guard books and stories free download online pdf in Marathi

रक्षक

माझं नाव संदेश. ही गोष्ट माझ्या आईने मला लहानपणी सांगितली होती. माझ्या आईला आणि मामाला आलेला हा प्रत्यक्ष अनुभव होता. माझी आई कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरच्या गावात रहायची. एके दिवशी काही कामानिमित्त बाजूच्याच एका गावी मामाबरोबर गेली होती. परत घरी येताना उशीर झाला. त्या दोन गावांच्या मध्ये एक खाड़ी लागते. त्यावेळी त्या खाड़ीवर पुल नसल्यामुले नाव(boat) वापरून खाड़ी पार करावी लागायची. आई आणि मामा खाड़ीकड़े जाण्यासाठी निघाले तेव्हा रात्रीचे पावणे बारा वाजले होते आणि त्यांना सव्वाबाराची शेवटची नाव गाठायाची होती. उशीर खुप झाला होता आणि काळोख पण भरपूर होता त्यामुळे मनात भितीची धाक होती.
खाड़ीवर जात असताना त्यांना दूरवर एक दिवा दिसत होता. मामा आईला म्हणाला की कोणीतरी शेतावर राखण करणारा घरी चालला असेल कंदील घेउन. त्याचवेळी अचानक बाजुच्या झाड़ीमधुन एक भलामोठा काळया रंगाचा कुत्रा आईला आपल्या अंगावर येतोय असा दिसला आणि ती किन्चाळली. तो कुत्रा काही क्षण दिसला आणि नाहीसा झाला. तो कुत्रा जेव्हा नाहीसा झाला त्यावेळी आईला अस वाटल की दुरवर दिसणारा तो दिवा जरा जास्त प्रखर झाला होता. आई आणि मामा खाड़ीकिनारी पोचले तेव्हा मामाला खाड़ीच्या दुसऱ्या बाजुवरुन येणारी नाव दिसली आणि तो जरा सुखावला. तरीपण नावाडयाला या किनारयापर्यन्त पोचायला अजुन १५-२० मिनिटे लागणार होती. लांबवर दिसणाऱ्या दिव्याची प्रखरता आणि आकार वाढतच होता. तो माणूस कदाचित त्यांच्या दिशेनेच येत असावा. त्याचवेळी दिवा ज्या दिशेने येत होता त्याच्या विरुद्ध दिशेला काही अंतरावर आईला हालचाल ऐकू आली आणि आईने त्या दिशेने बघितले. तिला काही अंतरावर एक आकृति दिसली. आईने मामाचे लक्ष तिकडे वेधले. ती आकृति जेव्हा जवळ आली तेव्हा त्यांना एक भयानक प्रकार दिसला. तो एक माणूस होता पण त्याला मुण्डके नव्हते आणि त्याच्या अंगावर कपडे नव्हते. मामा समजला की ते इतर काही नसून तो"मानकाप्या"होता.
मामा मानकाप्याबद्दल असे ऐकून होता की"तो एक पिशच्छ आहे आणि काही विशिष्ठ दिवशी रात्रि विशिष्ट वेळी गावत फेरफटका मारतो आणि त्यावेळी तो वाटेत येनाऱ्या कोणाचेहि मुण्डके धडावेगळे करू शकतो." आई आणि मामा प्रचंड घाबरले होते. मानकाप्या जलद गतीने चालत त्यांच्याकड़े येत होता. आणि अचानक दिव्याचा लख्ख प्रकाश त्यांच्यावर पडला. त्यांनी दुसरया बाजूला बघितले तर तो दिवा जवळ आला होता आणि तय दिव्याचा आकार साधारण दिव्यपेक्षा जास्त होता. तो दिवा ज्या व्यक्तीने पकडला होता तो माणूस पण १०-१२ फुट उंचीचा होता. अंधुक प्रकाशत तो माणूस निटसा दिसत नव्हता पण आईने आणि मामने त्याची अंधुकशी आकृति बघितली. आणि त्यांच्या वर्णनाप्रमाने त्याची शरिरयष्टि एकदम धडधाकट होती आणि त्याने धोतर नेसले होते, खांद्यावर फटकुर होती आणि पायात चामडयाच्या चपला होत्या. त्याने डोक्यावर पांढरा फडका गुंडाळला होता. मामाला दुसरया बाजूने येनाऱ्या मानकाप्याची आठवण झाली आणि तो त्याला बघाण्यासाठी वळला, पण मानकाप्या तिकडे नव्हताच.
एव्हाना नवाडी किनारयापरयंत पोचला होता आणि त्याने हाक मारून मामाला आणि आईला नावेत बसायला सांगितले. मामा आणि आई नावेत बसून यायला निघाले. दिवा घेउन तो भलामोठा माणूस तिथेच उभा होता. थोड्यावेळाने तो आपल्या दिशेने जायला निघाला. तो जसाजसा दूर जात होता दिव्याचा आकार पुन्हा कमी होत गेला. मामाने नावाडयाला विचारले की तो माणूस नक्की कोण होता? तेव्हा नावाडी म्हणाला की तो इतर कोणी नसून गावाचा रक्षणकरता एक जागृत दैवत होता. मामा आणि आई समजली की त्या गावाच्या रक्षणकर्त्या देवानेच त्यांना मानकाप्या पासून आणि त्या कुत्र्या पासून वाचवले होते.

- स मा प्त -
- ध न्य वा द -

इतर रसदार पर्याय