मल्ल प्रेमयुद्ध - भाग 16 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 16

मल्ल- प्रेमयुद्ध





सकाळी 9 वाजता सगळे नाश्ता करायला एक हॉटेलमध्ये थांबले. संग्रामने सगळ्यांच्या पसंतीचा नाश्ता विचारून ऑर्डर केली. क्रांती अजूनही नॉर्मल नव्हती. तिने दादांना फोन केला. नाश्ता करायला थांबलो आहोत. नाश्ता करून इथून निघू. सांगून फोन ठेवून दिला. वीर फ्रेश होऊन नेमक्या क्रांतीच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसला. क्रांतीने पटकन अंग चोरून घेतले. वीरला उगीच तिच्याजवळ बसलो असे वाटले. पण पर्याय नव्हता दुसरीकडे जागाच नव्हती. सगळ्यांनी नाश्ता केला आता संग्राम गाडी चालवायला बसला. साहजिकच त्याच्या शेजारी आता तेजश्री बसणार होती पण ती मागचा दरवाजा उघडून बसणार तोच वीरने आवाज दिला.


"वहिनी तुम्ही पुढं बसा. असंही घरातले सगळे असत्यात तवा तुमास्नी दादाबरोबर पुढं बसायचा आनंद घेता येतन्हाय." तेजश्रीने संग्रामकडे बघितले. संग्रामनेसुद्धा मान हलवून मान्यता दिली. तेजश्री पुढे बसली. क्रांतीजवळ वीर मधल्या सीटवर बसला आणि मागे रत्ना, चिनू आणि संतू बसला. चिनूची जाम बडबड सुरू होती. वीर त्यांच्या गप्पांमध्ये रंगून गेला होता.

"दाजी तायडीची एक गंमत सांगू का तुमास्नी?" चिनूने क्रांतीकडे बघितले. क्रांतीने तिच्याकडे बघून डोळे वटरले. आता ही बाई काय सांगणार याची काळजी क्रांतीला आणि उत्सुकता इतरांना लागली होती.
"आमच्या गावात मंजी तायडीची वर्गात एक पोरगा व्हता. त्याला तायडी लय आवडत व्हती म्हंजी अजून आवडती." चिनू
"चिनू कायपण काय सांगतीस अग..." क्रांती चिडली. वीर गालातल्या गालात हसत होता. तिची अवस्था बघून सगळ्यांनाच हसायला येत व्हते. चिनूने तिच्याकडे दुर्लक्ष केले.
"तो रोज तायडीच्या मग घरापर्यंत यायचा. संतू दादाला पण समजलं व्हत पण त्याला म्हाइत व्हत की ह्या पोराची आता वाट लागणार हाय..." चिनूला पुढं बोलताना क्रांतीने दोन तीन वेळा अडवलं.
"व्हय का मग पुढं काय झालं???" तेजश्रीने आश्चर्याने विचारले.
"आव वहिनी काय बोलू नका दुसऱ्या दिवशी तो तायडीची वाट अडवून तिला सांगायला लागला की मला तू लय आवडतीस पण तायडीची सटकली. पुढं काय बोलायच्या आता त्याचे पुढचे दोन दातच पाडल. बिचारा विव्हळत घरी गेला..." सगळे पोट धरून हसायला लागले. क्रांतीच्या चेहऱ्यावर खूप राग होता. तेजश्रीला ते समजले.
"चिडती का ग? अग हित कोणी तुला काय म्हणणार न्हाय. गंमत चालू हाय न... कशाला चिनुकडं रागानं बघती. हे बघ आम्ही परके आहोत का?"
"क्रांते अग मजा कधी कळणार तुला? आता तू मिक्स व्हायला पाहिजे का नको?" संतू समजवणीच्या सुरात म्हणाला.
" ते जाऊ द्या मजा तर पुढचं हाय..." चिनू उत्साहाने सांगायला लागली. क्रांती आणखीच चिडली.
"हा आता पूर्णच सांग अशी पण तुझी बहीण तुझ्यावर चिडली. पुढचं काय अजून सांगितलंस तर बहुदा तुझं दात पडायच आज..." वीर प्रेमाने क्रांतीकडे बघत होता तर हसत चिनुकडं बघत व्हता.
"दाजी असुद्या तवा त्या पोराला वाचवायला कुणी नव्हतं आता मला वाचवायला तुम्ही सगळी हाय... बर एका त्याच दिवशी रात्री त्या पोराला घेऊन त्याच आई वडील दादांकड आलं. म्हणाल तुमच्या पोरीन आमच्या पोराची काय अवस्था करून ठेवली बघा... दादा म्हणाले माझ्या पोरींन सगळं सांगितलंय मला... तुमचा पोरगा क्रांतीच्या माग माग रोज येत व्हता पोरीचा पाठलाग केला तर आणखी काय व्हणार? दादा म्हणाल. "आव पण मोठ्या मानसासनी सांगितल असत तर काय फरक पडला असता व्हय. आता ह्याच ह्या वयात दात पडलं तर ह्याच लग्न तरी जमलं का? त्याची आई काकुळलतीला येऊन म्हणत व्हती. पोराला आधी नीट वळणं लावलं असत तर ही वेळ आलीच नसती ना.. आई म्हणाली. बिचारे गप गुमान निघून गेले. आणि आता तर बिचाऱ्याला जस समजलंय तायडीच लग्न ठरलय तस तर..." चिनू जोरजोरात हसायला लागली.
" वा वा क्रांती आता त्या पोराची कुठल्या पोरीकड डोळे वर करून बघायची हिम्मत व्हाणार न्हाय." संग्राम म्हणाला.
"अश्याच पोरी पाहिजे पोराला घेऊन आई तुमच्या घरी आली..." तेजश्री मोठ्यामोठ्याने हसायला लागली.
"खरच लई भारी... एवढी मोठी आणि चांगली आठवण तुम्ही चिनूला सांगायला अडवत व्हता मंजी काय??? आम्हाला समजलं तरी की तुम्ही एकट्या कुठपन जाऊ शकता अन प्रत्येक मुलीला हे जमायला पाहिजे." वीर क्रांतीकड बघून म्हणाला. क्रांतीच्या डोळ्यांतन पाणी आलं.
"आव तुम्ही राडताय कशापायी...?" वीरने तिचे डोळे अलगत पुसले. वातावरण शांत झाल. वीरला समजणं आता काय करावं? त्याने तिचा हात हातात घेतला.
" वाघिणीला अस रडणं शोभत न्हाय... ह्याच वाघिणीवर आम्ही भाळलो आणि तुम्ही रडताय." क्रांतीला वीरचा बोलणं ऐकून अजूनच रडू आलं. तिने तिचा दुसरा हात त्याच्या हातावर ठेवला अन हसली.
" thank you." क्रांती.
वीर पुन्हा हसला त्याला हायस वाटलं. न्हायतर कुठंतरी त्याच्या मनात व्हत की आता आपलं पण दात पडत्यात वाटत.

