Gunjan - 28 books and stories free download online pdf in Marathi

गुंजन - भाग २८

भाग २८.


वेद आला स्पर्धा पाहायला हे पाहून गुंजन आनंदी तर होतीच पण तिने अजिबात स्वतः ची प्रॅक्टिस मिस्ड केली नव्हती. दोन दिवसांत तिने तिचा बेस्ट दाखवून बेस्ट असे स्वतः चे डान्स बसवले होते. वेद दिल्लीत राहून आपल काम देखील पाहत असायचा आणि तिथूनच आईची विचारपूस देखील करत असायचा.


शेवटी या भव्यदिव्य स्पर्धेचा अंतिम दिवस उजाडतो. तसे काहीं स्पर्धक थोडेसे सकाळी इमोशनल होतात. कारण पुन्हा काय त्यांना हे सगळ मिळणार नव्हत. हा इकडचा थाट , इथले नवीन मित्र मैत्रिणी काही पाहायला मिळणार नव्हते पुन्हा यामुळे थोडेसे ते भावुक होतात. गुंजनला देखील कमी महिन्यात दिल्ली भावली होती. आधी याच दिल्लीत यायला घाबरणारी ती आता मात्र बिनधास्त फिरत असायची. पण आता तिला त्या वातावरणला सोडून जायला थोडेसे जड पडत होते. तरीही मनाची समजूत काढून ती शांत होते आणि आपल्या प्रॅक्टिसला निघून जाते.


संध्याकाळी आज त्यांची स्पर्धाचा तो फायनल दिल्लीतील मोठ्या अश्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. कितीतरी पब्लिकने तिकीट खरेदी करून आधीच आपली सीट बुक करून चेअरवर येऊन बसले होते. सगळ्यात समोरच्या चेअर्स या स्पर्धकांच्या फॅमिली साठी राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्याच्या मागे काही मोठी लोक. नंतर इतर लोकांसाठी जागा करण्यात आली होती. वेद आपल जाऊन फर्स्ट रांगेच्या चेअरवर बसतो. पूर्ण हॉलमध्ये बऱ्याच लोकांच्या हातात गुंजनचे बॅनर आणि फोटो होते आणि जास्त प्रमाणात तेच नाव लोक मोठमोठ्याने ओरडुन अँकरला सांगत होते. तो अँकर स्पर्धक रेडी होईपर्यंत वेगवेगळे गेम पब्लिक कडून खेळवून घेतो. नंतर मात्र स्पर्धक रेडी झाले आहे हे कळताच तो पुन्हा स्टेजवर येतो.


"तो मेरे प्यारे डान्स के सुपरस्टार इस प्रोग्राम के पुजारियों, कुछ ही समय में आपके चहिते सुपरस्टार आपके सामने आने वाले है। तो भर भर के उनको अपना प्यार देना!!", अखिलेश हसूनच माईक हातात पकडत म्हणाला.


"ओ अखी भाई, किधर जा रहे हो? ये सिर्फ शो नहीं है! इसमे तो पुरे भारत के दर्शन हो जाते हैं। मतलब देखो गुंजन मॅडम महाराष्ट्र की!! देखो, उनके पती के चेहरे पर कितनी प्यारी स्माईल आयी।", एक हिंदी शो चा अँकर तिथं येत म्हणाला. त्यावेळी सगळे कॅमेरे वेदच्या चेहऱ्यावर आपोआप फिरतात. तसा वेद स्टेजच्या पांढर्या पडद्यावर झळकतो.


"हा हा!! देखो कितने प्यारे लगते है ये?", अँकर अखिलेश वेदला छेडत म्हणाला. यावर वेद फक्त हसतो.

"सर आपको क्या लगता हैं? आपकी पत्नी जितेगी या नहीं?", दुसरा अँकर विचारतो. तसा एक तिथच फिरणारा माणूस माईक आणून वेदच्या हातात देतो. वेद माईक हातात नीट पकडुन चेअर वरून उठतो.


