भेटली तू पुन्हा... - भाग 4 Sam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भेटली तू पुन्हा... - भाग 4








अन्वी लाजून तिथून पळून गेली, तर आदी तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत समाधानाने हसत होता. हसतच तो मागे फिरला तर समोर गोखले सर उभे होते.

हे पाहून आदित्य दचकला व दोन पावले मागे गेला. हे पाहून तर गोखले सरांना जास्तच जोर आला ते रागाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत दोन पावले पुढे गेले.

"ओ! सॉरी." अस म्हणून आदी तिथून निघत होता.

"कोण आहेस तू?" गोखले सर रागाने व तिरस्काराने बोलले.

" मी आदित्य, तुम्ही मला ओळखता का?"

आदीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गोखले सर आपलाच प्रश्न विचारतात

"काय करतोस तू?"

"मी CA आहे, तुमचे काही काम आहे का माझ्याकडे"
आदि चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत बोलला.

"CA आहेस ना मग बँकेमध्ये राहायचे, इथे अन्वीच्या मागे यायचे नाही" गोखले सर रागाने बोलले.

"एक्सक्युज मी, तुम्ही कोण मला सांगणारे की मी कुठे जायचे व कुठे नाही" आता आदि ही चिडला होता.

"सांगतो तेवढं ऐकायचं, जास्त शहाणपणा करायचा नाही" गोखले सर आदीच्या खांद्यावर हात ठेवत बोलले.

"तोंड सांभाळून बोला मिस्टर" आदि त्यांचा हात झिटकारत बोलला.

गोखले सर काही बोलणार होते की, त्यांचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर होम नाव झळकत होते, घरातून कॉल असल्याने गोखले सरांच्या चेहऱ्यावर वैतागलेले भाव उमटले.

मनात नसताना ही त्यांनी कॉल घेतला व बोलत ते चालू लागले. अजून ही आदि तिथेच उभा होता व जाणाऱ्या गोखले सरांकडे पाहत होता.

*****

गोवा

समुद्रकिनाऱ्यावर काही अंतरावर एका आलिशान बंगला होता स्वप्नपूर्ती नावाचा. वीस ते पंचवीस एकर मध्ये उभा असणारा तो आलिशान बंगला पांढरा व आकाशी रंगात रंगवलेला उठून दिसत होता. बंगल्याच्या चारी बाजूनी गार्डन व लॉन बनवले होते.

हा बांगला होता रुद्रच्या बाबांचा. बाहेरून जरी शांत दिसत असला तरी आत मध्ये खूप मोठे वादळ सुरू होते.

"यु इडियट, एक साध काम दिल होत करण्यासाठी ते ही तुम्हाला जमले नाही"

रुद्रच्या समोर चार ते पाच जण उभे होते. सगळेच दिसायला उंच, धिप्पाड, व दाढी मिशी वाढवलेले दिसत होते. त्यांना रुद्र रागवत होता.

"साहेब एकदा चान्स द्या, या वेळी नक्की तुमच्या बहिणीला शोधून काढू आम्ही" एकजण बोलला.

"गेले अकरा महिने तुम्ही हेच तर सांगत आला आहात, पण तिचा काही पत्ता लागला? नाही ना मग मी का चान्स द्यावा तुम्हाला" रुद्रच्या डोळ्यातुन अंगार बरसत होते.

"साहेब सारा गोवा पिंजून काढला, गोव्या बाहेर ही सगळी कडे पाहिले तरी त्या कुठे भेटल्या नाहीत" दुसरा एकजण बोलला.

"साहेब अखं महाराष्ट्र पिंजून कढलो आम्ही पण मिळाल्या नाहीत त्या" पहिला बोलला.

"तुम्ही थंड हवेची ठिकाणे बघण्यात वेळ वाया घालवू नका म्हणालात, नाही तर ती ही पहिली असती आम्ही"
पुन्हा एकजण बोलला.

"यु इडियट तिला थंड हवेची ठिकाणे आवडत नाहीत तसेच तिला ती सूट ही होत नाहीत म्हणून म्हणालो मी तसा, पुन्हा पहा सगळे यावेळी थंड हवेच्या ठिकाणी ही पहा" रुद्र सोफ्यावर बसत बोलला.

इतक्यात रुद्रचा पीए शरद चव्हाण मधेच बोलला.

" सर मी बोलू का थोडं, म्हणजे तुम्ही अनुमती दिली तर"

रुद्रने हातानेच बोल म्हणून इशारा केला. तस शरद बोलू लागला.

"सर , मॅडमांना गर्दी व सर्दी दोन्हींची ही अलेर्गी आहे.
या दोन गोष्टीमुळे त्या खूप बेजार होतात, त्यामुळे काही झाले तरी त्या अश्या ठिकाणी जाणे टाळातील तेव्हा त्या ठिकाणी शोध घेऊन वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही, तेव्हा मला अस वाटते की यांनी ग्रुप करून काही ठिकाणे वाटून घ्यावीत व वेगवेगळ्या ग्रुप ने शोध घ्यावा म्हणजे काम लवकर होईल. एकत्रपणे असे शोधत राहिले तर वेळ ही हातातून जाईल व मॅडम ही"

"गुड आयडीया शरद" रुद त्याची पाठ धोपटत बोलला.

"समजलं का रे तुम्हाला, हवे तेवढे पैसे मिळतील पण माझं काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे समजलं"

"होय साहेब" पाचजण ही खाली मान करून अदबीने बोलले.

*******

संध्याकाळची वेळ मुंबईच्या झोपडपट्टी मध्ये.

"काय र, का फोन केलंता?" राम बोलले.

"रामचंद्र काका, काम ही तसे महत्त्वाचे होते" शरद हळूहळू आवाजात बोलत होता.

"बर बोल" राम आजूबाजूला नजर फिरवत बोलले.

"दीक्षित सर कसे आहेत ? ठीक तर आहेत ना" शरद काळजीने विचारत होता.

"हो ठीक आहेत, तू काय सांगणार होता का"

"आ...!हो! ते तुम्ही सावध राहा. मॅडम जिवंत आहेत हे रुद्रला कसे समजले माहीत नाही ते त्यांचा शोध घेतच आहेत, आणि तसे तुमच्या बद्दल माहिती मिळू नये म्हणून मी आता त्यांना काही तरी सांगून समजावले आहे पण तरी तुम्ही सावधगिरी बाळगा."

"हो! पण तू काय सांगितले"

समोरून काही तरी बोलले गेले. रामचंद्र फोनवरचं हसू लागले व बोलले.

"धन्यवाद ! चव्हाण, तुमच्यामुळेच आज मालक व मालकांची मुलगी वाचू शकल्या होत्या, आणि अजून ही सुखरूप आहेत. तुम्ही ही काळजी घ्या, तुमच्याबद्दल त्याला समजले तर तो तुम्हाला ही जिवंत ठेवणार नाही हैवान आहे तो."

*********

गोवा

रुद्र लॉन मध्ये फिरत होता, तेव्हा शरद फोन वर कोणाशी तरी बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेसशन्स पाहून रुद्र त्याच्या मागे आला होता.

"हुं" तो फोनवर पुढे काही बोलणार होताच की मागून त्यांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तसा शरद घाबरला व त्याला दरदरून घाम सुटला हातातली फोन हातात तसाच चालू राहिला.

शरद घाबरतच मागे वळला तर समोर रुद्र ला पाहून त्याच्या डोळयांसमोर अंधारी आली.

*******

गोखले सर अन्वी व आदीच्या लव्हस्टोरी मध्ये व्हिलन म्हणून येतील का ? रुद्र ची इच्छा पूर्ण होऊ शकेल का? कथेमध्ये काय होईल पुढे वाचूया नेक्स्ट पार्ट मध्ये.
हा पार्ट कसा वाटला नक्की सांगा.

धन्यवाद!