ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ६ Dilip Bhide द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ६

Part 6

Continue reading from Part 5.............

 

One day Madam asked Pandit that how come you know so much about so many different subjects? Then the Pandit had told that he was very fond of reading so he had collected a lot of information.

And worship and mantra? When did you learn it? Many years have to be spent for it. But even after spending all these years you say that you will not become a priest, so how is this? Madam's second question.

Then the Pandit told the story of Narmada circumambulation leaving aside his job etc. One day he asked

"Pandit, why didn't you get married? Didn't anyone suggest any girls?”

“Many friends and their wives tried but failed. Probably not my wedding yoga. Then I gave up. Sadashiva alone. It's going well." The matter then stopped there.

One night Madam had a terrible dream and woke up in shock. Madam's face was turned and sweat was all over. The throat was dry. The tongue was stuck to the palate. It was like suffocation. No words came out of the mouth. A bottle of water was on the adjacent table. When he stretched out his hand to take it, the bottle fell down with a shock. The bottle must have gone under the bed with a snort because it could not be seen even with strained eyes. Tried to turn on the light by pressing the bed switch but the light was gone. Ma'am poured a lot of money to the electricity board in her mind. A call bell was set up to call Pandit but it was of no use. The leg was plastered from the knee so the leg could not bend. In the same state madam somehow got down, and sat on the ground. After sitting, I realized that she was sitting in water. Water was spilled in the bottle. After a little searching, the bottle was found. He put the bottle to his mouth like an adhasha. There was barely two teaspoons of water in the bottle. Thirst was not quenched but dryness was quenched. It was not possible to get up, so they remained sitting like that. Even they did not know when they were lying on the ground.

सकाळी पंडित त्यांच्या खोलीत चहा घेऊन गेला तेंव्हा मॅडम जमिनीवर झोपल्या होत्या. पंडितला वाटलं की त्या पलंगावरून पडल्या आणि बेशुद्ध झाल्या आहे. त्यानी जोरजोरयात हाका मारल्या आणि चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला. मॅडम जाग्या झाल्या. आणि उठून बसल्या. चेहऱ्यावर अत्यंत त्रासिक भाव होते. एक क्षणही न घालवता त्यांनी पंडित वर आग ओकायला सुरवात केली. पंडित चुपचाप काही न बोलता उभा होता. पांच मिनिटानंतर त्यांचा राग शांत झाला. मग म्हणाल्या की “नुसता शुंभा सारखा, बघत काय उभा राहिलास, मला उठायला मदत कर, मला पलंगावर बसायचय.”

नंतर पंडित ने त्यांना चहा बिस्किटे दिली. चहा प्यायल्यावर मॅडम नेहमीच्या मूड मध्ये आल्या.

“काय झालं मॅडम खाली कशा पडल्या ?” पंडितने विचारलं.

मग मॅडम नी सगळी कथा सांगितली. आणि म्हणाल्या की

“पंडित तू आत्ताच शेजारच्या खोलीत शिफ्ट हो. काल रात्री इथे असतास तर आवाज ऐकून तू आला असतास. आणि पुढचं रामायण टळलं असतं.” 

“पण मॅडम माझ्यासारख्या नोकर माणसाने घरात राहणं म्हणजे लोकांना बोलायला संधि देण्या सारखं होईल.” – पंडितने आपली शंका बोलून दाखवली.

“तुझ्या अंगाला भोकं पडतील ?” मॅडमनी विचारलं.

“नाही.” – पंडितनी काही न समजून उत्तर दिलं.

“मग माझं मी बघून घेईन. तू चिंता करू नकोस. आणि पंडित, एक तरी  असा प्रसंग सांग की, जेंव्हा मी तुला नोकरा सारखं वागवलं आहे ?” – मॅडम

“नाही मॅडम,” पंडित म्हणाला. “तो तुमचा मोठेपणा आहे. पण लोकांच्या दृष्टीने हे विचित्र आहे.”

“माझी सोय बघायला लोक येणार आहेत ? नाही ना, मग मी सांगते तस कर. शेजारच्या रूम मध्ये शिफ्ट हो. त्या रूम मध्ये सगळी सोय आहे. तुला काहीच त्रास होणार नाही.” – मॅडमनी निर्णय दिला.

“ठीक आहे मॅडम.” पंडितने नाईलाजाने मान तुकावली.

सव्वा महिना झाला आता चार दिवसांनी प्लास्टर निघायचं होतं. त्या दिवशी रात्री बेडपॅन ची गरज लागली. रात्रीचे अकरा वाजले होते आणि बाई तर निघून गेली होती. आता काय करायचं ? मॅडम आणि पंडित दोघेही संकटात सापडले. थोडा वेळ तसाच गेला. पण आता मॅडम ना असह्य व्हायला लागलं होतं. शेवटी पंडितला त्यांच्या कडे बघणं कठीण झालं. तो म्हणाला

“मॅडम प्राप्त परिस्थितीतून सुटका करून घेण्याचा एकच मार्ग मला सुचतो आहे. तुम्ही संकोच बाजूला ठेवा. मी बेडपॅन देतो. मी कोणाला काही सांगाण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही पण सांगू नका आणि विसरून जा.”

मॅडमचा चेहरा शरमेने काळवंडून गेला. पण दूसरा उपाय त्यांना पण सुचत नव्हता शेवटी त्यांनी नाईलाजाने मान डोलावली.

दुसऱ्या दिवशी पंडित चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेला तेंव्हा मॅडम म्हणाल्या की

“पंडित मला खूप लाज वाटते आहे. काल तुला माझी नको ती सेवा करावी लागली. काय करू मी ? सॉरी.”

“मॅडम प्रसंग सगळ्यांवरच कधी ना कधी येत असतात. त्यांची वाच्यता न करणेच श्रेयस्कर. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ.” पंडितने त्यांना आश्वस्त केलं.  

महिना भरानंतर मॅडमनी पुन्हा बँकेत जायला सुरवात केली. मॅडम ड्राइव करणं शक्यच नव्हतं. त्यांनी मैत्रिणीला, विशाखाला फोन केला की कोणी रिक्शा वाला आहे का जो ने आण करेल. ती चौकशी करते अस म्हणाली. पण मग म्हणाली की “पंडितलाच विचार, त्यानीच तुला दवाखान्यात नेलं होतं त्या दिवशी.” मॅडम ला पण आठवलं, त्यांनी पंडितला विचारलं आणि पंडित हो म्हणाला. आता पंडितची धावपळ  सुरू झाली. सकाळी लवकर उठून आंघोळ आटपून स्वयंपाक करायचा ,डबा भरायचा आणि मॅडमला बँकेत सोडून यायचं. संध्याकाळी पुन्हा घ्यायला जायचं. आल्यावर चहा नाश्ता मग रात्रीच्या जेवणाची तयारी सगळं आटपायला रात्रीचे अकरा वाजायचे. दिवस भराभर जात होते. विचार करायला फुरसत नव्हती. एक दिवस बँकेतून येतांना मॅडम जरा वैतागलेल्या दिसल्या. नेहमीची प्रसन्न मुद्रा नव्हती.

घरी आल्यावर त्याने चहा देता देता विचारलं. “काय झालं मॅडम चेहरा जरा उतरलेला दिसतोय ? काही प्रॉब्लेम आहे का ?”

“या मेडीक्लेम चा काही तरी घोळ झालेला दिसतोय. काय करावं समजत नाहीये. मी हे पहिल्यांदाच करते आहे, म्हणून गोंधळ उडाला आहे.” मॅडमनी सांगितलं.

“काय झालं काय पण ?” – पंडित.

मग मॅडमनी काय झालंय ते सांगितलं आणि म्हंटलं “म्हणून क्लेम मिळत नाहीये. पण तू का विचारतो आहेस ? तुला काही कळतंय का त्याच्यातलं ?”

पंडित नी काही न बोलता त्यांच्या ऑफिस मध्ये फोन लावला. पंडितचा फोन आला म्हंटल्यांवर सर्वांनाच बोलायचं होतं. अर्धा तास सगळ्यांचं समाधान करण्यात गेल्यावर  मग पंडितनी मॅडम चा प्रॉब्लेम सांगितला  आणि क्लेम सेट्टल करता येतो का ते पहायला सांगितलं. पंडित जवळ जवळ तासभर अस्खलित इंग्रजी मध्ये अधिकारवाणीने बोलत होता आणि मॅडम त्यांच्याकडे चकित नजरेने पहात होत्या.

क्रमशा:...........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

If you like my writing, please share and follow.