Sparshbandh? - 4 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 4




"डॅडी आज मी इथेच तुज्या कुशीत झोपू, प्लिज......." मिरा बारीक तोंड आणि ओठांचा चंबू करत म्हणाली......




"व्हाय??... रोज झोपतेस ना मग आज पण झोप.....जा रूम मध्ये डॅड ला आज खूप काम आहे...." विराज म्हणाला.



"नो..... मी तुला कडलं करून झोपणाल.. आज तू काम नाई कलायचं..."मिरा गाल फुगवून म्हणाली.... विराज ने केसातून हात फिरवला आणि तिला जवळ घेतल...




आणि लाईट्स ऑफ करून तिला कुशीत घेऊन झोपला........ ती पण गप्पा गोष्टी न करता झोपून गेली........ एक तोच तर होता तिला जवळ च... तिचा बाबा, तिचा डॅडी, तिची आई सगळं सगळं काही..... तोच होता...




ती पण निवांत त्याच्या छातीत तोंड घालून झोपली,...... ती झोपताच विराज उठला....!! तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले....आणि बाल्कनीत जावून बसला......




जुन्या आठवणीनं मध्ये हरवला............




मीराला त्याच्या बेडवर झोपवून तो बाल्कनी मध्ये आला आणि सिगारेट पेटवली..... जसा जसा सिगारेटमुळे धूर बाहेर पडत होता तश्या तश्या त्याला तिच्याबरोबरच्या आठवणी त्या धुराबरोबर विरत जात होत्या ...विराजला कधी तिच्याबद्दलची माहीती आपल्याला मिळतीये असं झाल होत.....त्याच्या पाठोपाठ 2 सिगारेट पिऊन झाल्या होत्या पण विचार काही संपत नव्हते.... झोप तशीही त्याला नाही मिळाली तरी त्याला काहीच अडचण नव्हती.... विराज मोजून 3-4 तासच सलग रात्री झोपू शकत होता.... त्या एका घटनेनंतर त्याला झोपणं पण जीवावर यायचं....शेवटी त्याने सगळे विचार आणि तिच्या आठवणी सिगारेटबरोबर ॲश ट्रे मध्ये विझावल्या आणि वास जाईपर्यंत तो बाहेरच थांबला.... नंतर तोंड धुवून त्याने 2 स्लीपिंग पिल्स घेतल्या आणि बेडवर मीरा शेजारी येऊन पडला....




***********************************





मिष्टीने आणि रूद्रांशने रात्रीचं जेवण करून घेतल.... जेवणानंतर रूद्रांश थोड्यावेळ अभ्यासाला बेडरूममध्ये बसला तर मिष्टी किचनमधल आवरून हॉल मध्ये येऊन बसली.....पुढे काय करायचं ह्याच विचारात ती गुंतली होती..... असं नव्हत की तिला नविन जॉब मिळणार नाही किंवा तिचं शिक्षण कमी आहे पण एवढ्या लगेच नविन जॉब शोधणं थोड अवघड होत तिच्यासाठी....





" मिष्टी....मिष्टी अस हातावर हात धरून बसल्याने काही होणार नाहिये.... नोकरी तर नक्कीच मिळणार नाही तुला अशी नुसती बसून राहिलीस तर....आतापासूनच नविन जॉब शोधायला हवा तुला." मिष्टी मनातच स्वतःला सांगत होती.




ती उठली आणि लॅपटॉप आणि पेपर,पेन घेउन परत सोफ्यावर येऊन बसली.... बऱ्याच शोधमोहीमेनंतर तिने जिथे तिला जॉब मिळू शकतो त्या सर्व कंपनीची नावे लिहून काढली.....



सर्वांच्या मेलवर तिने तिचा रेज्यूमे पाठवला आणि लवकरात लवकर त्यांच्याकडून उत्तर मिळेल ह्या आशेने तिने लॅपटॉप बंद केला.... थोड्यावेळाने ती देखील निद्रेच्या आधीन झाली.




