिद्धी

" 🙂🙂..." वंशने डोळ्यांनी होकार कळवला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले...

" जाऊया...." वंश

दोघे खाली आले... हॉल मध्ये तिघेजण त्यांची वाट पहात होते...

" वहिनी आय मिस यु यार..." धरा तिला बिलगत बोलते..

" लवकर ये मग... अंतरा - दादा तुमच्यासोबत जास्त वेळ नाही स्पेंड करता आला... पुढच्या वेळेस आल्यावर छान प्लॅन करूया.." रिद्धी

" कामं देखील महत्वाच असत समजू शकतो मी... आणि मी देखील कामामुळे आलो होतो... त्यामुळे मला देखील नाही जमलं..." समर

" वहिनी आता तु येणार आहेस जयपुर तेव्हा छान वेळ मिळेल आपल्याला..." अंतरा

" चला निघूया... लेट होईल..." समर

" काळजी घे...🙂" वंश

रिद्धी मान हलवते... मग सगळे एअरपोर्टला निघतात.... रिद्धी घरी निघुन गेलीत...

...............

..........................

....................................

..................................................

स्थळ :- जयपूर

दुसऱ्या दिवशी.....

पॅलेस मध्ये राजमातांच्या सांगण्यावरून त्यांच्या नातवंडांच्या आवडीचे पदार्थ बनवले जात होते... संजना आणि जयसिंग सकाळीच जयपुर आले होते... आल्यानंतर सगळ्यांच्या गप्पा सुरु होत्या... चौघेजण जेटलेग मुळे अजून झोपले होते...

काही वेळाने वंश तयार होऊन खाली आला...

" राधे राधे आत्या साहेब... राधे राधे मामा साहेब..." वंश दोघांना नमस्कार करतो...

" चिरंजीवी भव: " जयसिंग

" औक्षवंत व्हा..." संजना

" कशा आहात आत्या साहेब..." वंश त्यांच्या शेजारी बसतो...

" आम्ही ठीक आहोत... तुम्ही कसे आहात... स्वत:कडे लक्ष आहे कि नाही... की फक्त कामं आणि काम..." संजना

" त्यांची काळजी त्यांनी नाही घेतली तर वहिनी साहेब आहेत ना काळजी घेण्यासाठी... काय भाई.." धरा स्टेअर उतरत बोलते...

" हो का... तुम्हांला आवडल्यात वाटत तुमच्या वहिनी साहेब..." संजना

" आम्हांला तर त्या लग्न ठरण्याआधी पासून पसंत आहेत..." धरा

" तुम्ही दोघे आलात पण समर आणि अंतरा कुठे आहेत..." जयसिंग

" आम्ही इथे आहोत..." समर आणि अंतरा स्टेअरवरुन येतात... अंतरा जाऊन जयसिंग जवळ बसली... जवळपास आठ महिन्यांनी ती सगळ्यांना भेटली होती...

" अर्पिता ओवाळणीची तयारी झाली आहे का बघा.." राजमाता

" हो आई साहेब सर्व तयारी झाली आहे... तर ओवाळून घेऊया.." अर्पिता

" राधा आरतीचं ताट घेऊन या..." अर्पिता आवाज देऊन ताट बोलवतात...

आधी संजना मनीषला ओवाळून घेतात... मनीष त्यांना सोन्याची जर असलेली साडी गिफ्ट करतात... नंतर धरा वंशला ओवाळते आणि हात पुढे करते..

" आमच गिफ्ट..." धरा

" काय हवं आहे तुम्हांला..." वंश

" जे तुम्ही द्याल ते... तुमचे सर्व गिफ्ट्स बेस्ट असतात..." धरा

वंश दिनकरला खुनावतो... दिनकर टेबलवर गिफ्ट रॅप बॉक्स देतो... ( दिनकर वंश पॅलेसमध्ये असल्यानंतर त्याच्या कामांपासून ते त्याच्या खाण्यापर्यं बघायचे )

" ओपन करून बघा आवडत का..." वंश बोलल्यावर धरा लगेच गिफ्ट ओपन करते...

" wow... वहिनींनी डिझाइन केला आहे..." धरा

" हो... आवडला..." वंश

" खूप... थँक्स भाई..." धरा नंतर समरला ओवाळते... समर तिला डायमंड सेट देतो...

" हे मॅचिंग आहे... म्हणजे तुम्ही दोघांनी ठरवून गिफ्ट घेतले आहेत तर... " धरा

" 🙂🙂🙂..." समर / वंश

" अंतरा ओवाळून घ्या..." अर्पिता

त्यानंतर अंतरा दोघांना ओवाळते... आणि त्याच्या समोर हात करते... समर तिला डायमंड नेकलेस देतो...

" थँक्स भाई..." अंतरा

नंतर तिने वंश ओवाळून घेतलं आणि त्याच्या समोर हात केला... वंशने दिनकरला खुणावत बॉक्स देण्यास सांगितल...

" wow... Bhai you know what... आपण डिनरला गेलो होतो... तेव्हा आम्ही वहिनींच्या रूममध्ये गेलो होतो आणि आम्हांला हा गाउन दिसला होता त्यांच्या बोर्डवर... आम्ही त्यांना विचारल होत तर त्या बोलल्या त्यांच्या क्लाइंटचा आहे..." अंतरा

" तुम्हांला आवडला ना.. मग झालं तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या वहिनी साहेबांनी चार दिवसांत रेडी केला आहे..." वंश

" really... आणि आमचा..." धरा

" तुमच गिफ्ट आधीच तयार झालं होत.." वंश

" wait... आपण वहिनी साहेबांना कॉल करूया..." अंतरा बोलत रिद्धीला कॉल लावते... पण ती रिसिव्ह करत नाही... म्हणून ती पुन्हा कॉल करते.. तरी कॉल रिसिव्ह् नाही होत...

" नाही उचलत आहेत..." अंतरा

" कदचित कामात असतील... नंतर बोला तुम्ही..." राजमाता

" थांबा... मी सिया दिं ना करते..." अंतरा सियाला कॉल करते... तिचा मोबाइल रूममध्ये होता... म्हणून अप्पू पळत रूममध्ये जाते...

" हॅलो दि..." अंतरा

" हॅलो अंतरा... एक मिनिट वेट करा... वहिनी हॉलमध्ये आहे..." अप्पू स्टेअर उतरत बोलते...

" हे घे वहिनी अंतराचा कॉल आहे..." अप्पू

" बोला ना..." सिया

" कामात आहात का..." अंतरा

" नाही ग... ओवाळणी करायची आहे ना तर रांगोळी काढत होते..." सिया

" अच्छा... ऐका ना... वहिनी ऑफिसला गेल्यात का..." अंतरा

" नाही ग... ती किचनमध्ये आहे..." सिया

" किचनमध्ये..? " अंतरा

" आज रक्षाबंधन आहे ना... तर ती रक्षाबंधन आणि भाऊबीजेला अंकित आणि विराज दादूसाठी गाजर हलवा करत होती..." सिया

" सिया रिद्धीला तयार झाली का बघ... ओवाळणीला उशीर होईल.." मंजिरी

" आई... हा हलवा टेस्ट कर ना.." रिद्धी हलव्याची वाटी मंजिरी आणि रोहिणीच्या समोर करते...

" तुझ्यासारखा गोड झालाय... " मंजिरी

" खूप सुंदर दिसते आहेस..." रोहिणी तिच्या कानामागे काजळाची तीट लावते...

" दि आम्हांला वहिनी साहेबांना पहायच आहे.." अंतरा

" मी करते तुला नंतर फोटो सेंड..." सिया

" नाही नको... आम्ही व्हिडिओ कॉल करू का... म्हणजे सगळ्यांना दिसतील इथे..." अंतरा

" ok... " सिया बोलून कॉल कट करते...

" धरा लॅपटॉप आण ना..." अंतरा

धरा जाऊन लॅपटॉप आणते... आणि सगळ्यांच्या मध्ये ठेवते... जेणेकरून सगळ्यांना दिसेल... सिया तिचा लॅपटॉप देवघरात कोपऱ्यात ठेवते... अंतराने समोरुन कॉल कनेक्ट केला... समोरचा सर्व थाट त्यांना दिसत होता... समोर एकमेकाशेजारी दोन पाट ठेवले होते...

