स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 10 Pradnya Jadhav द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 10

विराजने मिष्टीचा चेहरा पुन्हा एकदा आठवला... असं indirectly तर लग्नाची मागणी तर नाही घालू शकत.....त्यासाठी तिला मीराच्या अजून क्लोज जावं लागेल......

"तिला प्रिन्सेसची किती काळजी आहे ते जाणून घ्यावं लागेल."


पण त्याला त्याच्या आयुष्यात नियतीने काय लिहून ठेवलं आहे कुठे माहिती होत??....त्याने केलेला निर्धार जसाचतसा राहू शकणार होता का ??

विराजचे डोळे आता जड झाले होते.... कधी नव्हे ते त्याला लवकर झोप आली होती....त्याने लावलेली जुनी गाणी बंद केली आणि बाल्कनीच दार नीट लॉक करून तो झोपी गेला.



इकडे मिष्टीची पण काही दुसरी हालत नव्हती....तिच्या डोळ्यासमोरून पण सकाळी झालेला प्रसंग जसेच्यातसे सारखे दिसत होते.


जेवणात पण तीच काहीच लक्ष लागत नव्हत...नुसता चमचा घेऊन इकडे तिकडे ताटात फिरवत बसली होती.


" दी अग तुझ लक्ष कुठे आहे ?" रुद्र तिला हलवत म्हणाला.


"अं.....नाही....काही नाही.....म्हणजे माझ लक्ष जेवणात तर आहे." मिष्टी गडबडून बोलू लागली.


" अग दी माझं जेवण संपत आल आता आणि अजून तुझ सुरू पण झालेलं दिसत नाहीये....ह्याला लक्ष असणं म्हणतात का??" रुद्र तिच्यावर नजर रोखत म्हणाला.


" अम.... नाही." मिष्टी मान खाली घालून बोलते.


" दी.....काही झाल आहे का??.....आज तू कुठेतरी हरवली आहेस अस वाटत आहे." रुद्र जरा सिरीयस होऊन काळजीने विचारतो.


" नाही रे.... अस काही नाही.....ते जरा ऑफिसच बाकी काही नाही." मिष्टि रुद्रला काहितरी सांगायचं म्हणून सांगते.


" नक्की काही सिरीयस नाहीये ना दि??" रूद्र अजूनही साशंकच होता.


"हो रे." मिष्टी खोटं खोटं हसत म्हणाली.


" रूद्र ऐक ना." मिष्टी जरा विचार करत म्हणाली.


" काय ग दी??.....बोल ना." रुद्र


" रूद्र तुला आपल्या फॅमिली बद्दल काही आठवत का रे??" मिष्टी त्याच्याकडे पाहत जरा आशेने म्हणाली.


" अम्......नाही....नाही ग दी......एवढं काही नाही आठवत.....मी किती लहान होतो तेव्हा आणि मोठा होत होतो तेव्हा मला तर मामा कडे पाठवून दिलं." रूद्र जरा थोडा विचलित होत म्हणाला.


" बर." मिष्टी जरा नाराज होत म्हणाली.


दोघांनीही मग शांततेत जेवण केलं आणि आवरून झोपायला गेले.



एक मुलगी एका गाडीमागे जोरात धावत होती.


ती मुलगी :- थांबवा....प्लिज गाडी थांबवा.......आई sssss बाबा ssssss मला सोडून नका जाऊ...... आई sssss मला सोडून नको जाऊस....... बाबा ssssss प्लिज गाडी थांबवा......मी काहीच नाही केलं...... माझ ऐकून घ्या.


ती खूप जोरजोरात ओरडत पळत होती ....... डोळ्यातून सतत पाणी ही गालावर येत होत....पण आता तिच्या डोळ्यापुढे हळूहळू अंधारी येऊ लागली होती पण तरीही ती जिवाच्या आकांताने गाडीमध्ये पळत होती पण ती गाडी काही थांबली नाही.


आता तिला सगळ असह्य झाल आणि तिच्या डोळ्यापुढे पूर्ण अंधार झाला आणि ती तिथेच रस्त्यात खाली कोसळली.


