काय नाते आपले? - 5 Pradnya Jadhav द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

काय नाते आपले? - 5

" ह्म्म्म... तुझं म्हणणं पटत आहे मला , आपण मिताली शी सुद्धा मिसळून बोललं पाहिजे , तरच ती आपल्यात मिक्स होईल... अजून किती दिवस त्या एकच रूम ला आपलं घर बनवणार आहे..... आणी ती लहान आहे तिला समजून घ्यायला सुद्धा कोणी नाही... त्यामुळे यावेळेस तुच पुढाकारं घे..... "

रुचिता आणी सुनील बराच वेळ बोलत होते...!!


इथे मिताली अजून बस ची वाट पाहत स्टॉप वर उभी होती..... एकटीला भीती हि वाटत होती....!! पण आपलं च काम आहे कराव तर लागेलच......

मिताली विचार करत होती......!!



इथे अभिजित खालती आला आणी आपल्या कार ची चावी घेत " मी आलोच " असं म्हणत निघाला.........


आई बाबा त्याच्याकडे पाहतच राहिले....अभि ने त्याची कार स्टार्ट केली आणी निघाला...

त्याला माहित होत कि ती नक्कीच बस स्टॉप जवळ असणार म्हणुन त्याने त्याची गाडी तिकडेच वळवली.....!!

....

मिताली अजून ही तिथेच उभी होती " यार या बस ला काय झालं यायला.. माझं काही महत्वाचं काम असलं कि सगळ्यांना पण काम असतात , आला असता मला सोडायला तर काही झालं असत का??? मी काय खाणार होते का त्याला....?? मूर्ख कुठचा स्वतःला खूप हुशहर स्मार्ट समजतो.... ह्ह्ह, "
मिताली मनातच त्याला शिव्या देत राग काढत होती....

अचानक तिच्या गालावर एक थेंब पडला तस ती दचकून वरती पाहू लागली , तर पाऊस पडायला स्टार्ट झाला...

मिताली लगेच धावत स्टॉप जवळ जाऊन उभी राहिली...!! आता या पावसाला पण यायचं होत का...???

ती पुन्हा निराश झाली....

इथे अभिजित ने गाडी थांबवली...पाऊस सुरु असल्यामुळे विंडो मधून इतक काही स्पष्ट दिसलं नाही , म्हणुन त्याने काच खाली घेतली... आणी बाहेर वाकून पाहू लागला , मिताली कुठे दिसते का.....

त्याला ती एका आडोश्याला उभी असलेली दिसली , त्याने गाडी लगेच त्या साईड ला फिरवली आणी तिथे जावून थांबवली....!! मिताली च लक्ष च न्हवत ती तिच्याच विचारात हरवली होती....

अभिजित गाडीतून बाहेर उतरला , आणी थोडं पळतच तिच्याजवळ गेला...

तस मिताली च लक्ष त्याच्यावर गेल आणी त्याला पाहून तिला जरा आश्चर्य च झालं...


" अ.... तुम्ही " बस्स या पुढे मिताली ला बोललं गेलं नाही , तिने दुसरीकडे चेहरा वळवला !!

अभि पूर्ण भिजला होता , त्याच्या केसांपासून पाणी गळत त्याच्या छातीपर्यंत आलं होत , त्याने शर्ट ची वरची दोन बटन्स ओपन करून ठेवले आणि खिशातून रुमाल काढून त्याने आपला चेहरा पुसला...


त्याने पण तिच्याकडे पाहिलं नाही , त्याची नजर पण दुसरीकडे होती...

त्याला सुरुवात कुठून करावी हे समजत न्हवत , एकदम शांतता होती.. त्यात पावसाचा धो - धो असा आवाज , वातावरण एकदम थंड झालं होत , गार वारा सुटला होता , आजू बाजूची लोक पावसापासून बचावा साठी बस स्टॉप जवळ उभी राहत होती....

जागा नसल्याने अभि ला मिताली जवळ सरकाव लागलं, त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या तिच्या कंबरेला होत होता.... ती पाठी वळून त्याला पाहू लागली तर तो त्याची केस पुसण्यात बिझी होता....


त्याची पण नजर तिच्यावर येउन थांबली तशी दोघांनी पण नजर दुसरीकडे वळवली...

" तुला घरी जायचं होत ना...?? " अभिजित नजर दुसरीकडे ठेवत च म्हणाला.....

" हो पण अजून बस नाही आली आहे.... " मिताली पण नजर दुसरीकडे ठेवत म्हणाली....


" ओके " म्हणत अभिजित पुढे काहीच म्हणाला नाही....


पुन्हा शांतता..........


पुन्हा शांतता तोडत अभिजित म्हणाला " चल मी तुला सोडतो..... "

" its ओके , मी माझी माझी जाऊ शकते , ट्रॅव्हल् करता येतो मला.... " मिताली.... तोंड वाकडं करतच म्हणाली..


" ufff किती हिचे नखरे.......... " अभि मनात म्हणत तिच्याकडे वळत म्हणाला...

" तुला यायचं असेल तर ये..... म्हणत तो पावसातून धावातच आपल्या कार पाशी गेला.....

मिताली रागातच त्याला शिव्या देऊ लागली... " मूर्ख मला साधी लाडगोडी तरी लावूच शकत होता.... 😡 इतका काय भाव खातो "

अभिनीत आपळी स्टार्ट करत निघतच होता मिताली धावतच त्याच्या जवळ गेली.... आणि विंडो वर ठोकलं , तस अभि ने पटकन कार चा डोर ओपन केला.....मिताली पटकन आत येऊन बसली.....

