भेटली तू पुन्हा... - भाग 5 Sam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भेटली तू पुन्हा... - भाग 5







दोन तीन दिवस सुट्टी असल्याने साहिल घरी जाणार होता.
आदित्य अनाथ असल्याने घरी भेटायला जावं अस कोणीही नव्हतं, त्यामुळे तो इथेच राहणार होता.

साहिलने आदित्यला खूप वेळा सांगितले की माझ्या सोबत माझ्या घरी चल पण नाही. त्याला तर अन्वी सोबत वेळ घालवायचा होता. कारण सरकारी सुट्टी असल्याने तिच्या स्कूलमध्ये ही सुट्टी असणार होती. तो मानातूनच खूप खुश झाला.

सकाळी लवकरच साहिल ला सोडून तो मंदिराकडे गेला.
मंदिरात जाण्याआधी त्याने अन्वीच्या आजोबांच्या दुकानावर नजर टाकली. त्याला तिथे अन्वी दिसली नाही. तसा त्याचा हिरमोड झाला.

उदास मनानेच तो मंदिरात गेला. देवाला नमस्कार केला व बाहेर जाण्यासाठी मागे वळला तर त्याचे डोळे आपोआप चमकले. कारण त्याच्या मागेच ती ही डोळे बंद करून देवाला नमस्कार करत होती.

तो तिच्या शांत, निरागस चेहऱ्याकडे पाहतच राहिला. गोबरे गोबरे गोरे गाल व लालबुंद ओठ, कपाळावर नाजूकशी स्टोनची टिकली. केस मोकळे सोडलेले. पिंक टॉप आणि व्हाईट लॉंग स्कर्ट गळ्यात छोटंसं व्हाईट स्टोल. हातात डिजिटल वॉच दुसऱ्या हातात घुंगरू असणारे ब्रेसलेट.

तो तिला पाहण्यात इतका गुंग होता की, तिने डोळे उघडले हे ही त्याच्या लक्षात आले नाही.

त्याला इतक्या जवळ व अचानक समोर पाहून ती दचकली. पण त्याला आपल्याकडे अस एकटक पाहताना पाहून ती थोडी लाजते. तिचे हार्टबिट्स खूप जोरात पळू लागले. स्वतःला कशी बशी सावरून ती त्याच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवते तस तो भानावर येतो.

तिचा हात जेव्हा जेव्हा हलायचा तेव्हा तेव्हा तिच्या ब्रेसलेटच्या घुंगरांचा आवाज यायचा, तो घुंगरांचा गोड आवाज त्याला वेड लावत होता.

ती त्याला नजरेनेच काय अस विचारते. तस तो ही आता लाजतो व हसत केसातून हात फिरवत इकडे तिकडे पाहतो. त्याला अस लाजताना पाहून ती ही मनोमन खूप खुश होती.

"अम्...ते तुम्ही इथे?" तो काहीतरी विषय काढून बोलत होता.

" हो मी इथेच असते पण तुम्ही इथे काय करताय?" ती हसत बोलली.

"ते मी दर्शन घेण्यासाठी आलो होतो."

"मग झालं दर्शन"

"हो आताच देवीचे दर्शन झाले"

त्याच्याही नकळत तो सहजच मनातलं बोलून गेला.
तशी ती पुन्हा लाजली व समोर येणारे केस कानामागे केले
तस पुन्हा घुंगरांचा आवाज झाला. आदित्य ला आता फक्त वेडच लागायचे बाकी होते.

" इफ यु डोन्ट माईंड, आपण इथे बसूया का थोडा वेळ" तो विनवणी वजा आवाजात बोलला.

"हुंम" ती एक बाजूला जात बोलली.

थोड्या अंतरावर जाऊन ते दोघे ही बसले. दोघे ही शांत बसले होते. अन्वीने बोलायला सुरुवात केली.

"तुम्ही आज इथे, सुट्टी असेल ना तुम्हाला ही"

"हो"

"घरी का गेला नाही? "

" ते मी....मी अनाथ आहे, सो मी जिथे असतो तिथेच सुट्टी एन्जॉय करतो" तो अडखळत दुःखी स्वरात बोलला.

"ओहह! आय एम सॉरी" ती खंत व्यक्त करत बोलली.

"डोन्ट बी"

"तुमचे फ्रेंड, ते गेले का?"

