१३ एक ईमेल
अनुला थांबवत अक्षय बोलू लागला.. त्याने आज त्याच्या मनातल्या सगळ्या भावना तिला सांगून टाकल्या. अनु काहीही न म्हणताच निघून गेली .
दुसऱ्या दिवशी त्याच्याजवळ येऊन ती म्हणाली
" तुला सगळे माझ्या नावाने चिडवतात म्हणून तुला असं वाटलं असेल. पण तसं काही नाही आपल्या दोघांत काहीच रिलेशन नाही. ना तू मला आवडतोस आणि मी तुला आवडत नाही असं समज.. "
एका दमात ती सर्व बोलून एका सेकंदात बस स्टॉप वरून नाहीसी झाली. सगळं संपून ती आज थोडं हलकं फील करत होती . अक्षयने ह्यावर खूप विचार केला. शेवटी आपलीच चूक म्हणून आपल्या सर्व भावना दफन केल्या आणि मेलबॉक्स उघडला कारण ती व्हाट्सअपवर नव्हती.
त्यांनी " आय एम वेरी वेरी सॉरी " असा मेल तिला केला. तिचा रिप्लाय येणार नव्हता हे त्याला माहीत होतं. तरीही त्याला जसं वाटलं तसं त्यानं केलं .
त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. अक्षयने मागे वळून पाहिले ती अंकिता होती.
तिने त्याला एक हलकी स्माईल दिली त्याने सुद्धा तिला तशीच स्माइल दिली .
तो दिवस अक्षयसाठी भकास केला. त्याने रात्री सहज वव्हॉट्सॲप उघडले व्हॉट्सऍपच्या ग्रुपवर साहिले एक फोटो टाकला होता..
"जेव्हा कुणीतरी तुमच्या आयुष्यात नकळतपणे येतो तेव्हा त्याला जाऊ देऊ नका कारण काहीतरी स्पेशल कारणासाठी तो तुमच्या आयुष्यात आला आहे"
अक्षयने यावर खूप वेळ विचार केला. त्यानंतर त्याने अंकिताला मेसेज केला. थोड्याच वेळात त्याच्या मेसेजच्या रिप्लाय आला. त्याने वाट्सएप उघडले. ते उत्तर ऐकून त्याच्या चेहर्यावरची कळी खुलली. आता त्या दोघांमध्ये काय संभाषण झाले हे वेगळे सांगायला नको. ग्रुपमधली आणखी एक प्रेमकथा बहरली.
कॉलेजमध्ये एका नामांकित प्राध्यापकावर मोठा आरोप करण्यात आला. खूप मोठा मॅटर झाला. कॉलेजच्या इतिहासातील हि एक मोठी घटना होती. त्याचा परिणाम असा झाला की नेने करंडक रद्द झाला आणि फायनल फेरी पुढच्या सेमिस्टरला म्हणजे जुलै महिन्यात घेण्यात ठरलं.
एप्रिल महिना आला तसे सर्व सबमिशन मध्ये बिझी झाले. रात्र-रात्र जागून जर्नल्स लिहिणे, व्हायवा ची तयारी आणि मग फायनल पेपरची तारीख तोंडावर आली. जीवतोड अभ्यास करून सगळ्यांनी पेपर लिहिले .
अखेर सुट्ट्या पडल्या आणि सर्वजण आपापल्या गावी निघून गेले . प्रत्येकजण गावी परतताना बर्याच आठवणी घेऊन गेला. सर्वानाच पुढच्या सेमिस्टरची उत्सुकता होती. शिवाय पियुष आणि प्रियाची पहिली भेटही फिस्कटली होती. त्यामुळे आता परत कधी भेटणार व त्यासाठी कधी पुस्तकात लिहून ठेवायचं याचा विचार करत होते .
उन्हाळी सुट्टी बघता बघता निघून गेली..
१४ नेने करंडक विजेता
जुलै महिना उजाडला. अधून-मधून पावसाळा पावसाच्या सरी पडत होत्या. एलसीडीवर प्रत्येक ग्रुपसाठी शेवटचे दोन उपक्रम जाहीर झाले.
एक गड स्वच्छता मोहीम &
दोन पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम.
टीम रायगडला देण्यात आला 'लिंगाणा गड'. जो रायगड किल्ल्यापासून जवळ आहे आणि ट्रेकिंग साठी खूप कठीण आहे आणि याच गडाच्या जवळच्या गावात बंधारा बांधायचा. टीम राजगडला याच तालुक्यातला दुसरा किल्ला 'मंगळगड' उर्फ कांगोरी किल्ला देण्यात आला आणि त्याच्या जवळ असलेल्या गावी बंधारा बांधून समाजसेवा करायची.
हे दोन्हीही सामाजिक उपक्रम होते आणि आणि यावेळेस पूर्ण कॉलेज कमिटी त्यांच्यासोबत होती. एकदम काटेकोर मार्किंग असणार होते. मुसळधार पावसात सर्वजण तयारीला लागले. हि शेवटची फेरी होती आणि नो डाउट ती प्रत्येकाला जिंकायची होती. साफसफाई झाली. दमून भागून आल्यावर सगळ्यांनी जेवणावर ताव मारला आणि पुढच्या कामाला लागले. अगदी कधीच केले नव्हते एवढे कष्ट सर्वांनी घेतले. टास्क संपले. आता सगळ्यांचे डोळे निकालाकडे लागले. त्यात आणखीन सस्पेन्स कॉलेजने ठेवला आणि दहा दिवसांनी बक्षीस स्टेजवर जाहीर होणार होते.
आज बक्षीस समारंभ होता. सगळे एकदम कडक ड्रेसिंग करुन आले होते. ऑडिटोरिअम अत्तराच्या वासानी भरला होता आणि निळ्या लाईट्स चमचम करत होत्या. समोर फिजिक्सच्या देखण्या मॅडम अँकरिंग करत होत्या. सोहळ्याला सुरुवात झाली भाषणं पार पडली आणि प्रिन्सिपल सरांनी माईक हाती घेतला. सर्वांचे कौतुक केले. विजेत्यांचे नाव जाहीर करायला एन्व्हलप उघडला.. कविता डोळे मिटून प्रार्थना करू लागली.
" आणि नेने करंडक विजेता आहे..
. गट रायगड.
. प्रिया साहिल कविता अक्षय.."
सोबत फटाक्यांचा मोठा ब्लास्ट झाला. इकडे टीम रायगडनं जल्लोष सुरू केला आणि स्टेजकडे झेप घेतली.
पियुषची टीम उदास झाली त्यांना रनर अप चे बक्षीस मिळाले.
एक भली मोठे चषक आणि सोबत दहा हजाराचे पारितोषिक घेण्यासाठी अक्षय वगैरे स्टेजवर गेले. ग्रुप फोटोसाठी सगळ्यांनी मोठी स्माईल दिली आणि नंतर एकसाथ ओरडले "जय भवानी जय शिवाजी "
सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन केले .चला आता विसाव्याला पार्टी ..कार्यक्रम संपल्यानंतर गाडीला खटकन कीक मारत आठही पाखरं भुरकन उडाली ...
१५ पाहिले न मी तुला
ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस शहरात पावसाने थैमान घातलं होतं. पावसाने आपला भयानक रूप दाखवले. सारं शहर जलमय झालं. सगळीकडे पाणी साचलं. पालिकेने सर्वांना सावधानीचा इशारा दिला. पाऊस येणारे बहात्तर तास विश्रांती घेणार नाही असं सांगितलं गेलं.
