भाग २७.
"वेदऽऽऽ", अस बोलून मागे वळून रडतच त्याला मिठी मारते. तसा तो देखील हसूनच तिला जवळ घेतो.
यावेळी महाराष्ट्रीयन बिझनेसमन वेद जाधवला तिथं पाहून बऱ्याच स्टेजच्या खाली असलेल्या मुलींना शॉक बसतो. कारण वेद त्याच्या स्वभावाने आणि दिसण्याने कितीतरी मुलींचा क्रश बनलेला होता. त्यात आता त्याने गुंजनला जवळ घेतल्याने काही मुली तर आता मनातच चरफडत होत्या. पण वेदला याच काही देणं घेणं नव्हत. तो तर सध्या गुंजनच अचिव्हमेंट पाहून आनंदी होता. स्टेजच्या मागे राहून त्याने पूर्ण तिचा डान्स पाहिला होता. पण जस त्याला आतमध्ये जायला सांगितले, तसा तो आनंदी होऊन आतमध्ये आला.
"तो मिसेस वेद आपको कैसे लगा हमारा सरप्राइज?", अँकर गुंजनला विचारतो. तशी गुंजन पटकन भानावर येऊन वेद पासून दूर होते.
"बहोत अच्छा!!",गुंजन वेदकडे पाहून म्हणाली.
"तो जजेस ऑर हमारे प्यारे दर्शकों, आज हमने पेहेली बार मिस गुंजन जाधव नहीं कहां था!! इस बात पर किसी ने ध्यान नहीं दिया। खुद्द गुंजनजी ने भी नहीं दिया।", अँकर काहीसा हसतच म्हणतो. तसे गुंजनला क्लिक होते की, आज त्याने तिला मिसेस गुंजन वेद जाधव या नावाने रिप्रेझेंट केले होते. गुंजन ते आठवून वेदकडे पाहते. वेद देखील तिला हसूनच पाहून एका हाताने जवळ घेतो.
"तो वो वेद जाधव इनके पती यही है!! महाराष्ट्र राज्य के होनहार बिझनेसमन मिस्टर वेद जाधव। सोचा था फिनाले मे मॅडम उन्से मिलवा देगी, लेकीन हम लोगों ने उनका परफॉर्मन्स देखकर आज ही बुला दिया!! और एक बात बता दे आप लोगों को मॅडम को आज हम यहाँ पर देख थे है ना? इसका श्रेय भि इनको ही जाता हैं।", अँकर आता वेद कडे पाहून म्हणाला. आता मात्र जजेस लोक देखील हिंदीतून वेदच कौतुक करतात. वेदला ते कौतुक पाहून प्राउड फिल होत.
"सर, आप एक बिझनेसमन है और उपरसे आपके कंपनी का नाम भि मॅडम के नाम से रखां है? इसकी खास वजह कुछ?थोडा पर्सनल सवाल है!!लेकीन जानना चाहते हैं", अँकर काहीसा विचार करत म्हणाला. त्याच्या या प्रश्नावर वेद गुंजन कडे पाहतो. ती देखील तो काय उत्तर देणार आहे? यासाठी उत्सुक होऊन त्याच्याकडे पाहत असते.
"सच बताये तो गुंजन जब से जिंदगी मे आयी हैं ना? तबसे मैं सक्सेस होता जा रहा हुं!! ये नाम ही मेरी सक्सेस का भागीदार हैं। इसलिये 'गुंजन' नाम है कंपनी का!!", वेद गुंजनकडे पाहून म्हणाला. यावेळी ते सगळ ऐकून गुंजनला वेद बद्दल खूप काही वाटत होत. जगासमोर हे सगळ काही त्याला बोलताना पाहून ती थोडीशी भावुक होते. पण लगेचच स्वतः ला सावरते.
"थँक्यू सर फॉर आन्सर के लिये! तो जजेस आप के सामने सब है रिझल्ट। तो फिर ज्यादा वक्त ना लेते हुए पहेले ग्रँड फिनाले का कार्ड मॅडम को दे दे क्या?", अँकर जजेस कडे पाहत म्हणाला.
"हा अखिलेश!! रूको मैं ही आती हू कार्ड लेकर! माझ्या महाराष्ट्राची मुलगी आहे ती. मग एका मराठी मुलीच्या हातून दुसऱ्या मराठी मुलीचा सन्मान. हे मस्त वाटेल.",एक त्यातील जज म्हणाली.
