भेटली तू पुन्हा... - भाग 3 Sam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भेटली तू पुन्हा... - भाग 3





" मुलांनो हळूहळू उतरा. आणि एकमेकांचा हात धरून दोघे दोघे रांगेत उभे राहा" अन्वी व मस्के मॅडम मुलांना बस मधून खाली उतरवत त्यांना इन्स्ट्रक्शन देत होत्या.

म्हेत्रे व सावंत मॅडम पुढे मुलांना घेऊन जात होत्या.
गोखले सर उगीचच अन्वी च्या मागे पुढे करत होते.

"गोखले सर येताय ना?" पाटील सर येऊन आवाज देऊन पुढे गेले.

"हो आलोच! तुम्ही चला पुढे मी आलोच" अस म्हणून त्यांनी पुढे जाणे टाळले.

मागून मोरे शिपाई येत होता.

"काय मोरे मागे कोणी राहील नाही ना?" गोखले सर मुद्दाम कारण काढून मागे थांबत होते.

" सगळे गेले सर, तुम्ही ही चला की आता."

" हो आलो चल."

सगळे पुढे निघाले. थोडं अंतर चालत गेल्यावर समोरचे दृश्य पाहून सगळे प्रसन्न झाले. लहान मुल-मुली ही खूप खुश दिसत होती.

समोर निसर्गातील रंगांची उधळण पाहून मन संतुष्ट होत होतं. समोरील दृश्य अस होत जस की धरती मातेने रंगीबेरंगी फुलांच्या नक्षीची साडी परिधान केली आहे.
खूप विविध प्रकारच्या प्रजातीची फुल दिसत होती. अगदी जमिनी लगतच होती फुल झाड व त्या फुलांवर बागडणारी रंगबिरंगी फुलपाखरे ही दिसत होती.

सगळी कडे फिरून तिथली माहिती घेऊन सगळे एक ठिकाणी येऊन थांबले. आता सगळे फोटो काढून घेत होते. अन्वी एका ठिकाणी थांबली होती आणि मागून तिला ओळखीचा आवाज आला. तशी ती मागे फिरून बघू लागली.तिला आदित्यचा आवाज आला. ती आदित्य ला शोधत होती. पण तो तिला तिथे दिसला नाही.

थोडा वेळ शोधून ती नेहमी प्रमाणे भास झाला म्हणून स्वतःच्या डोक्यात टपली मारून घेतली व पुन्हा निसर्गसौंदर्य पाहण्यात हरवली.

गोखले सर लांबूनच तिच्याकडे पाहत होते. त्यांना तिच्याजवळ जायचं होतं, पण सगळे तिथे असल्याने ते लांबूनच तिच्यावर लक्ष ठेवले होते.

पुन्हा तिला आदित्य चा आवाज आला, तशी ती पुन्हा त्याला शोधू लागली. आता तिला एक ठिकाणी आदित्य सारखी दिसणारी व्यक्ती दिसली. खात्री करण्यासाठी ती त्या व्यक्ती कडे गेली.

"एक्सकुज मी.." अस म्हणून तीने त्या व्यक्तीला आवाज दिला.

तशी ती व्यक्ती मागे फिरली. तर ती व्यक्ती दुसरीच कोणी तर होती.

" उफ्फस्! सॉरी, मी तुम्हाला दुसरीच कोणी समजून आवाज दिला."

"इट्स ओके" हसत ती व्यक्ती बोलली. पण तिच्या शेजारी असणारी स्त्री मात्र अन्वी ला रागाने पाहत होती.
तिला अस पाहताना पाहून ती तिथून लगेच निघाली.

थोडायवेळातने सगळे कास तलाव पाहायला पुढे गेले. तिथे ही निसर्ग खूप सुंदर दिसत होते. निसर्गाच्या कुशीत वसलेले ते तलाव व त्या भोवतीचे घनदाट जंगल याचे तिथून दर्शन होत होते.

" किती सुंदर आहे ना हा निसर्ग, खूप प्रसन्न व शांत वाटत आहे इथे." मस्के मॅडम अन्वी ला बोलल्या.

" हो ना! आणि हे निसर्गसौंदर्य आपल्या जवळच असून ही आजपर्यंत आपण याचा आनंद घेतला नाही."
अन्वी भारावलेल्या डोळ्यांनी तिथे असणाऱ्या हिरवळी कडे पाहत बोलली.

" हाय! मिस अन्वी "

पुन्हा तिच्या कानांवर आदित्य चा आवाज पडला.
तशी ती गालात हसली व स्वतःशीच म्हणली," वेडी झाली आहेस का सारख त्याचा विचार करू नको, त्यामुळे तुला सारख तो जवळ असल्याचा भास होत आहे." अस म्हणत तिने स्वतःच्याच डोक्यात टपली मारून घेतली.

" अरे! अन्वी हाय!" आता आदित्य तिच्या समोर येऊन थांबला.

तरी ही ती फक्त हसली व तिथून पुढे निघून जाऊ लागली.

" ओsss अन्वी मॅडम" तो हसत तिला आवाज देत बोलला.

"अग अन्वी ते बघ, तुला कोणी तरी आवाज देत आहे" सावंत मॅडम बोलल्या.

हे ऐकून ती मागे वळली व त्याच्याकडे जाऊ लागली. सोबत असणाऱ्या मस्के मॅडम कॉल वर बोलत थोड्या लांब जाऊन बोलू लागला.

" इट्स मी आदित्य, CA ऑफ युनिक बॅंक" तो तिला समजून व आठवून देत बोलला.

तिने त्याला हात लावून पाहिला.

"आर यु ओके, मिस अन्वी?" तिला अस गोंधळलेले पाहून विचारले.

तिला आता खात्री पटली की खरंच तिथे आदित्य आहे.

