काय नाते आपले? - 10 Pradnya Jadhav द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

काय नाते आपले? - 10

मितु ला जॉब करत शिकायचं होत म्हणून आम्ही तेच शोधायला गेलो होतो.... इतकं काय कि तिची कॉलेज ची फीज देखील मिच भरली आहे......

तुम्हाला लोकांना त्रास नको म्हणून , तिला कोणावरती ओझं म्हणून राहायला मुळीच आवडत नाही....

ती कशी पन असली ना तरी मुलं फिरवण्यातली तर अजिबात नाही.....

हे तर नक्कीच त्या तनुजा ने भरवून दिल असेल... स्वतः कमी शिकली म्हणून दुसऱ्यांच्या चांगल्यावर टपून बसली आहे.........

आणि हो याद रखा.....जर मिताली ठीक नाही zali नां...तुमच्यावर मी केस ठोकायला सुद्धा कमी नाही करणार......

राहुल खूपच चिडला होता......

त्याच रागावण हि सहाजिकच आहे... आपल्या best फ्रेंड ला अश्या अवस्थेत पाहणं त्याला खूप कठीण जातं होत... त्यात तो तिच्यावर प्रेम हि करत होता......

राहुल : इतकंच काय तर रक्ताच्या थारोळ्यात असून सुद्धा तिने तुम्हाला कॉल केला......

तस अभि ने चमकून वर पाहिल... त्याला आता समजलं इतके miss कॉल्ड का आले होते...
त्याला आता खूपच गिल्टी फील होत होतं....कि तेव्हा तो नशेत का होता आणि आपल्या फोन ची रिंगटोन का नाही ऐकू आली......

अभि काहीही न बोलता तिकडच्या बेंच वर जाऊन बसला.... त्याला मिताली च्या कॉलेज च्या फीज च पन आज समजलं.....
ती घर सोडून जाण्याचं प्लॅनिंग आधी पासूनच करत होती का..???

त्याला आईचा चा कॉल आला करण तो घरी कुठेच दिसत न्हवता.....

त्याने मिताली बद्दल पन सगळं सांगितलं... तस त्या पन लगेच यायला निघाल्या........

अभि तसाच डोळे मिटून शांत पडून राहिला........!!


" प्रेमाची गरज आहे तिला..... Hope so या पुढे तुम्ही तिला कधीच हर्ट नाही करणार... एकदा जीव लावून तर पहा कि... शेवट पर्यंत तुमची साथ नाही सोडणार..... जशी आमच्या मैत्री ची साथ तिने सोडली नाही..... लहानपणापासून " राहुल.......

अभि ला म्हणाला........अभि त्यावर काहीच म्हणाला नाही तो शांतच होता पन त्याची नजर ICU च्या दरवाज्या जवळच जातं होती.....!!

काय नात होतं त्यांचं..?? त्यात प्रेम न्हवत साधी मैत्री हि न्हवती.....

तरी तिच्या बद्दल अश्या भावना....??? कि तिला दुसऱ्या सोबत पाहून राग यायचा....

त्याचे विचार चक्र चालू होते.... कि रुचिता आणि बाबा हॉस्पिटल मध्ये आले.....

त्यांनी अभि ला तिथे बसलेलं पाहिले ते लगेच त्याच्याजवळ गेले.....

रुचिता : अभि अरे मिताली....

अभि : आई तिला ICU मध्ये ठेवलं आहे , आत जायची परमिशन नाहि म्हणून मी बाहेर बसलो आहे...आणि माझं डॉक्टरांशी बोलण झालं आहे....

अभि आई बाबांकडे पाहून म्हणाला...!! बाबा डॉक्टरांना पुन्हा भेटून आले....

जखमा खूप खोलवर होत्या आणि डोक्याला लागल्याने अजून शुद्ध न्हवती आली तिला..... अजून काही तास तरी तिला ऑबजर्वेशन मध्ये ठेवणार....

रुचिता : आपलच चुकलं आपण तिला असं....

अभि : आई आता तो विषय नको प्लिझ....

अभि रुचिता ला तोडत म्हणाला...तोच तिथे राहुल आला...

" मी निघतो आता.. तुम्ही आलेच आहात तर तिची नीट काळजी घ्या... " राहुल असं बोलत निघून गेला......

बाबा : मी मिताली च्या आई बाबांना सुद्धा बोलावलं आहे.. ते आता येतच असतील....

बाबा असे म्हणताच अभि च्या मनात विचार डोकावला कि त्यांना काय सांगायचं...???
या सगळ्यात माझीच चूक होती आधीपासूनच....
पन त्रास मी मिताली लाच दिला आता तिच्या आई बाबांना काय उत्तर द्यायचं आपण....???

