गुंजन - भाग ३३ Bhavana Sawant द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुंजन - भाग ३३

भाग ३३.

"तुझ्यामुळे झालं सगळे. आता तुझी सोना आई बनणार आहे आणि तू बाबा", वेदची आई हसूनच त्याचा कान सोडत म्हणाली. आईचे बोलणे वेदला काही कळत नाही. जेव्हा कळते तेव्हा मात्र चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन बदलतात.



"काय? मी बाबा? सिरीयसली?",वेद विचारतो. त्याच्या बोलण्यावर गुंजन लाजून खाली मान घालते. तसा वेद आनंदी होऊन तिच्याजवळ जातो आणि पटकन तिला मिठीच मारतो.



"ओहऽऽ ,गुंजन तुला मला काय दिले आहे ना? हे तुझं तुला देखील माहीत नाही. आज तू जे मागशील ते तुला मी देणार. ती फक्त आता एका जागी बसून आपल हुकूम सोडायचे. सगळे काही मी तुझ्यासमोर हजर करेन. लव्ह यू गुंजन. लव्ह यू. ", वेद तिला मिठीत घेऊन आनंदात बडबडत असतो. त्याला तर सध्या जगाचा विसर पडला होता. एवढा आनंद झाला होता.पण गुंजन मात्र भानावर असल्याने त्याच्या आईला तिथं पाहून थोडीशी लाजते. वेदची आई हसूनच बाहेर निघून जाते. तशी गुंजन लाजून वेदच्या भोवती हातांचा विळखा घालते.


"अहो, मी पण तुमचा आनंद पाहून आनंदी आहे. थँक्यू वेद तुम्हाला आणि अभिनंदन देखील तुमचे. तुम्ही पण बाबा होणार आहात.",गुंजन त्याला बाजूला करत म्हणाली.


"गुंजन तुला काय आवडत खायला? मला सांग आता मागून आणतो. आज तुला जे हवे ते मिळणार आहे", वेद आनंदाने म्हणाला. त्याचं बोलणे ऐकुन ती स्वतः च्या कपाळावर हात मारते.



"अहो, आता मला काही खायचं नाही. अहो, आताशी कुठे दीड महिना झाला आहे. ते नंतर डोहाळे लागतील ना? तेव्हा तुम्हाला सांगेल मी. सध्या वेद मला घरी जायचं आहे. दवाखान्यात थांबावे वाटत नाही आहे.",गुंजन तोंड बारीक करून म्हणाली.


"ओके, ओके. आता मी डॉक्टरला विचारून येतो. मग आपण जाऊ घरी. पण आता नो काम", वेद गोड गोड प्रकारे तिला धमकावत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून ती होकारार्थी मान हलवते.



वेद आनंदात डॉक्टरकडे जातो आणि त्यांना या दिवसांत तिची कशाप्रकारे काळजी घ्यायची, काय खाऊ घालायचे? आणि काय नाही? कशाप्रकारे तिला आनंदी ठेवायचे? अस सगळे काही विचारून घेतो. डॉक्टर व्यवस्थितपणे त्याला समजावतात. त्याची आई तर मुलाला अस काळजी घेताना पाहून समाधानी होते. त्यांच्या घरातील पुरुष आजवर जास्त असा बाईचा विचार करत नसायचे. तिला काय त्रास होत आहे की नाही? हे देखील पाहत नसायचे. फक्त त्यांना जेवण मिळाले आणि त्यांचे काम झाले की त्यांना बर वाटायचं. आजारी असली बाई की, तिला नकोते बोलून सुनावले जायचे. मग ती बाई आहे त्या अवस्थेत काम करत असायची. त्याच्या आईने देखील तो त्रास सहन केला होता. त्यांना जाणीव असते, त्या सगळ्याची. वेदला अस वागताना पाहून त्या त्याच्यावर आनंदी होतात. निदान त्याला जन्म देण्याचे सार्थक झाले आयुष्याचे असे त्यांना नेहमी वाटत असायचे. आजही त्या मनातच त्याला पाहून देवाचे आभार मानतात!!


वेद आणि वेदची आई डॉक्टर सोबत बोलून त्यांचा निरोप घेऊन गुंजनला घरी घेऊन येतात. घरी आल्यावर गुंजनला बर वाटत. आपल घर ते आपलच असत! रखुमाई आजी बातमी ऐकून गुंजनची चांगली नजर काढतात. त्या देखील भरपूरच आनंदी होतात.


"आई, मी ऑफिसला सांगून पेढे वाटायला लावतो.", वेद आनंदी होऊन म्हणाला.



"अरे, नाही नाही तीन महिने कोणाला सांगायचे नसते. त्यामुळे सद्या नको सांगू कोणाला. गुंजन तुझ्या आवडीच सांग मला मी बनवते. बदामी खीर आवडते ना तुला? तिचं बनवते मी. रखुमाई आंबे पण आले आहेत ना सकाळीच घरी? त्याचा रस पण बनवून घेऊ. आज माझ्या मुलीने खूप आनंदाची बातमी दिली आहे. तर आज तिची आई तिच्यासाठी स्वयंपाक करणार आहे!", वेदची आई म्हणाली.



"अहो, नाही आई. मी चांगली आहे. मी करते सगळ. थांबा, तुम्ही इथे बघू",गुंजन घाबरून म्हणाली. ती उठायला जात असते की, वेदची आई तिला बसायला लावते.



"काही गरज नाही. मी करणार तर मी करणार आहे! वेद, सांग हिला तू.", वेदची आई अस बोलून आपला डोक्यावरचा पदर बाजूला करते आणि त्या पदराला ओढून घेऊन त्याचे एक टोक आपल्या कंबरेत खोचून तशीच किचन रूममध्ये निघून जाते. आईला अस जाताना पाहून गुंजन पाहत राहते. आजवर त्या कधीच बिना पदराच्या फिरत नव्हत्या आणि आज मात्र तिच्यासाठी अस वागल्या होत्या. यामुळे ती विचारात पडते.



"आई ,आहे ती माझी. सगळे येत तिला. बघ कधी तरी खाऊन तिच्या हाताचे. साक्षात अन्नपूर्णा आहे!!", वेद तिला आईच्या दिशेला पाहताना पाहून म्हणाला.



"वेद अहो, तुम्हाला कस कळत नाही? सासू आहेत त्या माझ्या!! त्यांच्याकडून अस काम करवून घ्यायला नाही आवडत मला. तुम्ही पण त्यांना थांबवले नाही. ",गुंजन नाराज होत म्हणाली. सासू कडून काम करवून घ्यायला तिला आवडत नव्हत. यामुळे बिचारी नाराज झाली होती.



"अस नाराज होऊ नको. उद्यापासून मी करेल. आता हॅप्पी हो बघू?", वेद तिचे गाल ओढत म्हणाला. त्याच्या गाल ओढण्याने ती त्याला खोटा राग दाखवत तिथून उठते आणि सरळ किचन रूममध्ये जाऊन आईला मदत करण्यासाठी मध्ये मध्ये करायला लागते. पण वेदची आई काय तिला तसे करायला देत नाही. त्या इतर सर्व सर्वेंट लोकांना काम सांगतात. गुंजन काही करायला गेली की लगेच ती लोक तिच्या हातून ते काम काढून स्वतः करत असायचे. शेवटी, ती वैतागून तिथून निघून जाते. वेदची आई आणि इतर सगळे तिला जाताना पाहून हसतात.


"ही पोरगी अशी गप्प नाही बसणार म्हणून असे वागावे लागते मला. तुम्हा लोकांना सांगून ठेवते, ती काम करताना दिसली किचनमध्ये तर तुमची नोकरी राहील का नाही? हे मी तुम्हाला सांगू शकत नाही", वेदची आई सर्व काम करणाऱ्या लोकांना पाहून म्हणाली.


"ओके, मॅडम. आम्ही लक्ष ठेवू",एक सर्वेंट म्हणाला. त्याचं बोलणे ऐकुन पुन्हा त्या आपल्या कामात गुंतून जातात. अगदी मन लावून त्या एक एक पदार्थ स्वतःच्या हाताने गुंजनसाठी बनवतात. काहीवेळातच त्या जेवण बनवून तयार करतात. सगळ काही डायनिंग टेबलवर लावले जाते. त्या वासाने गुंजन तिथं येऊन बसते. एरव्ही कधी जेवणाला सगळ्यांची वाट पाहणारी ती आज मात्र समोरचे पदार्थ पाहून स्वतः च स्वतःला वाढून घेऊन खायला लागते. आंब्याचा रसचे आणि तिचे थोडे वाकडे होते. पण आज मात्र तो आमरस पाहून तिला कंट्रोल होत नाही. ती सरळ एका वाटीत आमरस घेऊन एक बोट त्यात बुडवून तोंडाला लावून चाटून पाहते. तिला त्याची चव चांगली लागताच ती भरलेली वाटीच तोंडाला लावून पिते. वेद तर आधीच आला होता खाली. पण तो लपून छपून तिला पाहून तिचे फोटो काढून कॅमेऱ्यात कैद करत होता. अगदी निरागस वाटत होती ती त्याला. तो फोटो कॅमेऱ्यात घेऊन तिच्या बाजूच्या चेअरवर येऊन बसतो. तशी गुंजन त्याला पाहते.


"सॉरी, मला खूप भूक लागली होती.", गुंजन त्याच्याकडे पाहत म्हणाली.


"इट्स ओके. एक मिनिट तो रस पुसू दे मला", वेद अस म्हणून तिच्या तोंडाला वर लागलेला रस टिश्यू पेपरने पुसून काढतो. ती तशीच शांत बसून राहते.



वेदची आई आपल आवरून येताच वेद त्यांच्यासोबत जेवायला लागतो. गुंजन आईच्या जेवणाचे भरभरून कौतुक करते. आज पहिल्यांदा किती तरी दिवसांनी तिचे मन तृप्त झाले होते. एवढे पदार्थ खाऊन. आईच्या हाताला खरचं अन्नपूर्णा होती. नाहीतर कधीही सगळ्यांसोबत खाणारी गुंजन आज मात्र एकटीच सगळ्यांच्या आधी बसून आमरस जो की कधीच तिला आवडत नसायचा तो देखील, बोट चाखून खात होती. आईला देखील ती भरपेट जेवली म्हणून समाधान मिळत. वेद देखील आज नेहमीपेक्षा जास्तच जेवण करतो. आईच्या हाताची चवच वेगळी असल्याने!!




क्रमशः
_______________
आईच्या हाताच्या जेवणाच्या चवीची बातच वेगळी असते. ती कधीच कोणत्याही बाहेरच्या पदार्थला किंवा आपल्या हाताला येत नाही!! तसेच काहीसे इथे दाखवण्यात आले. भेटू पुढील भागात.