" ओ...ह..! हाय!, तुम्ही आणि इथे बँकेला आज काय सुट्टी आहे की काय?" ती हसत बोलली.

मस्के मॅडम कॉल वर बोलत लांब गेल्या होत्या.त्यांचा कॉल अजून सुरूच होता.

"नाही! इथे मला एक क्लायंट ला भेटायचं होत, त्यांनी इथला पत्ता दिला होता."

"इथे आणि क्लायंट , समीकरण काही जमत नाहीये" अन्वी डोळे बारीक करुन बोलली.

"इथे म्हणजे इथे नाही, इथे जवळच एका रेस्टॉरंट मध्ये, मग त्यांचा कॉल आला की त्यांना एक तास वेळ होईल, मग म्हंटल की आता पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन येण्यात काही अर्थ नाही, त्यापेक्षा इथे यावं"

" अच्छा.." ती आजूबाजूला बघत बोलली.

"ट्रिप आहे का तुमची?" तो मागे उभ्या असलेल्या स्टाफ व स्टुडंट्स ना पाहून बोलला.

" अ...! हो." ती ही मागे वळून पाहत बोलली.

" कधी पासून आवाज देत होतो; तुम्ही मला इग्नोर करत होता. अस का?"

" तस काही नाही, अक्चुअली ते मला वाटलं मला नेहमी प्रमाणे भास होत असेल " ती सहज बोलून गेली.

" भास! म्हणजे मी नाही समजलो"

" अ... काही नाही, ते मी जाते"

अस म्हणून ती तिथून जात होती. पण तो ही तिच्या मागे जातो. अन्वी सोबतचे सगळे पुढे गेले होते.

" हेय! अन्वी वेट" तिच्या सोबत चालत बोलला.

तशी ती थांबली. तो तिच्या जवळ आला. ती त्याच्याकडेच बघत होती आणि तो ही तिच्या डोळ्यात बघत होता.

" काय म्हणालीस सांग ना, कसला भास झाला तुला?"

ती खाली मान घालून गालात फक्त हसत होती. हे पाहून आदित्य विचारात पडला.

" काय झालं सांग ना?"

" हुहूं..." तिने फक्त मान हलवून नकार दिली.

ती तिथून पळून जात होती की आदित्य ने तिचा हात पकडला.

"सांग ना..." अस म्हणत त्याने तिला आपल्या कडे ओढले.

त्याचे हे कृत्य पाहून ती त्याच्याकडे पाहु लागली. तस त्याने तिचा हात सोडला.

" ओ!सॉरी, मी जरा जास्तच ..."

तो इतकंच बोलून खाली मान घालून उदास चेहऱ्याने उभा होता. हे पाहून तिला त्याच हसू आलं.

तिला हसताना पाहून त्याला काही समजेना तो तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागला.

" अरे! मी तर..." ती पुढे बोलत होती की त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवला.

" ते नको! मला सांग ना कसला भास होत होता तुला?, प्लिज"

" ते होय! ते मला...ते"
इतक्यात मागून मागचा माणूस आला व बोलला.

" काय मॅडम भेटला का तुमचा माणूस तुम्हाला"

हे ऐकून तिने खाली मान घातली व केस कानामागे करू लागली. त्या माणसाची बायको येऊन त्याला ओढत तिथून घेऊन गेली.

"तुमची मेली सवय काय जायची नाही, कुठे बाई बघितली नाही की गेले लगे भुंग्या सारखे मागे" ती बाई बडबडली.

हे ऐकून अन्वी व आदित्य हसू लागले.

गोखले सर लांबून सगळं पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. पण त्याकडे दोघांचंही लक्ष नव्हतं. ते मनमोकळे पणाने हसत होते.

तिला अस हसताना पाहून आदित्य तिच्यात हरवला. तो तिला एकटक पाहत होता. त्याला अस पाहून ती ही थोडी शांत झाली आणि तिथून निघून जाऊ लागली.
हे पाहून आदित्यने तिच्या पुढे जाऊन समोर उभा राहिला.

" काय आहे हे CA साहेब. सगळे बघत आहेत, काय म्हणतील सगळे?" ती नजर इकडे तिकडे फिरवत बोलली.

" मग सांगा ना मॅडम ! काय भास झाला तुम्हाला" तो हसत हात बांधून तिच्या कडे पाहत बोलला.

ती खाली मान करून बट कानामागे करत बोलली.

" ते मला तुमचा आवाज..."ती मधेच शांत झाली.

तसा तो वाकून तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहू लागला.

" म्हणजे मला काही समजलं नाही" तो जाणून ही अजाणपणे बोलले. त्याला आता थोडा अंदाज आला होता.

तिने कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली व एक मोठा श्वास घेतला व डोळे झाकून एकादमात बोलली.

" खूप दिवस झाले मला, तुम्ही माझ्या जवळ असण्याचा भास होत आहे."

हे ऐकून आदित्य मनातून खूपच सुखावला होता व गालात हसू लागला.

" हसत का आहात?" त्याला अस हसताना पाहून अन्वी त्याला विचारू लागली.

"आय थिंक यु आर इन लव्ह विथ मी" तो गालात हसतच बोलला.

ती हे ऐकून चकित झाली व एकदम त्याच्याकडे पाहू लागली.

"बोल ना!, डु यु लव्ह मी " तो प्रेमाने तिच्याकडे बघत बोलला.

ती काही न बोलता तिथून पळून गेली. आदित्य तिला प्रेमाने पाहत होता. आता त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानच हसू होत. केसातून हात फिरवत तो मागे वळला तर समोर गोखले सर येऊन उभे होते.

काय होईल पुढे??? जाणून घेऊ नेक्स्ट पार्ट मध्ये.