गुंजन - भाग ७ Bhavana Sawant द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुंजन - भाग ७

भाग ७.

"तुम्ही, इथं झोपा माझ्याजवळ." गुंजन हट्ट करत म्हणाली. कारण तिला वाटलं वेद सोफ्यावर जाईल झोपायला? याचा विचार करून ती म्हणते. वेद हसूनच तिच्या बाजूला पडतो. गुंजन खुश होऊन त्याच्या बाजूला झोपायला जात असते की, तेवढ्यात तिचा फोन वाजतो. तशी ती फोनवरच नाव पाहते आणि ते पाहून तिच्या कपाळावर आठ्या उमटतात.कारण नाव तिच्या वडिलांचे झळकत होत. ती तसाच फोन बाजूला ठेवत असते की, तेवढ्यात वेद तिच्या हातून फोन घेतो.


"गुंजन, मी असताना तुला घाबरायची गरज नाही. कारण मी बोलणार आता यांच्यासोबत." वेद अस बोलून तो कॉल उचलतो. तो काही बोलणार तर पलीकडून बोलणं सुरू होतो.


"काय ग अवदसे? तिथे जाऊन पण माती खाल्ली का?घरात बंद केलं, तर बाहेर जाऊन सासरच्या लोकांचे नाव बदनाम करायला लागली तू? तुझं थांबवलं नाही हे सगळं तर तंगड मोडून ठेवेन तुझं" एक व्यक्ती भयंकर रागात चिडून तोंडाला येईल ते बोलत असतो. ते बोलणं ऐकून वेदच्या चेहरा लाल होतो. डोळ्यात अंगार फुलतात.


"मिस्टर भूषण विखे- पाटील, तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलत आहात ना? ती माझी बायको गुंजन वेद जाधव आहे. माझ्या बायकोबद्दल वाईट बोलणाऱ्या लोकांचे मी काय हाल करतो ना? हे लवकरच कळेल तुम्हाला. माझी बायको रस्त्यावर पडलेली मुलगी नाही आहे जे तुम्ही अस बोलत आहात? ती एका भारतातील फेमस उद्योगपतीची बायको आहे. त्यामुळे बोलताना मॅडम हा शब्द उच्चारला गेला पाहिजे तुमच्याकडून"वेद रागातच पण तितक्याच शांततेत मॅडम शब्दावर जोर देत म्हणाला. त्याचा आवाज ऐकून पलीकडे शांतता पसरते.


"जावई, तुम्ही? आम्हाला आमच्या मुलीसोबत बोलायचे आहे" भूषण विखे-पाटील(गुंजनचे बाबा) शांततेत म्हणाले.


"ती तुमची मुलगी नाही राहिले मिस्टर विखे-पाटील. ती आता गुंजन वेद जाधव आहे. त्यामुळे पुन्हा तिच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करू नये. परिणाम वाईट होतील"वेद अस बोलून फोन कट करतो. तो स्वतःला शांत करण्यासाठी एक मोठा श्वास घेतो.


"आय स्वेअर गुंजन, हे जर तुझे वडील नसते ना? तर आज नक्कीच मी यांना सोडलं नसत. अश्या घरात तू राहिली? जिथं तुला थोडी देखील किंमत नाही. का तर तू मुलगी होती म्हणून? गुंजन , आता तुला काहीच कमी पडू देणार नाही हा वेद जाधव. तुझे लाड करायला, तुला स्वप्न पाहायला देणार मी. तसच त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मदत देखील करणार आहे मी."वेद तिच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला.


"जाऊ दे, ना मी विषय सोडला त्यांचा. मला आता तुम्ही आणि माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. बाकी जास्त काहीच नको" गुंजन म्हणाली. तसा तो तिला पाहतो.


"ओके, तू सोडला ना? मग ठीक आहे. आता मला बाजूला घ्या बोलली झोपायला आणि आता स्वतःच अशी दूर पळत आहेस?"वेद बेडवर पडून नाराज होत म्हणाला. तो उगाच बेडच्या एका कोपऱ्याला सरकुन दुसरीकडे पाहून झोपतो. तो डोळे बंद करून शांत पडलेला असतो की, तेवढ्यात त्याच्या पोटाभोवती कोमल असा मुलायम स्पर्श होतो. तसा तो गालात हसतो. पण काहीच तस चेहऱ्यावर न दाखवता झोपुन राहतो. गुंजन हळूच त्याच्या अंगावर चढून मुद्दाम त्याच्या समोर जाऊन कुशीत शिरते. एखाद्या मांजरीच्या पिल्लासारखी!!तसा तो गालात हसून तिच्या भोवती हातांचा विळखा घालतो. पडली बिडली खाली तर? या विचाराने.


"गुंजन, सरळ झोप बघू. असे नखरे नाही चालणार"वेद थोडस खोटं खोटं चिडत बोलतो.



"नवरा जर नखरे झेलणारा असेल, तर करायला काय हरकत आहे ना?"गुंजन अस म्हणून त्याच्या छातीवर स्वतःच डोकं ठेवून डोळे बंद करते. तो हसूनच तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो.


"वेडी, झाली आहे तू!! बट, मला अशीच गुंजन पाहायला आवडेल" वेद गालात हसत म्हणाला. तो तसाच तिला जवळ घेऊन झोपी जातो.


आता गुंजन आणि वेद सोबत असल्याने त्यांचं प्रेम दिवसागणिक वाढतच जात होतं. हळूहळू फुलत होते दोघांचे प्रेम. वेदने तिला थोडस फ्री ठेवल्याने. ती हळूहळू सगळं काही शिकत होती. नाही जमल घरातील तरीही वेद तिचं कौतुक करत असायचा आणि तिला प्रोत्साहन देत असायचा. त्यामुळे ती हळूहळू घरातील काम पण शिकत होती. पिंजऱ्यातील बंद पक्षीला जसे बाहेर काढल्यावर तो स्वतंत्र होऊन आकाशात पंख फडफडून उडायला लागतो ना? तसेच काहीसे गुंजनच झालं होतं!! वेद तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असायचा. वेदने बिझनेस मध्ये असताना स्वतःची वेगळी अशी कंपनी त्यावेळी उभी केली होती आणि आता तो त्याच कंपनीला सांभाळत असायचा. त्याने गुंजनला निवडल्याने त्याच्या वडिलांनी पूर्ण त्याच्या नावावर असलेली प्रॉपर्टी आपल्या मुलीच्या नावावर केली. वेदने काही न बोलता गपचूप सही करून त्यांना ती प्रॉपर्टी देऊन टाकली.कंपनी त्याच्या घरच्या लोकांच्या हातात जाताच कंपनी हळूहळू लॉस मध्ये जायला लागली. कारण मायराला म्हणजे वेदच्या लहान बहिणीला काही ज्ञान नसल्याने ती कोणतीही डील घेत होती आणि साइन करून मोकळी होत असायची. या उलट, वेदच्या कंपनीने मार्केट मध्ये येऊन आपला जोम चांगल्या प्रकारे बसवला होता. वेदची सुरुवात ज्या नावपासून होते, तेच नाव त्याने कंपनीला दिलं होतं. ते नाव होतं "गुंजन".

गुंजनचा पहिला व्हिडीओ बऱ्याच प्रमाणात वायरल झाल्याने तिच्या फॅन्सनि आणखीन व्हिडिओची मागणी केली. मग वेदने घरीच कॅमेरामनला बोलावून घेऊन तिला चांगलं तयार करून सेकंड व्हिडीओ पण तिचा अपलोड केला. गुंजन चॅनल आणि गुंजन कंपनी पूर्ण भारतात प्रसिद्ध होत होते. वेदने बिलकुल तिला तिचा डान्स थांबवायला दिला नाही. रोज ती साधारण तीन तास प्रॅक्टिस करत असायची आणि तिच्या डान्समध्ये वेगवेगळे आविष्कार करत असायची. जस की कथक मध्ये, हिप हॉप मिक्स करून एकदम शांतपणे आणि बेंधुंद होऊन नाचणे, असे बरेच प्रकार तिने स्वतःचे तयार केले होते. लोक तिच्या एक्सप्रेशन वर फिदा होत असायचे. पण काही लोकांचा मात्र गुंजन नावामुळे जळफळाट होत होता. पण इकडे गुंजन आणि वेद मात्र आपले जीवन एन्जॉय करत असतात.


"वेद, हे बघा काय आलं? कोणी पाठवलं असेल बर?"गुंजन एक पार्सल हातात घेऊन येत म्हणाली. तिच्या हातात पार्सल पाहून वेद लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि उठून तिच्याजवळ जातो.



"अरे, हे तर यु ट्यूब कडून आलं आहे. बघू काय आहे यात?" वेद अस म्हणून ते पार्सल ओपन करतो. तो त्यातील बॉक्स काढतो आणि खुशीतच त्यावर हात फिरवतो. गुंजन विचित्र नजरेने त्याला पाहत असते.




"हे, तुझ्या कलेच पहिल अवॉर्ड आहे गुंजन. यु ट्यूब कडून सिल्व्हर प्ले बटन अवॉर्ड आलं आहे तुझ्या चॅनेलसाठी" वेद खुश होत म्हणाला.



"व्हॉट? सिल्व्हर प्ले बटन अवॉर्ड? हे कसलं अवॉर्ड झालं?" गुंजनला न कळल्याने ती म्हणाली.


"अग, तुझ्या चॅनेलच १ लाख सबस्क्रायबर झाले ना पूर्ण त्यामुळे मी त्यांना इमेल केला मागे. मग त्यांनी हे अवॉर्ड पाठवलं तुला. तुझा चॅनल रातोरात फेमस झाला आणि तू पण त्यामुळे आता असलं अवॉर्ड तुला मिळत राहतील." वेद तिच्या हातात ते प्ले बटन देत म्हणाला. त्याचे म्हणे ,ऐकुन गुंजन खुश होते आणि त्या अवॉर्ड वर हात फिरवते. "गुंजन" नाव त्यावर असत. ते पाहून टचकन तिच्या डोळ्यांत पाणी भरत. पण हे, आनंदाश्रू होते. तिच्या मनातील भावना वेदला कळतात. तसा तो एका हाताने तिला जवळ घेतो.



"ही सुरुवात आहे. गुंजन हे नाव माझ्या आयुष्यातील स्पेशल अस नाव आहे. आपली कंपनी पण मार्केट मध्ये चांगल्या प्रकारे फेमस होत आहे. काही दिवसांनी तू देखील स्वतःच अस साम्राज्य निर्माण करशील" वेद तिचे डोळे पुसत म्हणाला.


"मला काहीच नको फक्त माझ्यासारख्या ज्या मुली आहे ना ज्यांना डान्सची इच्छा आहे पण पूर्ण करू शकत नाही, त्यांच्यासाठी एखादं स्कुल काढायच प्रयत्न करायला आवडेल मला."गुंजन हळू आवाजात म्हणाली.


"बस्स एवढंच? करशील तू लवकरच पूर्ण." वेद हसून म्हणाला. ते दोघे अस मस्त खुश होऊन बोलत असतात की तेवढ्यात एक व्यक्ती त्यांच्या घरात प्रवेश करते.



"मिस्टर वेद जाधव, तुम्ही आम्हाला फसवलं आहे. आम्ही तुमच्यावर केस टाकू" ती व्यक्ती तावातावतच बोलते. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून गुंजन दचकते आणि मागे वळून पाहायला लागते.


"तुम्ही इथे?"गुंजन शॉक मध्येच थोडीशी घाबरून विचारते.



"या या मिस्टर विखे-पाटील. अरे, आमदार ना तुम्ही. मग हळू आवाजात आदराने बोललं पाहिजे"वेद गुढपणे हसत म्हणाला.


"चूप. एकदम चूप!! आम्हाला फसवून आमच्या मुलीसोबत तुम्ही लग्न केलं आहे."विखे-पाटील रागातच म्हणाले.



"मिस्टर वेद जाधव यांचे असे म्हणणे आहे की, तुम्ही यांच्या मुलीवर जबरदस्ती केली आणि हे लग्न केल आहे"एक पोलीस ऑफिसर तिथं येत म्हणाला.त्यांचे ते म्हणे ऐकून गुंजन वेदकडे पाहते. तो डोळयांनीच तिला शांत राहायला सांगतो.




"ऑफिसर, हुंडा घेणे हे चुकीचे आहे ना?"वेद शांतपणे विचारतो.



"हो, हुंडा घेणे चुकीचे आहे. हुंडा मागणाऱ्या लोकांवर कारवाई होऊ शकते"ऑफिसर देखील त्याला उत्तर देत म्हणाला.




"ओके, मग ऑफिसर या मिस्टर आमदार विखे- पाटलांनी माझ्याकडून हुंडा मागून घेतला. कारण माझं आणि गुंजनच एकमेकांवर भरपूर प्रेम होतं हे यांना कळलं होतं. त्यामुळे यांनी हुंडा मागितला" वेद थोडस एक कटाक्ष गुंजनच्या बाबांकडे टाकत म्हणाला.त्याच बोलणं ऐकून गुंजन आणि तिचे बाबा भलतेच शॉक होतात.



