हैवान अ किलर - भाग 12 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हैवान अ किलर - भाग 12

भाग 12

ही कथा संपुर्णत काल्पनिक असुन वास्तववादी जीवनाशी..ह्या कथेच काहीही घेण देण नाही! कृपया कथा मनोरंजनाच्या हेतुने वाचावी..! ना की सत्यता बाळगून. धन्यवाद..!

त्या म्हातारीच्या घरात मार्शल, निल-शायना, सोज्वळ -प्रणया आर्यंश, सागर आणि ती म्हातारी असे मिळुन नऊजन जमली होती. ती म्हातारी शायना-प्रणया तिघीही डायनिंग टेबलाजवळ च्या खुर्चींत बसलेल्या, तर बाकिची पुरष मंडळी ऊभी होती. हॉलमध्ये चार मेंबत्या पेटवुन ठेवलेल्या. त्या मेंबत्त्याचा तांबरट उजेड सर्व हॉलमध्ये पसरलेला..भिंतींना चिकटलेला.वरच्या कौलारु छप्परापर्यंत मात्र जात नव्हता. तांबरट प्रकाशात सर्वांचे चेहरे भयाने ग्रासलेले दिसत होते.एक विलक्षण गंभीरता पसरलेली. काहीवेळा अगोदर जे काही पाहिल! ते नक्की खर होत का? हा एक बुद्धीवादी मानवाला पडलेला प्रश्ण होता.

मार्शलने आतापर्यंत त्या सर्वांना आपली ओळख, रामचंद हैवाना बदल सर्वकाही सर्वांना सांगितल होत.

" यु मिन मार्शल घोस्टबस्टर स्पाई ! तुझ्या म्हंणण्यानुसार ? हा जो कोणी रामचंद आहे? तो ह्या हायवे नंबर 405 चा अर्बन लेजेंड आहे तर? जो की हायवे 405 वाल्या प्रवास्यांना मारुन खातो ? " सोज्वळचा अद्याप विश्वास बसलेला दिसत नव्हता.

" आणी तु निल, यूट्यूब वर वीडियो पाहिलीस, त्यात एका अघोरीमुळे

हा सैतान इथे आला अस म्हंणतोस." सोज्वळने निलकडे पाहिल.

निलने फक्त मान हलवली.

" आणी तुम्ही! तुमच गाव म्हंणे 25 वर्ष गायब असत ? का तर ह्या रामचंदने श्राप दिलाय ! हा, हा, हा, हा, हा! सोज्वळ हसु लागला.

" सोज! जस्ट शटअप. हसतोस काय?" प्रणया त्याला चिडुन बोल्ली.

" व्हॉट नॉनसेन्स प्रणु! यु नो! तु कस काय विश्वास ठेवू शकतेस ह्या सर्व भाकड कथांवर ? आताच्या युगात भुत वगेरे अस काहीही नसत! आणि हो. " सोज्वळ काहीक्षण थांबुन पुढे म्हंणाला " मला वाटत ती ट्रक कंप्युटर वरुन क्ंट्रोल केली असावी! म्हंणुनच आत ड्राईव्हर नव्हता. आणि जो कोणी हे करत आहेना त्याला शोधुन त्याच्या पापांची शिक्षा मी देईलच !" सोज्वळ रागानेच म्हंणाला.

" हा, हा, हा, हा, हा, "अचानकच ती म्हातारी कशीतरीच मोठ्याने हसु लागली. आर्यंश-सागर दोघांनीही तिल अस हसताना पाहून एकमेकाला मीठीच मारली.

" ह्य म्हातारीला क...क..कय झाल! अंगात बिंगात नही ना आल."

सागर थरथरत आर्यंशला म्हंणाला. त्या दोघांकडे कुणाचच लक्ष नव्हत.

" कोनाला मारणारेस तु! त्या सैतानाला. !" ती म्हातारी एकदमच हसायची थांबुन ओरडून म्हंणाली.

" गेली कित्येक वर्ष फक्त सात दिवसांच आयुष्य घेऊन जगत आहे हे गाव! इथल प्रत्येक घर, एक घर नसुन एक जिवंत कबर आहे. प्रत्येक घरात एक नी एक मूडदा, प्रेत सडत पडल आहे. आवाज येत का तुला आजुबाजुच्या घरांतुन? ह्या आजूबाजूच्या घरात लाईट दिसते का? दिसत का कोणी रस्त्यांवर ? नाही ना? त्याच्या भीतीपोटी ह्या गावची मांणस बाहेर निघत नाहीत. "

" बस्सऽऽऽ" सोज्वळ मध्येच म्हंणाला. " काहीही सांगु नका तुम्ही.सर्व दंतकथा आहेत त्या. सर्व फेक आहे. आणि हो....आता मी

 इथे एक क्षणभर ही थांबणार नाहीये!" सोज्वळने प्रणयाकडे पाहील.