सकाळी बरोबर सात वाजता तिने उठून सगळा स्वयंपाक आणि नाष्टा करून ठेवला कारण रुद्रांशला कॉलेजला लवकर जायचं होत....तो गेल्यावर तिने घर आवरलं..... घर आवरेपर्यंत 12 वाजून गेले होते.... कालच्या तिने पाठवलेल्या मेल्स ला उत्तर मिळालं असावं हया अपेक्षेने तिने लॅपटॉप उघडला....फक्त 1-2 कंपनी कडूनच तिला उत्तर मिळालं होत.... त्यातला एकाच कंपनीने तिला इंटरव्ह्यूसाठी उद्या यायला सांगितल होत....




" एकाच कंपनीने बोलावलं आहे.... कोणीच न बोलवण्यापेक्षा बर आहे.... मला उद्याचा इंटरव्ह्यू पास केलाच पाहिजे." मिष्टी म्हणली.....


तिने पूर्ण दिवस उद्याच्या इंटरव्ह्यूच्या तयारी करण्यातच सत्कारणी लावायचा ठरवलं होत.... त्यानुसार ती कामाला देखील लागली.




******************************************




विराज आपल्या ऑफिस मध्ये आपल्या आलिशान अश्या केबिन मध्ये चेअर वर आरामात काम करत बसला होता...



तोच एक व्यक्ती आत आला आणि त्याने विराज समोर एक मोठी फाईल ठेवली....!! तस विराज विचारातून बाहेर आला, त्याने समोरच्या माणसाला पैश्यांचा चेक दिला तसा तो माणूस चेक घेऊन निघून गेला......



विराज ने ती फाईल ओपन केली.... त्यात मिष्टी ची सगळी माहीती होती. त्याने एका डिटेक्टिव्ह ला कामाला लावल होत.... त्या साठी त्याला उत्सुकता तर होतीच कि मिष्टी आज चक्क 5 वर्षांनी त्याला दिसली होती.....!!




जेव्हा ती त्याला सोडून गेली होती तेव्हा त्याला दुःख तर झालंच होत पण त्यापेक्षा जास्त राग ही आला होता....पण ती का सोडून गेली होती याच कारण त्याला माहीतच न्हवत.......




त्याने तिची माहिती अगदी व्यवस्थित वाचायला सुरुवात केली......ती मागच्या वर्षीचं मुंबई मध्ये आली होती, आपल्या भावा सोबत राहायला.....




पण त्याला इतक तर नक्कीच माहीत होत कि तिला आई वडील न्हवतेच... आणि भाऊ तर दूरचीच गोष्ट , त्यात ती त्याला ओळखत नाही हा सगळा गोंधळ होता नुसता.....





इतकी काही खास माहिती न्हवती.... त्याच्याकडे पण तिच्यावर सध्या खूपच पैश्यांच ओझं होत हे नक्की समजलं......




आणि त्यात तिला जॉब वरून पण काढून टाकलं होत..... आपण आपल्या ऑफिस मध्ये तिला जॉब दिला तर ती नक्कीच रिजेक्ट करणार न्हवती.....!! आणि त्यात तिच्याबद्दल जाणून घ्यायची पण हीच संधी आहे....




त्याने अजून बरंच काही वाचलं..... पण मिष्टी.... हे नाव ओळखीचं तर न्हवतंच... पण मायरा..... हे नाव बदलून तिने मिष्टी का केल असेल....????




ही मायरा...... नो मायरा नाही ही मिष्टी आहे... पण खरंच ही माझी मायरा असेल का....??? कि कोणी दुसरीच आहे???? विराज च डोकं चालणं आता बंद च झाल होत....इतके दिवस तो तिच्या माहिती साठी एक्सायटेड होता.... पण तिची माहिती वाचून उरलेली एक आशा पण निघून गेली..... ही कोणी वेगळीच आहे.........



" मिष्टी.. मिष्टी... मिष्टी इट्स टू कॉम्प्लिकेटेड गर्ल... ह् ... इतक करुन सुद्धा काही उपयोग नाही......" विराज



त्याच्या मनाची बेचैनी अजून वाढतंच होती......मन काय हृदय ही मानायला तयार न्हवत..... त्याच!!




*********************************************

********************************************




मिष्टी ला उद्या इंटरव्ह्यू साठी जायचं होत.. त्यामुळे ती सगळं शोधून काढत होती...... एक एक कागद नीट एका फाईल मध्ये लावला आणि उद्याच्या इंटरव्हिउ ची तयारी करू लागली..


