आदित्य दुपारी रूममध्ये परतला व काही तरी लिहू लागला. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. काम बाजूला ठेवून त्याने पटकन मोबाईल घेतला. साहिलचा कॉल होता.
"हॅलो! हा पोहचलास का?" आदि खुर्चीत आरामात बसत बोलला.
"हो आता जस्टच पोहचलो"
"ओके"
"तुझ्यामुळे आई मला घरात घेण्याआधीच ओरडत आहे"
साहिल लटक्या रागाने बोलला.
"का? मी काय केले?" न समजून आदिने विचारले.
"तुला ये म्हणत होतो ना माझ्यासोबत "
"हा मग"
"मग कायss मग, आई मला म्हणते पोराला एकट सोडून का आलास घेऊन ये म्हणले होते ना"
तस आदी हसू लागला.साहिलचा आई साहिलच्या हातातील मोबाईल घेत बोलली.
"दे इकड मीच बोलते त्याच्याशी"
"हॅलो!"
एक प्रेमळ आवाज आदीच्या कानावर पडला.
"हॅलो! नमस्कार काकी, कश्या आहात?" आदि आदराने बोलला.
"मला मेलीला काय धाड भरली आहे पण तुला ये म्हणाली होती ना मी, मग का आला नाही?" नाराजीची स्वरात काकी बोलल्या.
"नेक्स्ट टाइम नक्की येतो काकी"
"होय आता तू याच्या लग्नालाच येणार"
तसा आदी हसला.
"बर मग लवकर तारीख काढुया ये मग तेव्हा"
"हो काकी नक्की नक्की येईन"
******
कॉल ठेवून आदी पुन्हा कामात बिझी झाला. काही डॉक्युमेंट्स टेबलवर त्याला दिसले नाहीत त्यामुळे तो उठला व आपली बॅग शोधू लागला. बॅगेतून एक फाईल काढत असताना त्याच्या बॅगेतून एक फोटो बाहेर पडला.
त्या फोटोकडे लक्ष जाताच त्याने फाईल बेडवर ठेवली व फोटो हातात घेऊन बसला.
फोटो बघत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेसशन्स बदलले. त्याच्या चेहरीवर आता एक फुसट्स हसू तरळलं.
फोटोमध्ये एक मुलगी होती जी समुद्रकिनारी उभी होती.
ती मुलगी गुलाबी टिशर्ट व ब्लॅक हेरम घालून उभी होती. आपल्याच विचारात ती गुंतलेली दिसत होती. सूर्योदय होताचा सिन दिसत होता. सकाळच्या शांत वातावरणात समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा तिच्या पायाशी चाळा करू पाहत होत्या.
फोटोमध्ये ती पाठमोरी उभी असल्याने तिचा चेहरा दिसत नव्हता. हा फोटो आदित्यनेच क्लिक केला होता. जेव्हा त्या मुलीच लक्ष नव्हते.
"किती सुंदर, मनमोहन, सकाळ होती ती जेव्हा मी तिला पाहिलं होतं, रात्री जिला लहान मुली सोबत खेळताना पाहिलं होतं ती हीच असेल अस वाटलं ही नव्हते"
तो मनातच विचार करत होता की दारावरची बेल वाजली.
बेलच्या आवाजाने आदी वास्तवात आला. फाईल व फोटो तसेच ठेवून तो दरवाजा उघडण्यासाठी गेला.
दरवाजा उघडताच त्याला आश्चर्य वाटले, कारण समोर अन्वी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती.
"तू इथे?" त्याने अविश्वासाने विचारले.
"हो, का तुम्हाला आवडले नाही का?" तिच्या चेहरीवरील ती गोड स्माईल आता दिसत नव्हती.
"नाही तसे नाही पण अचानक अस न सांगता, तू काही इन्फॉर पण नाही केले ना सो ..." तो तिचा चेहरा पाहून बोलला.
"आय एम सॉरी, मी तर फक्त तुम्हाला आजीचा निरोप देण्यासाठी आले होते."
"ओहह असंss, मला वाटलं"
"काय वाटलं ?" ती चेहरा बारीक करून बोलत होती.
"मला वाटलं की तू मला भेटायला आली आहे"
" म्हणून असे रिऍक्ट झाला का?" ती नाराजीनेच बोलली.
"नाही ग, तस नाही मला वाटलं नाही की, तू आता इथे माझ्याजवळ आली आहेस त्यामुळे मला समजले नाही की मला भास होत आहे की..." तो हसत डोकं खाजवत बोलला.
