पुरुष जन्म एक अभिशाप (लेख) Gajendra Kudmate द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुरुष जन्म एक अभिशाप (लेख)


नमस्कार मित्रांनो, संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती हे एक् रहस्यच आहे. माझे तर मत आहे की हे देव निर्मित आहे. कुणाला यावर आपेक्ष असू शकतो कारण सगळ्यांचे वेगवेगळे मत असू शकते.
तर मित्रांनो, पुरुष आणि स्त्री दोघेही देवाची सुंदर अशी कलाकृती आहे हे तुम्हाला माहीतच आहे. दोघांचे शरीर सोडता त्यांत मन भावना कर्तुत्व सारखेच आहेत. पुरुषाला आपण नर नारायण तर स्त्रीला नारी नारायणी अशा अनेक नावांनी संबोधतो. त्यांना माय, आई, देवी म्हणून उच्च असे स्थान देतो हे खरेही आहे. कारण जन्म आपुला त्या मातेचा उदरातून आहे आणि ती सदैव आपुल्या करीता पूज्यनीय आहे. पण आपण यात पुरुषाला का बर विसरतो, त्याचा पण यात मोलाचा वाटा असतो. त्याकडे आपण का बर दुर्लक्ष करतो.
मी मनापासून मानतो की काळावर काळ उलटून गेले स्त्रीवर अत्याचार होत आले. ते शारीरिक असोत अथवा मानसिक छळ तीचा कायम होतंच आला. कारण त्या वेळेस कायदे न्हवते, अतिशयोक्ति म्हणार नाही तर ते पुरुष प्रधान होते. स्त्रीला अबला समझुनी वस्तू सारखा तीचा वापर होतंच होता. परंतु तेव्हाही काही पुरुष होते जे स्त्रीचा मानसन्मान आणि काळजी करीत होते. आता काळ बदललेला आहे, आजची स्त्री अबला नव्हे तर सबला झालेली आहे. तिला नवनवीन कायदे तीचा स्वसंरक्षणासाठी भेटलेले आहेत. ही आनंदित होण्यासारखी बाब आहे. स्त्रियांच्या साठीच नाहीतर संपूर्ण पुरुषांसाठी सुद्धा.
तर मित्रांनो, मुद्दा असा आहे की कायदा हा असतो चांगल्या गोष्टींसाठी वाईट गोष्टींसाठी नाही. आज पुष्कळ असे चित्र दिसत आहेत की कायद्याचा गैरवापर करुनी काही स्त्रिया चुकीचे काम करत आहेत. आज जर कुणाही स्त्रीने एखाद्या पुरुषावर आरोप केले तर शंभर लोकं तीचा पाठीशी उभे होतात. फारच चांगली गोष्ट आहे आणि व्हायलाच पाहिजे. परंतु विसरू नका त्या लोकांत तिचे भाऊबंद वडील आणी मित्र हे सगळे पुरुष असतात. जे
एक पुरुष असून दुसऱ्या पुरुषाचा विरोधात उभे असतात. यात सगळ्यात वरती नाव येते घरेलु हिंसा या कायद्याचे. एखाद्या स्त्रीने तीचा पतिवर या कायद्या अंतर्गत तक्रार केली जर ती खोटी का नाही असो तिचे भाऊबंद वडील आणी मित्र सत्य जाणत असून सुद्धा त्या स्त्रीचे समर्थन करतात. कारण कायदा स्त्रीकडून आहे. कायद्याचा वापर करून ती स्त्री तीचा पतीला त्रास देते. त्याला कोर्टात खेचते, त्याचाकळून मासिक खंडणी, पोटगी घेते. चांगली गोष्ट आहे द्यायलाच पाहिजे, परंतु तेव्हा जेव्हा ती स्त्री खरं बोलत असेल अन्यथा नाही मिळायला पाहिजे. काही लोकांना माझे बोलणे आवडणार नाही. काही लोक म्हणतील की कायद्यात तरतूद आहे की पुरुषाकडे पुरावा असेल तर तो स्वतःचे रक्षण करू शकतो. परंतु जर त्याचाकडे पुरावा नसेल तर स्त्री जशी म्हणेल तसेच होते. आज एवढे कायदे बनले आहेत की एखाद्या स्त्रीकडे बघणे यालाही गुन्हा मानला जातो. अहो स्पर्श तर दूरच राहिले. मात्र ती पुरुषांकडे पाहू शकते, पुरुषांना कसेही स्पर्श करू शकते. कारण कायदा तिच्या बाजूने आहे . हीच गोष्ट तीच्या भाऊबंद वडील आणि मित्रांना याचं भान असते. म्हणून ते काहीही आणि कसेही करुन तिच्या पतीला छडतात आणि म्हणतात हा कायदा फारच चांगला म्हणजे फायदेशीर आहे.