"वा स्मिता मॅडम, मलाटी. कुप चान आही.",अँकर अखिलेश आपली तोडक्या मोडक्या मराठीत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून स्मिता, गुंजन आणि वेद हसतात. स्मिता जज आपला ड्रेस सांभाळत एक आयताकृती कार्ड जवळच्याच बॉक्स मधुन काढून गुंजन कडे चालत येत असते. ते कार्ड पाहून गुंजन तोंडावर हात ठेवते. ती आनंदातच हसायला लागते. सगळ्या भावना सध्या तिच्या मिश्रित झाल्या होत्या. रडू पण येत होत. पण ते कार्ड पाहून होत ते. स्मिता येऊन गुंजनच्या हातात ते कार्ड देते. ती गुंजनला मिठीत घेते.
"अभिनंदन, महाराष्ट्राच्या मुलीला इथ पाहून भारी वाटल.", स्मिता गुंजनला हात मिळवणी करत म्हणाली.
"थँक्यू, मॅडम",गुंजन हसून म्हणाली. वेद तिच्या हातातून कार्ड घेतो. त्यावर गुंजन वेद जाधव नाव पाहून तो खूप आनंदी होतो. तो आनंदी होऊन त्या कार्डवर हात फिरवतो. तशी वेगळीच प्राउड फिलिंग त्याच्या मनात निर्माण होते. गुंजनचा योग्य रीतीने मान सन्मान करून ती लोक वेदला कुटुंबाच्या तिथे बसायला सांगतात. एक तर कंटेंस्टंट त्यांना मिळालं होत. आता आणखीन काही निवडायचे होते. त्यामुळे ते लोक आता एक एक स्पर्धकांचे नाव जाहीर करायला लागतात. पार्थ जो की स्वतः वर खुश असतो. त्याचं नाव मात्र इथ फायनलला न घेतल्याने मनातच चडफडत असतो. कारण आजच्या स्पर्धेत एकापेक्षा एक डान्स झाल्याने पार्थचा डान्स प्रकार थोडासा कमी पडला होता. तो बाहेर पडला म्हणून इतर जण आनंदी असतात. गुंजन मात्र सध्या तरी हे सगळ सोडून वेदकडे पाहत असते.
पार्थ चरफडतच तिथून बाहेर निघून जातो. पण इतर बाहेर पडलेले स्पर्धक फायनलला पोहचलेल्या स्पर्धकांना बेस्ट ऑफ लक करतात आणि गळाभेट करतात. गुंजन देखील सगळ्यांना हात मिळवणी करते. काहीवेळातच कार्यक्रम संपतो. दोन दिवसांनी फायनल असल्याने, ती लोक वेदला थांबायला विनंती करतात. वेद देखील त्यांच्या विनंतीला मान देऊन गुंजन सोबत थांबतो.
स्वतः च्या रूममध्ये येताच गुंजन दरवाजा पटकन बंद करून आनंदातच वेद कडे झेप घेऊन त्याच्या मिठीत शिरते. वेद तिच्या अश्या वागण्याने सावध नसल्याने, तिला घेऊनच बेडवर पडतो.
"आहऽऽ , गुंजन हळू ना!! एवढी खुशी कळते मला. पण आता तुझ्या अश्या वागण्याने तुला देखील लागल असत?", वेद तिला मिठीत घेऊन बेडवर तसाच झोपून म्हणाला.
"नाही लागणार मला. तुम्ही आहात ना सोबत? मग बस झाल!!",गुंजन विश्वासाने हसतच म्हणाली. तिचं बोलणे ऐकून वेद नाही मध्ये मान हलवतो. कारण गुंजन काही ऐकून घेणार नव्हती सध्या!! वेद देखील मग तिचे केस कानामागे करून हळूच तिच्या कपाळावर स्वतः चे ओठ टेकवतो. तिचा आनंदच चेहऱ्यावरचा सगळ काही सांगून जात होता. तिला ती नाचली याचा आनंद नव्हता. तर वेद दिल्लीत आला होता याचा आनंद तिला झाला होता. हे वेदला तिचं असे वागणे पाहून कळते.
"फक्त फोरहेड? ", गुंजन इनोसेंटली विचारते. तिच्या या प्रश्नावर तो हसतो आणि हळूच तिला तसच बेडवर पाडून तिच्यावर झोपून तिच्या ओठांवर पटकन ओठ टेकवून तिला आपलस करायला लागतो. गुंजन देखील मग त्याला प्रतिसाद द्यायला लागते. जेव्हा तिला श्वास घ्यायला जमत नाही. तेव्हा वेद बाजूला होतो आणि हसूनच तिला पाहून फ्रेश व्हायला निघून जातो. गुंजन तशीच बेडवर झोपून आपला चेहरा उशीत लपवते.
क्रमशः
____________________