"हो तो सकाळीच गेला, मला ही सोबत चल म्हणत होता पण मी नाही म्हणालो"

"का? जायचं ना मग एकटे राहण्यापेक्षा"

"मग इथे राहिलेलं काम कोण करणार, आणि मी एकटा कुठे आहे आहेस की तू सोबतीला"

आदिचे असे प्रेमाने व हक्काने आपल्याबद्दल बोलणे पाहून तीच्या पोटात हजारो फुलपाखरू उडू लागले. तिचे गाल लाल दिसत होते. डोळ्यांमध्ये एक विलक्षण ओढ, एक चमक दिसत होती. आणि आदिने ती लगेच हेरली.
तो ही लाजून मनातून खुश होत गालात हसत आजूबाजूला बघू लागला.

"काही खाल्ले आहे का?" तिने काळजीने विचारले.

"नाही, आता गेल्यावर पाहू"

"बरं, चला माझ्यासोबत"

अस म्हणत अन्वीने त्याचा हात पकडला व त्याला जवळच्याच रेस्टोरन्ट मध्ये घेऊन गेली.
तिला अस हक्काने आपला हात पकडलेला पाहून तो मनातून डान्स करू पाहत होता.

"इथे नाश्त्याचे मेनू चांगले भेटतात" ती एका रेस्टोरंटच्या समोर जात बोलली.

"हो का, मला वाटलं तू मला तुझ्या हाताने करून खायला देशील पण इट्स ओके इथे काम चालवून घेऊ" तो नाटकीपणे नाराज होत बोलला.

" अच्छा! म्हणजे सीए साहेबांना माझ्या हाताने केलेलं खायचं आहे तरss" ती ही एक भुवयी उंचवत बोलली.

" मग नाही तर काय, आम्हला ही समजुदे की तुम्हाला काय काय बनवता येत" तो टेबलवर बसत बोलला.

इतक्यात वेटर तिथे आला. वेटर येताच अन्वी बोलनायची थांबली. वेटर ऑर्डर घेऊन गेला. तशी ती पुन्हा बोलू लागली

" आणि मला काय काय येत हे जाणून तुम्हाला काय फायदा होणार आहे" ती दोन्ही हात टेबलवर ठेवत बोलली.

" आयुष्यभर नवीन नवीन पदार्थ खायला मिळणार ना" तो तिच्याकडे मिश्किल हसत बोलला.

तशी ती बावरली तिच्या पोटामध्ये फुलपाखरे उडू लागली.
आदित्या अजून काही बोलणार की वेटर तिथे आला.
त्यामुळे तो विषय तिथेच थांबला.

"बाय द वे, अन्वी तू लहान असल्यापासून या मंदिरात येत असेल ना? आय मिन खूप वर्ष्यापासून आजोबांचे दुकान इथे आहे ना?"

ती थोडा विचार करत बोलली. तो तिलाच पाहत होता.

" डोन्ट नो, अक्चुअली मला काही आठवत नाही." ती उदास होत बोलली.

"म्हणजे, मी समजलो नाही" त्याने शंका व्यक्त केली.

"अक्चुअली, काही वर्षापूर्वी एका इनसिडेन्स मुळे मला मानसिक धक्का लागला होता व तेव्हा पासून मला काही आठवत नाही असे बाबा म्हणतात." ती शून्यात नजर ठेवून बोलली.

"बाबा कुठे असतात?" त्याने काळजीयुक्त उत्सुकतेने विचारले.

" बाबा म्हणजे माझे आजोबा" ती त्याची शंका दूर करत बोलली.

"काही वर्ष्यापूर्वी आमच्या घरी आग लागली होती म्हणे, त्यावेळीच माझे आई बाबा...." हे सांगत असताना तिचा आवाज जड झाला होता.

"ओह! आय एम सॉरी मला माहित नव्हते" त्याने खंत व्यक्त केली.

"इतकी भीषण आग लागली होती की, सगळं सगळं जळून गेलं, माझ्या आई बाबांचा साधा एक फोटो ही नाहीये माझ्याकडे, आजी आजोबा व मी तेव्हा आजोबांच्या मित्रांच्या घरी गेलो होतो व तेव्हाच हा अपघात झाला होता. माझे फोटो, डॉक्युमेंट्स त्याच सोबत माझ्या आठवणी ही जळून गेल्या."

हे बोलत असताना तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. तिच्या डोळ्यातून एक अश्रू येऊन टेबलवर पडला. तस आदित्यच मन ही हेलावले. त्याने तिच्या हातावर हात ठेवला व तिला धीर देऊ लागला.

थोडा वेळ बसून ते दोघेही बाहेर निघाले.