मोठ ऑफिस होत तर नक्कीच हाय-फाय लोक असणार.... त्यामुळे कपडे सुद्धा चांगलेच घालावे लागतील.... हे नक्की होत.......



तिने एक ऑफिस शर्ट आणि ब्लॅक मध्ये एक पॅन्ट काढून ठेवली.......



सोबत ते काय काय प्रश्न विचारतील... हा विचार करून तिच्या पोटातच गोळा आला....!! तिने त्यांच्या वेबसाईट वर जावून त्या ऑफिस बद्दल बरीच माहिती मिळवली.... छान होत ते....बघताच क्षणी आवडलं तिला...... म्हणून तिने तेच सिलेक्ट केल......


फक्त एकदा....... का इटरव्ह्यू पास होऊ दे मग कसलंच टेन्शन राहणार नाही.....तरी ती सोबत साईड जॉब पण करत होती..... एका आश्रमात जावून लहान मुलांना शिकवायची त्याचे आश्रम तिला पैसे पण द्यायचे....


त्यामुळे घरचा राशन चा खर्च त्यात जायचा......!!! आजचा अर्धा दिवस उद्याच्या तयारीतच गेला........


*******************************

पुढच्या दिवशी मिष्टी आवरून तयार झाली.... नेव्ही ब्लू कलरचा शर्ट त्याखाली ब्लॅक फॉर्मल पँट कानात छोटेसे टॉप्स आणि केसांचा हाय पोनी घातला.....चेहऱ्यावर थोड टेन्शन होतच पण शेवटी काहीही पर्याय नव्हता त्यामूळे तिने आत्मविश्वासाने सामोरं जायचं ठरवलं.... रुद्रांश आणि तिने नाष्टा केला.... त्याला दुपारचा जेवणाचा डबा आणि स्वतःलाही तिने डबा भरून घेतला.... रुद्रांश त्याच्या गाडीने कॉलेजला निघून गेला तर ही रिक्षातून त्या ऑफीसच्या पत्त्यावर पोहचली..... समोर बघितल तर मोठ्या अक्षरात 'जहागीरदार इंडस्ट्रीज' लिहिलं होत.

आत रिसेप्शनवर तिने इंटरव्ह्यू साठी आली आहे सांगितल.... त्यांनी तिला 4th फ्लोअर वर जाण्यास सांगितल....मिष्टी लिफ्टने वर आली.... तिथल्या एका रूमवर इंटरव्ह्यू रूम अस लिहिलं होत.... मग ती तिथल्या रिसेप्शनिस्टला नाव सांगून तिच्या टर्नची वाट बघत बसली....अजून 10-20 लोकं इंटरव्ह्यूसाठी आलेले होते..... त्यांच्याकडे बघून ती खूपच साधी आली आहे अस वाटल तिला.... ती त्यांच्याकडे न बघता मनात इंटरव्ह्यू चांगला जावा म्हणून देवाकडे प्रार्थना करत होती....

थोड्याचवेळात तिला आत जायला सांगितलं.... तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि चेहऱ्यावर हास्य ठेउन रूमकडे वळली..... आधी तीन दारावर नॉक केलं.

' मे आय कम इन सर??' मिष्टीने अदबीने विचारलं.

' येस... कम इन.' आतून तिला आत येण्याची परवानगी मिळाली.

आत 5 जण समोर बसले होते....

' प्लिज टेक अ सीट' त्यातला एक व्यक्ती तिला म्हणाला.

तिने सगळ्यांकडे बघून एकदा आत्मविश्वासाने स्माइल केली ...त्यातले 4 जण तीच्याकडे पाहत होते तर एक जण लॅपटॉपवर काम करत होते..... ती त्यांच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली.

' युअर नेम?' 4 जणांपैकी एकाने तिला विचारलं.

' मिष्टी देसाई.' मिष्टी हसून म्हणाली.

तीच नाव ऐकताच लॅपटॉपवर काम करणाऱ्या व्यक्तीची बोट टायपिंग करायची थांबली आणि त्या व्यक्तीने वर पाहिलं.... मिष्टिने पण त्याचवेळी त्या व्यक्तीकडे पाहिलं.... दोघांचीही नजरानजर झाली.... दोघांसाठी तो क्षण तिथेच थांबला होता जणू....





क्रमशः....




इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED