Punha Navyane - 2 books and stories free download online pdf in Marathi

पुन्हा नव्याने - 2

भाग २
मीराला असं समोर बघून राजीव शॉकच झाला. काय बोलायचे त्याला सुचेना. मीराला राग अनावर होत होता.
हे काय चालले आहे राजीव. "
त्या तरुणीला काही सुचेना की अचानक ही कोण बाई आली. राजीव शी असं का बोलते आहे .

ती तरुणी, " ओ मॅडम कोण आहात तुम्ही? तुम्हाला माहीती तरी आहे का तुम्ही कोणाशी बोलताय? "

मीरा, " मला चांगलेच ठाऊक आहे मी कोणाशी बोलते आहे. मी माझ्या नवऱ्याशी बोलतेय आणि तू आमच्य मध्ये अजिबात बोलायचे नाही. " मीरा म्हणाली.
राजीव, " अनया तू ऑटो करून घरी जा . "
अनया म्हणजे जी तरुणी राजीव बरोबर बोलत होती ती.
( अनया २७ वर्षांची गोरीपान , वेल मेंटेन फिगर, स्टायलिश, हाय लाईट केलेले केस, राहणीमान एखाद्या मॉडेल सारखे.)

अनया, " अच्छा तर तुम्ही राजीव ची बायको आहात तर.. बरं झालं तुम्हाला समजलं ते आमचे नाते. "अनया उद्धटपणे म्हणाली.

मीरा, " काय नातं आहे गं तुमचं ? चल नीघ इथून परत माझ्या नवऱ्याबरोबर दिसलीस ना तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल. "

अनया काहीतरी बोलणार होती पण राजीव ने तिला पटकन रिक्षात बसवून दिले. मीराचा बी पी हाय झाला. तिला भोवळ येऊ लागली रागिणी ने तिला पटकन पकडले.
रागिणी, " मीरा मीरा काय होतं तुला? प्लीज डोळे उघड."
रागिणी च्या आवाजाने अनया ला सोडायला गेलेल्या राजीव ने मागे वळून बघितले. रागिणी ने त्याच्या कडे मदतीच्या अपेक्षेने बघितले. मीरा ला असे पडलेले बघून तो धावत तिच्याजवळ आला. गाडीतून पाण्याची बाटली काढून ते मीराच्या चेहऱ्यावर मारले पण तरीही ती शुद्धीत येत नव्हती. दोघांनी मिळून मीराला गाडीत ठेवले आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.
गाडी त पण रागिणी तिला उठवायचा प्रयत्न करत होती. पण मीरा उठली नाही. जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये मीराला ते घेऊन गेले. डॉक्टरांनी तिला ॲडमीट करून घेतले. मीराला त्यांनी ट्रिटमेंट द्यायला सुरुवात केली. थोड्यावेळाने मीरा शुद्धीवर आली. रागिणी तिच्या जवळ बसून होती. तिला सलाईन लावले होते.
रागिणी, " मीरा कसं वाटतयं आता? मीरा रागिणी ला मिठी मारून रडू लागली. रागिणी ने तिला शांत केले. राजीव पण बाहेर थांबला होता. तो आत आला. मीरा ची माफी मागू लगला.
राजीव, " मीरा आय एम सॉरी. माझं चुकलं मीरा. मला माफ कर. "
मीरा, " माझं काय चुकल, राजीव. ज्याची मला ही शिक्षा दिली तुम्ही. "
इतक्यात डॉक्टर आले. मीराला रडताना बघून त्यांनी तिला समजावलं
डॉक्टर, "कसं वाटतयं तुम्हाला आता? " डॉक्टर म्हणाले.
मीरा, " बरं वाटतयं आता. मी घरी जाऊ शकते का डॉक्टर ? "
डॉक्टर, " जर असं सारखं सारखं रडणार नसाल तरच घरी सोडणार तुम्हाला. मला माहीत नाही तुमचा काय प्रॉब्लेम आहे. पण रडून प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे का?
त्यासाठी तुम्हाला खंबीर बनून आलेल्या संकटाला सामोरे जायला हवं की नको. "
मीरा, " हो डॉक्टर. "
डॉक्टर राजीव कडे बघून म्हणाले, " तुम्ही येता का? डिस्चार्ज पेपर पण बनवायचे आहे. "

राजीव आणि डॉक्टर च्या केबिन मध्ये गेले.
डॉक्टर, " बसा मिस्टर राजीव, हे बघा मिस्टर राजीव त्यांना कुठल्यातरी गोष्टींचा खूप मोठा धक्का बसला आहे. पण यापुढे त्यांना सांभाळावं लागेल. पुन्हा जर त्यांना असा काही त्रास झाला तर त्या डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात. अचानक आलेल्या स्ट्रेस मुळे त्यांना असं झालं. त्यामुळे यापुढे त्यांची काळजी घ्या.
राजीव आणि रागिणी मीराला घेऊन घरी आले. रागिणी ने तिला गोळ्या कश्या घ्यायच्या ते सांगितलं. आणि रागिणी तिच्या घरी निघून गेली. राजीव ने बाहेरुन जेवण मागवलं ते घेऊन तो मीराच्या रुममध्ये गेला.
राजीव, " मीरा, थोडं खाऊन घे. गोळ्या घ्यायच्या आहेत ना. "
पण मीरा काहीच बोलली नाही. राजीव ने तिला उठून बसवले.
राजीव, " मीरा माझं खरचं चुकलं गं. प्लीज मला माफ कर मीरा. "
मीरा, " राजीव लग्न झाले त्यावेळी तुझ्या नोकरी ची पण खात्री नव्हती. किती कष्टात दिवस काढले पण कधी तुझ्याकडे तक्रार केली नाही. तुझ्या आईवडिलांना मी आपले मानून त्यांच सगळं दुखलं खुले केलं . घरा साठी मी माझं करियर सोडून दिले. हे सगळं जे चालू आहे ते तुझ्यासाठी च आहे ना. माझं असं काय चुकलं ते सांग? "




राजीव काय बोलतो ते बघूया पुढच्या भागात.
हा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियेतुन नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED