गुंजन - भाग २४ Bhavana Sawant द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुंजन - भाग २४

भाग २४.

गुंजन आणि वेदचे दिवस चांगले जात होते. पण इकडे जाधवांच्या घरी मात्र काही चांगल घडत नव्हते. कारण डेझी होती. ती आजवर जाधवांनी जी काम कधीच केली नव्हती. ती करायला लावत असायची. लिगली डेझीने जाधवांच्या प्रॉपर्टीवर अधिकार मिळवला होता. तसे पुरावे देखील तिच्याकडे होते.

"वेद, अहो तुम्ही किती काम करता ना? मला बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्ही दोन मिनिट इथे बसा!!", गुंजन आपला राग शांत करत म्हणाली. वेद रुम मध्ये इकडून तिकडे कॉल वर बोलत आपल फिरत होता. गेले दोन अडीच तास त्याच असेच चालू होत. गुंजनने दोनदा नाष्टा आणला होता त्याच्यासाठी. पण महत्त्वाचे काम असेल? असा विचार करून ती तशी वागते. मात्र आता तिला राग यायला लागतो. त्यामुळे ती तस बोलते.

"झालं होत आल आहे."वेद आपला मोबाईल बाजूला करत म्हणाला आणि पुन्हा एकदा कॉल वर बोलायला लागला. पण यावेळी गुंजन काहीशी चिडूनच त्याच्या हातून मोबाईल काढून घेते.


"मिस्टर वेद बिझी आहे. ऑफिसमध्ये आल्यावर तुम्ही त्यांच्यासोबत बोला.", गुंजन अस चिडून बोलून फोन बंद करते. तसा वेद डोळे मोठे करून तिला पाहायला लागतो. पण ती काही झालच नाही या आविर्भावात त्याला पाहते. वेद हसूनच तिच्याजवळ येतो आणि तिच्या कंबरेत हात घालून तिला जवळ ओढतो.


"मिसेस वेद आता तुम्ही जे काही केलं त्यावरून मी तुमच्यावर चिडू देखील शकतो. हे माहीत आहे ना तुम्हाला?", वेद सिरियस होत म्हणाला.


"तुम्ही माझ्यावर चिडणार?", गुंजन बारीक डोळे करून विचारते. पण आता तिचं बोलण ऐकून तो हाताची घडी घालून हसूनच तिला पाहायला लागतो.


"मी कसा चिडू शकेन ना तुझ्यावर गुंजन?हे पण तुला माहिती आहे ना? त्यामुळे असल काही करत असते. बर बाबा सॉरी आता", वेद तिच्यासमोर हार मानत म्हणाला.


"मिसेस वेद ला मिस्टर वेद घाबरतात.", गुंजन मोबाईल बाजूला ठेवत त्याच्या समोर चमचा नेत म्हणाली. वेद एकदा चमचा कडे पाहतो आणि एकदा तिला पाहून मग हसूनच खातो. तिचं त्याच्यावर अधिकार गाजवण आणि स्वतः हून त्याला भरवणे. हे सगळ काही तो एन्जॉय करत होता. छोट्या छोट्या मूव्हमेंट मधून ती लोक एकमेकांवरच प्रेम व्यक्त करत असायची. गुंजन त्याला बडबडतच भरवायला लागते. वेद तिची बडबड ऐकून स्वतः शीच हसत असतो.

"तू अशीच बडबडत राहिली ना? तरीही चालेल मला. पण आता मला उशीर होत आहे ना? त्यामुळे मी ऑफिसला निघतो. ऑफिस वरून संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा तुझी बडबड कंटीन्यु करू हा", वेद तिचे खांदे पकडत तिला बाजूला करत हसूनच म्हणाला. तिला त्याच बोलण कळायच्या आधीच तो तिथून गायब झालेला असतो. गुंजन मात्र काहीशी गुस्यातच प्लेट्स उचलून घेऊन जाते. त्याने खाल्ले म्हणून तिला वेगळं समाधान मिळत. आपला माणूस उपाशी घरातून गेल्यावर आपल्याला जस जेवण जात नाही!! तसच गुंजनच होत. वेद काही खाऊन नाही गेला की, ती देखील काही खायची नाही. संध्याकाळी तो घरी येईपर्यंत ती त्याची वाट पाहत असायची. दोघेही मग सोबतच जेवायला बसत असायचे. वेदची आई त्याचा नवीन खुलणारा संसार पाहून आनंदी होत होत्या. गुंजन त्यांची स्वतः च्या आईप्रमाणे काळजी घेत असायची. त्यांच्या जखमा तिने बऱ्या केल्या होत्या. रोज रात्री झोपताना त्यांच्या पायांची मालिश करून देणे, वेदला थकून आल्यावर डोक्याचा मसाज करून देणे. हे सगळ काही ती स्वतः च्या मनाने करून देऊन मग गप्प झोपायची. सगळ काम करून देखील ती वेगळीच एनर्जेटीक राहत असायची.


पंधरा दिवस आपल वेद आणि वेदच्या आईला जीव लावून पुन्हा एकदा ती दिल्लीला जायला लागते. यावेळी मात्र ती न रडता जाते. कारण काही दिवसांतच ती पुन्हा घरी परतणार होती. हे ती जाणून होती. त्यात आता वेदसोबत त्याची आई असल्याने तिची त्याच्या बद्दलची काळजी थोडी कमी झाली होती. वेदच्या आईच्या आणि रखुमाई आजीच्या पाया पडून ती वेदसोबत गाडीने एअरपोर्टच्या दिशेला जायला निघते. पण यावेळी वेगळा कॉन्फिडन्स होता तिच्या चेहऱ्यावर. वेदला ती पहिल्यांदा दिल्लीला जात होती ना? त्यावेळीचे प्रसंग आठवतात. तो तसा स्वतः शीच हसतो आणि ड्रायव्हिंग वर लक्ष केंद्रित करतो.

"गुंजन , खूप चांगल्याप्रकारे स्वतः ला डेव्हलप केलं तू!!आवडल मला हा. अशीच थोडीफार बदलत जा. कारण या जगात साधं राहून चालत नाही. थोडस शातिर रहावे लागते.", वेद तिचा हात हातात धरत म्हणाला.


"हमम कळल मला वेद ते. पण मला अस ना कोणाला काही झालं माझ्यामुळे की वाईट वाटत. म्हणजे ना मला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला ना? ते सहन होत नाही मला. मग मी त्यांना उत्तर देते!!पण नंतर मलाच वाईट वाटत. त्या दिवशी ना डान्सच्या वेळी तो पार्थ ना मला बोलला होता. तर मी देखील त्याला उत्तर दिले. तो ना सगळ्यांना लहान समजतो आणि स्वतः ला मोठा!!हे मला नाही आवडत बघा. आपण कशाला जायचं ना दुसऱ्याला बोलायला? स्वतःकडे लक्ष द्यावे. स्वतः च काम आणि स्वतः ची मेहनत असच पहावे अस मला वाटत. पण हा माणूस मात्र अपोझिट आहे. स्वतः देखील काही करायचं नाही आणि लोकांना देखील मागे खेचायच. हेच चालू असत त्याच. आय हेट धिस पिपल!!", गुंजन काहीशी विचार करतच म्हणाली.

"आवडत नाही त्या लोकांपासून दूर राहायचे!! ते माहीत आहे ना चिखलात दगड मारल्यावर चिखल आपल्यावर उडतो? तर यामुळे आपण चिखला पासून दूर रहायचं आणि आपल काम पाहायचं!!तो बोलतो ना सगळ्यांना?तर एकदिवस देव त्याला त्याची शिक्षा देईलच!!तू फक्त स्वतः वर फोकस कर. असे बरेच लोक येतील ज्ञान द्यायला त्यांना इग्नोर करायचं आणि पुढे जायचं. तुला माहित नसेल तर सांगतो, सक्सेस मध्ये असणारे लोक कुठेही गाजावाजा न करता जगापासून थोडेसे दूर राहून सक्सेसफुल्ल बनत असतात.कारण या लोकांना कशाच काही पडलेलं नसत. ही लोक सक्सेसच्या मागे राहत असतात. यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालल की अपोझिट वाला काय करतो? हे पाहायला देखील वेळ नसतो!! जी लोक गाजावाजा करतात ना ती फक्त ठराविक काळापुरती लोकांच्या नजरेत येतात. पण नंतर कमी होऊन जातात. या उलट सक्सेस वाली लोक शेवटपर्यंत यशाच्या शिखरावर टिकून राहतात. त्यामुळे आता तू विचार कर!! तुला काय करायचे आणि काय नाही याचा?मी फक्त तुला ऍडवाईज दिली. बाकी आयुष्याचे तुझ्या निर्णय फक्त तुला घ्यायचे आहे.", वेद अस बोलून गाडी थांबवतो. त्याच बोलण ऐकत असलेली गुंजन भानावर येते आणि मनातच काहीतरी ठरवून हसूनच वेदला पाहते.


"थँक्यू, वेद.", गुंजन अस म्हणून वेदला बसल्या जागीच मिठी मारते. ती हसूनच त्याच्या ओठांवर ओठ टेकवून हलका किस करून बाजूला होते. वेद तिला हसूनच पाहतो आणि गाडीच्या बाहेर उतरून तिची बॅग काढून ठेवतो. गुंजन बाहेर उतरून स्वतः ची बॅग हातात घेते आणि एकदा वेदला मिठी मारून एअरपोर्टच्या आतमध्ये जायला लागते. वेद तिला आतमध्ये जाईपर्यंत पाहतो. तिचं प्लेन वर आकाशात उडून गेल्यावर तो तिथून गाडी घेऊन निघून जातो.



एक जाता जाता वेदने तिला मार्गदर्शन तर केले होते. त्याच्या मनात आले असते, तर त्याने त्या पार्थला स्पर्धेच्या बाहेर काढून त्याला त्याची खरी जागा दाखवली असती. पण अस करून गुंजनला कस या लोकांना हॅण्डल करायचं? ते मात्र कळल नसत. या सर्वांचा सारासार विचार करून तो गुंजनला मार्गदर्शन करून धडे देतो. पण आता त्याला पाहायचं होत ती नेमकी कशाप्रकारे परिस्थिती सांभाळते? यासाठी तो ड्राईव्ह करता करता आपल्या लोकांना कॉल करून कामाला लावतो.



क्रमशः
___________________

तुम्हाला काय वाटत काय करेल गुंजन? काय होईल पार्थच? याचा विचार सध्या तुम्ही करा.भेटू पुढील भागात लवकरच. तो पर्यंत वाट पहा.