विश्वास Liyana द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विश्वास

एक दिवस असेच केबिन मध्ये बसलेली असताना पिंकीला कोणी हाक दिली. ती पहिल्या पासूनच साधी - भोळी कोणा परकीय व्यक्तीशी सहज न बोलणारी, विशेष करून पर -पुरुषांशी संवाद साधने तिच्यासाठी ती अवघड गोष्ट तरी देखील कोणी हाक दिली हे पाहायला ती मागे वळली बघते...

ते तर काय ती दुसरी - तिसरी कोणी व्यक्ती नसून ते तिला ऑनलाईन शिकवणारे तिचे मराठीचे प्रोफेसर होते.
पिंकीने थोडी घाबरत त्यांच्याशी संवाद साधला तदनंतर तिला कळून चुकले कि एक दिवस लेक्चर मिस झाला म्हणून त्यांना तिने शंका विचारण्यासाठी मेसेज केला होता... हे तिला त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर कळून चुकले .

त्यांना थोडे काम असल्याने त्यांनी तिचा निरोप घेतला. थोड्या दिवसांनी पिंकी कॉलेज ला येऊ लागली, कोरोना चा काळ असल्यामुळे सर्व सावधानी बाळगून येणे आवक्ष्यक होते व वर्गात नवीन असल्यामुळे तिचे कोणी फ्रेंड्स देखील नव्हते . वर्गात शिकवताना ते प्रोफेसर तिचे नाव पुन्हा- पुन्हा उदगारु लागले तिने त्यांना सांगितले माझे नाव वर्गात घेण्याचे टाळा परंतु व्यर्थ,ते म्हणाले नावात काय ठेवलय.प्रोफेसर तिच्यापेक्षा वयाने फक्त 5 वर्षांनी मोठे होते. परंतु कसे काय ते तिच्यामध्ये गुंतले हे तिलाच समजत नव्हते.ते तिला म्हणाले तू खूप सुंदर आहेस. पाहत जा स्वतःला असे आरशात तुलाच समजेल.

काही दिवसांनी कळून चुकले कि ते देखील तिला आवडू लागले होते, रिकाम्या वेळेत ती त्यांना मेसेज करायची आणि ते तिला रिप्लाय... सगळेच काही रिप्लाय देत नसतात वेळ जे देतात त्यांना तूम्ही महत्वाचे वाटता . तिला कळले आता आपल्या मधील बंध जुळत चालला आहे, भेटीची पालट मैत्री मध्ये झाली. ते देखील तिच्या येण्याची वाट पाहायचे कधी आजारी असल्यामुळे वर्गात 4-5 दिवस न आल्यास ते तिच्या मैत्रनींना विचारायचे.

आणि काय सांगू त्यांनी तिला जेवणासाठी बोलावले. तशी ती कधी एकटी मित्र का असेना परंतु पर व्यतिबरोबर ती जेवणास कुठे फिरायला देखील गेली नव्हती, ती म्हणाली, "कृपया,तूम्ही काय बोलताय याच्यावर लक्ष ठेवा". एका मुलीची भावना कुठे एका पुरुषाला समजेल. ती बोललेल्या एका वाक्याचा त्यांना खूप राग आला, ते घडले असे कि तिने जर मराठीत सांगितले असते तर त्यांना लागले नसते. इंग्लिश मध्ये बोललेले वाक्य असे होते " mind your words, plz".
ह्या एका वाक्याने रिप्लाय देणे त्यांनी सोडून दिले. त्यांना वाईट वाटले असले असेल म्हणून तिने त्याची खूप वेळा माफी मागितली पण व्यर्थ...शेवटी ती त्यांना म्हणाली झालेल्या घटणेसाठी मी तुमची माफी मागते, मी सहजा माणसांना तोडत नाही पण हे कसे घडले मला माहित नाही. इतके दिवस तूम्ही मला वेळ दिलात त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे, म्हणून तिने त्यांचा निरोप घेतला.


तिला माहित होते असेच काहीतरी घडणार कारण तीला दुसऱ्यांना दुखावणे पसंद नाही पण तिला हे घाव कित्तेकदा सोसावे लागले होते. मुलिंच्या भावना कुठे मुलांना समजतात , म्हणून हे दुःख तिला अजून झेलावे लागत आहे.ती वाट पाहत आहे, ज्या मित्रावर तींने अपार विश्वास ठेवला होता ते तिला एकदिवस समजून घेतील म्हणून...कारण प्रत्येक मुलगी कोणी तिला सोडून दिले म्हणून ती सहजासहजी कोणाला सोडत नसते, तिचा विश्वास इतका भक्कम असतो कि ती वाट पाहते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आणि तिला हे सर्व जेव्हा अशक्य वाटू लागते, ती वाट पाहण्याची आशा सोडून देते.
हीं एक छोटीशी गोष्ट एका साधारण मुलीची, अशा अनेक मुली असतील हो मुलींना समजून घ्या.. त्यांचे प्रश्न त्या तुम्हाला सांगतीलच असे नाही.. त्यांना हीं दुःख आहेत. व्यक्त केले नसेल म्हणून काय झाले त्यांनाही तुमच्या सारखाच मान आहे.
मुली नैसर्गिक रित्या देवाची देणगी आहे, तिला कोणाची आई , कोणाची बहीण, कोणाची पत्नी असते त्यांना मान द्या सन्मानाने वागवा सन्मानाने जगू द्या...


-सर्व मुलींना समर्पित🙂