वंश रिद्धीला बघण्यासाठी उतावीळ होता... संजना आणि जयसिंग पहिल्यांदा रिद्धीला पाहणार होते...

" यश - समीर भावोजी बसा चला ..." मंजिरी

आधी मंजिरी समीरला आणि रोहिणी यशवंतला ओवाळून घेतात...

" रिधु कुठे गेली..." यशवंत

" काकू ती रक्ष आणि वीरची वाट पाहत होती..." सिया

"रिधु चल बाळा ओवाळून घे... " मंजिरी रिद्धीला बोलावतात... मंजिरीचा आवाज ऐकून रिद्धी आत येते... तिच्या मागे रक्ष आणि वीर आत येतात...

" चल दोघांना ओवाळून घे..." मंजिरी

" हो... " रिद्धी जाऊन यशवंत आणि समीरला ओवाळते... तिची पाठ असल्याने कोणालाही तिचा चेहरा कोणाला दिसत नव्हता...

" वहिनी अशा का थांबल्या..." अंतरा

" पण या का त्या दोघांना ओवाळताय..." संजना

" आत्या साहेब ती लहानपणापासून काकांना आणि डॅडना ओवाळते... तिच म्हणणं आहे जर आपले वडिल देखील आपलं रक्षण करतात तर त्यांना का राखी बांधू नये..." सियाने लॅपटॉप इअर कॉडला जॉईन केला असल्याने तिला त्यांच बोलणं ऐकु आलं...

" चला माझं गिफ्ट द्या..." रिद्धी दोघांसमोर हात करते...

" काय हवं आहे तुला... तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत... तुझ्या आयुष्यात दु:खाची सावलीही नको यायला... संपूर्ण आयुष्य आनंदाने व्यापून टाकू देत..." यशवंत तिला भरभरुन आशिर्वाद देतात...

" बाबा तुमचे आणि पप्पांचे आशिर्वाद मिळाले ना... मग मला अजून काय गिफ्ट हवं आहे..." रिद्धी हसून बोलते...

" चला तुम्ही दोघ सेंटी होण्याआधी उठा बाबा पटकन आम्हांला भूक लागली आहे... " अंकितच्या बोलण्यावर हशा पिकतो.... 😂😂😂

यशवंत आणि समीर उठल्यावर विराज आणी अंकित येऊन बसतात... रिद्धी आधी विराजला ओवाळते... नंतर अंकितला ओवाळते... आणि दोघांच्या समोर हात करते...

" पण मी काहीच आणल नाही आहे..." अंकित

" भाई नाटक करू नकोस हं... ओवाळायला कसा बसला.. मला माझं गिफ्ट हवं आहे नाही तर तुला हलवा नाही भेटणार..." रिद्धी

" माझा हलवा कुठून आला मध्ये..." अंकित

" माझं गिफ्ट आलं कि तुझा गाजर हलवा रिटर्न येणार..." रिद्धी

" अरे बस करा... रक्ष , वीर आणि आरव बाकी आहेत अजून..." रोहिणी

" बघ ना हा मम्मी..." रिद्धीची मान थोडीशी वळाल्याने तिचा अर्धा चेहरा दिसतो...

" अंकित... दे चल तीच गिफ्ट... कशाला चिडवतो आहे तिला..." विराज

" फक्त या वर्षी रे दादू... पुढच्या राखीला ती नसणार ना इथे..." अंकित सेंटी होतो... त्याच्या बोलण्याने सगळेच भावुक होतात... रिद्धिचे डोळे देखील पाणावतात.. पण ती स्वतःला सावरते...

" मी कुठेही असुदे पण राखीला तुला लुटणार... या जन्मात तरी तुझी माझ्यापासून सुटका नाही..." रिद्धी हसत बोलते... तिच्यामुळे सगळे थोडे नॉर्मल होतात...

" हे घे. " विराज तिच्या हातात ज्वेलरी बॉक्स देतो...

" हे माझ्याकडून..." अंकित तिच्या हातात बॉक्स देतो...

" थँक्स दादू... थँक्स भाई..." रिद्धी दोघांना मिठी मारते... रिद्धी बाजूला बसते आणि अप्पू दोघं भावंडांना ओवाळते.. त्यानंतर रक्ष आणि वीर बसतात...रिद्धी दोघांना ओवाळते.. रक्ष तिला सोन्याची चैन आणि तिच्या लाडक्या बाप्पांच पेंडल देतो...

