निस्वार्थी मैत्री - भाग 5 रोशनी द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निस्वार्थी मैत्री - भाग 5

विचार करत करतच रेवती झोपी गेली
तिला एक स्वप्न पडलं
ति किचन मध्ये आहे आणी माघून अशोक येतो
अशोक : रेवती कशी आहेस
रेवती : अशोक! तु कसा आहेस तु आणी तु आलास
5 वर्ष झाले कुठे होतास तु
आम्ही तर ..
अशोक : अग थांब मी कुठे गेलो होतो
माझा आत्मा रिया आणी तुज्या जवळ कायम राहतो
पण आता बस
रेवती मी आज तुला काहीतरि मागायला आलॊय
प्लीज नाही नको म्हणूस

रेवती : बोल न अशोक माझा जीव पण माग मी आनंदाने देईल
अशोक : रेवती
माला मुक्त कर रेवती

राम आलाय त्याला आयुष्यात जागा दे
माजी रिया तिला 5 वर्ष बाबाच्या प्रेमासाठी ताडपताना मी रोज पाहतोय
आणी राम तिचा बाप आहे
आणी माझा राम त्याला त्याच कुटुंब दे
जो पर्यंत हे होत नाही
मला मुक्ती नाही रेवती
रेवती: अशोक हे नाही होऊ शकत

अशोक : निर्णय तु घे पण
विचार कर आणी रेवती मला माहिती आहे तु राम वर जरी प्रेम केल असल तरी एक बायको मैत्रीण म्हणून कधी कमी पडली नाहीस
मी जे केल माझ्या मैत्री साठी केलास
आणी आजपर्यंत तु माज्यासाठी खूप केलस

पण राम त्याच काय
त्याचाही विचार कर
आणी हो यातून मालाहि मुक्ती भेटेल

अलार्म वाजतो आणी रेवती जागी होते
पाहिलेलं स्वप्न अगदी तिच्या डोळ्यासमोर फिरत असत
नकळत डोळ्यातून पाणी वाहत असत

रिया रूम मध्ये येते :सु प्रभात आई
आई !

रेवती डोळे पुसते

रिया : आई काय विचार करत आहेस ग

रेवती : काहींनाही बाळ चल आवर उशीर होईल

रिया विचारात पडते की आज जर आई देवळात गेली नाही तर
तीने राम ला नाटक करायला लवलं होत

रिया ला सगळं माहिती आहे हे रेवतीला माहित नव्हतं
रिया लवकर निघून जाते आणी देवळात राम सोबत
रेवतीची वाट पाहत बसते

राम :बाळ नेमकं तुला काय काय करायचं आहे
हे सांगशील का
की मला इथून काढून द्यायचा प्लॅन आहे

रिया : बस ना बाबा
आधीच खूप टेन्शन आल आहे आता तु नको बोलू असं

आणी माला तु आमच्या सोबत हवा आहेस

राम : ते ठीक आहे पण
रिया : बाबा
आईच तुज्यावर प्रेम असेल म्हणून नाही
पण माज्यासाठी तरी ती येईल
आणी तुला थांबवेल

राम : हो ती नक्की येईल
पण मैत्री पोटी प्रेम करण्या आधी आम्ही मित्र आहोत

तिच ठीक आहे मी आता तिला कश्याची उणीव नाही राहू देणार पण अशोक
त्याच्यासाठी मी काहीच करू शकलो नाही
तो जगला पण दुसऱ्या साठी
स्वतः साठी नाही

त्यांच्यासाठी काही करायचं असेल तर मी आहे ना
मी त्यांची आधी नंतर तुमची मुलगी आहे
हो

रेवती घरी विचारत पडली असते
हे सगळं अशोक नेच घडवून आणलं असेल का
आयुष संपल्यावर पण तो माज्यासाठी जगतोय
पण मी त्याच्यासाठी काही करू शकले नाही

त्याने सुद्धा लावला नाही कधी माला
एवढा त्याग आणी आता मी हे सगळं सोडून...
तिच्या डोळ्यातून पाणी येत असत

पण अशोक ला खरंच मुक्ती हवी असेल तर

रिया आणी राम त्या बाप लेकीच्या नात्यात तर येत नाहीयेना मी


तिच घड्याळ कढे लक्ष जात
तिला कळत नसते की तीने काय कराव

राम पण वाटेकढे आस लावून बसला असतो
अजूनही त्याच रेवती वरच प्रेम कमी झाल नसत

पण हे अशोक च आहे त्यात मी येत आहे हा अपराधी भाव पण त्याला खात असतो

तो रिया कढे पाहतो

ती त्या तीन मित्रांची एकत्रित मूर्ती आहे असं त्याला भासते