गुंजन - भाग १२ Bhavana Sawant द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुंजन - भाग १२

भाग १२.

वेदने गुंजनला काही सांगितले नव्हते, तो येणार आहे वगैरे? तिने कामच अस केलं होतं की, त्याला येणं भागच पडले होते. वेदच प्लेन मध्यरात्री दिल्लीत पोहचते. तसा तो तिथून त्याच्या बिझनेस फ्रेंड्सला कॉन्टॅक्ट करून गाडी पाठवायला सांगतो. काहीवेळात वेदला घ्यायला एक मोठी महागडी अशी ब्लॅक कार येते. तसा वेद त्याची चौकशी करून आतमध्ये बसतो.



"सर, आप ड्राईव्ह करेंगे क्या?" त्या कारचा ड्रायव्हर शॉक मधून विचारतो. कारण वेद ड्रायव्हिंग सीटला बसला होता. हे पाहून तो विचारतो.


" हां!! आप को मैं आपके घर छोड देता हूं। क्योकी मुझे दिल्ली के सारे रास्ते पता हैं और अकेले घुमना पसंद हैं। इसलीए मैं अकेले लेकर जाऊंगा कार। आप को छोड देता हूं।" वेद काहीसा स्मित करत म्हणाला. त्याच ऐकून तो ड्रायव्हर शांत होतो.



"सर आप जाईए। मैं बाद में काम कर के निकलता हूं।"ड्रायव्हर स्मित हास्य करत म्हणाला. तसा वेद आपली चावी लावून तिथून ती गाडी स्टार्ट करून गुंजनच्या हॉटेलला जायला निघतो.



काहीवेळाने वेद गुंजन ज्या हॉटेलवर राहिली होती. तिथं तो पोहचतो. तो हॉटेलच्या मॅनेजर कडून त्या रूमची एक्स्ट्रा असलेली किज घेतो आणि तसाच गुंजनच्या रूमकडे जाऊन तिची रूम हळूच आवाज न करता उघडतो. तो आपली बॅग ठेवतो आणि तसाच दबक्या पावलांनी आत शिरतो. गुंजन त्याला बेडवर पालथी झोपलेली दिसते. तसा, तो गालात हसतो.




"ही कधीच सुधारणार नाही आहे!!"वेद हसूनच तिच्या बेडवर बसत म्हणाला. तो अलगद तिच्या डोक्यावर हात फिरवतो.




"हुं...स्वप्नांत पण येऊन असच करतात तुम्ही"ती डोळे बंद करतच म्हणाली.आता मात्र तिचे ते बोलणे ऐकून तो शॉक होतो.



"गुंजन, मी आलो आहे"तो तिला हलवत म्हणाला. तिला काही कळत नाही म्हणून ती कुस बदलून पुन्हा झोपी जाते. तसा वेद कपाळावर हात मारतो. नंतर पुन्हा एकदा तो तिला आवाज देऊन उठवायचा प्रयत्न करतो. पण यावेळी मात्र त्याचा प्रयत्न सफल होतो. मात्र, गुंजन त्याला समोर पाहून भयंकर शॉक होते. ती डोळे मोठे करून त्याला पाहत राहते.




"अहो, तुम्ही....एवढया रात्रीच?"गुंजन स्वतःला शांत करत विचारते.






"मॅडम तुम्ही ,गोंधळ घातला ना मंगळसूत्रावरून ? तो निस्तरायला आलो आहे मी" वेद शांतपणे म्हणाला.



"म्हणजे काय करणार तुम्ही?"गुंजनला न कळल्याने ती विचारते. तसा वेद तिच्याजवळ जातो.





"हे, मंगळसूत्र काढून घेऊन जाणार मी. तसही आपलं नातं कुठे नवरा बायकोचे आहे ना? ते फक्त बाहेरच्या लोकांसाठी आहे. खऱ्या मध्ये तर आपण मित्र मैत्रिण आहोत" वेद शांतपणे बोलतो. त्याच बोलणं ऐकून ती थोडीशी चिडते.