मिष्टीने खाडकन डोळे उघडले.......तिचा चेहरा पूर्ण घामाने भरला होता.


तिच्या स्वप्नात हि घटना तिला दिसली होती पण हे स्वप्न होत की भूतकाळ??


तिने कसतरी हाताने चाचपडत लाईट ऑन केला आणि शेजारच्या बॉटल मधल पाणी घटाघटा प्यायलं.


त्या मुलीची हाक तिच्या हृदयात घर करून बसली होती.


मिष्टीला खूप बेचैन वाटतं होत.......ती उठली आणि बाल्कनीमध्ये येऊन उभी राहिली.

शांत आणि मोकळ्या वातावरणात येऊन तिला जरा थोड बर वाटत होत.

ती अजूनही त्या स्वप्नाच्या विचारातच अडकली होती.

मनातून सारखं काहितरी खूप महत्वाचं हरवल आहे अस सारख तिला वाटत होत.....तिच्या खूप जवळच...... पण काय ते काही उमजत नव्हत.


मिष्टीला आता खूप एकट वाटत होत.......ह्या संपूर्ण जगाविरुद्ध ती आहे अस तिला फिल होत होत.

तिच्या मनात आता खूप विचारांनी थैमान घातलं होत.

मिष्टी मनातच विचार करत होती......

" माझा भूतकाळ काय होता ??......माहिती नाही........भविष्यकाळ??......माहिती नाही......फक्त नवीन दिवसागणिक जगायचं म्हणून जगत आहे......ह्यालाच आयुष्य म्हणतात का??......अस आयुष्य जगण्यापेक्षा कधीही मेलेल चांगल ना??"

ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती.

तीला स्वतःचाच आता राग येत होता.


झोप तर काही येणार नव्हती आता.....शेवटी तिने आतून हेडफोन्स आणले आणि तिच्या मोबाईलला जोडून तिने तिची आवडती जुनी गाणी ऐकत तिथेच बसली.


जेव्हा सगळ तिला असह्य व्हायचं.....जगणं नको वाटायचं तेव्हा सगळ्या जगापासून स्वतःला लांब करण्यासाठी ती गाण्यांचा आधार घ्यायची.....थोडावेळ का होईना त्या गाण्यांमध्ये ती हरवून जायची......तिला शांत वाटायचं.......एकटीने शांततेत राहील की नको नको ते विचार तिच्या डोक्यात यायचे म्हणून मग ती तिची आवडती जूनी गाणी ऐकायची.


आजही तसच झाल होत.

गाणी ऐकता ऐकता कधी तिचा डोळा लागला हे कळलच नाही..... मिष्टी तशीच तिथे भिंतीला टेकून झोपी गेली.


सकाळी तिला जाग आली ती तिच्या आलार्मने.


मिष्टीने तीच पटकन आवरलं आणि स्वयंपाक वैगरे सगळ करून ती office साठी निघाली.



▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


" डॅडा sssss......डॅडा sssss " मिरा तिच्या इवल्या इवल्या हाताने विराजच्या पोटावर बसून त्याला हलवून उठवत होती.


" डॅडा उत ना रे!!" मीरा त्याला हाक मारत म्हणाली.


विराज तरीही उठत नव्हता...... मीराने तिचे छोटे छोटे हात तिच्या कमरेवर ठेवले आणि तिच्या झोपलेल्या डॅडाकडे डोळे छोटे करून काहितरी विचार करत बघू लागली.


तिला काहीतरी सुचलं आणि ती खुश होत पटकन त्याच्या पोटावरून उठली आणि बेड वरून उडी मारून पळत तिच्या बेडरूम मध्ये गेली.


मीरा गेल्यावर विराजने एक डोळा उघडून ती गेलेल्या दिशेला पाहिलं आणि हसू लागला.


विराज तर केव्हाच उठला होता पण त्याच्या प्रिन्सेसची गंमत करावी म्हणून झोपायच नाटक करत होता.


मीराच्या स्लिपर्सच्या आवाज परत येऊ लागला तेव्हा विराजने पटकन परत आपले डोळे बंद केले.


मीराने तिच्या fluffy स्लिपर्स पायातून काढल्या आणि परत उडी मारून बेडवर खूप कष्टाने चढली.


तिने तिच्या हातातल्या गोष्टीकडे पाहिलं आणि खुदकन हसत विराजकडे पाहिलं.


मिराने परत त्याच्या पोटावर बसून घेतल आणि तिने आणलेल्या तिच्या छोट्या छोट्या पिंक आणि ब्ल्यू हेअर बँड्सने त्याच्या कपाळावर आलेल्या सिल्की केसांचे तिच्या हाताने छोटे छोटे दोन पोनी घालू लागली.


आधीच मीराचे हात छोटुसे त्यात विराजचे केस सिल्की तिच्या हातात बसतच नव्हते.....तरी खूप कष्टाने तिने ते कसेबसे पोनी मध्ये अडकवले.


तिने पोनी घालून झाल्यावर त्याच नाक आणि कान ओढून त्याला त्रास द्यायला सुरुवात केली...... तिने घातलेले त्याचे दोन छोटे पोनीच ओढ कधी त्याचे गालच ओढ......आता त्यालाही त्याच हसू रोखून ठेवण अशक्य झाल त्याने हसतच तिला कवटाळल.

" डॅडाsssss तू उतलास...... मी कदी पासून तुला उतवयचा पयत्न तरत होते....... पन तू नाहीच उठलास मनून मी तुज्या केसांचे माझ्यासारखे दोन दोन चोटे चोटे पोनी घातले....बघ ना तू आता माज्यासारखा दिसत आहे." मीरा तिच्या बोबड्या भाषेत बोलत त्याला सांगत होती.

" हो का!!...... चल आपण बघुयात तू केलं तरी काय आहे ते." विराजने हसत मीराला उचललं आणि तिला कडेवर घेऊन आरशासमोर आला.

" मग ताय करणार??...... तू उततच नवता ना मनून मी केलं अस." मीरा तिचा उजवा हात कपाळावर मारत म्हणाली.


दोघेही एकदम क्यूट क्यूट दिसत होते.....तिचा छोटुसा कार्टून प्रिंट असलेला नाईट ड्रेस आणि तिच्या केसांचे दोन पोनी घातलेले होते....... मीराच्या करामतीमुळे विराजचे नाही म्हणले तरी दोन छोटे पोनी कसेतरी आले होते.....पोनी मध्ये कमी बाहेरच जास्त त्याचे केस तिने विस्कटून टाकले होते.


कोणी आता ह्यांना बघितल असत तर हाच विराज एवढा मोठा बिझनेसमन आहे ह्यावर कोणाचाही विश्वास नसता बसला.


दोघेही एकमेकांना पाहून हसत होते..... विराजने पटकन दोघांचा असा फोटो काढून घेतला.


हसत खेळत त्यांनी आवरलं आणि मीराचा हात पकडुन दोघेही हळू हळू पायऱ्यांवरून खाली येत होते.


दोघींच्याही चेहऱ्यावर भलीमोठी smile होती.....त्यांच्याकडे अस पाहून विराजच्या आईने त्यांच्या नकळतच बोट मोडून त्यांची नजर काढून घेतली.


दोघेही नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलपाशी आले..... विराजने मीराला तिच्या खुर्चीवर बसवलं आणि तिच्याच शेजारी बसून तिला भरवू लागला आणि एकीकडे स्वतः पण नाश्ता करत होता......आज सगळेजण ह्या दोघांकडे पाहत होते कारण पूर्ण डायनिंग टेबलवर ह्या दोघांचाच आवाज होता.


नाश्ता झाल्यावर मीराला गिताकडे सोपवून तो ऑफिसला निघून गेला.



▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


ऑफिसमध्ये आल्या आल्या विराजने कामाला सुरुवात केली.......त्याने landline वरून मिष्टिला फोन लावला.


