अंकिलेश - एक प्रेमकथा - 10 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

अंकिलेश - एक प्रेमकथा - 10

१०

@ अंकिता

यू नो माय ममा इज ग्रेट! डाॅक्टर मुग्धा देशपांडे मॅडम दोन महिने इकडे नव्हत्याच! त्या दिवशी त्यांचा फोन आल्याचे तिने खोटेच सांगितले! पण काही असो, दॅट अटेंप्ट वाॅज अ ग्रेट थिंकिंग बाय हर! आजची केईएम व्हिजिट मात्र त्यांचा ममाला फोन येण्याच्या आत रिपोर्ट करून टाकायला हवी! पुढे अख्खि एक गाणं म्हणायचा मध्ये मध्ये.. मुहब्बत की राहों में चलना संभलके! खरंय ते. आणि त्याची ही सवयच आहे. येता जाता कुठलाही शब्द मिळाला की त्यावरून गाणे म्हणतो. त्याचा आवाज आता तसा इरिटेट करतो मला. पण तेव्हा नाही करायचा! टाइम चेंजेस एव्हरीबडी.. प्रोबॅबली हिज व्हाॅईस हॅज चेंज्ड ओव्हर द टाइम!

ते इन्व्हिटेशन त्याला देऊन मी आले, त्यानंतर त्याच्याच बरोबर बसच्या वरच्या मजल्यावरचा पहिला प्रवास.. इमॅजिन, विथ हिम! मला ते गाणं आठवत होतं..

या, ही लुक्ड सो फाईन

येस, आय विल मेक हिम माईन

अँड व्हेन ही वाॅक्ड मी होम

डा.. डू.. राॅन राॅन राॅन, डा.. डू.. राॅन राॅन राॅन..

मला अजूनही आठवतात त्या गप्पा.

"तू बस इन धिस बस.. मग म्हणू नकोस आता बस!" अखिलेशने तोडलेले शब्दांचे तारे आठवतात! किंवा "हिम्मतसे ही आदमी की किमत होती है!" "तुला ठाऊक आहे ना तो डायलाॅग, तसा माझा पण एक आहे, जिधर मैं खडा रहता हूं वहांपर लाईन खत्म होती है!"

असली काही वाक्ये. घरी आल्यावर रेकाॅर्ड रिवाइंड नि रिप्ले केल्यासारखी आठवत मी हसत होते. आय टेल यू, इट वाॅज लाइक अ ड्रीम.

रस्त्यात त्याने त्याचे घर दाखवले. आय टेल यू.. आय वाॅज सो इंप्रेस्ड! नाॅट बाय हिज होम! बट बाय हिज आॅनेस्टी. म्हणजे मुलं इंप्रेशन मारायला काहीही थापा मारतात.. 'जो जिता वही सिकंदर' मध्ये हीरो मारतो तशा. जाता येता अख्खि, मुद्दाम असणार, पण ट्राइंग टू मेक मी अवेअर आॅफ हिज ॲव्हरेज कंडिशन. मला त्याने काहीच फरक पडणार नव्हता, बट हीज एफर्ट्स वेअर टू मेक मी अवेअर. मी तर माझी गाडी सोडून असा बसचा प्रवास सुरू केलाच होता. त्याच्यासाठी मी बाकी ही गोष्टी सोडल्या असत्याच. पुढे आमची या बाबतीत खूप डिस्कशन्सही झाली. ही टोल्ड मी अबाउट हिज ड्रीम्स.. व्हिच हॅड ओन्ली मेडिकल करीयर.. अँड नाॅट मच अबाऊट बिकमिंग रीच अँड वेल्दी. वेल्दी की फिल्दी रीच! मला तरी या सगळ्यांनी काय फरक पडणार होता? पण हे सगळे खूप नंतरचे. म्हणजे मध्ये अजून काही घडायचे बाकी होते.

वन ॲक्टचा तो प्रोग्राम मस्त झाला त्या दिवशी. म्हणजे नाॅट अबाऊट दॅट नाटक. तसा मी तो ड्रामा पाहिला नाही नीट. पण रियल प्रोग्राम वाॅज टू बी विथ माय ब्ल्यू आईड बाॅय! आय वाॅज आॅल द टाइम थिंकिंग अबाऊट हिम सिटींग नेक्स्ट टू मी. अख्खि हॅड काॅल्ड अप अ डे प्रायर. वुई हॅड टाॅक्ड फाॅर क्वाइट अ लाँग टाइम. ते आठवत होते. ममा सेव्हन टू एट तिच्या योगासनांच्या क्लासमध्ये बिझी असते. ती वेळ अख्खिला दिली म्हणजे फोन तिने उचलायचा प्रश्नच नाही! असं डोकं चालवायला लागतं. नि मी ते इन्स्टंटली चालवू शकते. अख्खि एकदा म्हणालेला, यह प्यार क्या क्या नहीं सिखाता! खरंय! प्यार म्हणा, इश्क म्हणा, प्रेम किंवा मोहब्बत म्हणा! मी हे सारे शब्द पुढे अख्खिकडूनच शिकले. नाहीतर लव्ह हा एकमात्र शब्द ठाऊक होता मला! अर्थात अख्खिला इतके सारे समानार्थी शब्द माहिती असले तरी आमच्या लव्हस्टोरीत इनिशिएटिव्ह मीच घेतला. नुसते शब्द ठाऊक असून नि भाषा चांगली असून कोणाचे भले झालेय?

तो नाटकाला आला तेव्हा मी त्याला जणू काही स्वत:च आॅरगनाईझर असल्यासारखी रिसिव्ह करायला उभीच होते. लकीली ममाला इंटरेस्ट नाही नाटकात नि पपांना तर स्वत:चा श्वास घ्यायलाही वेळ शोधायला लागतो. त्यामुळे द फिल्ड वाॅज ओपन. अख्खि समोर दिसला.. आय वेव्हड् ॲट हिम. मग एका बाजूला खास जागा शोधून आम्ही बसलो. मग ते नाटक..