"संग्रामदादा गाडी थांबवा." चिनू परत जोरात ओरडली गाडी घाटात वळणावळणाच्या रस्त्याने पिंगे घेत चालली होती.
"काय ग चिनू उलटी आली का?" रत्नाने विचारले.
"सगळे कपल रोमान्स मधी बिझी... भायर बघा..." चिनू म्हणाली तसे सगळ्यांनी बाहेर बघितलं. बाहेर घाटातून धुके वरती येत होते. दरी हिरवाईने नटून जणू धुक्याचं पांघरूण घेत होती अस वाटत होतं. आता धुकं वर वर येईल असं वाटत होतं. गाडी बाजूला घेतली आणि सगळे खाली उतरले. जवळून हे दृश्य बघताना कोणाच्या तोंडुन एक शब्द फुटत नव्हता. सगळेच अवाक झाले होते. सगळे फोटो घेण्यात गुंग झाले. प्रत्येकजण निसर्गाच्या बरोबर फोटो घेण्यात मग्न झाला होता.
"दाजी माझा फोटो काढा." चिनू वेगवेगळ्या पोज देत होती अन वीर तिचे फोटो घेत होता. संग्राम तेजश्री, रत्ना आणि संतू एकमेकांचे जोडीनं फोटो काढत होते.
" दाजी आता तायडी अन तुम्ही उभं राहा मी काढते तुमचं फोटो." क्रांती वीरच्या थोड्या अंतरावर जाऊन उभी राहिली.
"दाजी जर जवळ जा." वीर तिच्या जवळ जाऊन उभा राहीला.
"आता हसला तरी चाललं??" दोघेही हसले.
"आता दाजी तायडीची खांद्यावर हात ठेवा." वीरने तिच्याकडे बघितले ती खूप अस्वस्थ वाटली. वीरने खांद्यावर हात ठेवला नाही पण तो खूप छान हसला. क्रांतीला सुद्धा हायस वाटलं ती सुद्धा मनापासून हसली.
आता लांबच्याच पण चांगल्या पोज चिनू त्या दोघांना देत होती. बरेचसे फोटो काढून झाले. चिनूने दोघांनासुद्धा फोटो पाठवले. गाडी परत सुरू झाली. दुपारचे दोन वाजले होते. सगळे एक हॉटेलमध्ये जेवायला थांबले. मस्त मटणावर ताव मारला आणि गाडीत बसले. अजून दोन तास पोहचायला लागणार होते. संतू गाडी चालवायला बसला त्याच्या बाजूला संग्राम बसला. तेजु पुन्हा मागे जाऊन बसली. मागची गॅंग अर्ध्या तासातच डुलक्या मारायला लागली. बराच वेळ आपली झोप क्रांतीने थोपवून ठेवली होती. पण गर वार लागल्याने तिलाही झोप आवरेना. तिचे डोळे मिटायला लागले. तिची झोप लागली. वीर एकटक तिच्याकडे बघत होता. चेहऱ्यावर भुरभुरणार्या केसांमुळे तिचे रूप अजून सुंदर दिसत होते. तिची मान इकडून तिकडून हलत होती. शेवटी आधार मिळाला. वीरच्या खांद्यावर ती विसावली. आणि छान झोपून गेली. वीरला तीच नकळत अस हक्कानं खांद्यावर झोपून आवडलं. तोही सावरून बसला. संग्राम त्याच्याकडे बघून हसला आणि हाताने छान म्हणून खुणावले.

रत्नागिरीत पोहोचल्याचा खुणा दिसायला लागल्या. उंचीच्या उंच नारळाची झाड दिसायला लागली. निळ्याशार समुद्राचे दर्शन रस्त्यावरून व्हायला लागलं. मधून अधून दिसणार्या बोटी...पक्षी, झाड मन प्रसन्न करत होते. रत्नागिरीतच वीरच्या आत्याचं घर होत. घर आलं. गाडी एक टुमदार बंगल्याच्या अंगणात येऊन थांबली. गाडी थांबली तसे सगळे उठले. क्रांतीला जग अली एन्व्ह आपण वीरच्या खांद्यावर झोपलो हे तिच्या लक्षात आले. ती सावरून बसली. केस नीट केले.
"असुद्या काही वाटून घेऊ नका. तुमची झोप लागली व्हती चांगली म्हणून मला सुद्धा तुम्हाला जग करायला जीव झाला न्हाय. चला पोहोचलो आपण." सगळे गाडीतून उतरले. आत्या बाहेर आली. आत्या पाठोपाठ मामा, मामाच्या दोन मुली, एक मुलगा असे सगळे भायर आले. आत्याने सगळ्यांचे स्वागत केले. संग्रामने सगळ्यांची ओळख करून दिली. संग्राम अन तेजश्री आत्या मामांच्या पाय पडली. वीर क्रांती सुद्धा पाया पडली.
"व्हय आत्याला नाराज करून ह्या पोरीशी लगीन जमवलस न्हवं... माझी पोर आपली आशेवर राहायली. काय बघितस बाबा ह्या पोरीत बघू..." आत्याने क्रांतीकड बघितलं पाहिले तर आत्या काय बोलत्याच हे संग्राम, वीर अन तेजुशिवाय इतर कोणालाच समजलं नाही. रत्ना आणि संतू सुद्धा आत्या मामांच्या पाय पडले. चिनूने सुद्धा संस्कार दाखवले. सगळे आत गेले. चहापाणी झाले. आत्याची मोठी मुलगी सतत रागाने क्रांतीकड बघत होती. हे क्रांतीला जाणवलं होत. वीरने क्रांतीकडे पाहिले अन डोळ्याने शांत राहा असे खुणावले.







क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत

( पोहचले सगळे रत्नागिरीत. आता इथून पुढे नक्की मजा येणार आहे. आत्याची मुलगी हिच्यामुळे वीर आणि क्रांती आता अजून दुरावतील की त्यांची जवळीक जास्त वाढेल?? आत्या सगळ्यांशी नीट वागेल का? रत्नागिरीत सगळी मंडळी फिरायला जाणार आहेत आत्याच्या मुलांसोबत. क्रांती चिडेल की आणखी काही होईल. नक्की वाचा पुढच्या भागात. तुमचीच भाग्या...)