अभि तसाच विचार करत शांत बसला........!! रुचिता ला तर कधी मिताली ला बघतेय असं झालं होतं..
ती ठीक होईल कि नाही आणि तिच्या या अवस्थेच कारण आपणच होतो..
काय गरज होती आपल्याला अभि च ऐकून तिला घराबाहेर काढायची...
आमच्यावर विश्वास ठेवून तिच्या बाबांनी तिला आमच्याकडे पाठवली आणि आम्ही काय केल...????

आता पश्चाताप करून सुद्धा काहीच फायदा नाही जे व्हायचं आहे ते होऊन गेलं आहे....

थोड्यावेळ्याने मिताली चे आई बाबा पन आले त्यांना तर त्यांच्या मुलीला असं पाहून रडूच कोसळल..

आपल्या हसत्या खेळत्या मुलीला अश्या अवस्थेत पाहून त्यांचा तिळ तीळ तुटत होता....
भलेही ती आपल्याशी बोलत नसली तरी आपण तिचे आई वडील आहोत आपण आपले पालक होण्याचे कर्तव्य सोडून का द्यावे....!!

आपलीच चूक होती आपण तीच इतक्या लहान वयात लग्न लावून दिल.. काहीतरी सोल्युशन निघालच असत कि..

सगळे स्वतः लच दोष देत होते.. मिताली च्या या अवस्थेला , पन चूक कोणाची होती...??? सगळ्यांचीच नां..?? अगदी मिताली ची हि.....!!

सगळेच चुकीचे होते.......

नाही नाही.... परिस्थितीच तसही होती !!


.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

5 दिवस झाले मिताली हॉस्पिटल मध्येच होती... अजून रिकव्हर न्हवती झाली....
तिला अजून 1 आठवडा तरी हॉस्पिटल मध्येच राहावं लागणार होतं....

या 2 दिवसात अभि अजिबात हॉस्पिटल मधून हलला नसेल....!! तो मिताली चि स्पेशली काळजी घेत होता , पन ती काही बोलायची नाही.....


नुसती शांत असायची......!! काही घेणं देण च नाही जनु , मिताली चि आई हि रोज यायची... अर्थात सगळे रोज यायचे , आणि रात्री निघून जायचे......

कारण अभि असायचाच जवळ..... तिला VIP रूम मध्ये शिफ्ट केल होतं....

तर आतमध्ये थांबायला कोणाला परमिशन न्हवती... त्यामुळे अभि तिथेच असायचा.....

हळू हळू मिताली सुद्धा रिकव्हर होतं होती , ती बाकी सगळ्यांशी बोलायची पन अभि शी ती अजिबात बोलायची नाही..

हे सुद्धा त्याला समजत होतं , पन तो तिच्याशी बोलायचं त्यावर तिचा रिस्पॉन्स " हम्म , हा " इतकाच असायचा.......

या काही दिवसात त्याच्या मनात तिच्या विषयी एक वेगळीच जागा तयार होतं होती....
तीच भावना आता फक्त हृदयात यायची बाकी होती.....!!


...
......

मिताली शांत झोपून होती , अभि तिच्या बाजूला बसला होता , मोबाईल वर टाईम पास करत....!!

मिताली च्या हालचाली मुळे त्याच लक्ष तिच्याकडे गेलं , ती पुन्हा झोपली होती...

पन तो तिचच निरीक्षण करत राहिला...

खरंच ती पन दिसायला खूप सुंदर होती...!! पण स्वभावात कोमलता अजिबात न्हवती....

एकदम तिखट स्वभाव.. रागीट..... अभि ने तिच्या केसांवरून हळूच हात फिरवला आणि थोडं खाली झुकून तिच्या गालावर हळूच किस केल.....

हळूच हसत तो बाहेर निघून गेला....

पन तो बाहेर जाताच मिताली ने आपले डोळे उघडले , कदाचित रडत होती ती......!! पुन्हा डोळे मिटून ती झोपून गेली......!!


......
..........


डॉक्टरांनी आता मिताली ला डिस्चार्च दिला होता , कारण ती आता पूर्ण पणे ठीक झाली होती....

फक्त अजून विकनेस होता , काही जखमा होत्या ज्या भरत आलेल्या पन पूर्ण भरल्या न्हवत्या....!!
सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या मिताली च्या आईबाबांपासून ते अभि चि फॅमिली पन होतीच....

सगळेच खुश हि होतेच कि ती आता ठीक आहे म्हणून....निघायच्या टाईम ला अचानक मिताली चे बाबा म्हणाले.........

" आम्ही मिताली ला पुन्हा घरी न्हेत आहोत....." बाबा......

मिताली चे बाबा असं म्हणताच सगळे त्यांच्याकडे पाहू लागले.......

" अच्छा म्हणजे तुम्हाला काही दिवस मिताली सोबत टाईम स्पेंड करायचा आहे म्हणून न्हेत आहात ना...?? " रुचिता....


" मी हे आधीच बोलणार होतो , माझ्या मुलीला जेव्हा मी हॉस्पिटल मध्ये असं डोक्यावर पट्टी, हाताला फ्रॅक््चर झालेले पाहिले तेव्हाच मी ठरवलं..... आता बस खूप सहन केल माझ्या मुलींनी , तेव्हा आमची चूक होती आम्ही तिला तनुजाच्या जागी तिला पाठवल....
तेव्हा आम्हाला तिचे अश्रू दिसलें नाहीत.... पन आता इतकंच म्हणेल आमची मितु अजून लहान आहे , तिच्याकडून बऱ्याच चुका झाल्या असतील त्या साठी आम्ही तुमची माफी मागतो.....
पन आता मी पुन्हा तिला तुमच्याजवळ पाठवणार नाही , तस हि हे लग्न स्वतः अभिजित मानत नाहीत मग मिताली ला तिथे ठेवण्यात काहीही अर्थ उरत नाही...

एवढं बोलून तिचे बाबा शांत झाले.....

रुचिता " माफ करा आम्ही मिताली वर विश्वास नाही ठेवला आणी तिला...... "

मी बाबा " असुद्या रुचिता वहिनी मी तुम्हाला कोणताच दोष देत नाही आहे.... मला फक्त माझ्या मुलीला आनंदी राहिलेलं पाहायचं आहे....आम्ही आता तिला आमच्याकडे न्हेत आहोत.... जर ती बोली कि तिला हे नात मान्य नाही तर तिला कोणीही फोर्स करणार नाही...... "

अभि बाबा " हम्म तुझं म्हणणं मला हि पटत आहे.... तु घेऊन जा मिताली ला आमची काहीच हरकत नाही.... "


अभिचे बाबा म्हणाले तस रुचिता हि काही बोली नाही , अभि काहीच बोला नाही , बोलायचं तर खूप होतं पन तोंडातून ते बाहेर पडत न्हवत......!!


मिताली चे आई बाबा तिला घेऊन निघून गेले..........रुचिता आणि अभि चे बाबा हि निघाले....

अभि ने त्यांना पुढे जायला सांगितलं तो नंतर येईल असं म्हणून त्याची कार घेऊन निघाला....!!



नाम है लबों पे तेरा
दिल में तेरी याद हैं
कुछ ना तुझसे पहले यारा
कुछ ना तेरे बाद हैं

कुछ खबर नहीं मुझे
कैसे क्या हुआ
मासूमियत ने तेरी
यूँ इस रूह को छुआ



आवडू लागली आहे यार मला ती.....!! कस आणि कोणाला सांगू मी हे...???? मनाला समजल मी कि हो आवडते मला ती.......
पन आता बाकीच्यांना कस सांगू..????

खूप वाईट वागलो आहे मी माहित आहे , प्रत्येक वेळी सगळ्यांना चुकी साठी तिलाच ब्लेम केल , झाली चूक यार पन पन तिच्या मनात माझ्याबद्दल काही फीलिंग्स च नाही आहेत.......

अभि सिगरेट पीत विचार करत होता....

तो एका तलावा जवळ आला होता , कार बाहेर पार्क करून तो आत येऊन बसला होता....

काही कपल्स होते आजू बाजूला......




होने लगा तुमसे प्यार
मेरा दिल हैं बेकरार
इश्क़ की हदो से पार होने लगा

होने लगा बेशुमार
जाने क्यूँ तुझ ही पे यार
खुदसे ज्यादा ऐतबार होने लगा

होने लगा तुमसे प्यार
मेरा दिल हैं बेकरार
इश्क़ की हदो से पार होने लगा

यार लगे हैं खुदा
और यार की यादें
लगती इबादत की तरहा

राहो में मिले जब
हमसफ़र नया कोई
ज़िंदगी लगे हैं जन्नत की तरहा... ❤


इतका पन मोठा नाही आहे यार मी तिच्याहून फक्त 7-8 years नेच मोठा असेल.... ती 19 चि मी 27 चा तर आहे..... म्हातारा तर नाही झालो ना......!!

सगळं कस एकदम डिफिकल्ट होऊन बसल आहे , तो हातातील सिगरेट फेकत म्हणाला....

राग हि येत होता पश्चाताप हि होतं होता पुढे काय होईल हे सुचेना....

हम्म आता बघू पुढे काय होतय.....!!


क्रमशः...