पण म्हणतात ना प्रेम आंधळं असतं. आपले हे लव्हबर्ड्स काही ऐकायला तयार नव्हते . पहिली भेट तर फ्लॉप झाली होतीच पण आता दोन ऑगस्टला काही झालं तरी भेटायचं असं दोघांनीही ठरवलं होतं. दोघांनी एकमेकांना ओळखण्यासाठी घालायचा पोशाख आधीच सांगून ठेवला होता. प्रियाने पांढरा शुभ्र सदरा आणि पियुषने काळा टी शर्ट असे पुस्तकातल्या पत्रात म्हटले होते. लोकेशनसुद्धा डिसाईड झाली. शहरापासून दूर सावित्री नदीवरचा जुना पुल क्रॉस करून पलीकडे एक हॉटेल आहे तिथेच भेटायचं तेही रात्री आठ वाजता. दोघांनीही एकदम पक्का केलं . घरी खोटं सांगितलं आणि वेळ मोकळा केला.
पण बाहेर पाऊस थांबण्याचे नाव नव्हतं . शहराला चारी बाजूंनी पाण्याने वेढलेलं. अशातच प्रिया शेजाऱ्याची स्कूटर घेऊन निघाली. गाडीच्या वेगात पावसाचे तोंडावर पडणारे थेंब दगडासारखे भासत होते. वेळेच्या अर्धा तास आधीच ती निघाली.
पियुषने तयार व्हायला खूप वेळ लावला. त्याने निघताना आरशात पाहिले. त्याने एक सेल्फी काढला. तेव्हा त्याला मोबाईलवर वेळ दिसला. खूप वेळ झाला आतापर्यंत निघायला हवं होतं. झटकन तो घराबाहेर पडला आणि घरातली लाईट गेली. बाहेर काळाकुट्ट अंधार आणि विजांचा कडकडाट अत्यंत भयावह परिस्थिती होती. पण त्यांचाही निर्धार ठाम होता आणि तो शहराच्या बाहेर पडू लागला. लाईट गेली असल्याने सगळीकडे प्रचंड काळोख होता.
त्याने आयुष्यात पहिल्यांदाच इतकी भयानक रात्र आणि पावसाचं विकृत रूप पाहिले होते. दूरवर दिसणारी सावित्री नदी कोपली होती. काठाच्यावर तिचं पाणी चढले. आपलं जाणं खूप धोक्याचे आहे हे त्याला कळून चुकलेलं. कळत होतं पण वळत नव्हतं. निरव शांतता.. तो सावित्री पुलाजवळ आला. त्याच्या पायाखालची जमीन अक्षरशः कोसळली. डोळे भीतीने विस्फारले गेले . अंगावर तीव्र शहारा आला. सावित्री नदीवरचा शंभर वर्षे जुना असणारा ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला होता. तो कधीही न पाहिलेला नदीचा राक्षसी प्रवाह त्याच्या डोळ्यासमोर होता. जणू मरणच समोर आमंत्रण देत होते. त्याचा तोल गेला आणि जमिनीवर तो धाडकन कोसळला. त्याला समोर सफेद ड्रेसमधली बाय बाय करणारी तरुणी दिसत होती अंधुकपणे..
दोन आठवडे उलटुन गेले . पियुषला हॉस्पिटलमधून घरी परत आणले. तीव्र तापातून तो कसाबसा बरा झाला. पावसाचा जोर ओसरला त्याच्या डोळ्यासमोर अजूनसुद्धा ते दृश्य होते .डोळे पुसत त्याने फ्रेश होण्यासाठी आपली पावले बाथरूमकडे वळवली. तो फ्रेश होऊन बाहेर आला. त्याला कॉलेजला जायचे होते. काही महत्त्वाची कामे राहिली होती. थोडे कष्ट घेऊन तो कॉलेजला पोहोचला. त्याने लायब्ररी गाठली.. त्यात शेवटचं कपाट आणि मग खालचा कोपरा आणि ईटीचं पुस्तक ...
अरे पण ते तिथे नव्हतंच .. त्याने खूप शोधले पण त्याला पुस्तक पुन्हा कधीच भेटलं नाही.. तो हताश होऊन बाहेर आला. त्याच्या डोळ्यासमोर अजुनही ती तरुणी दिसत होती. सफेद ड्रेस मधली त्याला बाय बाय करत..
समाप्त