भेटली तू पुन्हा... - भाग 8 Sam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

भेटली तू पुन्हा... - भाग 8









आदि साहिल सोबत बोलून कॉल ठेवतो, व फ्रेश होण्यासाठी जातो.

अन्वी आदिला भेटून आल्यापासून शांत शांतच होती. आजीला हे जाणवत ही होतं, पण ती फक्त तिच्या हालचाली टिपत होती. आल्या आल्या तिने मोबाईल चार्ज करण्यासाठी लावला.

आजोबा दुकानाकडे जाण्यासाठी तयार होतं होते. अन्वी तिथून जाताच आजी आजोबांशी बोलू लागली.

"अहो! ऐकल का" आजीने हळू आवाजातच आजोबांना आवाज दिला.

"गेली पन्नास वर्षे तुमचंच तर ऐकत आलो आहे सरकार बोला" आजोबा आजींच्या गालाला हात लावत खट्याळपणे बोलले.

"काही ही काय तुमचं, आपलं सोडा नातीकडे पाहिलं का तुम्ही" आजी बारीक आवाजातच बोलली.

"का?, काय झाले तिला?" आजोबा डोळे बारीक करून बोलले.

"आल्या पासुन शांत शांतच आहे, त्या सीए साहेबांना भेटायला गेली होती ना ती?"

"हो, गेली तर होती" आजोबांना ही काळजी वाटून लागली.

"ती घरी परत आल्यापासून ती बोललीच नाही, शांतच आहे, काय बरं झालं असेल?"

"मी पाहतो बोलून तिच्याशी, तू नको चिंता करू"

"हा बघा बोलून, पोर शांत असली की घर खायला उठत हो"

"हो, बाईसाहेब बघतो मी तू जा कामाला लाग, आदित्यराव पहिल्यांदाच घरी येत आहे"

"हो, हो"

अन्वी ही रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन खाली आली. तर तिला हॉलमध्ये आजोबा बसलेले दिसले.

"काय हो आजोबा दुकानात जायचे नाही का? सहा वाजून गेले की"

"हो ग जायचे तर आहे आणि आदित्यराव घरी आले की पुन्हा घरी ही यायचे आहे"

"मग बसला का आहात जाऊन या ना पटकन नाही तर उशीर होईल तुम्हाला" ती ही त्यांच्या जवळच्या सोफ्यावर बसत बोलली.

"हो, पण त्या आधी माझं एक काम आहे तुझ्याकडे"

"हा बोला ना आजोबा" उत्सुक होत बोलली.

"काय झाले आहे बेटा तुला, तुझा मूड काही बरोबर वाटत नाहीये मला, कोणी काही बोलले का तुला?"
आजोबा काळजीने बोलत होते.

तशी ती गडबडली.

"नाही आजोबा, ते थोडं डोकं दुखत आहे म्हणून" ती काही तरी बोलायचं म्हणून बोलून गेली.

"अस होय मग मेडिसिन घ्यायची ना बाळा, उगीच म्हातारी माझ्या मागे लागते" आजोबा खोडकरपणे बोलली.

आजी जी किचनमध्ये काम करत होती ती आजोबांचे बोलणं ऐकून हॉलमध्ये आली.

"काय म्हणालात, मी म्हातारी आणि तुम्ही काय अजून तरुण आहात की काय, डोकं बघितले का आपले पांढरे झालेत केस" आजी रागाने बोलली.

"हो, पण तुझे तर कुठे काळे आहेत, तू कलर करते म्हणून तुला वाटत तू अजून तरुण आहेस पण तस नाही ना" आजोबा हसत अन्वीला टाळी दिली.

"हो पण माझी दात अजून शाबूत आहेत, तुमच्यासारखी कवळी नाही बसवली मी त्यामुळे तुमच्यापेक्षा तर मी तरुणच आहे" आजी ही हसत बोलली.

अन्वी त्यांचे लुटुपुटीचे भांडण एन्जॉय करत होती. आजोबा काही बोलणारच की दरवाजावर टकटक झाली.
तसे सगळेच दरवाज्याकडे पाहू लागले. दारात आदि उभा होता. त्याला पाहून अन्वी दाराजवळ गेली.

तिला पाहून त्याच्या हृदयात काही तरी हालचाल झाली. तिचा चेहरा पाहतच त्याच्या डोळ्यात एक चमक आली. तो मनातून खुपच सुखावला .

"या या सर" ती नजर चोरातच बोलली.

ती नजर चोरत आहे हे पाहून त्याचे मन पुन्हा खट्टू झाले.
तसाच तो आत आला.

आजीने घड्याळ पाहिले सात वाजले होते.

"अरे, तू बरोबर सातला आला ही" आजी हसत व थोडी चकित होत बोलली.

"मग, जाऊ का नंतर येऊ का?" आदि हसत मागे फिरल्यासारखे करत बोलला.

"नाही या या आदित्यराव या, आमच्या मंडळी आमची फिरकी घेत होत्या तुमच्यामुळे आमची सुटका झाली" आजोबा हसत आदीच्या खांद्यावर हात टाकून त्याला दरवाज्यातून आत घेऊन आले.

"सीए बाळा बरा आहेस ना?" आजी जवळच्याच सोफ्यावर बसत बोलली. आजोबाही जवळच बसले होते.

"हो आई, आय मिन आजी मी बरा आहे, तुम्ही दोघे कसे आहात?" त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतं होता.

"आम्ही ही खूप छान आहोत" आजी प्रेमाने आदिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली.

त्या तिघांना अस आपुलकीने बोलताना पाहून अन्वी मानातूनच खूप खुश झाली. पण दुपारचा किस्सा आठवताच तिचा चेहरा पडला.

अन्वी पाणी आणायला आत किचनमध्ये गेली. आदिला आजीच्या डोळ्यात आपुलकी, माया, प्रेम, काळजी सारे भाव एकत्र दाटून आलेलं दिसत होते. त्यामुळे आदिला ही भरून आलं. आजोबाही त्या दोघांना भावुक होऊन बघत होते.

तो आजीला काही बोलणारच होता की अन्वी पाणी घेऊन बाहेर आली.

"सर पाणी" ती अजूनही नजर चोरतच बोलली.

तो तिच्याकडे पाहतो तर ती मान खाली करूनच उभी होती.

"अनु बाळा, चहा टाक थोडा थोडा" आजोबा म्हणाले.

"बाबा थोड्या वेळापूर्वीच तुम्ही चहा घेतला आहे, आता नाही हा, नाही तर पुन्हा तुमची शुगर वाढेल." अन्वी काळजीपोटी बोलली.

"थोडा चालतो ग, आज मी खूप खुश आहे" आजोबा तिला मनवत बोलले.

"आणि ते का बरे?" अन्वी कुतूहलाने विचारले.

"ते म्हणजे, आदित्यराव आज पाहील्यांदाच आपल्या घरी आलेत ना म्हणून" आजोबांनी आदिच्या खांद्यावर हात टाकत बोलले.

"मग चहा राहू दे हे खा"अस म्हणून आदिने सोबत आणलेला बॉक्स आजोबांसमोर केला.

आजोबा हरकुन बॉक्स घेऊन उघडले बॉक्समध्ये पाहून ते खूपच खुश झाले व आदिकडे पाहू लागले. अन्वी ही बॉक्समध्ये डोकावून पाहू लागली. आता तिचे डोळे ही आश्चर्याने मोठे झाले.

"घ्या, चहा नको म्हणते तर या साहेबांनी गुलाबजाम घेऊन आलेत" अन्वी डोक्यावर हात मारून घेत बोलली.

"शुगर फ्री आहेत" आदि अन्वीकडे पाहत बोलला.

अन्वी व आदिची नजरानजर होताच अन्वीच्या हृदयाचा ठोका चुकला. आदि तिच्या गहऱ्या डोळ्यात हरवून गेला. अन्वी ही त्याच्या हरवली होती. दोघांना ही जसा बाकी जगाचा विसरच पडला होता.