"आता तुम्हाला ही भास होऊ लागले की काय?"
"न...नाही नाही"
"बर आत तर येऊ का अशीच दारात उभी राहून बोलू"
ती मस्करी करत बोलली.
"ओss सॉरी सॉरी आत ये ना"
अचानक तिला समोर पाहून आदींची पुरती तारांबळ उडाली होती.
ती आत आली तर आतला सीन पाहून ती थक्क झाली.
तिला वाटले होते की रूम साफ नसेल म्हणून तो आत येऊ देत नाहीये. पण आत तर वेगळाच नजारा तिला पाहायला मिळाला. सर्व रूम एकदम साफ होती फक्त टेबलवर पेपर्स विखुरलेले दिसतं होते. तीची नजर रूमभर फिरत होती. हे पाहून आदिने पटकन टेबलावरील
डॉक्युमेंट्स एकत्र केले व फाईल मध्ये ठेवले.
रूम पाहतच ती जाऊन बेडवर बसली.
" रूम छान ठेवली आहे की, एकदम साफ"
" हो मला रूम निटनेटकीच आवडते. स्वच्छतेच्या बाबतीत मी खूप जागृत आहे"
" हो का! हे बर झालं, म्हणजे पुढे जाऊन घर साफ करायची काळजी मिटली " ती हळूच पुटपुटली.
"काय...काय म्हणालीस?" तो हसत बोलला.
तिचे हे बोलणे ऐकून तो मनातून सुखावला. पण ती अवघडून हसली.
"कु...कुठे काय काहीच तर नाही" ती खांदे उडवत बोलली.
"ऐकल हा मी" तो खट्याळ हसत बोलला.
तशी ती खाली मान करून जीभ चावते. तो तिच्या जवळ येत आहे हे पाहून ती लाजून बाजूला सरकली. त्याने तिच्या जवळ असणारी बेडवरील बॅग उचलून बाजूला ठेवली थोडं अंतर ठेवून तो तिच्या शेजारी बसला.
"वेट मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो" अस म्हणून आदी आतल्या खोलीत गेला.
ती पुन्हा आपली नजर रूमभर फिरवू लागली. हात मागे सरकवून ती बाजूच्या खिडकीतून बाहेर पाहू लागली होती की, मागे तिच्या हाताला तो फोटो लागला. तिने तो हातात घेतला व पाहू लागली. फोटो उलटा होता. त्या फोटो मागे माय लव्ह अस लिहिलेलं होत.
हे वाचून तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ते लिहिलेलं वाचून तिच्या हृदयाचे ठोके जोरजोरात पडू लागले. भीत भीतच तिने तो फोटो पालटला व पाहू लागली. त्या फोटो मधील मुलीचा चेहरा दिसत नव्हता.
पण तो एका मुलीचा फोटो होता व त्यामागे माय लव्ह अस लिहिलेलं पाहून तिच्या मनाला खूप वेदना झाल्या. तिचे डोळे आपोआप भरून आले.
इतक्यात तिथे आदि आला व तिच्या हातात तोच फोटो पाहून तो गडबडीने पुढे आला.
" हे घे पाणी आणि तो फोटो इकडे दे"
"आदि हा.....हा...फोटो"
"ते सोड, तू बोल तू काय निरोप घेऊन आली होती " तो विषय टाळत बोलला.
"ते आजीने तुम्हाला आज रात्री जेवायला बोलावले आहे घरी"
ती खाली मान करूनच बोलत होती. ती नाराज झाली आहे हे त्याला जाणवलं पण का ते त्याला समजलं नाही.
ती ही नकळतपणे आदिवर प्रेम करू लागली होती. आणि आज त्याच्या जवळ असा एका मुलीचा फोटो व माय लव्ह अस वाचून ती खूप दुःखी झाली होती. ती कसबस पाणी पियुन उठली.
"मी निघते " ती पटकन उठून निघाली.
आदिने तिचा हात पकडला व तिला थांबवत बोलला.
"घाई आहे का, बस ना थोडा वेळ"
" नको, मला काम आहे एक ते करायचे आहे" ती मागे न वळताच बोलली.
तिच्या आवाजावरून ती हर्ट झाल्याचे जाणवले पण का ते अजून ही त्याला समजत नव्हते.
"ओके" तो तिचा हात सोडत बोलला.
तशी ती मागे वळून न पाहतच तिथून निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला.