ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ४ Dilip Bhide द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ४

 भाग 4

भाग 3 वरून पुढे  वाचा .....

 

असेच काही दिवस गेले पण आता या रुटीन चा पंडितला कंटाळा यायला लागला होता. आता या चक्रातून बाहेर पडायला पाहिजे अस त्यांच्या मनाला वाटायला लागलं. बघूया अजून थोडी वाट बघू आणि मग ठरवू, असा विचार करून तो झोपायला गेला. दिवस असेच सरत होते पण आता पंडितला वाटायला लागलं की हेच करायचं होतं तर मुंबईची नोकरी काय वाईट होती. भटकंती करण्यासाठी नोकरी सोडली आणि स्वयंपाक आणि चौकीदारी करतो आहोत, ह्या कोणच्या जाळ्यात येऊन फसलो. अश्या आयुष्यासाठी नक्कीच मुंबई सोडली नाही. त्यांनी पुन्हा पुरोहितला फोन लावला, आणि आपली व्यथा सांगितली. पुरोहितने त्याचं म्हणण शांतपणे ऐकून घेतलं आणि मग समजावणीच्या स्वरात म्हणाला की

“अरे पंडित यात सुद्धा काही ईश्वरी संकेत दडला असेल. जरा धीर धर. भटकंती करायला तुला कोणी रोकलंय ? अजून तुझ्या जवळ भरपूर वेळ आहे. पैशांचाही काही प्रॉब्लेम नाहीये, जेमतेम वर्ष झालं आहे तुला मुंबई सोडून, त्यात सात महीने परिक्रमेत गेलेत. पंधरा वीस दिवस वाराणसी मध्ये, थोडी वाट पहा. बघ काय होतेय ते. शांत पणे घे सगळं. पुरोहितशी बोलल्यावर पंडितला नेहमीच बरं वाटायचं. आणि त्याचं बोलणं पण पटायचं. पुरोहित म्हणाला तसं वाट बघायचं त्यानी ठरवलं. त्यानंतर त्याला शांत झोप लागली.

सकाळी सकाळी मॅडम कोणाशी तरी बोलत होत्या. बोलणं झाल्यावर त्या पंडितला म्हणाल्या की

“येत्या रविवारी सत्यनारायणाची कथा करायची आहे. दहा बारा लोक जेवायला असतील. जमेल ना ?”

“सकाळी की संध्याकाळी ?” – पंडितनी  विचारलं.

“संध्याकाळी पांच वाजता पूजा आणि पूजा झाल्यावर मग जेवण साधारण साडे नऊ होतील.” – मॅडम.  

“चालेल. मेनू तेवढा सांगा.” – पंडित.

“पूजेला जे जे साहित्य लागतं त्यांची लिस्ट त्यांनी पाठवली आहे ती तुला देते.” मॅडम म्हणाल्या. “ते सगळं सामान घेऊन ये. अजून पांच दिवस आहेत, तुझ्या जवळ भरपूर वेळ आहे.”

“ठीक आहे मॅडम.” – पंडित.  

“आणि हो तुला प्रसाद करता येतो का ? की कोणाला तरी सांगू ?” – पंडित.

“मॅडम इथल्यासारखी पंजीरी येत नाही पण महाराष्ट्रात जसा शिरा करतात तो येतो.”

“चालेल.” मॅडमनी संमती दिली.  

रविवार उजाडला. पूजेचं सर्व साहित्य आणून झालं होतं. मेनू ठरला होता. पंडित ने सगळी पूजेची आणि स्वयंपाकाची, सर्व पूर्वतयारी पण करून ठेवली होती. पांच वाजे पर्यन्त बोलावलेले सर्व लोक येऊन पोचले होते. पण गुरुजींचा पत्ता नव्हता. येतील थोड्या वेळात असा विचार करून मंडळी गप्पात गुंतली. पंडितने प्रसाद करायला घेतला. साडे पांच पावणे सहा झाले, प्रसाद पण तयार झाला. पण गुरुजी आले नव्हते. शेवटी मॅडम ने फोन लावला. बोलणं झाल्यावर मॅडम च्या चेहऱ्यावर चीड स्पष्ट दिसत होती.

“क्या हुवा ? पंडत लेट आ रहे है क्या ?” मॅडम चा चेहरा पाहून कोणी तर विचारलं.

“नही, वो नही आ रहे है.  डायरीमे नोट करना भूल गये थे.  अभि वो किसी दुसरे कार्यक्रम मे है. सो नही आ सकते. अगले रविवार की बात कर रहे है.” मॅडमनी सर्वांना अपडेट दिलं.