सारखी परिस्थिती जर मुलीच्या भाऊबंद वडिल आणि मित्रांवर ओढावली तर स्त्रीला आणि तिच्या भाऊबंद वडिल आणि मित्रांना हा कायदा वाईट वाटतो. असं का बरं जेव्हा बाजू तुमच्या बाजूने असते तेव्हा तुम्हाला तो पुरुष गुन्हेगार वाटतो आणि स्वतःवर वेळ आली तर आम्ही निष्पाप प्राणी आहोत असे वाटते . अहो जेव्हा त्या मुलीचा पतीला त्रासात बघून त्या स्त्रीला आनंद होतो तर त्या स्त्रीच्या भाऊबंद आणि मित्राला त्रासात बघून दु:ख होते. तिच्याच रक्षणासाठी केलेला कायदा तिला खोटा आणि व्यर्थ वाटू लागतो .
कायदा येथे एकच आहे फक्त व्यक्ती येथे बदलत आहे. त्यानुसार वापर करण्याची मानसिकता बदलती आहे. हे सगळं मी स्वतः पुरुष आहे म्हणून नाही म्हणत आहे. मी स्वतः माझ्या जीवनात हे सगळं अनुभवलं आहे. वारंवार ऐकलं आहे महिला मंडळ यात पुरुषसुद्धा असतात कधीकधी कानावर येते पीडित पुरुष मंडळ असतात काय यात स्त्रीया?
सर्वात आधी म्हणण्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांच्या मन भावना आणि कर्तुत्व सारखेच असते. जसे स्त्रीला दु:ख होते, त्रास होतो, ती रडते त्याचप्रमाणे पुरुषाला सुद्धा त्रास होतो, रडू येतं त्याची भावना दुखावू लागते. पुरुष जन्म त्याला अभिशाप वाटू लागते. पुरुषाला वाटू लागते माझ्या जीवनाचे काहिच अर्थ नाही. स्वतःचे जन्म त्याला एक दुःस्वप्न वाटू लागते.
शेवटी एकच बोलू इच्छितो वापर कायद्याच्या करा तो चांगल्या गोष्टींसाठी वाईट गोष्टींसाठी नाही. दोघांनाही आवर्जून सांगतो. जेवढी डेडिकेशन स्त्री करिता दाखवता तेवढीच पुरुषांबद्दल दाखवा. स्वतःला त्या ठिकाणी ठेवुनच परिस्थितीच्या विचार करा. कुठल्याही गोष्टींचा उद्रेक हा विनाशकारी ठरतो. असे जर होत राहिलं तर ज्या वेळेस खरंच एका स्त्रीला या कायद्याची गरज भासते तेव्हा तिला तसे समर्थन सगळ्यांकडून मिळत नाही. उलट निराशाच तीचा पदरी पडते. खरंच तिला या कायद्याची आवश्यकता असून तिला त्याचा उपयोग करता येत नाही. याला जिम्मेदार कोण?
स्वलिखित

गजेंद्र गोविंदराव कूडमाते