"तर काय वाटत मराठी लोकहोऽऽ?वाजणार का नाही मराठ्यांचा डंका दिल्लीत?", वेद मागे वळून लोकांना पाहत मोठ्याने विचारतो.


"होऽऽ. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जयऽऽ", गर्दीतील मराठी लोक मोठमोठ्याने म्हणायला लागतात. पूर्ण हॉल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने घुमायला लागतो. महाराज म्हटले की सगळे मराठे तयारच असतात. तसच काहीस इथ घडत होत. पण आता मात्र मराठी लोकांचं पाहून इतर लोक ही महाराजांची घोषणा करायला लागतात. त्यांचं हे चालूच असत की तेवढ्यात स्टेजवर राजमाता जिजाऊ यांचे फोटो झळकायला लागतात आणि एक बॅकग्राऊंड म्युझिक देखील चालू होते. तसे लोक शांत होतात आणि चेअरवर बसून पुढे पाहायला लागतात. स्टेजवर बऱ्याच बायका नव्वारी साडी नेसून येतात. गुंजन देखील यात मेन लीडला असते.


" महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र!! या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक राजे जन्मले, अनेक संत दिले या भूमीने आपल्याला. पण आजचा महाराष्ट्र स्त्री वीरांगना तर विसरूनच जात आहे. पण आम्ही नाही विसरणार. तर आज या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या महान स्त्रिया आणि महान लोकांचा इतिहास त्याबरोबर च महाराष्ट्रीयन संस्कृती, भाषा पाहू या आमच्या नवीन डान्स प्रकारातून",गुंजन हातात माईक घेऊन म्हणाली. ती माईक खाली ठेवते की तेवढ्यात जिजाऊ मातेचे गाणं चालू होते. तशी गुंजन त्या जिजाऊ मातेसारखी उभी राहून आपल्या डान्स द्वारे लोकांना जिजाऊ मातेच सगळ जीवन दाखवते. ते जीवन संपताच महाराजांचं जन्म दाखवला जातो. गाणं "झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजी चा" हे वाल असत. नंतर महाराजांची जीवनगाथा दाखवण्यासाठी जय भवानी जय शिवाजी हे गाणं वापरलं जातं.

इंद्र जिमि जंभ पर… बाडव सुअंभ पर…
रावण सदंभ पर… रघुकुलराज है !
पौन बारिबाह पर… संभु रतिनाह पर…
ज्यों सहसबाह पर… राम द्विजराज है !

उदरात माउली… रयतेस साउली…

गडकोट राउळी…शिवशंकर हा
मुक्तीची मंत्रणा… युक्तीची यंत्रणा…
खल दुष्टदुर्जना… प्रलयंकर हा

शिवाजी महाराजांनी मंदिरात मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेचा प्रण केला होता. तो सीन गुंजन आपल्या डान्स प्रकारातून लोकांना दाखवते.

संतास रक्षितो… शत्रू निखंदतो…
भावंडभावना… संस्थापितो
ऐसा युगेयुगे… स्मरणीय सर्वदा…
माता-पिता-सखा… शिवभूप तो

महाराज प्रत्येक जातीतील लोकांना कश्या प्रकारे सांभाळत असे? हे दाखवले जाते. सोबत त्यांच्या आईचे क्षण देखील दाखवले जातात. खाली बसलेलं लोक तर हा नवीन प्रकार पाहून शांत होतात. कारण त्या डान्स मधून खरोखरच जिजाऊ माता आणि शिव इतिहास त्यांच्या समोर घडत आहे असे वाटत होते.

दावा दृमदंड पर… चीता मृगझुंड पर…
भूषन वितुंड पर… जैसे मृगराज है !

तेज तम‍ अंस पर… कान्ह जिमि कंस पर…
त्यों मलिच्छ बंस पर… सेर सिवराज है !

अफजलखान वध , सोबतच आग्रा हुन सुटका असे सीन या कडव्यातून दाखवले जातात. सगळ काही पाहून खालची लोक टाळ्या वाजवायला लागतात.


जय भवानी, जय भवानी
जय शिवाजी जय शिवाजी !
जय भवानी, जय भवानी
जय शिवाजी जय शिवाजी !