आता परीक्षा सुरू होणार होती......त्याच्या मनात खूप विचार सुरू होते..... काल रात्री केलेल्या विचारांना आता सत्यात उतरवण्यासाठी पहिलं पाऊल घ्यायचं होत आता.


मिष्टिने काम करता करताच तिचा फोन उचलला.

📞

"हॅलो." मिष्टी म्हणाली.


" कम इन माय केबिन विथ Mr. मेहता फाईल." विराज तिला ऑर्डर देत म्हणाला.


"येस सर." मिष्टी म्हणाली.


त्याने फोन ठेवून दिला.


थोड्याचवेळात मिष्टिने डोअर वर नॉक केलं.


विराजने तिला आत यायला सांगितल." कम इन."


" सर...... फाईल." ती फाईल त्याला देत म्हणाली.


"टेबल वर ठेवा." विराज तीच्याकडे न पाहताच बोलला.



नंतर तो काहीच बोलला नाही......तो शांत आहे बघून तिने जावं की नाही ती द्वंद्वात अडकली....इथे उभ राहून तरी काय करणार होती ती??


तिने बाहेर जाण्यासाठी मागे वळली तेवढ्यात तिच्या कानावर त्याचा करारी आवाज पडला.


"मी तुला बाहेर जा म्हणून सांगितल??" विराज.


ती पटकन मागे वळली आणि स्तब्धच झाली कारण त्याची भेदक नजर तिच्यावर रोखली गेली होती.


उत्तर द्यावं एवढही भान तिला राहील नव्हत.


" अन्सर मी." विराज परत थोडा आवाज चढवत म्हणाला.


"न.... नो...... सर." मिष्टी घाबरतच म्हणाली.


" काल मिस. मिष्टी तुम्ही माझ्या केबिनच डोअर जोरात आपटून गेलात......का ह्याचं कारण कळेल??" विराज तिला म्हणाला.


आता काय सांगणार होती ती त्याला??.....की तुमच्यावरचा राग तिने दारावर काढला म्हणून.


" चुकून..... चुकून झाल सर. " तिने कसबस म्हणलं.


"मुद्दामून केलेली गोष्ट आणि नकळत झालेली गोष्ट ह्यातला फरक कळतो मला मिस. मिष्टी." विराज


तो त्याच्या चेअरवरून उठत म्हणाला......तिने फक्त मान खाली घातली.


डोळ्याच्या कोपऱ्यातून तो तिच्याकडेच चालत येत आहे हे तिला कळत होत आणि नकळत तिचे heartbeats ही त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर वाढत होते.


तो अगदी तिच्या पासून थोड्याशा अंतरावर उभा होता.....


"सांगा ना..... की तुम्हाला माझ्या thanks न स्वीकारण्याचा राग आला म्हणून तो राग दारावर निघाला??" विराज तिच्याकडेच पाहत म्हणाला.


मिष्टी काहीच बोलली नाही.


" मिस मिष्टी मी तुम्हाला काहितरी विचारलं....आणि मला इग्नोर केलेलं अजिबात आवडत नाही....आताच सांगून ठेवत आहे..... पहिली वेळ आहे म्हणून तुम्हाला सोडून देत आहे पण इथून पुढे लक्षात ठेवा नाहीतर पुढच्या वेळेपासून तुम्हाला पनिशमेंट मिळेल......" विराज थोड रागात म्हणाला.


त्याच्या इतक्या जवळ असल्याने तिला काही बोलायचं सुचतच नव्हत ती फक्त मान डोलवत होती.


विराज:- गूड.


विराज निर्विकारपणे म्हणाला.....तिच्या पासून लांब होत म्हणला.....तो जसा तिच्यापासून लांब झाला तेव्हा तिने रोखून ठेवलेला श्वास सोडला.


विराज:- तुम्ही आता जाऊ शकता.....आणि हो ऑफिस सुटल्यावर घरी जाऊ नका इथेच थांबा.


मिष्टीने फक्त मान डोलवली पण मनात प्रश्न निर्माण झाले होते...... ती पटकन त्याच्या केबिनमधून बाहेर आली आणि तिच्या डेस्कपाशी आली.