अख्खि तसा बेअकली आहे. म्हणजे वेडा मला मध्येच विचारतो कसा, बाकी दुसऱ्या काॅलेजातून कोण कोण आलंय? जसं काही इतर कोणी आल्याने त्याला खरेच फरक पडणार होता! आणि बाकी कोणी येणार तरी कसे? कोणाला इन्व्हाइट केले असेल तर ना?

हे इन्व्हिटेशन खास अख्खिसाठीच होतं. म्हणजे आॅफिशियल काही नव्हतं. बट आमचा मराथीचा सेक्रेटरी इज अ गुड फ्रेंड आॅफ माईन. त्या दिवशी तो नाटकाचा बोर्ड पाहिला.. ते लिटररी मंडळच ठाऊक नव्हतं तर सेक्रेटरी कुठून माहिती असणार? त्याला शोधला तर तो निघाला शेखर प्रधान! माझ्याच शाळेतला, पण मराथी सब्जेक्ट घेतलेला. शेखरला सांगायचे कसे? म्हटले, "काँग्रॅटस्!"

"थ्यांक्स! पण कशाबद्दल?"

"धिस ड्रामा अँड आॅल!"

"ओह! प्रत्यक्ष अँकिटा गवासकर प्रेझिंग मराथी मंडळ!"

आमच्या काॅलेजात माझे अँग्लिसाइज्ड बोलणं तसं फेमस होते. पोरं मला अँकिटा गवासकर म्हणायची इंग्रजी अँक्सेंट मध्ये!

"अरे, इतके मोठे वन ॲक्ट.."

"ओह! धन्यवाद!"

"बट डोन्च्यू थिंक वुई शुड इन्व्हाइट अदर काॅलेज पीपल!"

तो म्हणाला, "कधीपासून तू नाटकं पाहायला लागलीस? ते ही मराथी?"

मी म्हणाले, "तसं काही नाही.. बट आय वाँट धिस टू बी सक्सेसफुल. पहिलंच नाटक आहे हे.."

शेखर जोरात हसला, म्हणाला,"नाऊ आय नो. समथिंग फिशी हिअर! मॅडम अंकिता, धिस इज आॅल्मोस्ट फोर्थ वन इन लास्ट सिक्स मंथस!"

"तरीही. धिस ॲक्ट लुक्स सो स्पेशल!"

"ओ के. मॅडम आपण बोलावू.. फक्त एक कंडिशन.. फुलफिल आयदर आॅफ धिज.. दोन पैकी एक. एक, टेल मी एक्झॅक्टली व्हाॅट्स स्पेशल इन धिस ॲक्ट.. किंवा.. टेल्मी द मोटिव्ह बिहाईंड आॅल धिस! एनी वन आॅफ धिज. टेक युवर पिक!"

मी काय सांगणार होते? पहिला आॅप्शन तर शक्यच नव्हता. इतके मराथीतर मला येत नव्हते की ड्रामा दोन तीनदा पाहिला तरी त्याबद्दल नक्की सांगू शकेन. तर राहिला दुसरा आॅप्शन..

"शेखर, यू कॅन हेल्प मी. आय वाॅट टू इन्व्हाईट समवन.."

"स्पेशल समवन?"

"तसंच काही.."

"कोण आहे? सम अदर काॅलेज? आपल्या काॅलेजात इतके सारे आहेत.."

"तसं नाही रे. पण तो केईएमच्या मराथी मंडळाचा सेक्रेटरी आहे.. सो इट्स लाॅजिकल टू काॅल हिम!"

"आय सी! लाॅजिकल!"

"नुसतं आय सी नाही. लाॅजिकली नाऊ गिव्ह मी द इन्व्हायटे."

"पण तसं काही छापलं नाहीये.."

"मग छाप!"

"तूच छापून घे, छाप आणि पाड त्याच्यावर छाप!"

"शेखर, एवढं मराथी मला आलं असतं तर मीच लिहून प्रिंट केलं असतं.. बट इतकी लँग्वेज नाही येत मला.."

"मग?"

"तू लिहून दे. आॅफिसात प्रिंटरवरून काढते प्रिंट आऊट!"

"वा! व्हेअर देअर इज विल.. पण एक सांगू.. कमीतकमी नाटकाचं नाव तरी वाचून जा.. नाहीतर गोची ऐनवेळी.."

"यस.."

"तसं ड्रिस्किपटीव्ह आहे नाव. ॲप्ट अगदी!"

"म्हणजे?"

"प्यार किए जा..!"

"शेखर.. डोन्ट पुल माय लेग्स.. टेल्मी द नेम.."

"ते नाटकाचंच नाव आहे. तुला काय वाटलं, शेखर्स ॲडवाईज आहे म्हणून?"

आमच्या एका डिपार्टमेंटमध्ये एकमेव इलेक्ट्राॅनिक प्रिंटर होता. त्यावर मराठीत प्रिंटाऊट काढला गेला.. नाटकाचं नाव छान होतं, 'प्यार किए जा!' ते इन्व्हिटेशन नाटकाचेही होते नि अख्खिसाठी लिटरलीही होते! आमची लव्हस्टोरी यातूनच पुढे सरकली.. अख्खि नंतर एकदा म्हणालेला, एका इंग्लिश मुलीने हिंदी नावाच्या मराथी नाटकाचे आमंत्रण दिले.. आणि त्याला 'प्यार किए जा' असा मेसेज दिला.. आणि तो त्याला पाळावाच लागला!