"अहो, अस काय बोलतात तुम्ही?? मागेच तर मी बोलली ना तुम्हाला आणि किस..."गुंजन बोलता बोलता थांबते.



"आणि काय किस? तू कुठे बोलली पण प्रेम करते म्हणून?"वेद आता विचार करून बोलतो.





"किस नवऱ्याला करतात. हे तुम्ही विसरलात काय?मग तरीही तुम्ही अस कस बोलू शकतात? प्रत्येकवेळी मी तुमचा आदर करते आणि तुमच्या वर प्रेम करायला लागते. तरीही तुम्ही अस म्हणतात, की आपलं मैत्रीचे नाते आहे? अस बोलूच कस शकतात तुम्ही?"गुंजन धीर एकटवून त्याच्या जवळ बसत म्हणाली.




"अरे, फॉरेन कंट्रीत कोणाला पण किस करतात मुली आणि मुलं"वेद आता तिला छेडत बोलतो. कारण तिचं छोटसं नाक रागाने लाल झालं होतं. हे पाहून त्याला आता तिला छळायला आवडत. गुंजन त्याच ऐकून बाजूची बेडवरची उशी हातात घेते आणि ती धरूनच त्याला मारायला लागते.




"मी तशी मुलगी वाटली का तुम्हांला?काहीपण बोलतात हा तुम्ही. जावा तुम्ही इथून मला बोलायच नाही आता तुमच्यासोबत"गुंजन उशी त्याच्याकडे फेकत म्हणाली. ती तशीच बेडवर जाऊन झोपते. वेद मात्र हसून तिला पाहतो आणि तिच्याजवळ जाऊन पडतो.



"सॉरी, बाबा!! आता तर लव्ह यु बोल!!"वेद हसूनच तिला एका हाताने जवळ घेत म्हणाला.त्याने अस जवळ घेतल्याने ती रागातच त्याच्या हाताला चावत असते, पण तरीही वेदवर त्याचा काहीच परिणाम होत नाही.वेद हसूनच तिला आपल्याकडे वळवतो.




"हक्क गाजवत असते. पण आय लव्ह यू म्हणत नाही" वेद हसूनच तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवत म्हणाला.त्याच्या अश्या वागण्याने ती गालात हसते. गुंजन त्याच्या पोटाभोवती स्वतःच्या हातांचा विळखा घालते आणि सरळ जाऊन त्याच्या छातीवर डोकं ठेवते. वेद शांत राहून फक्त तिला पाहत असतो.




"कधी कधी प्रेम हे आय लव्ह यू न म्हणता पण कृतीतून दाखवूच शकतो की, आपल्या जोडीदाराला",गुंजन हसून म्हणाली.



"हां, पण कधी कधी बोलावे पण. समोरच्याला कळेल ना?" , वेद म्हणाला.



"तुम्हांला कळलं नाही का माझं मन? मी तुमच्यापासून दूर न जाण्यासाठी इथं येत नव्हती. कारण मला तुम्ही आवडायला लागला होतात. आता पण तुमच्यापासून दूर झाली तरीही मन अस्वस्थ होत असत. स्वप्नांत पण तुमचाच विचार येत असतो सारखा सारखा. एवढं प्रेम करते मी तुमच्यावर की , मला त्याला आय लव्ह यू या तीन शब्दांत बसवायला नाही जमत. सारख सारख ते म्हणायला देखील आवडत नाही. तुम्ही समजून घ्या ना मला.", गुंजन प्रेमाने बोलते.




आज मनापासून थोडीशी मनमोकळी होऊन ती त्याच्यासोबत बोलत होती. तिचं बोलणं ऐकून वेद मनातच भरपूर खुश होतो. ज्या व्यक्ती वर तो मनापासून प्रेम करत होता!!ती व्यक्ती आता त्याच्यावर देखील प्रेम करायला लागली. याचा विचार करूनच त्याचे ओठ रुंदावतात.



"अहो, तुमच पहिल्या रात्रीचे स्वप्न माझ्यामुळे खराब झाले ना तेव्हा? मग आपण आता करू या का?", गुंजन बाजूला होत लाजत बोलते. तसा वेद तिच्या कंबरेत हात घालून तिला जवळ घेतो.



"गुंजन अस घाई अजिबात करायच नाही प्रत्येक गोष्टीत. अजून वेळ आहे त्या सगळ्याला. कोण बोलले माझे असे काही विचार होते वगैरे? ते जर असले असते ना तुला न विचारता बेडवर झोपवून मी माझं स्वप्न पूर्ण केलं असत. पण मला अस कधी वाटत नाही. हळूहळू छोट्या गोष्टीतुन जोडीदाराला आनंदी ठेवावे. त्याचा आदर करावा. असेच मला वाटते. प्रणय क्रीडा ने नातं वाढत, हे म्हणणं चुकीचे आहे. आधी एकमेकांना समजून घेऊन, त्यांच्या आवडी निवडी पाहून , एकमेकांवर भरपूर प्रेम झाल्यावर पुढच्या स्टेप्स घेतल्या तर दोघांचे नाते आणखीन बहरते.", वेद तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला.



"किती भाग्यवान आहे मी तुमच्या बाबतीत? हे मी तुम्हांला नाही सांगू शकत वेद. तुम्ही रिअल जेंटलमन आहात!!", गुंजन त्याला मिठी मारत बोलते. तसा वेद हसून तिच्या भोवती हातांचा विळखा घालतो.




"वेडी!! काहीपण विचार करते. मी तुला हळूहळू फुलवेन. मला घाई नाही आवडत ", वेद हसूनच तिच्या केसांवर किस करत बोलतो. तो तिला तसाच अंगावर घेऊन खालून ब्लँकेट ओढून घेऊन दोघांना कव्हर करून गपचूप बसतो. गुंजन सुखाने आणि बिनधास्त पणे त्याच्याजवळ राहून त्याला अनुभवत असते.



"वेद, मी मंगळसूत्र वरून बोलली त्या लोकांना कारण मला हे खूप प्रिय आहे. माझं लग्न झालेलं आहे आणि मी तुमची बायको आहे. हाच विचार आतून समाधान देऊन जातो. हे मंगळसूत्र दूर झालं की माझं मन अस्वस्थ होत. त्यामुळे मी हे काढणार नाही.", काहीवेळ शांततेत जाताच गुंजन हळू आवाजात त्याला म्हणाली.



"हम्म. मी बघेन उद्या. ", वेद डोळे बंद ठेवूनच म्हणाला.



"थँक्यू, अहो."ती प्रेमाने बोलते आणि हसूनच थोडीशी वर होऊन त्याच्या डोळ्यावर स्वतःचे ओठ टेकवते. वेदला हल्ली तिच्या अनपेक्षित वागण्याची सवय झाली होती. त्यामुळे तो तिला काहीच बोलत नाही. गुंजन एक छोटासा किस, त्याच्या ओठांवर करते आणि तशीच त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपून जाते.




"अति रोमँटिक झाली आहेस तू. पण आज मी खूप खुश आहे आपल्यासाठी. आज माझी गुंजन माझ्या खूपच जवळ आली आहे.", वेद मनातच बोलतो आणि तसाच तिला बेडवर व्यवस्थित झोपवून तिला कडल करून झोपी जातो.


वेदने कधी तिच्यावर आपले मत लादले नव्हते. ना की तिला कोणत्याही गोष्टीला "नाही" म्हटले होते. तिला हवं तसं वागू द्यायचा तो, कारण तिच्यावर भरपूर विश्वास होता त्याचा. गुंजन साधी, सरळ मुलगी होती. हे, त्याला कळून चुकले होते. त्यामुळे तो तिला मोकळं ठेवत असायचा. आज त्याच्या अश्या वागण्यानेच गुंजन त्याच्या प्रेमात पडून, त्याच्यावर हक्क गाजवत होती. तो वेगळा होता इतरांपेक्षा!! मुलांसबंधीचे तिच्या मनात असलेले विचार वेदच्या बाबतीत मात्र खोटे ठरले. त्याच कारण तो स्वतः होता!!




क्रमशः
-------------------