“अब ? अब कया करना है ?” जमलेल्या पैकी एक बोलला.

“अब क्या, गपशप लडाएंगे, खाना खायेंगे और फिर घर लौटेंगे. That’s all.”

पाहुण्यांपैकी कोणी तरी मुक्ताफळे उधळली

“अरे शीलाजी ये पंडत लोग ऐसेही होते है. जो काम करना है वो छोड़के बाकी सब करेंगे. तुम्हारा पंडित भी सिर्फ नाम का पंडत है. कुछ काम का नही.”  

हे ऐकल्यावर पंडितला रागच आला. त्याला खुन्नस चढली. तो मॅडमना म्हणाला की “मॅडम तुम्हाला चालत असेल तर तुम्ही पूजेला बसा मी पूजा सांगतो.”

“काय सांगतो आहेस पंडित ? तुला पूजा येते ? नीट येते ?” - मॅडम.

पंडित ने आपलं जानवे काढून दाखवलं आणि म्हणाला “हो. चिंता की कोई बात नहीं.”

लोकांना मराठी जरी कळत नव्हतं तरी अर्थ कळला.

मॅडम तर नाही पण एक जोडपं मराठी होतं. ते येऊन बसले. मॅडम शेजारी बसल्या.

पंडितने या कुंदेन्दू तुषार हार धवला म्हणत सरस्वती वंदन केलं आणि पूजेला सुरवात केली. प्रथम गणेश पूजा, मग श्री सूक्त, मग अष्टद्विक पाल पूजन मग नवग्रह पूजन वगैरे झाल्यावर महीम्न झाल्यावर, विष्णुपूजन आणि विष्णुसहस्त्रनाम झाल्यावर. प्रसादाचा नैवेद्य दाखवल्यावर आशीर्वचन म्हणायला सुरवात केली. मॅडम ना पदर पसरून बसायला सांगितलं आणि सर्व लोकांना अक्षता वाटल्या आणि सांगितलं की तो जेंव्हा तिघांच्या डोक्यावर अक्षता टाकेल, त्या वेळेस सर्वांनी टाकायच्या. आशीर्वचन झालं. फळांची ओटी भरून झाली. आणि पंडितने कर्पूर गौरम आणि मंत्र पुष्पांजली म्हंटली. ती झाल्यावर पूजा संपन्न झाली असं जाहीर केलं. पंडितला आरती आणि कथा येतच नव्हती म्हणून त्यानी ती वगळून टाकली. नंतर काहीतरी सर्वांना पटेल अशी सारवा सारव करणं भाग होतं. फक्त येत नाही अस सांगून भागणार नव्हतं. पण साहजिकच सत्यनारायणाची पूजा करायची आणि आरती आणि कथा नाही हे लोकांच्या पचनी पडलं नाही. त्यांनी लगेच त्या बद्दल विचारलं. 

पंडित ज्या प्रसंगाला भीत होता तो प्रसंग समोर येऊन ठाकला होता. त्यानी धैर्य गोळा केलं आणि म्हणाला

“हम लोंग पूजा करते है अर्थात हम परमेश्वर की स्तुति करते है. स्तवन  करते है. जैसे मैने अथर्व शीर्ष पढा जो श्री गणेश की स्तुति है. श्रीसूक्त पढा जो माँ दुर्गा देवी की स्तुति है, विष्णुसहस्त्रनाम श्री विष्णुकी अर्थात श्री सत्यनारायण की ही स्तुति है. और आरती क्या है ? वो भी स्तुति है. लेकिन सब लोंग मंत्र जानते नही है इसलीये ऊनकी सुविधा के लीये प्राकृत भाषा मे आरती करनेकी प्रथा चल पडी. अब मै मराठी हूँ. मुझे  हिन्दी आरती आती नहीं है. अगर आपमेसे किसिको आती होगी तो करते है.” पंडितने विस्तृत उत्तर दिलं.  आरती कोणालाच येत नव्हती, कोणीच बोललं नाही.

“अरे पंडित कथा ? वो भी नही हुई, उसके बारेमे आपका क्या कहना है ?” – एक जण म्हणाला.

 

“ऐसा है, भगवान का नाम एक संकट कालीन दरवाजा है. इंसान जब संकट मे फसता है तभी उसको भगवानकी याद आती है. अब देखिए किसीभी दरवाजे को कबजे याने hinges रहते है. अगर उसको तेल पानी ठिकसे नहीं दिया गया तो दरवाजा जाम हो सकता है. ऐसी हालत मे दरवाजा खुलता नहीं, और बाहर निकलनेका रास्ता मिलता नहीं. इस दरवाजे का तेल पानी है पुण्य की कमाई. और ये कमाई करनेका एक तरीका है की आप आपके अच्छे समय मे भी भगवान को याद करे. न की सिर्फ संकट काल मे. सत्यनारायण की पूजा एक बहुतही सरल और सुलभ भक्ति का मार्ग है. आपने कथा पहले बहुत बार सुनी होगी. पुरातन काल मे इस पूजा के बारेमे बहुत कम लोग जानते थे. सामान्य जनता तक पहुचने के लिए साधारण तौर पर यह सार्वजनिक रूपसे की जाती थी. लोगोंके मनमे ये पूजा करनेकी इच्छा जागृत हो और बहुत असानीसे पुण्य संचय कर सके इसलिए कथा सुनानेकी प्रथा चली. तो ये कथा वास्तवमे लोगोंको जागृत करने के लिए है, अब यहाँ तो पूजा हो गई है और इसका महत्व सबको पता है. इसलिए कथा नहीं सुनाई. और चूँ की मैं रेगुलर पंडित नहीं हूँ, मुझे कथा पूर्ण रूपसे आती नहीं है.” पंडित ने पुन्हा एकदा लांब लचक भाषण दिलं.

“पंडित एक और बात समजमे नहीं आई. आपने अगरबत्ती तो जलायी ही नहीं. क्या इसके पीछे भी कोई कारण हैं ?” जमलेल्या लोकांपैकी कोणीतरी विचारलं.

“जी हाँ अगरबत्तीका मसाला बाम्बू के काड़ी पर लगाया जाता हैं.  और बाम्बू एक वर्जित वनस्पति हैं। आपने देखा होगा की शमशान मे भी जिस सीढ़ी पर मृत शरीर को रखा जाता हैं, उसको चीता मे नहीं डालते हैं। उसको तोड़ मरोड़के फेका जाता हैं. अब आपही सोचिए की जो चीज चीतामे भी चलती नहीं हैं वो पूजा मे कैसे चलेगी ? कारण का तो मुझे भी पता नहीं हैं लेकिन कुछ जहरीले वायु निकलते होंगे जो हानिकारक हो सकते हैं. हम धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी बोलते हैं. कहीं पर भी अगरबत्ती समर्पयामी बोलते नाही. सोचिए.” पंडितने उत्तर दिलं. हे सगळं बोलतांना त्यांची चांगलीच दमछाक होत होती.

थोडा वेळ सगळेच शांत होते. कोणीच काही बोललं नाही. सर्वांना बहुधा त्यांनी दिलेलं कारण पटलं असावं. मग त्यानी मॅडमना सांगितलं की सर्वांना आपल्या हाताने प्रसाद वाटप करा. त्यानंतर मॅडमनी एक लिफाफा आणला आणि म्हंटलं की पंडित दक्षिणा. पंडित ने विड्याचं पान, सुपारी पैसा आपल्या हातावर ठेवला आणि म्हणाला की “मॅडम फक्त एक रुपया दक्षिणा द्या.”

“अरे पंडित इतकी छान पूजा सांगितलीस तू, मी हजार रुपये देते आहे.” – मॅडम.  

“नको मॅडम मला फक्त एकच रुपया द्या. बाकी तुमच्या नेहमीच्या पंडित ला द्या, किंवा एखाद्या देवळाच्या पूजाऱ्याला द्या. किंवा दान पेटीत टाका.” पंडित ठामपणे म्हणाला.

“अस का?” – मॅडम.

“मॅडम हा माझा व्यवसाय नाहीये.” पंडितनी कारण सांगितलं. “मी फक्त तुमची अडचण सोडवली. दक्षिणा घेतली नाही, तर तुम्हाला याचं पुण्य मिळणार नाही म्हणून एक रुपया घेतो आहे.”

लोकांना मराठी जरी कळलं नाही तरी आशय कळला. हॉल मध्ये pin drop silence. पंडित पूजा सांगायला बसला होता म्हणून पाहुण्यांपैकी दोन बायकांनी स्वयंपाकाचा जिम्मा उचलला. जेवण झाल्यावर, श्रीवास्तव नामक एक माणूस म्हणाला की.

“पंडित हमारी समजमे ये तो आ गया की आपको आरती और कथा आती नहीं है इसलिए आपने नहीं किया. लेकिन इसके बावजूद आपने जो प्रवचन दिया वो भी अपने जगह पर सही था. लेकिन एक दो बाते और पुछनी थी, पुछू ?”

 

क्रमश:.........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.