" बाप्पा... माझं बेस्ट गिफ्ट... थँक्स यार रक्षु... चल वीरू कर खिसा खाली... " रिद्धी

वीर तिच्या हातात बॉक्स देतो...

" थँक्स बडी..." रिद्धी दोघांना मिठी मारते...

" ए दि यार बास ना... तुम्ही बाजूला होऊन गप्पा मारा.. मला भूक लागली आहे..." आरव ( सियाचा भाऊ )

तिघे तिथून उठतात... सिया आरवला ओवाळून घेते... आरव तिला कांजीवरम साडी देतो...

रिद्धी मागे वळल्यावर सगळ्यांच्या नजरा तिच्यावर जातात... वंश तर फुल्ल फ्लॅट होतो... संजना आणि जयसिंगला देखील रिद्धी आवडते...

" मस्त दिसताहेत ना..." समर वंश जवळ जाऊन हळुच बोलतो...

" मग चॉईस कोणाची आहे.. " वंश

" दि वंशराजे मनिषराजे राज पुरोहित..." समर

" अंतरा रिद्धींना बघितलं आहे... जेवण करून घेऊया भूक लागली असेल ना... तुम्ही नंतर फोन करा त्यांना..." राजमता

सगळे डायनिंग रूममध्ये जातात....

पुण्यात ओवाळणी झाल्यानंतर पुरुष मंडळी हॉलमध्ये बसले होते... रक्ष आणि वीरच्या अंकित आणि विराजसोबत गप्पा सुरु होत्या...

" तुम्ही सगळे लंडन कधी जाणार आहेत..." विजय ( सियाचे बाबा )

" तिलकचा कार्यक्रम झाला कि जाऊ... तिकडे कामं रखडली आहेत... आम्ही दोघे इकडे आलो आहे तर... बिझनेस पण वाइल्ड करायचा आहे तर ते बघावं लागेल..." समीर

" म्हणजे जाण्याआधी जर सिया दोन तीन दिवस घरी आली असती तर..." विजय

" विजय अरे विचारतोय काय... घेऊन जा... दोन दिवस काय.. चांगल आठ दिवस घेऊन जा... " यशवंत

" आता मित्र जरी असलो तरी व्याही आहे मग विचारायला हवं बाबा..." विजय

" हो ना... मग व्याही म्हणून सांगतो मुलीला घेऊन पण जायच आणि येऊन सोडायच..." समीर

" 😂😂😂..." सगळे

" समीर चला जेवून घ्या... नंतर गप्पा मारा..." रोहिणी

सगळे जेवायला बसतात... महिला मंडळं नंतर बसणार होते... मंजिरीने आग्रहाने रिद्धी आणि अप्पूला त्यांच्या सोबत जेवायला बसवल...

दुपारी सिया काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली... त्यानंतर रिद्धी रूममध्ये आली... मोबाइलची आठवण आल्यावर तिने मोबाईल चेक केला...

वंशचे मिस्ड कॉल होते... त्याआधी अंतराचे मिस्ड कॉल होते... म्हणून तिने आधी अंतराला कॉल केला... तिच्यासोबत बोलून तिने वंशला कॉल केला... कॉल एंगेज्ड लागतं होता... म्हणून ती मिररसमोर जाऊन बसली आणि ज्वेलरी काढू लागली... तेव्हा तिचा मोबाईल रिंग झाला...

" आता आठवण आली तर आमची..." वंश

" सॉरी ना वंश... सकाळपासून गडबड सुरु आहे... आणि तुम्ही इतक्या दिवसांनंतर सगळ्यांना भेटणार मग माझी का लुडबुड... " रिद्धी

" एवढा जास्त समजूतदारपणा नको आहे आपल्याला..." वंश

" आता आहे तो आहे... तुम्हांला माहित आहे मी आज आजी साहेबांनी दिलेला नेकलेस घातला होता... " रिद्धी

" आम्हांला कसं माहित असणार आम्ही तुम्हांला पाहिलं नाही आहे..." वंश

" अरे हो ना... मी तुम्हांला नंतर फोटो सेंड करते... " रिद्धी

" मला तुम्हांला पहायच आहे व्हिडिओ कॉल कनेक्ट करा..." वंश

" ok wait... " रिद्धी कॉल कट करून व्हिडिओ कॉल जॉईन करते... तिला बघून वंश काही वेळ तिला पाहत बसतो...

" काय झालं... असं का बघताय...🙈🙈" रिद्धी

" आम्ही आता तिथे हवे होतो... पण चान्स मिस झाला...😉" वंश

" 🙈🙈🙈...." रिद्धी

" आता तर अजुनच सुंदर दिसते आहेस... आम्हांला तुम्ही साडीत जास्त आवडतात... " वंश

" ठीक आहे... लग्नानंतर मी रेग्युलर साडी वेअर करेल..." रिद्धी

" बघा... झेपेल ना.." वंश

" तुम्हांला आवडेल ते करायला तर मला आवडेल.." रिद्धी

" दमल्या असाल ना आज... आराम करा आता..." वंश

" परवा सगळे जयपुर येणार आहे..." रिद्धी

" ह्म्म्म... आपलं लग्न ऑफिशियल फायनल करायला... पण तुम्ही नसणार आहात..." वंश

" मी तिथे तुमच्या सोबत नसेल पण धरा व्हिडिओ कॉल करणार आहेत..." रिद्धी

" त्या बोलल्या असतीलही पण ते शक्य होणार नाही... आजी साहेबांना रीती मोडलेल्या आवडत नाहीत..." वंश

" अच्छा... मग नको..." रिद्धी

थोड्यावेळ गप्पा मारून रिद्धीने कॉल कट केला आणि चेंज करून आराम केला... संध्याकाळी एकदा अकॅडेमीला जाऊन आली...

..................

............................

........................................

" समु अग बाळा... काय हि रूमची अवस्था करून ठेवली आहेस..." अर्चना रूममध्ये प्लेट घेऊन येतात...

( समिधा आणि अर्चना लक्षात आहेत ना... सियांकितच्या लग्नात होत्या... अंकितची मावस बहीण... )

" मॉम तु जा इथून मला काही बोलायच नाही आहे...", समिधा पिलो फेकून बोलते...

" अग पण झालं काय... तु या वस्तू का फेकल्या आहेत..." अर्चना प्लेट टेबलवर ठेवतात...

" काय झालय.... माझं लाईफ बरबाद झालंय... नाही सोडणार मी तिला... नाही सोडणार...😡😡😡" समिधा ओरडून फ्लॉवर पॉट जोरात आदळते....

" तु नीट सांगशील मला...इकडे ये...इथे बस... आता नीट सांग..." अर्चना तिला बेडवर बसवतात .

" Mom don't behave like you didn't know anything... त्या रिद्धीने माझ्याकडून वंश घेतला आहे आणि आता तिलक करते आहे .... " समिधा...

" हे बघ समु मी तुला तेव्हा हि बोलले होते आणि आता पण बोलते आहे तुझं लग्न त्याच्यासोबत कधीच नाही होणार... लग्नात तु त्याच्या आजी समोर एवढी फिरली पण काय उपयोग झाला..." अर्चना

" त्या म्हतारीमुळे झालं आहे सर्व.... पण वंश फक्त या समिधाचा असणार... नाही या रिद्धीला वंशपासून दूर केली तर नाव नाही लावणार समिधा..." समिधा रागात बोलते...

" समु अगं पण..." अर्चना

" Mom shut your mouth... and go away...😡😡😡" समिधा अर्चनावर चिडत बोलते... अर्चना नाइलाजास्तव तिथून निघून जाते...

समिधा मोबाइलवर नंबर डायल करते...

" hello rocky.." समिधा त्याच्यासोबत बोलून कॉल कट करते...

" तुझी उलटी गीणती सुरु झाली... तु या लग्नाला होकार देऊन खूप मोठी चूक केली आहे मग त्याची भरपाई देखील मोठीच हवी ना... Your time has now begun...😈😈😈" समिधा कुत्सित हसते...

क्रमश:

वैष्णवी मोकासे " vaishu.... "
१८ / ०८ / २०२२