मल्ल प्रेमयुद्ध - भाग 12 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 12

मल्ल प्रेमयुद्ध





रात्र झाली होती. आचाऱ्याशी बोलून उद्या काय आणि किती वाजता जेवण तयार करायच बोलून आचारी निघून गेला.
दादा घरात जायला निघाले तेंव्हा उस्ताद बाहेर उभं व्हते.

उस्ताद घराच्या बाहेरच उभे व्हते.
"उस्ताद घरात या.." दादा म्हणाले.
"दादा एवढंच सांगतो. पोरीच्या भविष्याच्या दृष्टीन तुमी चांगला निर्णय घेतलाय त्यात माझी ना न्हाय... पण खेळाच्या मैदानातन नकळत माघार घ्यायला लावताय. तेच तीच आयुष्य हाय. तिच्या डोळ्यात म्या बघितलंय क्रांती खुश न्हाय. तीला भविष्यात खुश ठेवायचं म्हणून तुम्ही तीच आयुष्य हिसकावून घेतलंय. दादा मला ठाव हाय तुमचा हरवक्त तिला पाठिंबा होता. मग अस काय झालं की तिचा इचार केला न्हाय तुमी." उस्ताद जवळजवळ रडवेले झाले होते. त्यांना क्रांतीच लग्न पचनी पडत नव्हतं.
"उस्ताद मला पण क्रांतीच लग्न एवढ्यात नव्हतं करायचं पण...?" दादा उस्तादातांच्या नजरेला नजर देत नव्हते.
" पोर इंटरनॅशनल लेवलची खेळाडू हाय. लग्न केलं तर संसार, नवरा, सासू सासरे, पोर बाळ, घरकाम यातच तीन आयुष्य घालवायच? दादा मला तुमचा हा निर्णय पटला न्हाय. अशी काय घाई व्हती व.." दादा काहीही बोला मला हे काही पटलेलं न्हाय. उस्ताद दादांना काय म्हणायचं आहे हे ऐकायला थांबले नाहीत. दादा शांत होते. तेवढ्यात चिनू आली.

" दादा नका वाईट वाटून घेऊ... मी एकल उस्ताद तुम्हाला जे बोललं ते... हे बघा तायडी आता खुश न्हाय पण मी मनापासून सांगते. दाजींबर लग्न झालं ना की तिला तुमच्या, तिच्या निर्णयाचा पश्चाताप व्हणार न्हाय.
"चिनू घाई व्हती मला बी म्हायती हाय तुझ्या तायडीला आमचं अचानक अस वागणं खटकलं हाय... पण माझ्या पोरी संस्कारी.. तोंडातन एक शबद काढणार न्हाईत. तिला अस वाटत असेल ना की दादा कस तयार झालत? जो माणूस लेक लहान असल्यापासन कुस्तीत नेहमी पहिलं यावं म्हणून धडपडतोय तो आज वेळ आली तर लग्न लावून देतोय." दादांना एवढं हतबल झालेलं चिनूने कधीच पाहिलं नव्हतं.
"दादा जे घडतं ते चांगल्यासाठी घडत तुम्ही चांगल्यासाठी करताय. आईला, तुम्हाला कळतंय की काय बरोबर आणि काय चूक.. आम्ही कधी तुमच्यापुढ गेलोय का?? चला नका विचार करू... झोपा."
चिनू दादांना घेऊन आत गेली.


तेजश्रीने साखरपुड्याची तय्यारी जय्यद केली होती. भूषण वीरच्या घरातल्यांना साखरपुड्याचे साहित्य ठेवायला मदद करत होता.
"बापरे वहिनी हे काय एवढं समान व्हय?" भूषण म्हणाला.
" व्हय मग... अपल्याकडन कमी पडायला नको काय..सगळं व्यवस्थित . अन पाटलांच्या घरचं कार्य म्हंटल्यावर लोकं आवर्जून बघत्यात. हे ठेवून घ्या मी हारांची टोकरी आणली की नाही बघते." तेजश्री निघायला लागते. तेवढ्यात सुलोचना येते. "तेजश्री म्या बघते बाकीचं... तुम्ही कामात झोकून दिलय पार जा आधी नाश्ता करून घ्या अन मग लगेच आवरायला घ्या."
" हो जाते...तुम्ही खाल्लं का?" तेजश्री
"हो ग मी खाल्लं. तू जा तासाभरात निघायला पाहिजे. तुमचे आबासाहेब वेळेचं पक्क उशीर झाला तर कोणासाठी थांबायचे न्हाईत." तेजश्री हसून आत गेली.
"रखमाकाकू अग तू कशाला करत बसलीस हे आता आणखी... आपण आवरू नंतर..." तेजश्री घरात काम करणाऱ्या रखमाला म्हणाली. रखमा भांडी घासत होती.
"ताईसा आव कशाला उग काम ठिवयाचं.. झाली सुद्धा भांडी. थांबा पोवं गरम करून देते." हात झटकत रखमा गॅसकडे जायला निघाली.
"काकू तुम्ही घासा भांडी मी घेईन हातानं पोवं..." तेजश्री हसली.
"हा ताईसा हसा मला माहिती हाय मी पोवं म्हणाली म्हण हसताय ना.." रखमा लटक्या रागात बोलली.