या गोंधळात ती सुद्धा भिजली , अभि ने तिच्याकडे रुमाल पास केला.....!!

तिने तीच अंग वरच्यावर पुसलं.....

आणि त्याला पाहून प्रश्न केला " तुम्ही तर येणार न्हवते ना , तुमचं काम होत?? " मिताली.....


यावर त्याने बोलणं पसंत नाही केल , तो गप्प गाडी चालवत होता..... मिताली ला उगाच तोंडावर आपटल्या सारखं झालं , उगाच विचारलं याला... असं झालं





मिलने है मुझसे आई
फिर जाने क्यूँ तन्हाई
किस मोड़ पे है लायी, आशिक़ी 💞
ख़ुद से है या ख़ुदा से
इस पल मेरी लड़ाई
किस मोड़ पे है लायी, आशिक़ी


अभिजित ने गाणी लावली , त्यामुळे अवघडणे पणा न्हवता आता....

तरी एकमेकांशी बोलणं पण न्हवत..!! दोघ पण विरुद्ध दिशेला तोंड करून पाहत होते.........





आशिक़ी बाज़ी है ताश की
टूटते बनते विश्वास की
मिलने है मुझसे आई...

जाने क्यूँ मैं सोचता हूँ
खाली सा मैं इक रास्ता हूँ
तूने मुझे कहीं खो दिया है
या मैं कहीं ख़ुद लापता हूँ
आ ढूँढ ले तू फिर मुझे
कसमें भी दूँ तो क्या तुझे
आशिक़ी बाज़ी है ताश की...💞




मिताली च्या बिल्डिंग समोर अभि ने कार थांबवली , मिताली ने बाहेर पाहिलं तर ती तिच्या घरी आली होती...

आता ते घर नसून तीच माहेर झालं होत.....मिताली गाडीतून उतरून सरळ बिल्डिंग मध्ये जायला निघाली , अभि ला जायची इच्छा न्हवती आत , पण तीच सामान जास्त असलं तर कशी आणेन , म्हनून तो पण कार पार्क करून तिच्या पाठी गेला......


.........
.....

दरवाज्याची बेल वाजताच तनुजा दार उघडायला आली आणि समोर मिताली ला पाहून ती आश्चर्य चकित झाली...

" मितु तू.... " म्हणत ती शांत झाली आणि तिची नजर पाठी गेली तर अभिजित उभा होता , त्याला पाहून तिचे डोळे भरून आले....

अभिजित पण तनु कडे पाहत उभा होता.... या दोघांचे असली नाटक बघत मिताली पटकन आत गेली तोच...

मितु ची आई समोर दिसली.... तिला पाहत मिताली म्हणाली " तुमच्या घरच सामान नाही चोरणार आहे डोन्ट वरी, माझं काही सामान राहील आहे तेच घ्यायला आली आहे.... " म्हणत मिताली पटकन तिच्या रूम मध्ये गेली......

आणि पटापट तिच्या गरजे च्या वस्तू ती बाहेर काढू लागली.....!!

आई तिच्या रूम मध्ये आली आणि मिताली जवळ गेली....

" मितु बाळा कशी आहेस ग..... इतक्या दिवसांनी आलिस आणि... "


" मी जिवंत आहे 🙂 दिसतंय ना?? मग का विचारतेयस , तू जा बघू इथून मला तुझा चेहरा ही नाही बघायचा आहे " मिताली आई वर ओरडतच म्हणाली.....

मिताली ने आपले कपडे एका मोठ्या बॅग मध्ये भरले आणि तिची काही पुस्तकं होती आणि तिची काही पर्सनल गोष्टी त्या तिने बॅग मध्ये भरून घेतल्या....


कापाटात चेक करता करता तिने हळूच लॉकर मध्ये असलेला तिचा गल्ला आणि पॉकेट मध्ये असलेले सोन्याचे कानातले आणि एक चैन काढून घेतली......

आणि आई च्या नजरेला चुकवून आपल्या pant च्या खिश्यात टाकून दिली....

तोच बाबा पण आले... " मितु बाळा तू ग इथे कशी...?? बाहेर पाहिलं तर जावई पण आलेले आहेत? आणि ही बॅग " ते तिला प्रश्न विचारत म्हणाले....


" इथे राहायला नाही आली आहे , नका काळजी करू , फक्त सामान राहील होत तेच घ्यायला आली आहे.... " असं बोलत तिने पटकन त्या दोन बॅग घेतल्या आणि बाहेर आली हॉल मध्ये......


तर तनुजा अभि शी बोलायचा प्रयत्न करत होती....मिताली ला जाताना बघताच तो पण निघाला तनुजा च न ऐकता.......!!


त्याने मिताली च्या हातातले बॅग्स घेतले आणी दोघेही निघाले.......!!


पन का कोण जाने तनुजा च्या मनात वेगळेच विचार चालू होते........


.......

....


रात्री अभि आपल्या रूम मध्ये झोपणार च होता कि त्याच्या फोन ची मेसेज ट्यून वाजली , त्याने मोबाईल पहिला तर तनुजा चा मेसेज......

" मला तुझ्याशी खुप महत्वाचं बोलायचं आहे , एकदाच भेट अभि प्लिझ......... 🙏🙏🙏 "



अभि ने तो मेसेज पाहिला आणि विचारात पडला......

इथे मितु आपले सोन्याचे काही दागिने विकायच्या तयारीत होती......





क्रमशः......