खाली बसलेली लोक देखील आता जय भवानी जय शिवाजी चा जयघोष करायला लागतात. हे गाणं संपताच , श्री छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई , राजाराम महाराज यांचा देखील इतिहास काही गाण्याने सादर केला जातो. वेद आणि इतर लोक पापणी न लवता ते सगळ काही पाहत असतात. नंतर लगेच काळं बदलतो आणि रमा बाई रानडे माधव रानडे यांच्यासंबंधी दाखवले जाते.

चांदण चाहूल होती कोवळ्या पाऊली
माप मी ओलांडले अन्‌ दूर गेली भातुकली
खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय
सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय
थबकले उंबर्‍यात मी पाहुनी नवी पहाट
जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट
हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत.. झुले उंच माझा झोका !


या गाण्याचं कडव्याचे सादरीकरण करताना गुंजनला तिचं आणि वेद चे आधीचे दिवस आठवतात. ती आपल नृत्य करत करत वेद वर कटाक्ष टाकते आणि एक गिरकी घेऊन पुन्हा त्या गाण्यात गुंतते. पूर्ण स्टेजवर रमाबाई रानडे आणि माधव रानडे यांचा जीवनपट सादर केला जातो.

दाटुनिया येता मेघ भरे आकाश ओंजळ
माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ
झिजे पायरी होऊन जन्म चंदनासारखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत.. झुले उंच माझा झोका !

आरतीत तेवे माझ्या मंद ह्या व्रताची समई
तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई
मीच ओलांडले मला, सोबतीस माझा सखा
येई कवेत आकाश.. झुले उंच माझा झोका !

रमा माधव यांचा जीवनपट संपताच लोकमान्य टिळकांच्या काळातील गणेशोत्सव साजरा केला जातो. हळूहळू कथक, भरतनाट्यम मिक्स फ्युझन महाराष्ट्र निर्मिती कशी झाली हे दाखवले जाते. महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी आपल्या लोकांना शहीद होताना पाहून तिथं बसलेल्या प्रत्येक माणसाचे डोळे भरतात. कधी गुंजनने त्यांच्या डोळ्यात पाणी आणल? हे त्यांचं त्यांना देखील कळल नाही.



"या अशा महान लोकांच्या बलिदानाने माझा महाराष्ट्र उभा झाला आहे. स्वातंत्र्य फुकट मिळाले आपल्याला अस समजून पुढे जाऊ नका. छोट्या छोट्या कामातून आपल्या महाराष्ट्र राज्याला सोबतच देशाला एक नवीन प्रकारातून घडवा!!", गुंजन अस बोलून खाली बसते. ती खाली बसताच सर्व लोक उभी राहतात आणि तिला झुकून दोन्ही हात वर करून सलाम करतात. हा सलाम होता तिच्या आगळ्या वेगळ्या डान्स प्रकारासाठी. यात वेद देखील तिला तसाच सलाम करतो. आयोजक पासून ते जजेस पर्यंत सगळेच जण उभे राहून तिचं कौतुक करतात. कारण या आधी कोणी असला काही प्रकार पाहिला नव्हता. पण गुंजनने मात्र अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती.


"बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय!!",एक अँकर तिथं येत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून सगळे पुन्हा जय जय करत राहतात.


"मिन्स, आप तो सोचकर ही आयी हैं ना आग लगाने का? सबको ऐसा चॅलेंज दिया की , बिचारे वहां बैठे हुये हमारे स्पर्धक भि डर गये हैं। और उपर से ये सब लोग तो शुरू से ही आपका नाम लिए जा रहे!! आज मराठी मेकअप महाराष्ट्र की कन्या हां हां!!",तो अँकर गुंजनकडे पाहत मस्तीत म्हणाला.