"काकू तुम्ही घ्या आवरून मी खाते.पण भारी झाल्यात हा पोवं.." तेजश्रीने एक घास खाल्ला आणि म्हणाली आणि दोघीही हसायला लागल्या. वहिनी ह्या शेरवणीचे बटन नीट बसना बघताय का?" वीर खाली येत म्हणाला.
मोती कलरची शेरवणी आणि निळ्या रंगाचे जॅकेटमध्ये वीर राजबिंडा दिसत होता. भाऊजी काय भारी दिसताय. काकू माझ्या भावासारख्या दिराला कोणाची नजर नको लागायला. दृष्ट काढताय??" रखमाला दीर भावजयचं नात बघून डोळ्यात पाणी आलं.
"व्हय आत्ता काढते.."



रखमाने मीठ मोहरी आणली आणि वीरची नजर काढली. तेजश्रीने बटन लावून दिले. गळ्यात घातलेल्या मोत्याच्या माळा निटक्या केल्या.
"भाऊजी क्रांती तुम्हाला बघून..." तेजश्री हसली.
"काहीही काय वहिनी... तुम्ही आवरा..." वीर काहीतरी बोलून तिथून निसटला. तेजश्री आवरायला गेली.

वीर मोजडी घालून बाहेर आला. सुलोचनाबाई त्याच्याकडे बघतच बसल्या.
"बाई एवढं लेकरू माझं गोड दिसतंय??? थांब राखमाला तुझी नजर काढायला लावते."
"आई कसली तिने माझी नजर... वहिनींनी सांगितले. बाकी सामानच बघतो मी तू ज आवरून घे." सुलोचना आत गेली.

"चा मारी एवढा भारी या आधी दिसला नव्हतास का कधी तू? आज मंजी एकदम..." भूषण जोरजोरात हसून म्हणाला.
" व्हय मी भारीच दिसतो तू आत्ता नीट बघितलस मला.चल आता आवर निघायला पाहिजे." वीर
"व्हय कळती अमास्नी तुमची घाई...आवरलय सगळं आता फक्त गाडीत बसुद्यात सगळ्यांना मग निघू." भूषण


तेजश्रीने संग्रामकडे पाहिले.
"छान दिसताय.." तेजश्री घाबरत बोलली.




"तुम्ही अजून असंच... आवरा पटकन अन या खाली."
संग्राम रागाने बाहेर गेला. तेजश्रीने आवरायला घेतलं. 15 मिनिटात तेजश्री आवरून खाली आली. संग्रामने तेजश्रीकडे पाहिलं.
"ही एवढी गोड दिसती. मी का न्हाय बघितलं अजून एवढं प्रेमानं हिच्याकड." संग्राम स्वतःशीच बोकात होता. तेजश्री त्याचा जवळ आली.
"मला काय म्हणाला का?" तेजश्री
"व्हय म्हणाल तुमी आपल्या गाडीत बसा." तेजश्री हसली. गाडीमध्ये बसली.



पाहुणे येणार म्हणून अंगणात मंडप टाकला होता. फुलांची सजावट केली होती. एक बाजूला मोठ्या विटांच्या चुली केल्या होत्या. जेवण बनवलं जात होतं. बाकी लोक आचाऱ्याला सूचना करत होते. पाटलांच्या तीन चार गाड्या आल्या. दादा, सरपंच, गावातली मंडळी आणि घरातले त्यांच्या स्वागताला गेले. चिनूने वीरकडे बघितले आणि हाताने खुणावले. "छान दिसताय दाजी." वीर थँक्स म्हणाला.

आशाने वीरला ओवाळले. सगळे घरात आले. वीरची नजर क्रांतीला शोधत होते. सगळे बसले. ब्राम्हणकाकांनी पूजेला सुरुवात केली. सगळीकडे आनंदी आनंद होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता पण क्रांती शांतपणे सगळं आवरत होती. संतोषने रत्नाला हाक मारली आणि क्रांतीला बाहेर घेऊन यायला सांगितले. रत्ना क्रांतीला घेऊन बाहेर आली.



