पसायदान व चंगादेव पासष्टी Sudhakar katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पसायदान व चंगादेव पासष्टी

पसायदान

आता विश्वात्मकें देवे येणे वाग्यज्ञे तोषावे

तोषोनि मज द्यावे पसायदान हे ।।१।।

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मि रति वाढो । भूता परस्परे पडो । मैत्र जिवाचे ।।२।।

दुररितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्मसुर्ये पाहो। जो जें वांच्चील तो ते लाहो प्राणिजात ।।३।।

वर्षते सकलमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूतळी । भेटो तया भूता ।।४।।

चला कल्पतरुचे अरव । चेतना चिंतामणीचे गांव । बोलते ते अर्णव पियूषाचे ।।५।।

चंद्रमे जे अलांच्छन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतू ।।६।।

किंबहुना सर्वसुखी। पूर्ण होऊनि तिही लोकी।

भजोजो जो आदिपूरुशी अखंडित ।।७।।

आणि ग्रंथोपजीविये विषेशी लोकिये

दृष्टादृष्ट विजये होआवे जो ।।८।।

तेथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो हा होईल दानपसावो । येणे वरे ज्ञानदेवो ।सुखिया झाला ।।९ ।।

अर्थ

आता यावर विश्र्वस्वरुप सदगुरू यांनी माझ्या वागयज्ञेकरून संतुष्ट होऊन मजला

हा प्रसाद द्यावा.की दुष्टांचा कुटिलपणा जाऊन त्यांना सत्कर्माची प्रीति उत्पन्न होवो. व जीवामात्राची एकमेकांवर मैत्री वाढो.या सर्व विश्र्वामधील पापरूप अंधकार नाहीसा होऊन स्वधर्मारुपी सूर्य उगऊन त्याचा प्रकाश होवो,आणि प्राणिमात्रांच्या ज्या ज्या इटछा असतील त्या त्या पूर्ण होवोत. या भुतलावर अखिल मंगालांचा वर्षाव करणाऱ्या भागवतभक्तांच्या समुदायांची सर्व भूतांना सदभावेकरून सदोदित भेट होवो.ते भक्तजन कसे आहेत,तर चालतेबोलते कल्पतरूंचे बाग,जिवंत,चिंतामणीचे गाव,किंवा अमृताचे चालते बोलते समुद्रच होत.जे कलंकरहित

प्रतिचंद्र,संसररुपी अंधकार दूर करून शांतिसुख देणारे प्रतिसूर्य असे भगवतभक्त,

हे सकल जीवांना प्रिय होवोत,फार काय सांगावे! सर्व त्रैलोक्य सुखाने परिपूर्ण होऊन प्राणिमात्राला हरीचे अखंड भजन करण्याची इच्छा होवो.आणि या ग्रंथावरच ज्यांचे उपाजीवन आहे,त्यांना इहलोक व परालोकचे

सुख प्राप्त होवो.

तेव्हा सदगुरू प्रसन्न होऊन म्हणाले की,तुझ्या म्हणण्या प्रमाणे सर्व होईल.असे वlरलप्रदान मिळाल्याने श्रीज्ञानदेव फार संतोषित झाले.

आहेतआहेतपत्र

,

स्वस्ति श्रीवटेशूजो लापोनी जगदा भासु । दावी मग ग्रासु । प्रगटला करी ।।१।।

श्री वटेशु तुमचे कल्याण असो.स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवतो.आणि तो प्रगट होतो तेव्हा तेव्हा जगाचा भास नाहिसा होतो.

प्रगटे तंव न दिसे ।रुपे तंव तंव आभासे । प्रगत ना लपला असे । न खोमला जो।।२।।

बहु जंव जंव होये । तंव तंव काहींचं न होये । काही नहोनि आहे । आवाघांची जो ।।३ ।।

सोने सोनेपणा । न येताची झाले लेणे

तेवी न वाचता जग होणे । अंगे जया।।४।।

कल्लोळ कंचुक । न फेडिता उघडे उदक । तेवि जगेसी सम्यक । स्वरूप जो ।।५।।

परामाणुचिया मांदिया । पृथ्वीषने न वाचेचि वायां । तेवि विश्वस्फूर्ति इयां ।

झाकवेना जो ।।६ ।।

कळांचेनि पांघरूणे । चंद्रमा हारपो नेणे ।

का व तेन्हि ।दीपपणेम । आन नोहे ।।७।।

म्हणोनि अविद्यानिमित्ते । दृश्य दृष्टत्व वर्ते । ते मी नेणें आईते ऐसेची असे ।।८।।

जेवि नाममात्र लुगडे । येऱ्हवी सुतचि ते उघडे । का माती मृदभांडे । जयापरी ।।९।।

तेवि द्रष्टा दृश्य दशे । अतीत दृङ

जे असे । तेचि दृष्टादृश्यमिसे केवळ होय ।।१०।।

अलंकार येणे नामे ।असिजे निखिल हेमे ।

नाना अवयवसंभ्रमे। अवयाविया जेवी।।११।।

तेवी शिवोनि पृथ्विवरी । भासाति पदर्थांचिया परी । प्रकाश ते एकसरी । संवित्ति हे ।।१२।।

नाहीं ते चित्र दाविति । परि असे केवल भिंति । प्रकाशे ते संवित्ति । जगदाकारें।।.१३।।

बन्धायाचिया मोड़ी। बांधा नहोनि गुळाची

गोडी। तयापरि जगपरवडी। संवित्ति जाण।।१४।।

घड़ियेचेई आकारे। प्रकाशिजे जेवी अम्बरे।

तेवि विश्वस्फुर्ति स्फुरें।स्फउर्तइचइ हे ।।१५।।

न लिम्पता शुखदुःख। येणे आकारे क्षोभोनी नावेक ।होय आपणिया जो ।।१६।।

तया नाव दृष्याचे होणे । संवित्ति दृष्टत्वा आणिजे जेणे । बिंबा बिंबत्व जालेपणें।प्रतिबिंबाचेनि ।।१७।।

तेवी आपनचि आपुला पोटी । आपणया दृष्य दावित उठी। मांड ते हे।।१८।।

सुताचिये गुंजे।आतबाहेर नाहि दुजे।तेवी तिनपणेविण जानिजे । ट्रिपुटी हे ।।१९।।

नसुधे मुख जैसे।देखिजतसे दर्पणमिसें।

वायांचि देखणे रैसे । गमों लागे।।२०।।