"हे, खोटं आहे. यांनी स्वतःहून आम्हाला प्रोजेक्ट आणि आठ कोटी दिले होते" गुंजनचे बाबा वेद कडे पाहून बोलतात. ते बोलणं ऐकून वेदच्या चेहऱ्यावर भलीमोठी स्माईल येते.



"आमदार साहेब, तुम्ही अस वागलात? हुंडा घेतला मुलीसाठी? आम्ही या साठी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर तुमच्यावर कारवाई पण होईल"पोलीस ऑफिसर थोडेसे त्यांच्या कडक आवाजात म्हणतात.


"मी हुंडा... नाही... नाही घेतला...माझी मुलगी खर काय ते सांगेल" गुंजनचे बाबा ततपप करत बोलतात.


"ऑफिसर, माझं आणि वेदच एकमेकांवर भरपूर प्रेम होत. पण माझ्या बाबांना वेद आवडत नव्हता. त्यामुळे त्यांनी लग्नासाठी म्हणून त्यांच्याकडून हुंडा मागितला. यांनी नकार दिला तर यांना धमकी दिली, दुसऱ्या मुलासोबत लग्न करून देणार याची. त्यामुळे यांनी सगळं काही केलं माझ्यासाठी. आता रोज हे आमदारसाहेब, फोन , मॅसेज करून मला धमकी देत असतात. माझ्या नवऱ्याला मी सोडलं नाही तर ते आम्हाला सुखाने जगू देणार नाही याची. हा बघा, माझा फोन आणि हे मॅसेज" गुंजन थोडीशी धीट होऊन आपला मोबाईल ऑफिसरला दाखवत म्हणाली. तिचं म्हणणं आणि वागणं पाहून तिचे बाबा भलतेच शॉक होतात. कारण गुंजन आजवर कधीच अशी पटकन कोणासमोर बोलली नव्हती. पण आज मात्र , पुढे येऊन तिने वेदची बाजू सांभाळली. हे पाहून ते तिला पाहत राहतात.


आज जी मुलगी पाहत होते ती त्यांना अनोळखी अशी भासत होती. कारण आताची गुंजन न घाबरता एकदम प्रोफेशनली पोलिसांसमोर पुरावे दाखवत बोलत होती. पण आताची गुंजन ही फक्त वेदची गुंजन असल्याने ते काहीच बोलत नाही तिला.


"ऑफिसर, मी यांना आठ कोटी आणि प्रोजेक्ट बद्दल देतो म्हणालो, पण मला ते पटत नसल्याने मी माझं हाईड पेन वापरून सही केली. त्या पेनचा वापर केला की, आपण त्या पेनने लिहलेले फक्त बारा तासासाठी राहत नंतर ते आपोआप गायब होत. त्यामुळे मी ते वापरले. म्हणूनच आता हे इथे येऊन असा तमाशा करत आहे" वेद शांतपणे पॉकेट मध्ये आपला हात ठेवत बोलतो. त्याच बोलणं ऐकून गुंजनच्या बाबांना कळून चुकत की, ते आता त्यांच्याच प्लॅन मध्ये पूर्णपणे फसले गेले आहेत. कारण आता गुंजनने देखील तिची बाजू मांडली होती आणि वेदने पण डाव पलटवला होता.

वेद पक्का बिझनेसमन होता!! त्याला कुठे काय बोलायचं आणि करायचं हे बरोबर माहिती होत. त्यामुळे तो एकटाच गुंजनच्या बाबांना हँडल करणार असता. पण यात गुंजनने देखील मध्ये येऊन बाबांच्या विरुद्ध बोलली हे ऐकून त्याला शॉक बसला होता आणि थोडासा तिचा राग पण येत होता. कारण मॅसेजबद्दल तिने त्याला काहीच सांगितले नव्हते यामुळे.ऑफिसर सगळ्यांची बाजू ऐकून गुंजनच्या बाबांच्या हातात बेड्या घालतात आणि त्यांना तिथून घेऊन जातात. गुंजन त्यांना जाई पर्यंत पाहत असते. पण ती काहीच त्यांना बोलत नाही. तिच्या मनात राग होता तिच्या घरच्यांबद्दल. पण आज थोडासा तो शांत झाला होता.



"गुंजन$$$, हे सगळं तुझे बाबा करत होते? तरीही तू मला का बोलली नाही?"वेद चिडून विचारतो. तशी ती शांत त्याच्यासमोर उभी राहते.
.
.
.
.
.
.
क्रमशः
---------------------