तीच रूप बघून वीरच तोंड बघण्यासारख झालं. भूषणने त्याचे आ वासलेले तोंड बंद केले.
"हा तुझीच होणारे... किती बघशील." भूषण हळूच वीरला म्हणाला.
"भूषण्या मला चिमटा काढ ही एवढी सुंदर हाय..." वीर ची नजर क्रांतीवरून हटत नव्हती. तेजश्रीने आपल्या होणाऱ्या जावेला बघितले आणि बघतच राहिली. पाटील, सुलोचनाबाई सुनेला बघून आश्चर्यचकित झाले.
" पोराची पसंत एक नंबर हाय." सुलोचना तेजश्रीला म्हणाली. क्रांती पाटावर येऊन बसली. सगळेजण क्रांतीकडे बघत होते. सुलोचना, तेजश्री आणि इतर बायकांनी तेजश्रीची ओटी भरली. सुलोचनाने सुनेला ठुशी आणि पायातले पैंजण दिले.
तेजश्रीने ओटी भरताना. मोहनमाळ आणि नथ दिली. एवढं सगळं बघून घरातले आणि गावातले लोक आश्चर्यचकित झाले.
"पोरीन नशीब काढल." सगळेजण एकमेकांना कुजबूजत होते. सुलोचनाने सुपारीची साडी तिच्या हातात दिली. क्रांती साडी घेऊन आत गेली. बाकीच्या मंडळींचे तोपर्यंत चहा नाश्ता सुरू होता. क्रांती आवरून आली.



आता फक्त वीर चक्कर येऊन पडायचा राहिला होता.
"जागे व्हा... बदल्याचा मूड गेला वाटत." भूषण हसला.
संग्राम राहून राहून तेजश्रीकडे बघत होते. तीच घरातल्यांसाठी करणं... एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची स्वतः घेतलेली जबाबदारी सगळं तो बघत होता. सगळं नीटनेटकं आणि व्यवस्थित आणले होते. फळांच्या टोकऱ्या व्यवस्थित सजवून मांडल्या होत्या. हार सजवलेल्या ताटात काढून ठेवले होते. तांदूळ, गहू, गुळ, साखर, वेगवेगळ्या डाळी सगळं अगदी छान मांडून ठेवलं होतं. साखरपुड्याची साडी, त्यावरचे दागिने, ब्लाउज, मेकअपचे साहित्य सगळं व्यवस्थित... मग आपण का भरकटत होतो. याची जाणीव त्याला राहून राहून होत होती.
सरपंचांनी दोन दगडांच्यामध्ये पाच सुपार्या ठेवल्या.
"मुलगी आणि नारळ एवढंच ना...?" सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले. पाटील हो असे म्हणल्यावर सुपारी फुटली. न राहून क्रांतीने वीरकडे पाहिले. तिच्या डोळ्यात त्याला आसवं दिसली. त्याने मानेनेच रडू नको असे खुणावले. क्रांतीने मान खाली घातली. सरपंचाने 2 महिन्यांच्या तारखा काढायला लावल्या. क्रांतीच्या हातात तेजश्रीने साखरपुड्याची साडी दिली. त्यावर तिने खास आणलेले दागिनसुद्धा दिले. तेजश्रीने सुद्धा क्रांतीच्या डोळ्यांत पाणी पाहिले. क्रांती हसून आत गेली. रत्ना आणि चिनू तिच्यासोबत आत गेल्या.
"तायडे दाजी काय भारी दिसत्यात ना?" क्रांतीने तिच्याकडे दुर्लक्ष केले.
"क्रांते नाराज झालीस सगळ्यांना कळतंय तुझ्या अश्या चेहऱ्यामुळं...आता ठरलं ना मग ज सामोरी,तुला अस हताश बघायची सवय न्हाय. जे झालय त्याला आता कोण बदलू शकत न्हाय पण तुला मात्र बदलावं लागणार हाय. हे बारीक तोंड करण्यापेक्षा हास... बघ अजून छान दिसशील. अन तुझं अस बारीक झालेले तोंड बघून दादा, आई अन संतुला बर वाटल का?" तेवढ्यात संतू आला.
"आर अजून झालं न्हाय. आवर पटकन." संतुला बघून क्रांती ढसाढसा रडायला लागली.
"आता न्हाय रडणार. जे हाय ते हाय त्याला जाईन मी सामोर... मी आलेच 15 मिनिटात." संतुच्या डोळ्यात पाणी आलं त्याने रत्नाकड पाहिलं.
"संतू तुम्ही जा मी आले घेऊन तिला." क्रांतीला चिनू आणि रत्नाने तयार केलं.
"बघ सगळे चांदीच दागिन... ही लोक किती करतायेत." रत्ना
"तायडे हे बघ चांदीचे तोडे...किती जड ..." सगळी आभूषणे घातल्यावर क्रांती एखाद्या देवीसारखी दिसत होती. ती आवरून बाहेर आली. आता मात्र वीरला काहीही सुचत नव्हते. त्याची अवस्था बघून भूषण आणि संग्राम हसू लागले.



वीर पाटावर उभा होता. दादांनी सरपंचांना वीरला कपडे द्यायला सांगितली. वीरला नाम ओढून हातात कपडे आणि वीरला सोन्याची चैन घातली.
" दादासाहेब हे कशासाठी??? खरच हे नको." आबा म्हणाले.
"अहो हे जावई न्हाय तर आमचा पोरगा व्हानारेत. अन नवीन नात जुळणार म्हंटल्यावर आमच्याकडून काही नको का. असुद्यात न्हाय म्हनू नका." दादा खूप प्रेमाने बोलले मग आबा नाही म्हणू शकले नाही.
दोघांना जवळजवळ यायला सांगितले. तेजश्री,भूषण संग्राम सगळे वीरच्या बाजूला उभे राहिले आणि संतू, चिनू,रत्ना क्रांतीच्या बाजूला... वीरने तेजश्रीच्या हातामधून अंगठी घेतली. आणि क्रांतीकडे पाहिले. क्रांतीने हसून वीरच्या हातात हात दिला वीरने क्रांतीच्या हातात अंगठी घातली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. रत्नाने क्रांतीच्या हातात अंगठी दिली. वीरला क्रांतीच्या चेहऱ्यावर हसू बघून बर वाटल.

तिने अंगठी घातली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. एकमेकांच्या सोबत उभे राहिल्यावर जोडा उठून दिसत होता. "तायडे लग्नाची तारीख 20 नोव्हेंबर काढली बर. ऑक्टोबरमध्ये लग्नाचे मुहूर्त न्हाईत दाजींन अजून 15 दिवस मिळाले तुला पटवायला." चिनू क्रांतीच्या कानात हळूच म्हणाली.



क्रांतीने एकदा सुद्धा वीरकडे पाहिले नाही. पण वीरमात्र क्रांतीने एकदा बघावं म्हणून वीर तडपडत होता. सगळे जेवायला बसलो. क्रांती आणि वीर एकमेकांच्या सोबत बसले पण एकही शब्द न बोलता जेवत होते. क्रांतीला जेवता जेवता ठसका लागला. वीरने पटकन तिला पाणी पाजले. क्रांतीने एक नजर त्याच्याकडे पाहिले. वीरला हायसे वाटले. क्रांतीला पहिल्यांदा त्याच्या काळजीची जाणीव झाली.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत

वीर- नितीश चव्हाण (लागीर झालं जी फेम)
क्रांती- अश्विनी महांगडे (स्वराज्यरक्षण संभाजी महाराज फेम राणूआक्का, आई कुठे काय करते- अनघा )
तेजश्री -वैशाली भोसले( रंग माझा वेगळा फेम)
संग्राम - संग्राम साळवी (देवयानी फेम)

( माझ्या स्टोरी मध्ये जे शोभतील तेच कॅरॅक्टर घ्यावेत अस वाटत होतं. स्वतः विचार करते म्हणून अश्विनीशिवाय इतर कोणाचा लीड म्हणून चेहरा डोळ्यासमोर येते नाही. मैत्रीण म्हणून नाही पण ती एक उत्तम अभिनेत्री आहे हे मलाच नाही तर सर्वांना माहीतआहे. म्हणूनच अश्विनीसोबत चर्चा करून ठरवलेले कॅरॅक्टर घेतले. वैशूला मी निवडले. करण तिच्या दिसण्यात सोज्वळपणा आहे आणि ती सोज्वळ अभिनेत्री आहे. नितीशला मी आणि अश्विनीने निवडले कारण या आधी त्याबे खेडेगावात राहणाऱ्या मुलाची भूमिका केले आहे त्याचबरोबर तो उत्तम अभिनेता आहे. संग्राम सुद्धा संग्रामच्या पात्रासाठी उत्तम वाटला. म्हणून हे सगळे कॅरॅक्टर तुमच्यासाठी..नक्की या कॅरॅक्टर मधून स्टोरी इमाजिन करा आणि मला कळवा. कसा वाटला आजचा पार्ट??? धन्यवाद तुमचीच भाग्या)