" तु येतेस? की नाही ! तेवढच सांग? " सोज्वळच्या वाक्यावर प्रणयाने एकवेळ बाकी सर्वांकडे पाहिल.

" ओके नको येऊस!" सोज्वळ घाई झाल्यासारखा तणतणत्या पावलांसहित दरवाज्याच्या दिशेने पोहचला व हलूच कडीवर हात ठेवल की तेवढ्यात... बाहेरुन (भौ, भौ, भौ भौ, ) मायकलच्या भुंकण्याचा आवाज त्या निरव शांततेत घुमला. सर्वजण तो आवाज अगदी कानदेऊन ऐकू लागले..की पुन्हा एक मोठा गेटचा टाळा तोडण्याचा..व गेट उघडला गेल्याचा ( कुंऽऽऽऽऽऽऽऽ) मंद आवाज आला.

" शुश्शऽऽऽऽ!" त्या म्हातारीने दोन बोट आपल्या ओठांवर ठेऊन सर्वांकडे पाहत गप्प राहायला सांगितल. बाहेरुन काहीबाही आवाज येत होते.मायकल जोर-जोराने भुंकत होता. घराला असलेल्या कंपाउंड मधोमधच गेट कुलूप तोडून उघडल होत. आणि आता ह्याक्षणी बुटांचा टोक टोक आवाज येत होता.जस की कोणि दरवाज्याच्या दिशेनेच चालत येत आहे. ज्याच्या अंगावर मायकल जोर जोराने भुंकत आहे. कारण मायकलचा भुंकण्याचा आवाज तीव्र झाला होता. घरातल्या प्रत्येकाच्या चेह-यावर भीती उफाळून आली होती. शांततेचा विलक्षण स्फोट त्या सर्वांमध्ये घडला होता.

" फट्ट!" कवटी फुटल्यासारखा आवाज.नी मायकलचा भुंकण्याचा आवाज बंद झाला. बाहेर जो कोणि आल होत..त्याने नक्कीच मायकलचा घात केला होता.

" ओह गॉड! " त्या म्हातारीने भीतीपोटी छातिवरच हात ठेवला. 

मार्शलने दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या सोज्वळकडे पाहत होकारार्थी मान हळवली. नी बाजुची एक जाड़जुड़ काठि उचलून ती सोज्वळकडे भिरकवली. ती त्याने हलकेच हवेत झेळली. मग दुसरा थरथरणारा हात हलकेच दवाज्याच्या दिशेने घेऊन जात कडीवर ठेऊन, ती एक आवंढा गिळून डाव्याबाजुला सरकवली.दरवाजा आता मोकळा झाला होता.

वाटलस तर बाहेर जे काही अभद्र उभ होत त्याने दरवाज्यावर एक लाथ हाणुन सोज्वळला अलगद दुर भिरकावल असत.पन तस झाल नाही.

सोज्वळले हलकेच करकरत तो सात फुट तीस सेंटीमीटरचा दार हलकेच आत घेत उघडला. बाहेर अंगणात चंद्राचा चंदेरी प्रकाश पसरलेला..नी त्या उजेडात सफेद कंपाउंड आणि मधोमध असलेल उघड लोख्ंडी गेट दिसत होत. ह्याचा अर्थ कोणीतरी आत शिरल होत हे नक्की.पण कोण? 

" ए डिकरा ! तिथे मायकल माझा कुत्रा आहे का ?" सर्वांशेवटी ऊभी ती म्हातारी काळजीच्या सुरात म्हंणाली. तिला आप्ल्या मायकलची आता काळजी वाटत होती. पाळीव प्राणि असला तरी कित्येक वर्षांचा सोबती होता तो. काळजी वाटण साहजीकच होत..पन आज वाटणारी काळजी भीतीत बदलली होती. बाहेर सामसुम, नी रातप्रकाश पसरलेला दिसत होता. रातकीड्यांची किरकिर हंबरडा फोडत होती. 

सोज्वळने एक कटाक्ष खाली तीन थराच्या पायरीवर टाकला. पायरीवर रक्त दिसत होत. जे पाहून त्याची पाचावर धारण बसली. बोबडीच वळली. त्याने गर्रकन मान वळवून त्या म्हातारीकडे पाहिल..त्याच तो पांढरा पडलेला चेहरा सर्वकाही सांगुन गेला होता. तीने मोठ्या दुखी भावनाहिंतपणे छातीवर क्रॉसची खुन केली. की तेवढ्यात घरावरच्या कौलारी छप्परावर कोणीउभ असल्यासारखा किंवा उडी मारल्यासारखा आवाज आला.( थप्पऽऽ) सर्वांच्या नजरा एकसाथ वर अंधा-या कौलारु छप्पराकडे स्थिरावल्या. मन धोका धोका म्हंणुन किंचाळत होत. डोळे धोक्याचा इशारा देत होते..परंतु मेंदू मात्र बिन कामी झाला...होता. पाय जागेवरुन हळता हळत नव्हते. जणु थिजले गेलेले.

कौलारु छप्परावरुन खुळ्यासारख ते ध्यान चालत होत..चालताना च्याच्या पायांतल्या चकचकीत काळ्या बुटांचा (टोक, टोक) आवाज होत होता. प्रत्येकाच्या डोक्यावरुन तो आवाज पुढे पुढे जात होता. आर्यंश, सागर, मार्शल, निल-शायना आणि शेवटला ती म्हातारी तिच्या डोक्यावर येऊन तो आवाज थांबला.

" पळा पोरांनो!" क्षणाचाही मेळ न लावता म्हातारी मोठ्याने किंचाळी.नी त्याचवेळेस वर उभ्या ध्यानाने कौल तोडत थेट घरात प्रवेश केला. दहा बारा चौकलेटी कौवल, आणी एक आठ फुट पांढ-याफट्ट थंड आम्ली, असुगंधीत देहाची आकृती म्हातारी समोर थेट तिच्या समोरा समोर झेपावली.ती हिरवट जहरी नजर आज आयुष्यात पाहिल्यांदा

त्या म्हातारीने समोरा समोर पाहिली. डोळ्यांतुन थेट मेंदूत, मग मेंदूतल्या नसांमधुन थेट खाली, जात धडधडत्या काळजात रुतली. भीती काय असते हे त्या म्हातारीला विचाराव मी म्हंणतो?

" मला घाबरत नाही ना म्हातारे, ही, हिहि, ही, ही!" 

वरुन तूटलेल्या कौलारु छप्परामधुन चंद्राचा प्रकाश त्याच्या पांढरट अपशकुनी देहावर पडला होता..त्या प्रकाशात त्या देहातुन थंड वाफ बाहेर पडताना जाणवत होती. हसताना त्याचे ते काळसर मसेरीवाले धार धार दात त्या म्हातारीला दिसले ज्या दातांच्यात काळे केस अटकले होते. मायकलचा मांस जणु त्याने आताच गोडीने फस्त केला होता.

शायना -निल, सोज्वळ तर त्या हिडिस आकाराला पाहून पुरता गार झाला. सागर आर्यंश, शायना निल स्व्त:चा जिव वाचवुन घरातुन बाहेर पडले. प्रणयाने सुद्धा स्टेच्युसारख्या थिजलेल्या सोज्वळला सोबत..घेऊन बाहेर धुम ठोकली. परंतु मार्शल मात्र तिथेच होता. त्याने आपल्या घड्याळावर हलकेच टच केल. परंतु त्या हिरवट स्क्रीनवर नो सिग्नल अशी नोटीफीकेशन येत होती.

" ओह शट!" मार्शल ने अस म्हंणतच. पुढे पाहील..तो अगडबंब देहाचा आकार सामान्य मानवाच्या मनात धडकी भरवायला पुरेसा होता.तिथे त्या म्हातारीचा काय निभाव लागणार? नाही का?

" तुला म्हंटल होत म्हातारे ! सोड तिला! पन नाहीच, नाही ऐकल तु..!" रामचंदचा धारधार नखांचा बलदंड हात हळू हळू मागे जात होता.तसे मार्शलने पाहील.त्याच्या मागे एक धारधार पातिची कुदळ होती.

" म्हातारे.! हिहीही!" खर्जातल्या आवाजात ते ध्यान हसल.

" जन्नत नसीब मैं हे तेरे!" रामचंदच्या हिरवट जहरी डोळ्यांत लकाकी उमटली, मागे गेलेला एक हात कुदळच्या दंड गोल दांड्यावर आवळला गेला नी सर्रकन तोच हात रामचंदने हवेला कापत पुढे आणला..वरुन खाली आलेल्या चंदेरी प्रकाश किरणांचा मारा त्या कुदळेवर झाला..तशी ती कुदळ चमकली... मग त्या प्रकाशात म्हातारीच्या विस्फारलेल्या बुभळांना आवासलेल्या तोंडाला दोन सेकंद दाखवुन जात पुढच्याक्षणाला म्हातारीच देह एका निर्जीव कलेवरासारखा उज्व्याबाजुला फट्ट कवटी फुटून जमिनीला आलिंगन देत खाली पडल.तसा दरवाज्याच्या चौकटीतुन बाहेर पडना-या मार्शलच्या कानांवर तो आवाज घुमला. " फट्ट "

 

क्रमश:...