"अतिश मिस्टर जाधव है नींचे बैठे है। इसलीये फ्लर्ट मत करो!!", अँकर अखिलेश हसून म्हणाला. तस तो अँकर घाबरण्याची ॲक्टिंग करून तिथून कल्टी मारतो. सगळे त्याला पाहून हसतात. मग मात्र जजेस गुंजनच कौतुक करतात आणि तिला पाठवून देतात. नंतर हळूहळू सगळ्यांचे परफॉर्मन्स पार पडतात. टिव्ही वर ब्रेक दाखवले जातात पण तिथं त्या वेळात प्रत्येक डान्स झाल्यावर स्टेज पुन्हा पुन्हा बदलले जात होते. कारण प्रत्येकाची थीम वेगळी होती. वेद सगळ काही तो सोहळा पाहून आपल्या डोळ्यात साठवत असतो. तर वेदची आई घरी बसून तो सोहळा पाहत असते. शेवटी रिझल्टची वेळ येते. तेव्हा मात्र सगळे जण डोळे बंद करून आपल्या राज्यातील मुलगी जिंकावी, आपली बहीण, भाऊ जिंकावे यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. कधी नव्हे, तो वेद देखील तसच करतो. समोर आता तीन स्पर्धक उभे होते. त्यात गुंजन देखील होती. त्या सर्वांना पाहून इकडे बसलेल्या सर्व लोकांचे हार्ट बिट्स वाढतात.


"तो डान्स के सुपरस्टार की ये ट्रॉफी जाती है.......जाती हैं.... एनी गेसेस?", अँकर अखिलेश हातात एक भव्य अशी गोल्ड ची मोठी ट्रॉफी घेत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून ती लोक त्या तीन स्पर्धकांच्या नावाने ओरडायला लागतात. गुंजनला देखील सध्या भीतीच वाटते.



"तो ये ट्रॉफी जाती महाराष्ट्र राज्य की मिसेस.गुंजन वेद जाधव को!!", अँकर अखिलेश मोठ्याने माईक वर ओरडतो. तशी गुंजन त्याचं बोलण ऐकून पटकन डोळे उघडते आणि भावुक होऊन स्टेजवर गुडग्यावर बसते. तिला अस भावुक झालेलं पाहून वेद उठून स्टेजवर येतो. तो तिला सरळ उभ करून एका हाताने जवळ घेऊन तिचे डोळे पुसतो. जजेस तिच्या हातात ट्रॉफी देतात. तशी ती डोळ्यात पाणी ठेवून ती घेते. मोठे असे चार ते पाच ब्लास्ट देखील स्टेजच्या शेजारी वाजतात त्यातील छोटे छोटे रंगीबेरंगी रिबन येऊन गुंजनच्या आणि इतरांच्या अंगावर पडतात. हे सगळ पाहून गुंजन भारावून जाते. तिच्या हातात मोठा असा चेक आणून दिला जातो. सोबत इतरही कार्ड देऊन तिला सर्वजण अभिनंदन करतात. गुंजन आणि वेद सगळ्यांचे आभार मानतात. वेद आनंदी असतो. पण गुंजन थोडीशी मिश्रित भावनेत असते. ते त्यांचा सन्मान स्वीकारून स्टेजच्या खाली उतरतात. जो तो वेदच आणि गुंजनचे कौतुक करत असतात. पण सध्या गुंजनला काय बोलायला सुचत नसल्याने? ती फक्त थँक्यू म्हणत वेद सोबत चालायला लागते. वेद आणि ती ट्रॉफी घेऊन काहीवेळाने आपल्या रूमवर जातात. रुमवर पोहचून आतमध्ये जात असतात की तेवढ्यात गुंजनला चक्कर आल्यासारखे होते आणि ती स्वतः ला सावरण्याच प्रयत्न करत असते. पण ते तिला काही जमत नाही. वेद मागे वळतो त्याला गुंजन खाली पडणार असे दिसताच तो पटकन तिला स्वतः च्या मिठीत घेऊन सावरतो.

"गुंजनऽऽऽ", वेद अस बोलून तिला उचलून आत घेतो. आता त्याला देखील काळजी लागली होती. तो आणून बेडवर ठेवतो आणि लगेच डॉक्टरला कॉल करतो.



क्रमशः
_______________________


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED