भाग १५.
काही दिवस गुंजन आणि वेद आपलं दिल्ली वगैरे फिरून आता आपल्या आपल्या ठिकाणी जाणार होते. वेद आणि ती आता पुन्हा साडे नऊ महिन्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटणार होते. वेदच्या जाण्याची वेळ जवळ आली होती. म्हणून गुंजन सकाळपासूनच मुसमुसत होती. तिला अस रडताना पाहून तो पटकन तिला जवळ घेतो.
"गुंजन, सोना अस करणार आता तू ? नको ना रडू. आपण पुन्हा भेटणार आहोत.",वेद तिला समजावत म्हणाला. पण तरीही तिला भरून येत होतं. कारण आता त्याची सवय झाली होती तिला. त्याने तिला या वातावरणात कस वावरायचे शिकवले , तरीही आपल्या माणसासोबत वावरण्यात एक वेगळंच असत. त्यामुळे ती रडत होती.
"आपण सोबत नाही राहणार....तू...तुम्ही मला भेटायला पण येणार नाही...म्हणून मला....रडू येत आहे",गुंजन इनोसेंटली रडत अडखळत म्हणाली.
"ओहऽऽ काहीच महिने फक्त. नंतर तू आणि मी सोबतच राहणार आहोत. या स्पर्धेत मला तुझं नाव प्रसिद्ध झालेलं पहायच आहे. एक लक्षात ठेव, पुढे कितीही कोणीही काही बोलत असले आणि ते तर वायफळ असेल तर सोडून द्यायचं हा. बाकी जर जास्तच झालं तर तू स्वतः उत्तर द्यायचं. पण मूर्ख लोकांच्या नादी नाही लागायच.",वेद तिला समजावत म्हणाला. कारण या स्पर्धेत प्रत्येक जण काहींना काही तरी करून एकमेकांना मागे काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार होते. मेंटली एकमेकांना त्रास देऊन सगळं काही आपल्याला मिळावे, यासाठी देखील त्यांचे प्रयत्न चालू होणार होते. हे वेद जाणून होता. तो या जगाचा खेळ पाहून होता. एकदम हुशार असल्याने, तो जाणून होता. पण या विरुद्ध गुंजन होती. तिला माणसं पटकन समजत नव्हती. आंधळा विश्वास लोकांवर ठेवायची. हेच त्याला पटत नसायचे!! त्यामुळेच त्याने तिला अगदी चांगल्याप्रकारे व्यवहार ज्ञान शिकवले. म्हणून आता ती थोडीफार व्यवहारी बनली होती. जशाच तसे राहावे!! हे, वेदने तिला शिकवले होते.
"ओके. पण त्या लोकांनी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मंगळसूत्रावरून काही बोलले ना? तर मी त्यांना...",गुंजन पुढे काही बोलणार त्या आधीच वेद तिच्या तोंडावर हसून स्वतःचा हात ठेवतो.
"बस्स बस्स!! एवढं पण नाही वागायचं बर. नाही बोलणार तुला कोणी यावरून",वेद हसूनच तिच्या तोंडावरचा हात काढत म्हणाला.
"आता आपण निघू. मी तुला तुझ्या ठिकाणी सोडतो आणि मग एअरपोर्टला जातो.",वेद तिच्या पासून दूर होत बॅगस उचलत म्हणाला. तशी गुंजन देखील आपल्या अंगाला स्वतःची साईड पर्स लावते आणि उलट्या हाताने डोळे पुसून स्वतःला नॉर्मल करतच ती त्याच्या मागे चालायला लागते. ते दोघे कारमध्ये बसून एकमेकांसोबत बोलतच आपला शेवटचा क्षण एन्जॉय करत असतात.
काहीवेळाने वेद गुंजनला स्पर्धेच्या ठिकाणी सोडतो. गुंजन स्पर्धेतिल जज आणि इतर लोकांना तिच्या नवऱ्याची म्हणजेच वेदची ओळख हसूनच करून देते. त्या दोघांना पाहून ते आनंदी होतात. त्यांना तर वेदच भरपूरच कौतुक वाटते. वेद गुंजनला कोणी आसपास नसताना पाहून स्वतःच्या घट्ट मिठीत घेऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला फोर्सफुल्ली किस करतो. तशी ती देखील भरल्या डोळयांनी त्याला प्रतिसाद देते.
"बाय बाय माय वाईफी. हे लक्षात राहील.",वेद तिचे ओठ सोडत तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवत म्हणाला. तो हातानेच तिचे डोळे पुसतो.
"आता रडायचं नाही आता या स्पर्धेसाठी तुला लढायचं आहे. तू हे करू शकते!! हे मला माहित आहे. मिस यू अँड लॉट्स ऑफ लव्ह यू",वेद तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. त्याचा तो तिच्या प्रतीचा विश्वास पाहून तिला समाधान मिळते. ती यावर फक्त मान हलवते.
आज शब्दांची गरज बोलायला त्यांना वाटत नव्हती.डोळयांनी आणि मनाने ते फक्त एकमेकांसोबत बोलत असतात. फक्त प्रेम आणि प्रेम!! हेच होत त्यांच्या कडे आज. अरेंज मॅरेज मध्ये जर खरा आणि प्रेम करणारा जोडीदार तुम्हाला मिळाला, तर ती मुलगी स्वतःला या जगातील भाग्यवान स्त्री समजते!! तसच काहीसे , ती स्वतःला समजत होती. काहीवेळाने वेद तिला दूर करून तिथून निघून जातो. तशी गुंजन देखील मनाला समजावत आपल्या पुढच्या आयुष्याच्या प्रवासाला निघते.
गुंजन आपलं तिला दिलेल्या रूममध्ये जाऊन शांत बसते. प्रत्येक स्पर्धकाला त्या लोकांनी स्पेशल रूम दिल्या होत्या. मोठी स्पर्धा असल्याने, प्रत्येक स्पर्धकांची योग्य ती काळजी घेणे. हे ते स्पॉन्सर स्वतःचे कर्तव्य समजत होते.
गुंजन आपली वेदचे विचार बाजूला ठेवून तिची डान्स प्रॅक्टिस करायला लागते. ती आपला मोबाईल काढून एका टेबलवर ठेवून त्यात रेकॉर्डिंग चालू करून तिचा डान्स करायला लागते. नंतर डान्स झाल्यावर कुठे कुठे ती मिस झाली? कुठे काय स्टेप्स चुकली? हे, सगळं काही ती दुरुस्त करून पुन्हा पुन्हा त्यात बदल करायला लागते. हे, वेदने तिला सांगितले होते.
"पर्फेक्ट, आलं. पण हे अस नाही घ्यायला पाहिजे अस वेगळं घ्यायला हवं मी.",गुंजन स्वतःचा मोबाईल हातात घेत म्हणाली. ती स्वतःला पर्फेक्ट बनवत होती.
गुंजन आता दिवस रात्र करून स्वतःला पर्फेक्ट बनवून या स्पर्धेत उतरणार होती. तिची मेहनत पाहून तिथे असलेले काही स्पर्धक तिचं कौतुक करत असायचे. तर काही उगाच तिच्यातील त्रुटी काढत असायचे. पण गुंजन मात्र, त्यांना इग्नोर करत असायची.
"ये गलत हैं मिस। आप ना ऐसा सर्कल में घुमकर अपना हात उपर उठाकर लो।",एक स्पर्धक तिथं येत म्हणाला. त्याच ते बोलण ऐकून गुंजन मागे वळते.
"मैं कुछ भि करू। तुमहें क्या लेना देना?",गुंजन थोडीशी गुस्यात म्हणाली. तिच्या या बोलण्यावर तो स्पर्धक हसतो.
"तुमहें क्या लगता हैं? ये भरनाट्यम , कथक जैसे क्लासिकल डान्स करके तुम यहाँ की ट्रॉफी ले जाओगी? पागल कहीं की।",तो स्पर्धक कुत्सिकपणे म्हणाला. त्याच बोलणे ऐकून गुंजन आपल्या हाताच्या मुठी घट्ट करते.
"आपको क्या लगा मिस्टर पार्थ यहां सिर्फ फोक, अँड मॉर्डन डान्स प्रकारों को देखकर ये लोग ट्रॉफी देने वाले हैं?तो आप भि जान लो यहां पर मेहनत और थीम देखी जाती हैं ना की क्लासिकल और मॉर्डन वगैरा। आप अपना देखो। हम अपना देख सकते हैं।",गुंजन पार्थला रागाच्या स्वरात म्हणाली. भारतीय कलेचा अपमान कोणी केलेला तिला चालत नव्हता!! त्यामुळे तिला राग आला होता. तिचं ते बोलण ऐकून तो एकवार तिला पाहून रागातच तिथून निघून जातो. तशी गुंजन पुन्हा आपली आपल्या डान्समध्ये गुंतून जाऊन बेधुंद होऊन डान्स करायला लागते.
मिस्टर पार्थ हा एक दिल्लीचा गुंजनच्याच वयाचा तरुण मुलगा होता. स्वतःच्या कलेला घेऊन तो गर्व बाळगत असायचा. त्यामुळे तिथं असलेल्या लोकांना तो काहीही बोलून स्वतःला हुशार समजत असायचा. पण यावेळी गुंजन समोर तो सामोरा गेला. मात्र, तिच्यावर काहीच त्याच्या बोलण्याचा फरक पडला नाही. उलट त्याने भारतीय कलेला कमी लेखले म्हणून तिलाच त्याचा थोडा रागच आला. भारतातील कलेला, भारताला नाव ठेवलेलं तिला चालत नसायचे. म्हणून ती त्याला तस सुनावते.
क्रमशः
------------------