"ओ गॉड......हे असे इतक्या जवळ कसे आले??.....आणि त्यांच्या जवळ येण्याचा मी विरोध का नाही करू शकले??....... मिष्टी तुला साधं त्यांच्यासमोर काही बोलता पण नाही आलं फक्त मूर्खासारखी मान डोलवत होतीस.....काय विचार करत असतील ते आपल्याबद्दल??......तू खरच वेडी आहेस त्यांना प्रतिप्रश्न करायचे सोडून बाहेर पळून आलीस....... पण ह्यांनी मला थांबून का राहायला सांगितल असेल??" मिष्टी मनात बडबडत होती.


खुप सारे विचार तिच्या मनात येत होते.....तिने फक्त ऑफिस संपण्याची वाट बघायची ठरवली अजून तसही ती करू काय शकणार होती??


ऑफिसची वेळ आता संपत आली होती....सगळे जण एकेक करत निघून जात होते आता फक्त काही मोजकी माणसच मागे उरली होती.


मिष्टिने रूद्रला फोन करून तिला यायला थोडा उशीर होणार आहे कळवल होत.


घडाळ्याचा काटा हळूहळू पुढे सरकत होता पण विराज अजून त्याचा केबिन मधून बाहेर नव्हता आला.... मिष्टी त्याचीच वाट बघत टाईमपास करत बसली होती पण मनात विचारांचं काहूर माजलं होत.


विराज त्याच्या केबिनमधे बसून तिच्या प्रत्येक हालचाली टिपत होता.......त्याने त्याचा लॅपटॉप बंद केला आणि त्याची बॅग घेत ब्लेझर अंगात चढवलं आणि बाहेर आला.....तो आल्याक्षणी ती उभी राहिली.


तो झपझप पावल टाकत तिच्या डेस्कपाशी आला.


" फॉलो मी." एवढंच बोलून तो लिफ्टच्या दिशेने वळला.


ती तर त्याला फक्त पाहतच राहिली आणि भानावर येताच पटकन त्याच्या मागे पळाली.


" खडूस..... सडू कुठचे." मिष्टी त्याच्याकडे बघत हळूच पुटपुटली.


पण त्याने मागे एक कटाक्ष टाकला तेव्हा तिने झरकन मान बाजूला वळवली आणि काहीच झाल नाही अश्या आविर्भावात इकडेतिकडे पाहत होती.


लिफ्ट आली आणि दोघेही जण आत गेले.


खाली येताच विराज पटकन कार मध्ये ड्रायव्हिंग सीट वर बसला.....ड्रायव्हरला त्याने सकाळीच घरी जायला सांगितलं होत.


त्याने त्याची बॅग मागे ठेवली आणि ब्लेझर ही काढून मागे ठेऊन दिला.

त्याच झाल्यावर तो ती आत बसण्याची वाट बघत स्टिअरिंग वर एका बोटाने टॉप करत होता.

शेवटी त्याने तिच्याकडे पाहिलं आणि जरा ठसक्यातच
म्हणाला.


" मला वाट बघायला आवडत नाही मिष्टी."


तशी ती पटकन त्याच्या साईडच्या डोअर उघडून आत येऊन बसली.

ती बसल्याक्षणी त्याने कार स्टार्ट केली.


गाडीत पूर्ण शांतता होती......तिला विचारायचं होत की आपण कुठे चाललो आहोत पण अजून काही बोललो तर परत चिडायचा म्हणून ती शांतच बसली.


F.M. लावयच तर तो अजून काहीतरी बोलणार म्हणून तिने तिच्या साईडची काच खाली घेतली आणि बाहेर बघू लागली.


संध्याकाळ झाल्यामुळे अंधार पडत चालला होता..... पावसाचीही लक्षण दिसत होती......थंड वारा तिच्या चेहऱ्याला स्पर्शून जात होता......तिने अलगद आपले डोळे मिटले आणि त्या थंड वाऱ्याला अनुभवू लागली.


तिने कानात घातलेल्या झूमक्यांचा आवाज हळुवार लयीत येत होता.


बास!!......तेवढंच पुरेस होत त्याच लक्ष विचलित करण्यासाठी.


त्याने तिच्याकडे एकवार बघत परत स्वतःची नजर समोर रस्त्यावर स्थिर केली.


त्याला आत्ता विचलित होऊन चालणार नव्हतं पण शेवटी मन ते मनच असत ते कधी बुद्धीचं थोडीच ऐकत??


त्याने तिच्या साइडची काच वर केली तस तिने डोळे उघडत त्याच्याकडे पाहिलं त्याने फक्त खांदे उडवले.


" किती खडूस आहेत यार हे!!......मान्य आहे गाडी त्यांची आहे पण त्यांनाच त्रास नको म्हणून काच उघडून बाहेर बघत होते पण काच ही वर केली...... सडूपणा कुटून कुटून भरला आहे." ती त्याच्याकडे पाहत मनातच बडबडू लागली.


पण त्याने ब्लेझर काढल्यामुळे त्याच्या पांढरा शर्ट मधून त्याच्या फुगलेल्या biceps दिसत होत्या......तिची नजर सारखी तिथेच जात होती......कितीही नाकारलं तिने तरी तो मुळातच हँडसम होताच.


त्यांना पोहोचायला अजून थोडा वेळ लागणार होता.


तिने कंटाळून fm सुरूच केला शेवटी......त्याच ऐकून ऐकून कंटाळली होती.


जीने लगा हूँ, पहले से ज़्यादा
पहले से ज़्यादा, तुम पे मरने लगा हूँ


विराजने पटकन गाणं बंद करायला हात पुढे केला पण तिने त्याचा हात पटकन पकडला आणि दोघांच्याही अंगावर शहारा आला.


मागून हॉर्नचा आवाज आला तेव्हा त्याने पटकन त्याचा हात मागे घेत पुढे बघत रस्त्यावर लक्ष दिलं.


मैं, मेरा दिल, और तुम हो यहाँ
फिर क्यूँ हो पलकें झुकाए वहाँ?
तुमसा हसीं पहले देखा नहीं
तुम इससे पहले थे जाने कहाँ
जीने लगा हूँ...

रहते हो आ के जो तुम पास मेरे
थम जाएँ पल ये वहीं
बस मैं ये सोचूँ



नंतर त्यानेही गाण बंद नाही केलं.


सोचूँ मैं थम जाएँ पल ये
पास मेरे जब हो तुम
चलती हैं साँसें, पहले से ज़्यादा
पहले से ज़्यादा, दिल ठहरने लगा

तनहाइयों में तुझे ढूंढें मेरा दिल
हर पल ये तुझ को ही सोचे भला क्यूँ?
तनहाई में ढूंढें तुझे दिल
हर पल तुझको सोचे
मिलने लगे दिल, पहले से ज़्यादा
पहले से ज़्यादा, इश्क होने लगा



प्रत्येक वाक्याबरोबर त्याला ' तिची ' आठवण येत होती.


त्याने तर तिच्यावर जिवापाड प्रेम केलं होत ना.....त्याच्या
जिवापेक्षा त्याने तिला जपल होत पण तिने.....


प्रत्येक शब्दावर त्याच्या हृदयावर वार होत होते पण त्याला आता त्यांची सवय होती......कारण जखम ही तशीच होती.


विराजने पटकन त्याच्या डोळयात आलेलं पाणी पटकन पुसून टाकल...... तेवढ्यात मिष्टीने ही ते पाहिलं होत पण त्याच्या डोळ्यात पाहून तिच्या हृदयात कळ उठली.


गाण संपल्यासंपल्या त्याने fm बंद केला.....ह्यावेळी तिनेही त्याला अडवल नाही.


थोड्याच वेळात त्याने त्याची गाडी थांबवली आणि बाहेर येत मिष्टीच्या साईडच डोअर ओपन केलं.


क्रमशः.....


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️